बिर्याणी मसाला रेसिपी Biryani Masala Recipe in Marathi

Biryani Masala Recipe in Marathi बिर्याणी मसाला रेसिपी भारतामध्ये पदार्थ चव आणि स्वाद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घरी बनवले जातात किंवा बाजारातून विकत आणले जातात जसे कि गरम मसाला, गोडा मसाला, कांदा लसून मसाला, मटन मसाला. हे मसाले भाजी मध्ये किंवा कोणत्याहि मटण किंवा चिकन रेसिपी मध्ये जर आपण हा मसाला घातला तर त्या पदार्थाची टेस्ट बदलते तसेच सध्या बिर्याणी हा पदार्थ घरोघरी आवडीने बनवला जातो आणि खाल्ला जातो आणि ती कोणत्याही प्रकारची असो जसे कि व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी, मटन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी बनवली जाते आणि यामध्ये बाजारातून आणलेला किंवा घरी बनवलेला बिर्याणी मसाला घातला जातो.

आणि आता आपण या लेखामध्ये बिर्याणी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. बिर्याणी मसाला हि एक भारतीय पाककृती आहे आणि हा मसाला आपण बिर्याणी बनवताना वापरतो आणि मसाला भारताच्या बहुतेक बागमध्ये वापरला जातो. घराच्या घरी बिर्याणी मसाला बनवणे खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २० ते २५ मिनिटामध्ये बनते. चला तर आता आपण बिर्याणी मसाला कसा बनवायचा ते पाहूयात.

biryani masala recipe in marathi
biryani masala recipe in marathi

बिर्याणी मसाला रेसिपी – Biryani Masala Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकून लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलाभारतीय

बिर्याणी मसाला कसा बनवला जातो ? 

बिर्याणी मसाला बनवताना वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाले जसे कि काळी मिरी, दालचिन, बदाम फुल, लाल सुक्या मिरच्या आणि काही इतर मसाले घेतले जातात आणि ते कढईमध्ये वेगवेगळे भाजून घेतले जातात आणि मग ते मिक्सरला बारीक करून त्याची पावडर बनवून घेतली जाते.

बिर्याणी मसाला रेसिपी – biryani masala powder

बिर्याणी मसाला हे वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाल्यांचे पावडर केलेले मिश्रण आहे जे आपण बिर्याणीमध्ये बिर्याणीची चव वाढवण्यासाठी घालतो. कांदा लसून मसाला घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २० ते २५ मिनिटामध्ये बनतो परंतु हा बनवण्यासाठी साहित्य जास्त लागते. चला तर मग आता आपण बिर्याणी मसाला कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकून लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलाभारतीय

बिर्याणी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य – biryani masala ingredients

बिर्याणी मसाला बनवण्यासाठी आपल्याला विशेषत सर्व प्रकारचे खडे मसाले आवश्यक असतात आणि ते आपल्या घरामध्ये बहुतेकदा उपलब्ध असतात आणि जर ते आपल्या  घरामध्ये उपलब्ध नसतील तर ते आपण बाजारातून विकत अनु शकतो. चला तर मग बिर्याणी मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • ३ ते ४ सुक्या मिरच्या.
  • २ बदाम फुल.
  • १ चमचा राम पत्री.
  • २ चमचे धणे.
  • २० ते २५ वेलदोडे.
  • २ मसाला वेलदोडे.
  • ३ ते ४ तुकडे दालचिन.
  • ६ ते ७ तमालपत्री पाने.
  • ९ ते १० लवंग.
  • ५ ते ६ काळी मिरी.
  • जायफळ.

बिर्याणी मसाला बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make biryani masala recipe 

बिर्याणी मसाला बनवणे तसे खूप सोपे आहे परंतु हा मसाला बनवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाले गरजेचे असतात जसे कि मसाला वेलदोडे, तमाल पत्री, राम पत्री, काळी मिरी, धने, सुक्या मिरच्या, वेलदोडे या सारखे इतर मसाले भाजून त्याची पावडर बनवली जाते. चला तर मग आता आपण वर दिलेले साहित्य वापरून  बिर्याणी मसाला कसा बनवायचा ते पाहूयात.

  • बिर्याणी मसाला बनवताना सर्व मसाले चांगले निवडून घ्या तसेच बिर्याणी मसाला बनवण्यासाठी वापरला जाणारा मसाला १ ते २ तास उन्हामध्ये वळवून घ्या.
  • तसेच मिरच्यांचे देठ देखील काढून घ्या आणि त्या बाजूला ठेवा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि मग कढई गरम झाली कि त्यामध्ये मिरच्या घाला आणि मिरच्या थोड्या गरम करून घ्या आणि त्या थोड्या वेळासाठी बाजूला काढून ठेवा.
  • मद त्यामध्ये धणे, वेलदोडे वेगवेगळे भाजून घ्या आणि ते बाजूला काढून ठेवा.
  • आणि मग त्या कढईमध्ये दालचिन, बदाम फुल, लवंग, काळी मिरी, तमाल पत्री, राम पत्री, मसाला वेलदोडे हे सर्व खडे मसाले घाला आणि ते देखील भाजून घ्या.
  • आता प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घालून त्याची पावडर बनवून ती एका भांड्यामध्ये काढा तसेच आता धने घाला आणि त्याची देखील एकदम बारीक पावडर बनवून ती देखील भांड्यामध्ये काढा.
  • आता भाजलेले वेलदोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि त्याची देखील पावडर बनवून ती भांड्यामध्ये घाला,
  • शेवटी एकत्र भाजलेल्या खड्या मसाल्यांची पावडर बनवून घ्या आणि ती देखील इतर मसाल्यांच्या पावडर मध्ये मिक्स करा आणि यामध्ये अगदी थोडीसी जायफळ पावडर घाला आणि हे सर्व मसाला चांगला एकत्र करून घ्या.
  • बिर्याणी मसाला तयार झाला हा आणि आपण हवाबंद बरणी मध्ये भरून ठेवून ज्यावेळी बिर्याणी बनवणार आहोत त्यावेळी हा मसाला त्यामध्ये घाला त्यामुळे बिरायानीची चव आणखीन वाढेल.

टिप्स (Tips) 

  • बिर्याणी मसाल्यामध्ये थोडीशी हिंग पावडर देखील घातली तरी चालते.
  • बिर्याणी मसाला आपण १० ते ११ महिने चांगला साठवून ठेवू शकतो.

आम्ही दिलेल्या biryani masala recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या biryani masala powder recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chicken biryani masala recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये biryani masala homemade Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!