राम गणेश गडकरी मराठी माहिती Ram Ganesh Gadkari Information in Marathi

Ram Ganesh Gadkari Information in Marathi – Govindagraj राम गणेश गडकरी मराठी माहिती राम गणेश गडकरी हे अठराव्या शतकामध्ये जन्माला आलेले महाराष्ट्रीयन कवी, नाटककार व विनोदी लेखककार होते. गणेश गडकरी यांनी मराठी भाषेमध्ये साहित्य लेखन केलं. राम गडकरी हे गोविंदाग्रज, बाळकराम व सवाई नाटकी या नावाने साहित्य लेखन करायचे. गोविंदाग्रज या नावाने जवळपास १५० हून अधिक कविता त्यांनी लिहिल्या. आणि बाळकराम ह्या टोपणनावाने बरेच विनोदी लेख देखील लिहिले. मराठी साहित्य क्षेत्रामध्ये राम गडकरी यांनी मोलाचं कार्य केलं.

आणि अठराव्या शतकामध्ये मराठी साहित्य क्षेत्राच्या इतिहासामध्ये आपलं नाव कोरलं. आजच्या लेखामध्ये आपण महान व जेष्ठ नाटककार कवी राम गणेश गडकरी यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

 ram ganesh gadkari information in marathi

ram ganesh gadkari information in marathi

राम गणेश गडकरी मराठी माहिती – Ram Ganesh Gadkari Information in Marathi

पूर्ण नाव राम गणेश गडकरी
जन्म२६ मे १८८५
जन्म गावगुजरातमधील नवसारी
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख महाराष्ट्रीयन कवी, नाटककार व विनोदी लेखककार
मृत्यू२३ जानेवारी १९१९
टोपणनाव(ram ganesh gadkari nickname)गोविंदाग्रज

जन्म

गडकरी यांचा जन्म २६ मे १८८५ मधला. जन्म गुजरातमधील नवसारी येथे झाला. गडकरी यांचा कुटुंबा साधं आणि गरीब होतं. फार लहान वयातच वडिलांचे छत्र त्यांच्या डोक्यावरून हरपलं. दिवस हलाखीचे चालले असतानाच लहान भावाचा देखील मृत्यू झाला. बालपणा मध्ये गडकरी यांना अनेक दुःखांचा सामना करावा लागला. पुढे गडकरी यांचे संपूर्ण कुटुंब पुण्यामध्ये स्थानबद्ध झालं.

शिक्षण व वैयक्तिक आयुष्य

वडिलांच्या मृत्यूनंतर गडकरी यांचे कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक झालं. पुणे येथेच गडकरी यांचा बालपण गेलं. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गडकरींनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.पुढील शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. गडकरी यांचा विवाह सीताबाई यांच्याशी झाला होता.

परंतु, काही कारणास्तव या दोघांना वेगळं व्हावं लागलं. गडकरी यांचा दुसरा विवाह रमाबाई या तरुणीशी झाला रमाबाई या गडकरी पेक्षा सतरा वर्षांनी लहान होत्या. राम गणेश गडकरी यांचं हे लग्न देखील काही सफल ठरलं नाही.

साहित्य लेखन

महाराष्ट्राचा शेक्सपियर अशी राम गणेश गडकरी यांची विशेष ओळख आहे. १५० हून अधिक कविता, बरेच विनोदी लेख, चार पूर्ण नाटके, दोन अपूर्ण नाटके अशी अल्प पण गमतीदार अशी त्यांची साहित्य निर्मिती आहे. गडकरी यांना ते एकोणीस वर्षाचे होईपर्यंत धड मराठी देखील नीट बोलता येत नव्हतं. आज आपण जे महाराष्ट्र गीत वाचतो त्याचा लेखन गडकर यांनी केला आहे.

“मंगल देशा, पवित्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा” या महाराष्ट्र गीतांमधून राम गडकरी यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं पवित्र असं वर्णन केलं आहे. पुढे मराठी, संस्कृत, इंग्लिश या भाषांचा अभ्यास करून या भाषांमध्ये ते पारंगत झाले. मराठी भाषेतील गोडी समजून घेऊन मराठी संस्कृती मराठी रितीरिवाज जाणून घेऊन गडकरींनी मराठी भाषेमध्ये अत्यंत सुंदर लेखन केले आहे.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना गडकरींना त्यांच्या एका मित्रा द्वारे किर्लोस्कर नाटक मंदिराबद्दल समजलं आणि त्यांनी या मंदिरात प्रवेश देखील घेतला. या मंडळा तर्फे चालवल्या जाणाऱ्या रंगभूमी नावाच्या मासिका मधून गडकरी यांनी कविता व लेख लिहिण्यास सुरुवात केली. शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून आणि हरीभाऊ आपट्यांच्या करमणूक नियतकालिकातून गडकरींनी साहित्य लेखनास सुरुवात केली.

राम गडकरी यांनी त्यांच्या नाटकांमध्ये समाज प्रबोधनावर लेखन केलं आहे. समाजामधिल सम विषमता आणि भिन्न गोष्टींची मांडणी त्यांनी आपल्या नाटक लेखनात केली आहे. महाराष्ट्राचा शेक्सपियर असा त्यांचा उल्लेख त्यांच्या नाटकांमुळे केला जातो. गडकरी यांनी लिहलेली ‘भावबंधन’ व ‘एकच प्याला’ ही नाटके आजही एव्हरग्रीन आहेत. अल्पायुष्य लागल्यामुळे गडकरींची ‘राजसंन्यास’, ‘वेड्याचा बाजार’ ही नाटके अधूरी राहिली परंतु त्यांनी लेखन केलेली बरीच नाटके व त्यातील काही पात्र देखील अजरामर झाले.

एकच प्याला, गर्वनिर्वाण, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास, भावबंधन, मित्रप्रीती, राजसंन्यास, वेड्याचा बाजार ही राम गणेश गडकरी यांची नाट्य संकलन आहेत. मित्रप्रीती हे नाटक राम गडकरी यांनी वयाच्या सतराव्या वर्षी लिहलं होतं. आजही यातील बरीच नाटके रसिकजनांच्या मनावर राज्य करत आहेत. राम गडकर्‍यांनी १५० कवितांच काव्यलेखन केला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कविता त्यांनी हाताळल्या आहेत‌.

अगदी चारोळीच्या कविता पासून ते दहा पानांच्या दीर्घ कवितां पर्यंत त्यांनी लेखन केले आहे. वाग्वैजयंती हा राम गडकरी यांचा एकमेव काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रह मध्ये सर्व प्रकारच्या कविता पाहायला मिळतील. मुक्तछंदापासून ते छंदबद्ध कविता चे लेखन या काव्यसंग्रहात पहायला मिळेल.

कविता सादर करण्याची गडकरी यांची पद्धत थोडी वेगळी होती ते आधी एखादा परिच्छेदामधून कवितेची थोडक्यात सारणी सांगायचे आणि त्यानंतर संपूर्ण कविता सादर करायचे या त्यांच्या पद्धतीमुळे कविता वाचण्यास आणखीन गंमत वाटायची आणि या पद्धतीमुळे कवितेचा अर्थ समजून घेण्यास सोपे जायचं. राम गडकरी यांनी बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेख लिहले.

संपूर्ण बाळकराम हे गडकरी यांचं विनोदी लेखाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकांमध्ये सर्व प्रकारचे विनोदी लेख आढळून येतात. नाट्यछटा, संवाद आणि विडंबना या संकल्पनेतून राम गडकरी यांनी विनोदी लेख हाताळले आहेत. गडकरी यांनी लिहिलेले विनोदी लेख उच्च दर्जाचे आहेत. त्यांचं हे संपूर्ण पुस्तक उच्च अभिरुचीच्या हास्याची निर्मिती करणारे आहे.

नाट्य कविता आणि विनोदी लेखनाच्या व्यतिरिक्त देखील राम गडकरी यांनी इतर साहित्य लेखन देखील केलं आहे. चिमुकली इसापनीती, समाजात नटाची जागा आणि इतर दोन निबंध, नाट्यकलेची उत्पत्ती, गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना पत्र ही काही राम गणेश गडकरी यांनी लिहलेली अन्य साहित्य आहेत.

राम गडकरी यांनी काही काळ किर्लोस्कर कंपनी मध्ये नाटकात काम करणाऱ्या मुलांच्या मास्तरचं काम केलं. विदर्भातल्या बाळपुर या गावांमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काही वेळ कार्य केलं. इसवी सन १९९० ते १९१० मध्ये राम गडकर यांनी पुण्यातील ज्ञान प्रकाशात उपसंपादकाची नोकरी केली‌. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक म्हणून सेवा दिली.

पुरस्कार व सन्मान

मराठी साहित्य क्षेत्रामध्ये राम गणेश गडकरी यांचं योगदान फार मोठे आहे. सुंदर काव्य लेखन, नाटक, विनोदी लेखन करून राम गडकरी यांनी रसिकजनांच्या मनावर राज्य केलं. गडकरी यांना जरी अल्प आयुष्य लाभलं असल तरी त्यांची साहित्यनिर्मिती अजरामर आहे. पुण्यातील संभाजी उद्यानांमध्ये राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा तयार करण्यात आला आहे.

महाराष्ट्रामध्ये राम गणेश गडकरी यांच्या नावाने साहित्यप्रेमींसाठी स्पर्धा आयोजित केल्या जातात. गडकरी करंडक स्पर्धा. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पिंपरी चिंचवड या शाखेद्वारे ही स्पर्धा आयोजित केली जाते. आणि गडकरी नाट्यलेखन स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेद्वारे केले जात.

गडकरींवर आधारित पुस्तके

राम गणेश गडकरी यांच्या वर आधारित काही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. या पुस्तकांमध्ये राम गडकरी यांच्या साहित्य निर्मिती विषयी लेखन केलं आहे.‌ या पुस्तकांमध्ये राम गणेश गडकरी यांच्या जीवनावर व साहित्यावर आधारित माहिती नोंदवली गेली आहे.

अप्रकाशित गडकरी, कवितेतला राजहंस-कविश्रेष्ठ गोविंदाग्रज, कवी गोविंदाग्रज, गडकरी जीवन चरित्र, गडकरी यांच्या आठवणी, “गडकरी, व्यक्ती आणि वाड्मय”, गडकरी- सर्वस्व, गडकऱ्यांची नाट्यप्रकृती व नाट्यसृष्टी, गडकऱ्यांची नाट्यशैली, गडकऱ्यांची नाट्यसृष्टी, गडकऱ्यांचा विनोद, गडकऱ्यांची संसार नाटके, गोविंदाग्रज, गोविंदाग्रजांची गूढगीते, नाट्यस्वरूप गडकरी, प्रतिभावंत राम गणेश गडकरी, कै. राम गणेश गडकरी यांच्या आठवणी, इत्यादी.

मृत्यू

३४ वर्षाच्या अल्प आयुष्यामध्ये मराठी साहित्य सृष्टीला एकापेक्षा एक काव्यलेखन, नाट्यलेखन, विनोदी लेख देणारे महान व जेष्ठ मराठी कवी राम गणेश गडकरी यांचा मृत्यू २३ जानेवारी १९१९ रोजी झाला. गडकरी यांचा मृत्यू विदर्भातील सावनेर या गावी झाला. गडकरी यांना जाऊन शंभराहून अधिक वर्ष झाली परंतु, त्यांच्या साहित्य निर्मितीतून आपण शरीराने नाही तर मनाने त्यांच्याशी आजही जोडले गेलो आहोत.

राम गणेश गडकरी हे मराठी साहित्य क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचे साहित्यिक होते. इतर साहित्यिकांन प्रमाणे त्यांचा साच्या ठरलेला नसायचा. कविता, नाटक, विनोदी लेख याच्या व्यतिरिक्त जाऊन त्यांनी इतर साहित्य प्रकारांमध्ये देखील लेखन केलं. आज मराठी साहित्य क्षेत्रामध्ये इतर महान साहित्यिकांन सोबत राम गणेश गडकरी यांचे देखील नाव घेतलं जातं.

त्यांच्या कवितांमधून भावनोत्कटता आणि कल्पनाचमत्कृती यांचा प्रत्यय येतो. महाराष्ट्राला राम गणेश गडकरी यांच्यासारख्या साहित्य लेखकाची आजही गरज आहे. राम गडकर यांनी मांडलेले अनेक विषय आज पडद्याआड झाले आहेत.

आम्ही दिलेल्या Ram Ganesh Gadkari Information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राम गणेश गडकरी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ram ganesh gadkari wikipedia in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about ram ganesh gadkari in marathi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ram ganesh gadkari kavita sangrah Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!