दाजीपूर अभयारण्य माहिती Dajipur Abhayaranya Information in Marathi

dajipur abhayaranya information in marathi दाजीपूर अभयारण्य माहिती, आज आपण या लेखामध्ये कोल्हापूर आणि सिंधूदुर्ग सीमेवर वसलेले असे सुंदर दाजीपुर या अभयारण्यविषयी माहिती घेणार आहोत. दाजीपुर या अभयारण्याचे वैशिष्ठ्य म्हणजे त्या भागामध्ये असणारे राधानगरी धारण, सुंदर आणि मनमोहक पक्षी आणि विपुल वन्यजीव. दाजीपुर अभयारण्याला राधानगरी वन्यजीव अभयारण्य म्हणून देखील ओळखले जाते आणि हे अभयारण्य २०१२ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वसलेले एक सुंदर अभयारण्य आहे आणि या ठिकाणाला नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळालेली आहे.

दाजीपुर हे अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या शहरापासून ३० किलो मीटर अंतरावर आहे आणि हे कोल्हापूर पासून ८० किलो मीटर अंतरावर आहे आणि हे पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या शेवटच्या दक्षिण टोकावर आहे आणि हे समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंचीवर आहे. दाजीपुर हे वन्य हरीण, गवा, चितळ, बायसन, सुंदर पक्षी आणि इतर अनेक नेत्रदीपक वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे ते घर आहे.

पक्षीप्रेमींच्यासाठी किंवा निरीक्षकांच्यासाठी हे अभयारण्य नंदनवन आहे तसेच पावसाळ्यामध्ये दाजीपुर हे एक सुंदर असे पिकनिक स्पॉट आहे ज्याठिकाणी नाले खळखळ आवाज करत वाहत असतात आणि डोंगराच्या विविध ठिकाणी लँडस्केप मधून मार्ग काढतात त्याचबरोबर दाजीपुर या जंगलामध्ये गगनगिरी महाराजांचा मठ देखील आहे. दाजीपुर या अभयारण्यामध्ये पक्ष्यांच्या एकूण २६४ प्रजाती आहेत तसेच ४७ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आहेत, ५९ सरपटनाऱ्या प्रजाती, ६६ फुलपाखराच्या प्रजाती अश्या प्रकारे ६६ प्रजातीचे निवासस्थान दाजीपुर अभयारण्य आहे.

dajipur abhayaranya information in marathi
dajipur abhayaranya information in marathi

दाजीपूर अभयारण्य माहिती – Dajipur Abhayaranya Information in Marathi

अभयारण्याचे नावदाजीपुर अभयारण्य
जिल्हाकोल्हापूर
जवळचे ठिकाणराधानगरी
स्थापना२०१२

दाजीपुर अभयारण्यमधील प्राणी, पक्षी आणि वनस्पती

दाजीपुर हे वन्य हरीण, गवा, चितळ, बायसन, सुंदर पक्षी आणि इतर अनेक नेत्रदीपक वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे ते घर आहे. या ठिकाणी ४५० ते ५०० पर्यंत बायसन, ४ वाघ, ७० जंगली कुत्रे, १४० बार्किंग डीअर, ५ रानडुक्कर अश्या प्रकारचे अनेक उभयचर प्राणी आहेत. त्याचबरोबर ज्या लोकांना पक्षी निरीक्षण करण्यास आवड आहे.

त्यांच्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे कारण या ठिकाणी अनेक पक्षी पहायला मिळतात जसे कि बुलबुल, गिधाडे, गरुड, फ्लायकॅचर, वॅगटेल्स, काही लहान पक्षी आणि जंगली पक्षी असे अनेक पक्ष्यांचे प्रकार या अभयारण्यामध्ये आपल्याला पहायला मिळतात. त्याचबरोबर हे जंगल खूप घनदाट असल्यामुळे या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जंगली वनस्पती देखील पहायला मिळतात ज्या अनेक आरोग्यफायद्यासाठी देखील खूप उपयुक्त असतात जसे कि रनमिरी, मुरुडशेंग, कढीपत्ता, करवंदा, वागती, आवळा, तमालपत्री, जांभूळ, कुंभ, बिब्बा, उभंर, अजनी आणि इतर अनेक वनस्पती आपल्याला पहायला मिळतात.

दाजीपुर अभयारण्यविषयी महत्वाची तथ्ये – facts 

  • दाजीपुर हे कोल्हापूर जवळील एक प्रमुख ठीकानापैकी आहे आणि हे १९५८ मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेत होते अंग १९८५ मध्येमहाराष्ट्र सरकारने राधानगरी जलाशय, काळमवाडी जलाशय, पाणलोट खोऱ्यासहजंगलाचे अतिरिक्त क्षेत्र हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.
  • दाजीपुर अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ हे ३५१ चौ. किलो मीटर इतके आणि राज्यामध्ये बायसन अभयारण्य म्हणून प्रसिध्द असलेले हे २०१२ पासून हे नैसर्गिक श्रेणीचे जागतिक वारसा स्थळ आहे.
  • दाजीपुर हे अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या शहरापासून ३० किलो मीटर अंतरावर आहे आणि हे कोल्हापूर पासून ८० किलो मीटर अंतरावर आहे.
  • या अभयारण्यामध्ये बायसन, हरण, जंगली कुत्रे, वाघ, बिबट्या प्राणी आहेत, तसेच या ठिकाणी सुंदर पक्षी देखील पाहायला मिळतात.
  • दाजीपुर अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम वेळ हा ऑगस्ट ते फेब्रुवारी हा काळ आहे.
  • अभयारण्याचे मुख्य वन्यजीव आकर्षण हे बायसन, सांभार हरणे, ठिपकेदार हरने आणि बिबट्या हे प्राणी आहेत.
  • राधानगरी धरण, काळमवाडी धरण, शाहू सागर धरण, गगनगिरी मठ, फोंडाघाट, राऊतवाडी धबधबा हि ठिकाणे अभयारण्याच्या जवळची पर्यटन ठिकाणे आहेत.
  • या ठिकाणाला नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळालेली आहे.
  • हे पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेवर दक्षिण टोकाला वसलेले आहे आणि येथून फोंडाघाट देखील जवळ आहे आणि कणकवलीला या मार्गाने पुढे जाता येते.

कसे पोहचायचे – how to reach 

या अभयारण्याला भेट देण्यासाठी आपण कोल्हापूर मधून बसने जाऊ शकतो कारण कोल्हापूर हे दाजीपुर अभयारण्यापासून ८० किलो मीटर अंतरावर आहे. जर तुम्हाला हे अभयारण्य पाहण्यासाठी मुंबई या शहरातून यायचे असेल तर मुंबई ते दाजीपुर हे अंतर ४९० किलो मीटर इतके आहे आणि तुम्ही या ठिकाणी स्वताची कार घेऊन येऊ शकता किंवा मग तुम्ही बसने, रेल्वेने किंवा विमानाने कोल्हापूरमध्ये येऊ शकता आणि तेठीन भाड्याने टॅक्सी घेवून किंवा बसने तुम्ही हे अभयारण्य पाहण्यास जाऊ शकता.

राहण्याची सोय – dajipur wildlife sanctuary timings

दाजीपुर या ठिकाणी अनेक पर्यटक अभयारण्य पाहण्यासाठी तसेच या घाटावर असणारी अनेक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येतात आणि काही त्याठिकाणी राहण्याची सोय देखील पाहत असतात आणि अश्या लोकांना काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण या ठिकाणी दाजीपूरचे जंगल रीसॉर्ट हे राहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे जे महाराष्ट्र सरकारद्वारे चालवले जाणारे एक युवा वसतिगृह आहे. ज्यामध्ये अगदी मुलभूत प्रकारचा निवास प्रधान केला जातो आणि या ठिकाणी जेवणाची देखील चांगली सोय आहे. तसेच काही अंतरावर राहण्यासाठी आपल्या खाजगी रीसॉर्ट सुध्दा मिळतात जे आपल्या कडून शुल्क आकारतात.

आम्ही दिलेल्या dajipur abhayaranya information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर योगासन चित्र सहित माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dajipur wildlife sanctuary timings या article मध्ये update करू, मित्रांनो हि atm information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!