रयत शिक्षण संस्था माहिती Rayat Shikshan Sanstha Information in Marathi

rayat shikshan sanstha information in marathi रयत शिक्षण संस्था माहिती, महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिया असणारी रयत शिक्षण संस्थेविषयी आज आपण या लेखामध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. रयत शिक्षण संस्था हि एक मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे आणि या संस्थेची १९१९ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली आणि हि संस्था फक्त राष्ट्रीय स्तरावरच नावाजलेली संस्था नसून हि संस्था जागतिक स्तरावर देखील नावाजलेली एक सन्मानित शिक्षण संस्था आहे आणि रयत शिक्षण संस्था हि आशिया खंडातील एक आग्रगण्या शिक्षण संस्थांच्यापैकी आहे.

आणि सर्वसाधारणपणे शिक्षणातील त्यांच्या योगदानाचे मोल हे खूप मोठे आहे कारण त्यांनी सुरुवातीपासूनच समाजातील एक मोठा भाग असलेल्या गरीब आणि अज्ञानी यांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी किंवा या स्तरावरील मुलांना शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणासाठी सर्व तन मन झोकून देणारे जनसामान्य होते आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये सामाजिक आजारांची तीव्र जाणीव होती आणि शिक्षणाच्या प्रसाराची नितांत गरज त्यांना पूर्णपणे जाणवली देखील होती म्हणून त्यांनी गारब आणि अज्ञानी मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले तसेच त्यांनी रयत शिक्षण संस्थेची देखील स्थापना केली.

त्यांनी सातारा जिल्ह्यामधील काळे या ठिकाणी १९१९ मध्ये बोर्डीग शाळा सुरु केले आणि त्यांनी रयत शिक्षण संस्थेचा पाया घातला परंतु त्यांनी काही काळानंतर रयत शिक्षण संस्थचे मुख्यालय १९२४ मध्ये सातारा या शहरामध्ये हलवले आणि सध्या देखील या शिक्षण संस्थचे मुख्यालय साताऱ्यामधेच आहे.

rayat shikshan sanstha information in marathi
rayat shikshan sanstha information in marathi

रयत शिक्षण संस्था माहिती – Rayat Shikshan Sanstha Information in Marathi

संस्थेची स्थापनारयत शिक्षण संस्था
स्थापना१९१९ मध्ये
संस्थापक डॉ कर्मवीर भाऊराव पाटील
मुख्यालयसातारा

रयत शिक्षण संस्थेची माहिती – information about rayat shikshan sanstha in marathi

रयत शिक्षण संस्था हि डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरीब आणि अज्ञानी मुलांच्यासाठी १९१९ मध्ये सुरु केली होती आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळून सध्या या संस्थेच्या सध्या एकूण ४३९ उच्च माध्यमिक शाळा आहेत तसेच ४० हून अधिक महाविद्यालये आहेत आणि २५ हून अधिक महाविद्यालयीन वसतिगृह आहेत.

तसेच या संस्थेच्या एकूण ५ ते ६ इंग्रजी शाळा आहेत तसेच १५ कृषी महाविद्यालये आहेत तसेच ५ तांत्रिक शाळा आणि ८ डी एड महाविद्यालये आहेत. ५५ पेक्षा अधिक आयटीआय ( ITI ) आणि इतर शैक्षणिक संस्था देखील आहेत.

रयत शिक्षण संस्थेची उदिष्ठ्ये – objectives

कोणत्याही संस्थेची स्थापना हि काही न काही उदिष्ट समोर ठेऊन स्थापन केली जाते आणि तसेच रयत शिक्षण संस्था देखील काही उदिष्ट समोर ठेऊन स्थापन झालेली संस्था आहे. चला तर खाली आपण रयत शिक्षण संस्थेची उदिष्ठ्ये काय आहेत ते पाहूया.

  • रयत शिक्षण संस्थेचे मुख्य उदिष्ट हे गरीब, अज्ञानी आणि मागासवर्गातील ज्या मुलांना शिक्षण घेणे अवघड होते त्यांना मोफत शिक्षण देणे.
  • शिक्षणाचा प्रचार करणे आणि संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवणे.
  • वेगवेगळ्या जाती आणि धर्माच्या मुलांच्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण करण्याचे प्रयत्न करणे.
  • गरीब आणि मागासवर्गीय मुलांच्यामध्ये शिक्षणाविषयी जागरुकता वाढवणे तसेच त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे.
  • या संस्थेमध्ये शिक्षणाच्या मार्फत मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच काटकसर करण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते.

रयत शिक्षण संस्थेविषयी विशेष तथ्ये – facts

  • रयत शिक्षण संस्था हि प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक कै. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव यांनी स्थापन केलेली विज्ञान, वाणिज्य, कला, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि कायदा या सारख्या विविध विषयांच्याविषयी शिक्षण देणारी भारतातील सर्वात मोठी संस्था आहे.
  • या संस्थेच्या सध्या एकूण ४३९ उच्च माध्यमिक शाळा आहेत तसेच ४० हून अधिक महाविद्यालये आहेत आणि २५ हून अधिक महाविद्यालयीन वसतिगृह आहेत. तसेच या संस्थेच्या एकूण ५ ते ६ इंग्रजी शाळा आहेत तसेच ७ प्रशासकीय कार्यालये, ५१ प्राथमिक शाळा अश्या प्रकारे एकूण ७३७ शाखा आहेत.
  • या संस्थेचे स्वयंसाहाय्याद्वारे शिक्षण हे ब्रीदवाक्य आहे आणि सर्वांच्यासाठी शिक्षण हे या संस्थेचे मुख्य उदिष्ट आहे.
  • संस्थेची सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि केंद्रातील शिक्षणापासून वंचित आणि उपेक्षित जनसामान्यांसह समाजाचे परिवर्तन लक्षात घेवून भारत सरकारने, राज्य सरकारने तसेच विविध राष्ट्रीय संस्थांनी या संस्थेचा गौरव केला.

रयत शिक्षण संस्थेला मिळालेले पुरस्कार – awards

रयत शिक्षण संस्थेने गरीब आणि मागासवर्गीय मुलांच्यासाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला म्हणजेच त्यांच्यासाठी मोफत शिक्षण सुरु केले तसेच शिक्षणामार्फत अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या मार्फत मुलांना स्वावलंबी बनवले आणि म्हणून या संस्थेने चांगली कामगिरी केल्यामुळे या संस्थेला भारत सरकारने, राज्य सरकारने आणि इतर राष्ट्रीय संस्थेनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ते पुरस्कार कोणकोणते आहेत ते आपण खाली पाहणार आहोत.

  • राजर्षी शाहू पुरस्कार हा या संस्थेला १९९० मध्ये मिळाला होता.
  • २०१२ – २०१३ या काळामध्ये या संस्थेला शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार मिळाला होता.
  • १९९४ मध्ये रयत शिक्षण संस्थेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
  • २००१ मध्ये या संस्थेला आदर्श शिक्षण संस्था या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेला २०११ मध्ये उत्कृष्ट शिक्षण संस्था हा पुरस्कार मिळाला होता.
  • रयत शिक्षण संस्थेला २०१४ ते २०१५ च्या काळामध्ये वटवृक्ष शिव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • तसेच या संस्थेला २००२ मध्ये श्री गाडगे महाराज सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

आम्ही दिलेल्या rayat shikshan sanstha information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रयत शिक्षण संस्था माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rayat shikshan sanstha information in marathi pdf या Rayat shikshan sanstha information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about rayat shikshan sanstha in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!