पॉलिहाऊस माहिती मराठी Polyhouse Information in Marathi

Polyhouse Information in Marathi – Greenhouse Information in Marathi ग्रीन हाउस माहिती मराठी पॉलिहाऊस म्हणजे काय ? पॉलीहाउस म्हणजे पॉलिथिलीनपासून बनवलेले संरक्षणात्मक छाया घर होय. खरंतर, पॉलीहाउसचा उपयोग उच्च किंमतीच्या कृषी उत्पादनांसाठी केला जातो. याची रचना साधारणतः अर्धवर्तुळाकार, चौरस किंवा आयत आकारातअसते. पॉलीहाउसमध्ये बसवलेल्या उपकरणांच्या मदतीने पॉलीहाउसमधील तापमान, आर्द्रता आणि प्रकाश इत्यादी गोष्टी नियंत्रणात आणल्या जातात. आजकाल सगळीकडे जास्तीत जास्त ठिकाणी संरक्षित लागवडीखाली पॉलीहाऊस तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
या तंत्राने जर आपण हवामान नियंत्रित केले, तर इतर हंगामातही  आपल्याला शेतीची लागवड करता येते. पॉलीहाउसमध्ये तापमान आणि आर्द्रता या दोन गोष्टी प्रामुख्याने ठिबक सिंचनाद्वारे नियंत्रित केल्या जातात. पॉलीहाउसच्या मदतीने आपल्याला कृत्रिम शेती देखील करता येऊ शकते.

अशा प्रकारे, एकंदरीत आपल्याला पाहिजे तेंव्हा आपण आपल्याला हवे असलेले इच्छित पीक घेऊ शकतो. मित्रहो, पॉलीहाऊसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते, जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन हे कमीत कमी वेळेत आणि कमी जागेच्या ठिकाणी घेणे शक्य होते. खरंतर, पॉलीहाउस हे एक सिंगल आणि मल्टी स्पॅम प्रकारचे स्ट्रक्चर आहे.

polyhouse information in marathi
polyhouse information in marathi

पॉलिहाऊस माहिती मराठी – Polyhouse Information in Marathi

हरितगृह माहिती

पॉलीहाउसलाच आपण दुसऱ्या शब्दात हरितगृह असेही म्हणू शकतो. मित्रहो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हरितगृह म्हणजे नेमके काय? तर हरितगृह म्हणजे वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी सर्व भिंती आणि पूर्ण छत पारदर्शक असणारी काचेची  मानव निर्मित अशी एक कृत्रिम खोली. अशा प्रकारच्या खोलीला ‘ग्लास हाऊस’ असेही म्हटले जाते.

अति थंड असलेल्या प्रदेशात तापमानाचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे, अनेक झाडांना तसेच, वेगवेगळ्या जातीच्या वनस्पतींना असे हवामान सहन होत नाही आणि त्यांची योग्य अशी वाढ देखील  होत नाही.

कालांतराने, अशा हवामानामध्ये वाढणाऱ्या वनस्पती मृत होतात. म्हणूनच, अशा वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना जीवदान देण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था म्हणजे हरितगृह व्यवस्था होय. सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच युरोपात काचेच्या हरितगृहामध्ये निरनिराळ्या जातींच्या वनस्पतींची लागवड सुरू करण्यात आली आहे.

प्रो. इमरी केर्यस या केन्टुकी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने इसवी सन १९४८ साली पहिल्यांदा हरितगृहासाठी लोखंडी, अल्युमिनियम, लाकूड आणि बांबूच्या सांगाडयावर काचेच्या पारदर्शक आच्छादनाचा वापर त्यामध्ये करुन वनस्पतीची लागवड कशा प्रकारे करता येते, हे दाखवून दिले.

शिवाय, हरितगृहाचा दुसरा फायदा म्हणजे यामध्ये वाढवलेल्या वनस्पतींना वातावरणातील हानिकारक बदलांपासून आणि घातक असलेल्या सूर्य किरणांपासून वाचवणे शक्य होते. पॉलीहाउसमधील वनस्पतींना अति पाऊस, अति ऊन, धुके यांसारख्या अनेक गोष्टींपासून संरक्षण देखील मिळते.

यावरून, मित्रहो तुमच्या लक्षात आलं असेल की, पॉलिहाऊस किंवा ग्रीनहाऊस (हरितगृह) या दोन्ही एकच गोष्टी आहेत. पूर्वीच्या काळी हरितगृहे लाकडी सांगाड्यावर आच्छादनासाठी काच वापरून उभी केली जात असत आणि आताच्या काळी प्लॅस्टिक तंत्रज्ञानामध्ये झालेल्या सुधारणांमुळे फक्त काचेऐवजी प्लॅस्टिक वापरले जात आहे.

शिवाय, काचेच्या तुलनेत पॉलिथीनचा वापर हा स्वस्त असल्या कारणाने, आजकाल पॉलिथीन आच्छादने खूप लोकप्रिय झाली आहेत, त्यामुळे आता सगळीकडे  हरितगृहांना पॉलीहाउस असे देखील म्हटले जाते.

हरितगृह वायू

प्राथमिक हरितगृह वायूंमध्ये पृथ्वीच्या वातावरणात असलेल्या कर्ब द्वी प्राणीद मीथेन, नायट्रस ऑक्साईड, ओझोन वायू व पाण्याची वाफ इत्यादी वायुंचा समावेश होतो. हे वायू पृथ्वीच्या वातावरणामध्ये राहून अवरक्तप्रारणे शोषून घेतात व ती परत पृथ्वीवर परावर्तीत करतात. खरंतर, हे वायू पृथ्वीवरती हरितगृह परिणाम निर्माण करतात.

साधारणतः इसवी सन १७५० पासूनच म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीपासून मानवी क्रियाकलापांमध्ये कार्बन डाय ऑक्साईडच्या वातावरणीय एकाग्रतेत ४५% वाढ झाली होती. सामान्यतः जीवाश्म इंधन, कोळसा, तेल, नैसर्गिक वायू, जंगलतोड, जमीन वापरातील बदल, मातीची धूप आणि शेती इत्यादी गोष्टी मिळून मोठ्या प्रमाणात मानववंशिक कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन होते.

यामध्ये, प्रामुख्याने मानववंशिक मिथेन उत्सर्जनाचा प्रमुख स्रोत म्हणजे पशुसंवर्धन, गॅस, तेल, कोळसा आणि इतर काही उद्योगातून मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा घनकचरा, सांडपाणी आणि तांदळाचे उत्पादन हा आहे.

कार्य

सूर्योदय झाल्यानंतर सूर्याची कोवळी किरणे पॉलीहाउसच्या खोलीत शिरून, तेथील जमिनीला व वनस्पतींना ऊब देतात. त्यामुळे, सूर्याच्या किरणांनी पॉलीहाउसमधील तापमान वाढून त्याठिकाणी वनस्पतींसाठी अनुकूल असं पोषक वातावरण तयार होतं. पॉलीहाउसच्या खोलीतील उष्णता बाहेर जाण्यास जागा नसल्यामूळे या खोलीतील उष्णता त्याच ठिकाणी कोंडली जाते.

ज्यामुळे रात्रीच्या वेळी सुद्धा तेथील वनस्पतींचे कमी तापमानापासून संरक्षण होते. त्यामुळे, त्या वनस्पतींची वाढ योग्यप्रकारे होण्यासाठी मदत होते. साधारणतः अतिशीत वातावरण असलेल्या कोणत्याही ठिकाणी अथवा अन्य कोणत्याही देशांमध्ये वनस्पती संशोधन करण्यासाठी या व्यवस्थेचा प्रामुख्याने उपयोग होतो.

कारण, पॉलीहाउस या व्यवस्थेत वनस्पतीस पोषक असणारी सूर्यप्रकाशाची नैसर्गिक प्रक्रिया वापरण्यात येते. याशिवाय, हरितगृहामध्ये म्हणजेच पॉलीहाउसमध्ये वातावरणातील पाच प्रमुख घटक नियंत्रित केले जातात. ते पुढीलप्रमाणे;

सूर्यप्रकाश

साधारणतः  ५०००० ते ६०००० लक्‍सपर्यंतचा सूर्यप्रकाश हरितगृहामध्ये येऊ दिला जातो. यावेळी, सूर्याच्या प्रकाशातील अतिनील आणि वनस्पतींना घातक ठरणारी किरणे योग्य प्रकारची पॉली फिल्म वापरून नियंत्रित केली जातात. ज्यामुळे, वनस्पतीची वाढ व्यवस्थितरीत्या होण्यास मदत होते.

तापमान

दिवसाच्या वेळी २४ ते २८ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान आणि रात्रीच्या वेळी १५ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान पॉलीहाउसमध्ये ठेवले जाते. कारण, अशा तापमानाला वनस्पतीची चांगली वाढ होते.

आर्द्रता

पॉलीहाउसमध्ये सर्वसाधारणपणे दिवसा ६० ते ७० टक्के व रात्री ७० ते ८० टक्के आर्द्रता नियंत्रित केली जाते. त्यामुळे, वनस्पतींचा विविध प्रकारच्या  रोगांपासून बचाव होतो.

कार्बन-डाय-ऑक्‍साईड

जवळजवळ ८०० ते १२०० पीपीएम CO2 हरितगृहामध्ये अडवला जातो. खरंतर, हे प्रमाण बाहेरील वातावरणापेक्षा जवळपास तीन ते चार पट जास्त असते. त्यामुळे, वनस्पतीमध्ये अन्ननिर्मिती चांगल्या प्रकारे होते आणि त्याचबरोबरीने  वनस्पतीची वाढ देखील जोमाने होते.

वायुवीजन

हरितगृहामध्ये साधारणतः ८ ते १० टक्के वायुवीजन होईल, अशा पद्धतीने वरची खिडकी आणि हरितगृहामधील इतर बाजूच्या खिडक्‍या यांच्या पडद्यांची व्यवस्थितरीत्या उघडझाप केली जाते. ज्यामुळे, हरितगृहामध्ये हवा खेळती राहते. याशिवाय, वातावरणातील अनेक घटक या खोलीत नियंत्रित केले जात असल्यामुळे पिकाची उत्पादन व गुणवत्ता पातळी चांगली राहण्यास मदत होते.

हरितगृह परिणाम – Greenhouse Effect in Marathi

पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद म्हणजे कार्बन-डाय-ऑक्साईड व अशाच अन्य काही घातक वायूंचे प्रमाण वाढले की त्याचा थेट परिणाम हरितगृहावर होतो. अशा प्रकारच्या हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा अधिक संभव असतो. दुपारच्या कालावधीत सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडल्यावर पृथ्वी तापते आणि नंतर रात्रीच्या वेळी तीच उष्णता उत्सर्जित होऊन आकाशाकडे जात असते.

या क्रियेस ‘उष्णतेचे प्रारण’ असे म्हटले जाते. आपल्या पृथ्वीला वातावरण असल्याने ही उष्णता नाहीशी होत नाही. शिवाय, वातावरणात असलेला कर्ब-द्वी-प्राणीद या वायूचे रेणू या कामात महत्त्वाची भूमिका बजावतात असे निरीक्षण संशोधकांच्या निदर्शनास आले आहे.

हे रेणू अवरक्त प्रारणाने उत्तेजित होऊन ते त्याला ग्रहण करतात व ते प्रारण पुन्हा भूपृष्ठाच्या दिशेने पाठवितात. या साखळीमुळे पृथ्वीवरील वातावरण रात्रीदेखील उबदार राहते. अशा प्रकारे, निसर्गतः घडणारा हा एक ‘नैसर्गिक हरितगृह परिणाम’ आहे.

खरंतर, कर्ब-द्वी-प्राणीद हा वायू पृथ्वीवरील सर्व जीवांसाठी मदतनीसाचे काम करत असतो. परंतू, कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जर अल्प प्रमाणात किंवा संतुलित प्रमाणात असेल तरच, त्याच्या या गुणधर्माचा जीवसृष्टीला फायदा होतो. म्हणून त्यास ‘संतुलित हरितगृह परिणाम’ असे म्हणतात.

वाईट परिणाम

वरील परिणामांमध्ये आपण पाहिलं की, कार्बन डायऑक्साइड वायूचे तसेच, मिथेन, नायट्रस ऑक्साईड व बाष्प या हरितगृह वायूंचे  वातावरणातील प्रमाण संतुलित असेपर्यंतच याची पृथ्वीवरील जीवांना मदत होते. जर या वायूंचे  वातावरणातील प्रमाण भरमसाठ वाढले तर मात्र या वायुंमुळे उद्भवणाऱ्या अनेक दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागेल.

कारण, या वायूंचे सजीवसृष्टीच्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होत असतात. हे सर्व वायू सूर्याच्या प्रकाशातील अवरक्त प्रारणे शोषून त्यास पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात परावर्तीत करत असतात. त्यामुळे, दरवेळी वैश्विक तापमानवाढ (ग्लोबल वार्मिंग) होत असते. म्हणूनच अशा प्रकारच्या परिणामास ‘असंतुलित हरितगृह परिणाम’ असे म्हणतात.

अती तापमानवाढीमुळे ध्रुवीय प्रदेशांतील बर्फ वितळत असतो, त्यामुळे महासागरांची पातळी वाढते व किनारपट्ट्या पाण्याखाली जातात. या परिणामांसोबतच महासागरांचे तापमानही वाढते आणि याचाच परिणाम म्हणजे काही ठिकाणी अतिवृष्टी होते, तर काही ठिकाणी दुष्काळ पडतो. आज काळाची गरज आहे की या सर्व परिणामांकडे दुर्लक्ष न करता, आपण सर्वांनी तापमानवाढ या समस्येकडे गंभीरतेने पाहण्याची आणि तापमानवाढ कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याची.

                    –  तेजल तानाजी पाटील

                         बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या polyhouse information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे

जर पॉलिहाऊस माहिती या बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about polyhouse in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि polyhouse farming information in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू  नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!