राधानगरी धरण माहिती Radhanagari Dam Information in Marathi

radhanagari dam information in marathi राधानगरी धरण माहिती मराठी, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक प्राचीन धरणे बांधली आहेत आणि या धरणांचा वापर हा पाण्याचा साठा करून हे पाणी शेतीसाठी तसेच इतर वापरासाठी वापरता यावे. महाराष्ट्रामध्ये अनेक धरणे आहेत आणि त्यामधील एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण आणि आज आपण या लेखामध्ये राधानगरी धरणाविषयी माहिती घेणार आहोत. राधानगरी धरण हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी शहरापासून काही अंतरावर वसलेले आहे आणि हे धरण राजर्षी शाहू महाराजांनी सिंचनाचे आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे महत्व लक्षात घेऊन बांधले आहे.

राधानगरी या शहरापासून भोगावती नदी वाहते आणि या भोगावती नदीवरच राधानगरी धरण बांधले आहे आणि या धरणातील पाण्याचा वापर हा शेतीसाठी, सिंचनासाठी आणि जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो. हे धरण घनदाट जंगलांच्या पार्श्वभूमीवर निसर्गरम्य परिसरामध्ये आहे.

radhanagari dam information in marathi
radhanagari dam information in marathi

राधानगरी धरण माहिती Radhanagari Dam Information in Marathi

धरणाचे नावराधानगरी धरण
बांधकाम१९०९ ते १९५४
निर्माताराजर्षी शाहू महाराज
उंची३८.४१ मीटर
लांबी१०३७ मीटर
पाणी साठवणूक क्षमता२३६.७० दशलक्ष घनमीटर 
वापरशेती, सिंचन आणि वीजनिर्मिती

राधानगरी धरणाविषयी महत्वाची माहिती – information about radhanagari dam in marathi

राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी शहरामध्ये घनदाट जंगल परिसरामध्ये बांधण्यात आले आहे आणि हे धरण शेतीसाठी पाण्याची गरज आणि सिंचन लक्षात घेऊन राजर्षी शाहू महाराज यांनी १०० वर्षापूर्वी बांधले आहे. या धरणाचे बांधकाम हे १९०९ मध्ये सुरु झाले होते आणि त्यानंतर या धरणाचे बांधकाम १९५४ मध्ये पूर्ण झाले म्हणजेच हे धरण बांधण्यासाठी ४० ते ४५ वर्ष लागली.

राधानगरी या धरणाचे संपूर्ण क्षेत्रफळ हे १८ वर्ग किलो मीटर इतके असून या धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता हि २३६.७० दशलक्ष घनमीटर  इतकी आहे. हे धारण प्राची असल्यामुळे या धरणाचे संपूर्ण बांधकाम हे दगडापासून केले आहे आणि या धाराची लांबी १०३७ मीटर आहे तर उंची ३८.४१ मीटर इतकी आहे. या धरणाची विशेषता म्हणजे हे धरण १०० वर्षापूर्वी जरी बांधले असले तरी या धरणाला स्वयंचलित दरवाजे आहेत.

म्हणजेच जर या धरणामध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात पाणी झाले तर या धरणाचे दरवाजे अपोआप उघडतात आणि अशी धरणाची रचना हि राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये केली आहे आणि या धरणांच्या दारातून सेकेंदला २८० पेक्षा अधिक घनमीटर पाण्याचा विसर्ग होतो.

तसेच हे धारण शेतीसाठी पाणीपुरवठा आणि वीजनिर्मिती करण्यासाठी बांधले आहे आणि या धरणातून शेतीसाठी तर पाणी पुरवठा होतोच परंतु या धारणावर वीजनिर्मिती करण्यासाठी दोन टर्बाइन देखील बसवली आहेत आणि या टर्बाइनची वीज उत्पादन क्षमता १० मेगावॅट इतकी आहे.

राधानगरी धरणाचा इतिहास – radhanagari dam history in marathi

राधानगरी धरण हे प्राचीन काळामध्ये म्हणजेच १९०७ ते १९५४ च्या दरम्यान बांधले आहे आणि हे राजर्षी शाहू महाराज यांच्या काळामध्ये शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी आणि वीजनिर्मिती करण्यासाठी बांधलेले एक धरण आहे. हे धरण भोगावती नदीच्या पलीकडे घनदाट जंगलामध्ये बांधले आहे आणि त्यामुळे या धरणाच्या आजूबाजूला अनेक  वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी आहेत.

राधानगरी धरणाचे कार्य काय आहे – functions

 • राधानगरी हे धरण शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच सिंचन पध्दत सुधारण्यासाठी आणि वीजनिर्मिती करण्यासाठी बांधलेले धारण आहे.
 • राधानगरी धरणातून प्रामुख्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो.
 • धरणातून वीजनिर्मिती केली जाते जी या भागामध्ये वापरासाठी उपयोगी पडते.
 • राधानगरी धरण २३७ दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ठेवू शकते.

राधानगरी धरणाला भेट देताना ह्या टिप्स नक्की वापरा – tips

 • धरणाला भेट देताना स्वताचे अन्न आणि पाणी सोबत घेऊन जा.
 • धरण पाहण्यासाठी सकाळी ९ ते संध्याकाळी सहा पर्यंत आपण हे धारण पाहू शकतो तसेच ह्या धरणाच्या क्षेत्रामध्ये फोटो काढण्यास मनाई आहे.
 • राधानगरी धरणाच्या जवळपास अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत, त्यामुळे तुम्ही तुमची स्वताची कार घेऊन जाणे कधीही सोयीचे ठरेल.
 • जर तुम्हाला या शहरामध्ये मुक्काम करायचा असेल तर तुमच्या बजेटला सूट होणारी अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स येथे आहेत.
 • राधानगरी धारण पाहायला येण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा काळ उत्तम काळ आहे.

पाहण्यासारखी ठिकाणे – places to visit near radhanagari dam

 • सुंदर आणि निसर्गरम्य राधानगरी धरणाला भेट द्या.
 • राधानगरी धरणाजवळ काही अंतरावर दाजीपुर अभयारण्य आहे तसेच तुम्ही राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्याला देखील भेट देऊ शकता.
 • आपण राधानगरी धरणापासून काही अंतरावर असणारे काळंमवाडी धरण देखील पाहू शकतो.

कसे पोहचायचे – how to  reach

राधानगरी धरणाला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही बसने, रेल्वेने किंवा विमानाने भेट देऊ शकता. जर तुम्हाला विमानाने या शहराला बेत द्यायची असेल तर या धारणापासून जवळचे विमानतळ बेळगाव आहे आपण विमानाने बेळगावमध्ये येऊन तेथून आपल्याला राधानगरी बस मिली शकते बसने राधानगरी शहरामध्ये जाऊन तेथून आपण भाड्याने टॅक्सी किंवा रिक्षा घेवून राधानगरी धारणापर्यंत जाऊ शकतो.

तसेच रेल्वेने यायचे असल्यास तुम्ही कोल्हापूर पर्यंत रेल्वेने येवू शकता किंवा बेळगाव पर्यंत रेल्वेने येऊ शकता आणि मग तेथून बसने राधानगरी शहरामध्ये जाऊन तेथून आपण भाड्याने टॅक्सी किंवा रिक्षा घेवून राधानगरी धरणापर्यंत जाऊ शकतो. तसेच तुम्ही बसने देखील राधानगरी धारण पाहण्यासाठी सहज जावू शकता कारण या शहरामध्ये जाण्यासाठी कोल्हापूर या शहरातून अनेक बस आहेत.

राधानगरी धरणाविषयी विशेष तथ्ये – radhanagari dam latest news in marathi

 • राधानगरी धरण हे १०० वर्षापूर्वीचे धरण आहे आणि हे धरण बांधण्यासाठी ४५ वर्ष लागली होती.
 • या धरणामध्ये पाणी २३७ दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे.
 • राधानगरी धरणाची निर्मिती हि सिंचनासाठी आणि जलविद्युत निर्मितीसाठी केली आहे.
 • या धरणाचे दरवाजे स्वयंचलित आहेत आणि या धरणाच्या एका दरवाज्यातून प्रती सेकंद २८० घनमीटर पाण्याचा विसर्ग होतो.
 • वीजनिर्मितीसाठी या धरणावर दोन टर्बाइन बसलेली आहेत.
 • धरणाचे संपूर्ण क्षेत्रफळ १८ वर्ग किलो मीटर इतके आहे.

राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे?

राधानगरी या शहरापासून भोगावती नदी वाहते आणि या भोगावती नदीवरच राधानगरी धरण बांधले आहे.

राधानगरी धरण किती टक्के भरले?

सध्या राधानगरी धरण ५० टक्के भरल्याची माहितीही जलसंपदा विभागाने दिली आहे.

आम्ही दिलेल्या radhanagari dam information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राधानगरी धरण माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या radhanagari dam history in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about radhanagari dam in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये radhanagari dam wikipedia in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!