प्रॉन्स/कोळंबी बिर्याणी रेसिपी Prawns Biryani Recipe in Marathi

Prawns Biryani Recipe in Marathi – Kolambi Biryani Recipe in Marathi कोळंबी बिर्याणी रेसिपी प्रॉन्स बिर्याणी रेसिपी बिर्याणी हे फक्त नाव घेतले कि अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते, ती कोणतीही का असेना जसे कि व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, पनीर बिर्याणी. यासारखे अनेक बिर्याणीचे प्रकार आहेत जे लोक खूप प्रेमाने आणि आनंदाने बनवतात आणि खूप आवडीने खातात आणि त्यामधील एक प्रसिध्द आणि स्वादिष्ट बिर्याणीचा प्रकार म्हणजे प्रॉन्स बिर्याणी म्हणजेच कोळंबी बिर्याणी कशी बनवायची. कोळंबी बिर्याणी बनवताना हि बिर्याणी मसाले, कोळंबी आणि इतर काही साहित्यासोबत बनवली जाते.

प्रॉन्स बिर्याणी हि भारतामध्ये कोकण भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी समुद्र किनारपट्टी आहे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात बनवली जाते कारण त्या ठिकाणी हि कोळंबी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते तसेच या प्रकारची बिर्याणी भारतामध्ये इतर ठिकाणी देखील बनवली जाते. प्रॉन्स बिर्याणी रेसिपी कोणत्याही प्रसंगी, पार्ट्या, लग्न, वाढदिवस आणि विशेषत: ईदच्या सणात देखील हि रेसिपी बनवली जावू शकते.

प्रॉन्स बिर्याणी बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो परंतु आपण हि बिरयानी बनवण्यासाठी घातलेल्या वेळेचा सदुउपयोग झाला असे वाटते ज्यावेळी आपण हि रेसिपी टेस्ट करतो. प्रॉन्स बिर्याणी हा नॉनव्हेजीटेरीयन पदार्थ आहे आणि प्रॉन्स बिर्याणी हा पदार्थ जर आपण घरी बनवला तर हा पदार्थ घरामध्ये लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडू शकतो. प्रॉन्स बिर्याणी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे.

परंतु हि रेसिपी बनवण्यासाठी थोडा वेळ आणि जास्त साहित्य लागते. चला तर मग आता आपण प्रॉन्स बिर्याणी कशी बनवायची ते पाहूयात.

prawns biryani recipe in marathi
prawns biryani recipe in marathi

कोळंबी बिर्याणी रेसिपी – Prawns Biryani Recipe in Marathi

प्रॉन्स बिर्याणी बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • तांदूळ : प्रॉन्स बिर्याणी बनवण्यासाठी तांदूळ वापरला जातो आणि तांदूळ या डिश मधील एक महत्वाचा घटक आहे. बिर्याणीसाठी जर आपण चांगल्या दर्ज्याचा आणि लांब तांदूळ वापरला तर बिर्याणी चांगली बनू शकते. बिर्याणी बनवण्यासाठी वापरले जाणारे काही तांदूळ म्हणजे इंडिया गेट, झीबा प्रीमियम बासमती तांदूळ, डावात बिर्याणी बासमती तांदूळ आणि फॉर्च्यून बिर्याणी स्पेशल बासमती तांदूळ इत्यादी.
  • खडे मसाले : बिर्याणीमध्ये मसाले वापरल्यामुळे बिर्याणीला चांगली टेस्ट आणि स्वाद येतो त्यामुळे बिर्याणी खमंग लागते. दालचिन, वेलदोडे, मसाला वेलदोडे, बदाम फुल, तमाल पत्री, काळी मिरी आणि लवंग हे खडे मसाले बिर्याणीमध्ये वापरले जातात.
  • प्रॉन्स : प्रॉन्स याला मराठीमध्ये कोळंबी म्हणतात. कोळंबी हा एक माश्यांचा प्रकार आहे जो समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो आणि म्हणून या प्रकारची बिर्याणी समुद्र किनाऱ्यावरील भागांमध्ये बनवला जातो.

प्रॉन्स बिर्याणी रेसिपी – Kolambi Biryani Recipe in Marathi

प्रॉन्स बिर्याणी हि एक नॉन व्हेजीटेरीयन डिश आहे जी कोळंबी, बासमती तांदूळ, खडे मसाले आणि काही इतर साहित्य घालून बनवली जाते. प्रॉन्स बिर्याणी हि खूप स्वादिष्ट आणि टेस्टी लागते जी अनेक लोक रेस्टॉरंट मध्ये ऑर्डर देवून खातात परंतु आपल्याला घरामध्ये देखील रेस्टॉरंट सारखी प्रॉन्स बिर्याणी बनवता येते. प्रॉन्स बिर्याणी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे परंतु हि रेसिपी बनवण्यासाठी थोडा वेळ आणि जास्त साहित्य लागते. चला तर आता आपण प्रॉन्स बिर्याणी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

प्रॉन्स बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make prawns biryani recipe 

प्रॉन्स बिर्याणी बनवण्यासाठी कोळंबी, खडे मसाले, बासमती तांदूळ आणि इतर साहित्य लागते आणि हे सर्वच साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते असे नाही आणि ते साहित्य आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर आता आपण प्रॉन्स बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात.

प्रॉन्स मॅरीनेट करण्यासाठी लागणारे साहित्य 

  • २५० ग्रॅम कोळंबी / प्रॉन्स.
  • ४ चमचे दही.
  • अर्धा चमचा हळद पावडर.
  • अर्धा चमचा लाल मिरची पावडर.
  • १ चमचा धने पावडर
  • १ चमचा आले लसूण पेस्ट.

मुख्य प्रॉन्स बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

  • १/२ किलो बासमती ( लांब तांदूळ )
  • २ चमचे आले लसूण पेस्ट.
  • १ मोठी वाटी कांदा ( उभा चिरलेला ).
  • २ टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
  • १ चमचा गरम मसाला पावडर.
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • १ चमचा हळद पावडर.
  • २ चमचे तेल.
  • २ बदाम फुल.
  • २ ते ३ दालचिन तुकडे.
  • १ चमचा जिरे.
  • १ चमचा काळी मिरी.
  • २ ते ३ तमाल पत्री पाने.
  • पाणी ( अवश्यकतेनुसारा ).

प्रॉन्स बिर्याणी बनवण्यासाठी केली जनारी कृती – process to make prawns biryani recipe

प्रॉन्स बिर्याणी हि घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि रेसिपी टेस्टला देखील खूप छान लागते. चाल तर मग वर दिलेले साहित्य वापरून प्रॉन्स बिर्याणी कशी बनवायची ते पाहूयात.

  • प्रॉन्स बिर्याणी बनवताना प्रथम तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घ्या आणि ते एका भांड्यामध्ये घ्या आणि त्यामध्ये पाणी, एक चमचा तेल, मीठ, जिरे, बदाम फुल, दालचिन, तमाल पत्री पाने आणि काळी मिरी घालून हे तांदूळ शिजवत ठेवा.
  • आणि हा भात ८० टक्के शिजला कि तो गॅसवरून बाजूला काढा आणि त्यामध्ये पाणी राहिले असेल ते देखील गळून घ्या आणि मग हा भात ताटामध्ये काढून गार करून, सुट्टा बनवून घ्या.
  • आता प्रॉन्स घ्या आणि ते देखील स्वच्छ धुवून घ्या आणि मग त्यामध्ये दही, हळद पावडर, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि आले लसूण पेस्ट घाला तसेच चवीनुसार थोडे मीठ देखील घाला आणि ते मिक्स करून हे १० ते १५ मिनिटे चांगले मॅरीनेट होऊ द्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये थोडेसे जिरे घाला आणि जिरे फुलले कि लगेच त्यामध्ये आले लसून पेस्ट आणि कांदा घाला आणि हे मिश्रण तेलामध्ये ५ मिनिटे भाजा किंवा कांद्याला लालसर रंग येईपर्यंत भाजा.
  • आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घाला आणि थोडा वेळ टोमॅटो देखील तेल सुटे पर्यंत भाजून घ्या मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद घाला आणि मिक्स करा आणि मग त्यामध्ये लगेच मॅरीनेट केलेले प्रॉन्स घाला आणि आणि ते त्यामध्ये थोडावेळ भाजा आणि त्यामधी जर मीठ घालावे लागत असेल तर मीठ घाला आणि मिक्स करा आणि त्यामध्ये १ वाटी पाणी घालून ते मिक्स करून ते १० मिनिटे शिजवून घ्या.
  • आता हे बाजूला काढून घ्या आणि एक मोठा कुकर घेवून त्याच्या तळाला तूप किंवा तेल लावा आणि मग त्यावर भाताचा थर मग प्रॉन्स ग्रेव्हीचा थर अश्या प्रकारे ३ ते ४ थर घाला आणि वर थोडे केसरचे पाणी शिंपडा आणि तूप टाका आणि कुकरचे झाकण लावून.
  • कुकरला एक शिट्टी येवू द्या आणि मग गॅस बंद करा.
  • प्रॉन्स बिर्याणी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.

आम्ही दिलेल्या prawns biryani recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्रॉन्स/कोळंबी बिर्याणी रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या prawns dum biryani recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kolambi bhaat recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये green prawns biryani recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!