Sabudana Khichdi Recipe in Marathi साबुदाण्याची खिचडी रेसिपी भारतीय संस्कृती हि वेगवेगळ्या प्रकारे जपली जाते आणि भारतीय संस्कृती मध्ये उपवासाला एक वेगळेच महत्व आहे. भारतामध्ये कित्येक ठिकाणी वेगवेगळे उपवास केले जातात आणि त्या उपवासाला वेगवेगळे पदार्थ आणि फळे खाल्ली जातात जसे की शाबु, चिप्स, रताळाची खिचडी, साबूदाणा वडे, उपवासाची बटाटा भाजी, बटाटे चिवडा, शाबु चिवडा यासारखे वेगवेगळे पदार्थ उपवासाला बनवले जातात परंतु वारंवार बनवला जाणारा आणि उपवासाठी लोकप्रिय असणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी हा एक असा प्रकार आहे.
जो उपवासासाठी बनवला जातो आणि महाराष्ट्रामध्ये तर हा आवडीने बनवला जातोच परंतु हा पदार्थ भारताच्या काही इतर भागामध्ये देखील बनवला जातो. साबुदाणा खिचडी बनवण्यास खूप सोपी आहे आणि ती जर भिजून मऊ झाली असेल तर ती बनवण्यासाठी फक्त १५ ते २० मिनिटे लागतात.
साबुदाणा खिचडी बनवताना सर्वप्रथम आपल्याला कमीत कमी ५ ते ६ तास शाबु भिजवून ठेवावी लागते आणि मग ती भिजली कि त्याला हिरवी मिरची किंवा लाल तिखट, जिरे याची फोडणी दिली जाते आणि मग त्यामध्ये मीठ, साखर, शेंगदाण्याचा कुट, ओले खोबरे आणि कोथिंबीर घालून ते मिक्स करून तो थोडा वेळ चांगली वाफवली जाते.
साबुदाणा खिचडी ज्यावेळी आम्ही घरामध्ये बनवतो त्यावेळी ती थोडी जास्ती बनवावी लागते कारण उपवास असणाऱ्या व्यक्तीसोबत घरातील काही इतर लोकांना देखील खिचडी खावीशी वाटते कारण साबुदाणा खिचडी हि काही लोकांची लोकप्रिय डिश आहे. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनते. चला तर आता आपण या लेखामध्ये साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहूयात.
साबुदाण्याची खिचडी रेसिपी – Sabudana Khichdi Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० मिनिटे |
पाककला | भारतीय ( महाराष्ट्रीयन ) |
बनवण्याची पध्दत | सोपी |
साबुदाणा खिचडी म्हणजे काय ?
साबुदाणा खिचडी बनवताना सर्वप्रथम आपल्याला कमीत कमी ५ ते ६ तास शाबु भिजवून ठेवावी लागते आणि मग ती भिजली कि त्याला हिरवी मिरची किंवा लाल तिखट, जिरे याची फोडणी दिली जाते आणि मग त्यामध्ये मीठ, साखर, शेंगदाण्याचा कुट, ओले खोबरे आणि कोथिंबीर घालून ते मिक्स करून तो थोडा वेळ चांगली वाफवली जाते.
साबुदाणा खिचडी रेसिपी – maharashtrian sabudana khichdi recipe
महाराष्ट्रा बरोबर भारतामध्ये इतर ठिकाणी देखील आवडीने बनवली जाणारी आणि खाल्ली जाणारी उपवासाची खिचडी हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि छान देखील लागते. आपण हि खिचडी उपवासाला तसेच आपण कधीही खावू वाटल्यास बनवू शकतो किंवा कित्येक कुटुंबामध्ये हा पदार्थ सगळ्यांचा आवडीच असला तर तो सकाळच्या नाश्त्यासाठी देखील बनवला जातो.
साबुदाणा खिचडी हि खूप सोपी आणि कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये बनणारी डिश आहे. चला तर मग साबुदाणा खिचडी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.
- नक्की वाचा: झटपट नाश्ता रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० मिनिटे |
पाककला | भारतीय ( महाराष्ट्रीयन ) |
बनवण्याची पध्दत | सोपी |
साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही तसेच मोजकेच साहित्य लागते आणि जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये आधीपासूनच उपलब्ध असते त्यामुळे आपल्याला बाजारातून काही विकत आणावे लागत नाही. चला तर मग साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात
- १ वाटी साबुदाणा.
- १ वाटीला थोडासा कमी शेंगदाण्याचा कुट ( भाजलेल्या शेंगदाण्याचा ).
- ३ ते ४ चमचे खवलेले ओले खोबरे.
- २ चमचे कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
- १/२ चमचा जिरे.
- ३ ते ४ चमचे तेल.
- ३ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
- ५ ते ६ पाने कडीपत्ता.
- १ बटाटा ( पातळ काप केलेला ).
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
आता आपण वर दिलेले साहित्य वापरून एकदम सोपी पण चविष्ट असणारी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
- साबुदाणा खिचडी बनवताना सर्वप्रथम आपल्याला शाबु स्वच्छ धुवून घ्या आणि त्यामधील शाबु धुतलेले पाणी काढा आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून ते भिजवण्यासाठी ठेवा. शाबु कमीतकमी ५ ते ६ तास भिजवा किंवा जास्तीत जास्त रात्रभर भिजत ठेवा.
- शाबु रात्रभर भिजत ठेवली तर ती चांगली भिजेल आणि फुगेल त्यामुळे शाबु रात्रभर भिजवलेली चांगली.
- आता त्या भिजवलेल्या शाबुमध्ये पाणी असेल तर पाणी काढून टाका. शक्यतो भिजवलेल्या शाबुमध्ये पाणी राहत नाही कारण शाबु पाणी शोषून घेते.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये ३ ते ४ चमचा तेल गरम करा तेल गरम झाले कि त्यामध्ये जिरे टाका आणि जिरे छान फुलले कि त्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता पाने टाका आणि ते काही सेकंद भाजा.
- मग त्यामध्ये पातळ काप केलेला बटाटा घाला आणि थोडा वेळ भाजा आता त्यामध्ये भिजवलेली शाबु घाला आणि ती चांगली तेलामध्ये मिक्स करा.
- आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट, चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि ते चांगले मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये लगेच ओले खोबरे आणि कोथिंबीर घाला आणि ते एकत्र करू खिचडीला एक चांगली वाफ येवू द्या.
- तुमची गरमागरम उपवासाची साबुदाणा खिचडी तयार झाली.
साबुदाणा खिचडी कश्यासोबत खावू शकतो – serving suggestions
- खिचडी मध्ये अवपण लिंबू रस पिळून तो मिक्स करून खावू शकतो तसेच खिचडी लिंबूच्या लोणच्यासह किंवा दह्यासोबत खावू शकतो.
टिप्स (Tips)
- जर तुम्ही साबुदाणा खिचडी जर उपवासाला बनवत नसाल तर त्यामध्ये फोडणीसाठी कांदा देखील वापरला तरी चालतो.
- जर तुम्हाला लगेच खिचडी बनवायची असेल आणि तुम्ही जर रात्री शाबु भिजत घातली नसेल तर शाबु गरम पाण्यामध्ये एक तास भिजवा त्यामुळे शाबु थोडे मऊ होतील.
- आपण साबुदाणा खिचडीमध्ये हिरव्या मिरच्या घालण्याऐवजी लाल मिरची पावडर घालू शकतो.
आम्ही दिलेल्या sabudana khichdi recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर साबुदाण्याची खिचडी रेसिपी माहिती मराठी sabudana khichdi madhura बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या recipe of sabudana khichdi in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sabudana khichdi recipe in marathi video माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sabudana khichdi recipe marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट