Lohagad Fort Information in Marathi लोहगड किल्ल्याची माहिती लोहगड हा किल्ला जवळ जवळ ३४०० फुट उंच असणाऱ्या पुणे जिल्ह्यामधील लोणावळा गावाजवळ मावळ (सह्याद्री) नावाच्या डोंगर रांगेवर विस्तारलेला आहे. लोहगड हा किल्ला पावन खोरे आणि इंद्रायणी खोरे या २ भागामध्ये विभागलेला आहे, त्याचबरोबर हा किल्ला जवळच्या विसापूर किल्ल्याला जोडलेला आहे. लोहगड या किल्ल्यावर मराठा साम्राज्याने खूप वर्ष राज्य केले आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला आपल्याला राजकीय कारणांसाठी खूप वापरला आहे.
लोहगड किल्ला माहिती – Lohagad Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | लोहगड |
प्रकार | गिरिदुर्ग |
उंची | ३४०० फुट |
ठिकाण | लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा गावाजवळ मावळ ( सह्याद्री ) नावाच्या डोंगर रांगेवर विस्तारलेला आहे |
गडावर चढण्याची श्रेणी | सोपी |
डोंगर रांग | मावळ |
किल्ल्याचे २ विभागलेले भाग | पावन खोरे आणि इंद्रायणी खोरे |
पुण्यापासुनचे अंतर | ५० किलो मीटर |
त्याचबरोबर या किल्ल्यावर ५ वर्ष मिगल वंशाने देखील राज्य केले ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण २३ किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले होते. त्यामध्ये लोहगड देखील सामील होता आणि त्यामुळेच मोगलांना या किल्ल्यावर ५ वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली पण इ. स. १६७० मध्ये हा किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील झाला.
लोहगड किल्ल्याविषयी माहिती – lohagad fort pune information in marathi
लोहगड हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा गावाजवळ मावळ (सह्याद्री) नावाच्या डोंगर रांगेवर विस्तारलेला आहे. लोहगड या किल्ल्याची उंची साधारण ३४०० फुट इतकी आहे. या किल्ल्याची निर्मिती राजा सुरजमल याने केली असे म्हटले जाते. लोहगड हा किल्ला पुणे या शहरापासून ५० किलो मीटर अंतरावर आहे आणि ज्यावेळी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता त्यावेळी महाराजांनी ह्या किल्ल्याचा वापर आपली सर्व संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी केला. लोहगड हा किल्ला पावन खोरे आणि इंद्रायणी खोरे या २ भागामध्ये विभागलेला आहे त्याचबरोबर हा किल्ला जवळच्या विसापूर किल्ल्याशी जोडलेला आहे. या किल्ल्यावर चढणे अगदी सोपे आहे आणि हा किल्ला सर्वोत्तम डोंगर किल्ल्यांपैकी एक आहे.
- नक्की वाचा: तोरणा किल्ल्याची माहिती
लोहगड किल्ल्याचा इतिहास – Lohagad Fort History in Marathi)
प्राचीन इतिहासावरून असे म्हंटले जाते कि लोहगड हा किल्ला ७०० वर्षापूर्वीचा आहे आणि प्राचीन काळी या किल्ल्यावर चालुक्य, सातवाहन, राष्ट्रकुट आणि यादव या वंशांचे वर्चस्व होते. त्यानंतर इ. स. १४८९ च्या काळामध्ये मलिक अहमद याने निजामशाहीची सुरुवात केली आणि त्यावेळी त्याने अनेक किल्ले जिंकून घेतले त्यामध्ये लोहगड हा किल्ला देखील समाविष्ट होता. इ. स. १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड विसापूर आपल्या ताब्यात घेतला.
पण पुरंदर किल्ल्यावर झालेल्या मराठा आणि मुगल लढाई मध्ये विनाकारण सैन्य मरत पावत असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह करण्याचे ठरवले आणि या तहामध्ये शिवाजी महाराजांना आपले २३ किल्ले औरंगजेबाला द्यायचे होते आणि त्यामध्ये लोहगड देखील होता.
या किल्ल्यावर तब्बल ५ वर्ष मोगलांनी राज्य केले आणि पण हा किल्ला परत मराठ्यांनी इ. स. १३ मे १६७० मध्ये जिंकला. १७१३ मध्ये हा किल्ला शाहु महाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला आणि त्यांकडून हा किल्ला पेशव्यांना देण्यात आला आणि शेवटी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
- नक्की वाचा: सिंहगड किल्ल्याची माहिती
किल्ल्यावर जाण्यासाठी असलेले ४ दरवाजे
महा दरवाजा :
महादरवाजा हे लोहगडाचे मुख्य दरवाजा आहे या दरवाज्याचे काम देखील नाना फडणवीसांनी करून घेतले आहे आणि या दरवाज्यावर हनुमानाच्या मूर्तीचे नक्षीकाम केले आहे.
गणेश दरवाजा :
किल्ल्यामध्ये जाण्यासाठी गणेश दर्वाज्याजाचा देखील उपयोग केला जायचा हा दरवाजा मध्यम आकाराचा असून दरवाज्याच्या आतल्या भागामध्ये दोन्ही बाजूला देवड्या आहेत. असे म्हणतात कि या दरवाज्याच्या डाव्या-उजव्या बुरुजांच्या बरोबर खाली सावळे कुटुंबाचा नरबळी दिला होता. गणेश दरवाज्याला गडाचा पहिला दरवाजा देखील म्हंटले जाते.
हनुमान दरवाजा :
हनुमान दरवाजा हा किल्ल्यामध्ये येण्यासाठी वापरला जाणार प्राचीन दरवाजा आहे.
नारायण दरवाजा :
नारायण दरवाज्यामधून हि किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो आणि हा दरवाजा इ. स. १७८९ मध्ये नाना फडणवीस यांनी बांधला होता आणि या दरवाज्याजवळ धान्य ठेवण्यासाठी भुयार बनवले होते.
- नक्की वाचा: दौलताबाद किल्ल्याची माहिती
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे
महादेव मंदिर :
दर्ग्यापासून थोडे पुढे गेल्यानंतर दर्ग्याच्या उजवीकडे गेल्यानंतर एक सुंदर शिवमंदिर पाहायला मिळते.
शिवकालीन तोफा :
किल्ल्यामध्ये गणेश दरवाज्यातून आत गेल्यानंतर आपल्यला रिकाम्या जागेत ठेवलेल्या आणि मोडकळीस आलेल्या शिवकालीन तोफा पाहायला मिळतात.
लक्ष्मी कोठी :
ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलेली त्यावेळी मिळालेली सर्व संपती लक्ष्मी कोठीमध्ये ठेवली होती आणि हि कोठी आज देखील आपल्यला पाहायला मिळते.
विंचूकडा :
लोहगडाच्या टोकावर गेल्यानंतर एक विंचवाच्या आकाराचा एक कडा पाहायला मिळतो तो म्हणजे विंचू कडा.
दर्गा :
आपल्याला किल्ल्याच्या महादरवाजाच्या आता गेल्यानंतर दर्गा पाहायला मिळतो.
१६ कोणी तलाव :
आपल्याला किल्ल्यावर एक सुंदर असा १६ कोणी तलाव देखील पाहायला मिळतो या तलावातील पाण्याचा उपयोग पूर्वी पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी केला जात होता.
गुहा :
आपल्यला गडावर ८० ते ९० लोक मावतील इतके मोठी गुहा पाहायला मिळते.
- नक्की वाचा: नरनाळा किल्ल्याची माहिती
किल्ल्याच्या जवळील इतर आकर्षणे
भागा गुहा :
भागा गुहा हि किल्ल्यापासून २ ते ३ किलो मीटर अंतरावर आहे आणि हि गुहा पूर्वीच्या काळी बुध्द संतांचे घर होते.
आमी घाटी शहर :
आमी घाटी शहर हे लोणावळा गावापासून २२ ते २३ किलो मीटर अंतरावर आहे. आपण लोहगड हा किल्ला पाहायला गेल्यानंतर हे शहर देखील पाहू शकतो.
लोणावळा हे शहर एक प्रसिध्द पहाडी भाग आहे आणि हे किल्ल्यापासून २० किलो मीटर अंतरावर आहे.
लोहगड किल्ला फोटो:
लोहगड किल्ला पाहण्यासाठी कसे जायचे ?
- रेल्वे मार्गे : जर तुम्हाला हा किल्ला पाहण्यासाठी रेल्वे ने जायचे असेल तर तुम्ही पुणे किवा मुंबई मधून रेल्वे पकडून लोणावळा रेल्वे स्टेशनवर उतरू शकता आणि तेथून मावळ बस, स्थानिक रेल्वे पकडून जावू शकता.
- रस्ता मार्गे : किल्ल्यापर्यंत जाणारी कोणतीही थेट बस नाही त्यामुळे लोणावळा बस पकडून. लोणावळ्यामध्ये टॅक्सीने जावू शकता.
- विमानाने : लोहगडला जाण्यासाठी कोणतेही थेट विमानतळ नाही. या किल्ल्यापासुनाचे सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे आणि तेथून रेल्वे किवा बस पकडून लोणावळ्याला येवू शकतो.
टीप :
- लोहगड हा किल्ला सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत पर्यटकांना पाहण्यासाठी उघडा असतो.
- लोहगड पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क घेतला जात नाही.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, लोहगड किल्ला lohagad fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. lohagarh fort maharashtra हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information of lohagad fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही लोहगड किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या lohagad killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही lohagad fort pune information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
किल्यावर जायला 25 रू शुल्क तर पार्किंग ला लहान गाडी 20 रू तर मोठी गाडी 60 रू शुल्क
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद