रोटी रेसिपी मराठी Roti Recipe in Marathi

Roti Recipe in Marathi रोटी रेसिपी मराठी आपण भाजीसोबत खाण्यासाठी काही ना काही करतो जसे कि चपाती, नान, पुलके, जीरा राईस, पांढरा भात या सारख्या पदार्थांच्या सोबत खाल्ल्या जातात आणि यामधील एक महत्वाचा पदार्थ जो हॉटेल मध्ये कोणत्याही मसालेदार भाजीसोबत मागवतात तो म्हणजे रोटी. रोटी हि रेसिपी हॉटेल मध्ये गेल्यानंतर भाजीसोबत खाण्यासाठी हमखास ऑर्डर करतात आणि हि रोटी आपल्याला घरी देखील बनवता येते. जर आपण घरामध्ये जर काही मसालेदार भाजी बनवली असेल तर म्हणजेच पनीर मसाला, पनीर टिक्का, पालक पनीर, व्हेज कुर्मा या सारख्या भाज्या बनवल्या कि आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी रोटी बनवू शकतो आणि एक उत्तम पर्याय आहे.

रोटी हि रेसिपी भारतामध्ये सर्व ठिकाणी भाजीसोबत खाण्यासाठी केली जाते आणि बहुतेक लोकांना हि रेसिपी आवडते. रोटी रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण रोटी रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

roti recipe in marathi
roti recipe in marathi

तंदूरी रोटी रेसिपी – Roti Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

रोटी कशी बनवतात ?

रोटी बनवताना मैदा आणि गव्हाचे पीठ त्यामध्ये मीठ घालून मळले जाते आणि मग त्याचे मध्यम आकाराचे बनवून ती लाटली जाते आणि तव्यावर भाजून कोणत्याही भाजीसोबत सर्व्ह केली जाते.

रोटी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • मैदा : मैदा हा रोटी बनवण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे मैद्यामध्ये आपण इतर साहित्य घालून त्याचा कानिकीचा गोळा बनवून मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्याची रोटी बनवली जाते.
  • गव्हाचे पीठ : यामध्ये गव्हाचे पीठ घातल्यामुळे रोटी छान मऊ होते.
  • दही : रोटी मध्ये दही वापरले तर रोटी छान बनते.

रोटी रेसिपी – roti recipe in marathi

रोटी हि एक भारतीय डिश आहे जी भारतामध्ये बहुतेक भागामध्ये बनवली जाते आणि आवडीने खाल्ली देखील जाते. रोटी हि आपण कोणत्याही भाजी सोबत खावू शकतो आणि बहुतेक लोक रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर कोणत्याही भाजीसोबत खाण्यासाठी रोटी ऑर्डर करतात. रोटी रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण रोटी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

नक्की वाचा: पालक पराठा रेसिपी मराठी 

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

रोटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make roti recipe 

रोटी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते आणि जर आपल्या घरामध्ये उपलब्ध नसेल तर आपण ते बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो. चला तर आता आपण रोटी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी मैदा.
  • १ वाटी गव्हाचे पीठ.
  • मीठ ( चवीनुसार )
  • १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर.
  • अर्धी वाटी दही.
  • साखर ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • ३ चमचे तेल.

रोटी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make roti recipe 

रोटी रेसिपी हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि रेसिपी भारताच्या बहुतेक भागामध्ये लोक आवडीने खातात. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून रोटी कशी बनवायची ते पाहूयात.

  • रोटी बनवताना सर्वप्रथम मैदा आणि गव्हाचे पीठ चाळून घ्या आणि मग ते एका मोठ्या मिक्सिंग बाऊल मध्ये घाला.
  • आता दही थोडे फेटा आणि मग ते दही मैदा आणि गव्हाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये घाला आणि दही देखील पिठाला चांगले लावून घ्या.
  • आता यामध्ये तेल, चवीनुसार मीठ आणि साखर आणि कोथिंबीर घाला आणि हे मिश्रण चांगले मिक्स करा.
  • मग यामध्ये लागेल तेवढे पाणी घाला आणि याची घट्ट कणिक मळून घ्या आणि हे झाकण लावून कमीत कमी एक तास किंवा जास्ती जास्त २ ते ३ तास भिजवून ठेवावी.
  • २ तासांनी कानीक चांगली भिजली कि त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवावे आणि त्याला मैदा लावून ते गोल लाटावे.
  • आता गॅसवर तवा ठेवावा आणि तो मध्यम आचेवर गरम करावा.
  • आपण जी रोटी लाटलेली असते त्या रोटीला वरच्या बाजूला पाणी लावा आणि पाणी लावलेली बाजू तव्यावर खाली घाला.
  • रोटी खालून चांगली भाजे पर्यंत आणि वरून थोडी फुगे पर्यंत तव्यावर भाजा आणि मग ती रोटी डायरेक्ट गॅसवर दोन्ही बाजू भाजा.
  • तुमची रोटी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.

रोटी कश्या सोबत खातात – serving suggestions

  • रोटी आपण काजू करी, पनीर मसाला, पालक पनीर, पनीर टिक्का, व्हेज कुर्मा या सारख्या भाज्यांच्या सोबत खाल्ली जाते तसेच हि रेसिपी आपण कोणत्याही दुसऱ्या भाजी सोबत खावू शकतो.

टिप्स (Tips) 

  • आपण जर साध्या रोटीला जर बटर लावले तर ती बटर रोटी बनते.
  • साध्या रोटीमध्ये आपण जर कोथिंबीर घातली नाही तरी चालते.
  • रोटीची कणिक कमीत कमी १ तास आणि जास्तीत जास्त २ ते ३ तास भिजवून ठेवावी लागते.

आम्ही दिलेल्या roti recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर तंदूरी रोटी रेसिपी माहिती मराठी maida roti recipe in marathi language बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या wheat roti recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि roti recipe in marathi madhura माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये roti in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!