pot kami karnyache upay – potachi charbi kami karnyasathi gharguti upay पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण कोणकोणत्या घरगुती पध्दतीने वजन कसे कमी करायचे ते पाहूया. काही वेळा वजन कमी करणे हे खूप मोठे काम असते आणि आपण वेगवेगळ्या पध्दती, टिप्स आणि व्यायाम करून आपले वजन तर कमी करतो परंतु आपल्या पोटाचा भाग हा कमी होणे काही वेळा अशक्य असते. असे अनेक लोक असतात ज्यांचे पोटाचे वजन हे खूप वाढलेले असते ते लोक खूप त्रस्त असतात आणि त्याचे कितीही प्रयत्न केले तरी पोटाचे वजन मात्र कमी होण्याचे नाव घेत नाही आणि ज्या लोकांचे पोट जास्त असते त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत असतात.
त्यामुळे अशा लोकांनी कोणत्याही परिस्थितीत आपले पोट कमी करणे खूप गरजेचे असते. पोटाचे वजन कमी करण्यासाठी अनेक पोटाचे व्यायाम असतात तसेच आपल्याला अनेक डाएट करून आपण आपल्या पोटाची चरबी हि कमी करू शकतो. पोटाची चरबी हि लवकर कमी व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि ते पोटाची चरबी कमी करण्यासाठी रोजचे प्रयत्न करत असतात.
रोजच्या प्रयत्नाने तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी असे अनेक टिप्स आणि व्यायाम आहेत आणि ते व्यायाम आणि टिप्स कोणकोणते आहेत ते आता आपण पाहूया. चला तर आता आपण पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण कोणत्या टिप्स फॉलो करू शकतो ते पाहूया.
पोट कमी करण्याचे उपाय – Pot Kami Karnyache Upay
पोटाची चरबी वाढण्याची कारणे
- जास्त फॅटयुक्त आहार जर एखादी व्यक्ती वारंवार खात असेल तर अश्या व्यक्तीच्या पोटाची चरबी झपाट्याने वाढते.
- अनेक लोकांना असे वाटते कि जास्त खाल्ल्यामुळे पोटाची चरबी वाढते पाणी तसे नाही तर व्यायामाची कमतरता आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे एखाद्या व्यक्तीचे वजन वाढत असते.
- तेलकट, जंक फूड किंवा फास्ट फूड खाल्ल्यामुळे देखील पोटाची चरबी वाढते.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय – potachi charbi kami karnyasathi gharguti upay
stomach fat loss tips in marathi
असे अनेक लोक असतात ज्यांचे पोटाचे वजन हे खूप वाढलेले असते ते लोक खूप त्रस्त असतात आणि त्याचे कितीही प्रयत्न केले तरी पोटाचे वजन मात्र कमी होण्याचे नाव घेत नाही आणि ज्या लोकांचे पोट जास्त असते त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत असतात. पोटाची चरबी हि लवकर कमी व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि ते पोटाची चरबी कमी करण्यासाठी रोजचे प्रयत्न करत असतात आणि रोजच्या प्रयत्नाने तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी असे अनेक टिप्स आणि व्यायाम आहेत आणि ते व्यायाम आणि टिप्स कोणकोणते आहेत ते आता आपण पाहूया.
- तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल करा म्हणजेच तुम्ही तुमच्या आहारामध्ये फळे, पालेभाज्या, काकडीचे सलाड, कोबीचे सलाड, टोमॅटोचे सलाड, गाजराचे सलाड, ग्रीन टी या सारख्या आहाराचा समावेश करा.
- जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असल्यास तुम्ही सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू रस आणि एक चमचा मध मिक्स करा आणि ते पाणी प्या. तुम्हाला फरक जाणवेल.
- ज्या लोकांना आपले पोट कमी करायचे आहे अश्या लोकांनी तेलकट तसेच जंक फूड, फास्ट फूड खाणे टाळले पाहिजे कारण तेलकट खाल्ल्याने पोटाची चरबी झपाट्याने वाढते.
- पोटाची चरबी कमी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने सकाळी कमीत कमी अर्धा लिटर कोमट पाणी पिले पाहिजे तसेच दिवसातून एक तासाला थोडे थोडे पाणी घेतले पाहिजे त्यामुळे देखील तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
- तुम्हाला जर तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असल्यास तुम्ही दीड ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा जिरे घाला आणि ते पाणी एक ग्लास होई पर्यंत उकळा आणि मग ते पाणी थोडे कोमट झाले कि ते गाळा आणि ते पाणी प्या. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला फरक पडलेला दिसेल.
- जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये काकडीचे, गाजराचे किंवा कोबीचे सलाड घ्या तसेच काकडीचा रस देखील घेवू शकता कारण यामध्ये खूप प्रमाणात फायबर असते. तसेच तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी देखील घेतली तरी चालेल. तसेच तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये काही तरी लाईट खा जसे कि ओट्स खिचडी किंवा दलिया. अश्या प्रकारच्या डायट मुळे तुमचे पोटाचे वजन कमी होण्यास आणि तुम्ही बारीक होण्यास मदत होईल.
- तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ तसेच भात जास्त प्रमाणात खाणे टाळा कारण या गोष्टींच्या मुळे वजन वाढते. तुम्ही तुमच्या आहारामध्ये पौष्टिक आणि फायबर युक्त आहार खा त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
- असे म्हणतात कि सूर्यनमस्कार केल्याने पोटाचे वजन कमी होऊ शकते म्हणून तुम्ही पोटाची चरबी कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार घालू शकता.
- तुम्ही दिवसातून सतत पाणी प्या त्यामुळे तुमची पोटाची वजन कमी होण्यास मदत होते.
- जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आहाराच्या पध्दती बदलल्या पाहिजेत म्हणजेच तुमच्या जेवणाचा वेग कमी केला पाहिजे त्याचबरोबर अन्न चांगले चाऊन खाल्ले पाहिजे तसेच वेळच्या वेळी आहार घेतला पाहिजे आणि आधी मधी काही खाल्ले नाही पाहिजे. या सवयींच्यामुळे तुमची पोटाची चरबी कमी होण्यास आणि तुम्ही बारीक दिसण्यास मदत होऊ शकते.
- रोज सकाळी दोन चमचे तुळशीच्या पानांचा रस पिल्याने देखील तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. परंतु त्या बरोबर तुम्हाला व्यायाम देखील केला पाहिजे.
- जर तुम्ही रोग सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये दालचिन पावडर घालून ते पाणी पिले तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
- पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही नियमितपणे पोटाचे वेगवेगळे व्यायाम करा. त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या pot kami karnyache upay माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पोट कमी करण्याचे उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या stomach loss tips in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि pot kmi krayche upay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pot kami karnyasathi upay Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट