Bamboo information in Marathi – Bamboo Tree information in Marathi बांबू लागवड माहिती बांबू हि भारतात नैसर्गिकरीत्या उगवणारी गवताच्या कुलातील दैनंदिन जीवनातील बहुपयोगी वनस्पती आहे. याला वेळू असेही म्हटले जाते. बांबू हा एखाद्या नळीसारखा पोकळ असून उंच वाढणारा आहे. याची पाने लांबट अरुंद आणि टोकदार अशी असतात. बांबूचा बुंधा हा जास्त खोलवर न जाता तो जमिनीला समांतर असतो. कांडे असलेले, गोल, गुळगुळीत व काष्ठयुक्त खोड हे बांबूचे वैशिष्ट्य आहे. बांबू हि एका ठिकाणी लावला कि त्याचा प्रसारही जलद गतीने होतो. बांबू हि अतिशय कमी खर्चात उत्पादन मिळवून देणारी वनस्पती आहे.
बांबू झाडाची माहिती – Bamboo Tree information in Marathi
नाव | बांबू |
शास्त्रीय नाव | Bambusoideae |
इतर नावे | वेळू, बांस |
बांबू लागवड
महाराष्ट्रात जवळजवळ १० लाख हेक्टर जमिनीवर वर नैसर्गिक बांबूचे क्षेत्र आढळते. बांबूचा उद्योग धंद्यात वापर वाढावा म्हणून सरकारने चंद्रपूर येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन केले आहे. बांबू हि बहुवर्षीय वनस्पती असून याची लागवड हि कंदांपासून केली जाते. बांबूच्या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकला पाणी आणि खते अतिशय कमी प्रमाणात लागतात. तसेच या पिकाची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असल्याने पिकासाठी कीटकनाशकाचा वापर कमी होतो.
- नक्की वाचा: झाडांची माहिती
बांबूची अभिवृद्धीसाठी दोन पद्धती असतात,
१. बियाण्यापासून अभिवृद्धी – बांबूची अभिवृद्धी बियांपासून करताना गाडी वाफ्यावर बी पेरून आणि पोलीथीन पिशवीत लावून अशी केली जाते. यामध्ये बियाणांची पेरणी सप्टेंबर – ऑक्टोबर मध्ये करावी.
२. कंदांद्वारे अभिवृद्धी – करण्यासाठी निरोगी आणि दोन ते तीन डोळे असणाऱ्या कंदांची निवड अत्यावश्यक आहे.
बांबूच्या लागवडीसाठी लागणारी जमीन सकस व दमट, भरपूर पाणीपुरवठा, वाऱ्यापासून संरक्षण आणि पहिली एक दोन वर्षे बुंध्याजवळच्या जमिनीस आच्छादनाने संरक्षण इत्यादींची आवश्यकता असते. याची लागवड करताना मुळे न मोडता पुनर्लागण करावी लागते. पाणथळ, क्षारयुक्त तसेच मुरमाड जमिनीवर सुद्धा बांबूची लागवड यशस्वीरीत्या होऊ शकते.
- नक्की वाचा: कडुलिंब झाडाची माहिती
बांबू लागवड अनुदान
शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत होण्यासाठी सरकारने अनेक योजना अमलात आणल्या आहेत. त्यामधीलच एक म्हणजे सरकार बांबू शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देते. शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा सवलतीच्या दराने उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने “अटल बांबू समृद्धी योजना” या नावाने नवीन योजना चालू केली आहे. बांबू शेतीतून अधिक लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. टिशू कल्चर बांबू रोपांचा अंदाजे दर प्रती रोप २५ रुपये इतका आहे. बांबू लागवड केल्यानंतर शासन त्याची तपासणी करून बांबू रोपांच्या किमतीपैकी ४ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीनधारकांना ८० टक्के तर ४ हेक्टर पेक्षा अधिक शेती असलेल्या भूधारकांना ५० टक्के सवलतीच्या दराने सब्सिडी दिली जाते.
- नक्की वाचा: वडाच्या झाडाची माहिती
शेतकऱ्यांना सब्सिडी मिळवण्याकरिता बांबू विकास मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- ७/१२ उतारा
- रहिवाशी दाखला
- ठिबक सिंचन व संरक्षक कुंपणाची सोय असल्याचे हमीपत्र
- आधार कार्डाची प्रत
- बँक खात्याचा तपशील व पासबुक ची प्रत
- शेतात विहीर/ शेततळे/ बोअरवेल असल्याचे विहित हमीपत्र
- जिओ टॅग / जीआयएस द्वारे फोटो पाठविण्याबाबत हमीपत्र.
- बँक खात्याला आधारलिंक असणे आवश्यक असते.
बांबू जाती
जगात बांबूच्या १२०० पेक्षा अधिक जाती असून त्यापैकी १२० जातीचे बांबू भारतात आढळतात. त्यापैकी राज्यात प्रामुख्याने ५ जाती आहेत.
बांबूच्या मानवेल बांबू, माणगा, मेस बांबू, एप्सर बांबू, बुल्का, वनन, ब्रान्डीसी, कटांग, काष्टी, काटे कळक, काटोबा, टूल्डा मित्रींगा, नुटन्स, मल्ल बांस, भालुका, बराक, बाल्कू, भीमा इत्यादी जाती आहेत.
एकदा बांबू लावला कि त्याचे जीवनचक्र ४०-१०० वर्षापर्यंत चालू राहते. याचे शास्त्रीय नाव “dendrocalamus strictus” असे आहे. त्यामधील मानवेल बांबू हि लांब धागा असलेली, जास्त सेल्युलोज असलेली तसेच कोड व रोग प्रतिकारक जात आहे. यामुळे याला कीटकनाशक फवारणी कमी प्रमाणात लागते. हि जात गर्द हिरव्या रंगाची असते. याची उंची हि साधारणपणे २५ ते ५० फुट इतकी उंच असते. दोन कांड्यामधील अंतर जवळपास २५ ते ४० सेंटीमीटर असून पेचरा जवळचा भाग थोडा फुगीर असतो.
- नक्की वाचा: नारळाच्या झाडाची माहिती
लकी बांबू – Lucky Bamboo Tree Information in Marathi
लकी बांबूचे रोपटे हे “ड्रेसिना” जातीतले आहे. याचे शास्त्रीय नाव ‘ड्रेसिना सेंडेरीयाना’ असे म्हटले जाते. बांबू मधील लकी बांबू हा मातीशिवाय फक्त पाण्यावर जगवता येणारा प्रकार आहे. या बांबूला काचेच्या भांड्यात पाणी घालून घराच्या सौंदर्यात भर पाढण्यासाठी ठेवले जाते. पाण्यावरच मोठे होणाऱ्या या सुंदर रोपट्याला हिरवी पालवी फुटते. या बांबूच्या बारीक बारीक काड्या एकत्र बांधून त्याला विविध प्रकारचे आकार देऊन सुशोभित केले जाते.
लकी बांबू घर किंवा ऑफिसमध्ये सजावटीकरिता लावले जाते. तसेच या बांबूला उन्नती आणि सौभाग्याचही प्रतिक मानल जातो. लकी बांबू हा त्रिकोणी, पिरामिड, ड्रेगन च्या आकारात बाजारात उपलब्ध होतात.
- नक्की वाचा: पिंपळाच्या झाडाची माहिती
बांबू झाडाचे उपयोग – uses of bamboo
- पूर्वेकडील देशात विविध हस्तव्यवसायात बांबूचा प्रवेश झाला आहे.
- गरीब व मध्यम थरांतील लोक घरबांधणी साठी बांबूचा वापर करतात.
- घरे, बागा, शेते, मळे व लहान लहान वस्त्या यांच्याभोवती काटेरी बांबूचे कुंपण करतात, तसेच याचा वापर मासेमारीच्या काठ्या, घरे सुशोभित करणे यासाठी वापरला जातो.
- पूर्वीपासूनच चीनी कारागिरांनी बांबूची सुयोग्यता कागद व हत्यारे बनविण्यास अनुभवली आहेत.
- द्राक्षवेली, टोमॅटो, पानवेली इत्यादींना आधार देण्यासाठी बांबूच्या काठ्यांचा वापर केला जातो.
- बासरीसारखी वाद्य, छत्रीचे दांडे बनविण्यासाठी पोकळ बांबूचा वापर केला जातो.
- कागदाचा शोध लागण्यापूर्वी चीनमध्ये बाबुपासुंनच सर्व लेखन- साहित्य बनवीत असत.
- बांबूचा पाला गुरांना वैरण म्हणून वापरला जातो. तसेच याच्या सुक्या पानाचा उपयोग मस्त्य तेल गंधहीन करण्यासाठी होतो.
- बांबूच्या पेरात आढळणारा सिलीकायुक्त पदार्थ – वंशलोचन पूर्वीपासून औषधात वापरला जातो.
- बांबूच्या अनेक जातींचा उपयोग औषधे, इमारत बांधणी, सजावटी सामान, फर्निचर, नावेतील डोलकाठ्या, धनुष्यबाण, पुलबांधणी, सभामंडप, बैलगाड्या, बादल्या, स्वयंपाकाची भांडी, कणगी, पाट्या, सुपे, करंडे, टोपल्या कागदाचा लगदा, दोऱ्या, तट्टे, चटया, छपरे इत्यादी विविध गोष्टींसाठी बांबूचा उपयोग केला जातो.
- बांबूच्या धाग्यापासून विणलेल्या कापडाचे बनवलेले शर्ट, मोजे, टॉवेल मिळतात.
- बांबूच्या कोंबांपासून नुक्लिएज व डी-अॅमिनेज हि जीव्रसायानिक विक्रीयाना मदत करणारी प्रथिने काढली जातात.
- सायकलिंगच्या फ्रेम्स, स्केटिंग करण्याच्या फळ्या किंवा लॅपटॉप, संगणकाचे बाह्य कवच ह्या गोष्टी सुद्धा बांबूपासून बनवल्या जातात.
बांबू झाडाचे फायदे
- बांबू हा जलद वाढणारा गवताचा प्रकार असून त्याच्या लवचिक व दणकट गुणधर्मामुळे त्याला फार महत्व आहे.
- एकदा बांबूची लागवड केली कि साधारणतः ४०-१०० वर्षापर्यंत त्याची पुन्हा लागवड करावी लागत नाही, व ४ ते ५ वर्षापासून सतत नियमितपणे बांबूचे उत्पादन मिळत राहते.
- जमिनीची धूप कमी करण्यासाठी आणि जलसंवर्धन साठी बांबूच्या झाडाची लागवड फायदेशीर ठरते.
- बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेतीसारखे नुकसान होत नाही. बांबूच्या बेटांमध्ये दरवर्षी ८-१० नवीन बांबू तयार होत असतात.
- इतर पिकांच्या तुलनेत बाबू लागवडीचा खर्च हा ३० ते ४० टक्के कमी येतो.
- विविध उत्पादनांमध्ये वापरला जाणारा कच्चा माल उपलब्ध करून देण्यासाठी बांबू लागवड फायद्याची आहे.
- नक्की वाचा: आंबा झाडाची माहिती
बांबू झाडाचे fact
- बांबू हि गवतवर्गीय बहुवर्षीय वनस्पती आहे.
- बांबूचे शास्त्रीय नाव Bambusoideae असे आहे.
- बांबू हा अतिशय कमी खर्चात उत्पादन मिळवून देणारी वनस्पती आहे.
- बांबू हा पुनर्वसू नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
- बांबूला वेळू, बांस असेही म्हटले जाते.
- बांबूचा वापर अनेक व्यवसायामध्ये कच्चा माल म्हणून केला जातो.
- बांबू हि एक बहुपयोगी वनस्पती आहे. बांबूची कोंब, पाने, लाकूड या सगळ्याचा उपयोग होतो.
आम्ही दिलेल्या bamboo tree information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “बांबू लागवड” pimpal zad अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lucky bamboo tree information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bamboo farming in maharashtra pdf Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर information of bamboo tree in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
Dear Team,
Very nice collection of information which is surely helpful.
Keep growing.
Special Request : Pls provide all about Agarawood (Aquilaria malaccensis) harvesting details.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ..!!
अशाच नवीन माहिती करिता भेट देत रहा