सैनिक स्कूल सातारा माहिती Sainik School Satara Information in Marathi

sainik school satara information in marathi सैनिक स्कूल सातारा माहिती, आपल्याला माहित आहे कि भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ३३ अश्या सैनिक शाळा आहेत आणि त्यामधील १ म्हणजे सैनिक स्कूल सातारा हि आहे आणि भारतामध्ये अश्या ३३ शाळा जरी असल्या तरी या शाळेला या प्रकारची पहिली शाळा म्हणून ओळखले जाते आणि हि सातारा या शहरामध्ये असून या शाळेची स्थापना २३ जून १९६१ मध्ये स्थापन झाली होती आणि हि शाळा भारत सरकारने सुरु केली होती.

सैनिक सातारा स्कूल हि एक निवासी शाळा असून हि पहिल्यांदा मुलांच्यासाठी स्थापन केली होती परंतु सध्या या शाळेमध्ये मुली देखील प्रवेश घेऊ शकतात आणि या शाळेमध्ये ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते.

हि शाळा १९६१ मध्ये म्हणजेच ज्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कारकीर्दीमध्ये सातारा या ठिकाणी झाली.

आणि या शाळेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश असा होता कि या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी हे शैक्षणिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या चांगल्या प्रकारे तयार व्हावेत. या सैनिक स्कूल सातारा या शाळेचे सर्व कामकाज हे भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या मार्फत चालते.

sainik school satara information in marathi
sainik school satara information in marathi

सैनिक स्कूल सातारा माहिती – Sainik School Satara Information in Marathi

शाळेचे नावसैनिक स्कूल सातारा
स्थापना२३ जून १९६१
शाळेमध्ये कोण शिक्षण घेवू शकतात६ वी  ते १२ वी पर्यंतचे मुले व मुली यामध्ये शिक्षण घेवू शकतात.
प्रशासकीय कामकाजभारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या मार्फत

सैनिक स्कूल शाळा स्थापन करण्याचा मुख्य उद्देश – main objective

सैनिक स्कूल सातारा हि या प्रकारातील पहिली शाळा आहे आणि या शाळेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या चांगल्या प्रकारे तयार करणे.

सैनिक स्कूल सातारा मार्फत मिळणाऱ्या सुविधा – facilities

सैनिक स्कूल सातारा हे मुलांना आणि मुलींना शैक्षणिक, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या चांगले बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि या शाळेमध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा देखील दिल्या जातात त्या कोणकोणत्या आहेत ते खाली आपण पाहूया.

 • सैनिक स्कूल सातारा मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॅडेट्सचे निवासस्थान मिळते आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी राहावे लागते कारण हि एक प्रकारची निवासी शाळा आहे.
 • तसेच सध्या तंत्रज्ञान हे खूप पुढे गेले आहे आणि त्यांना या बद्दल माहिती होण्यासाठी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी संगणक प्रयोगशाळा देखील आहेत.
 • या ठिकाणी विद्यार्थी निवास करत असल्यामुळे त्यांना या ठिकाणी कॅडेट्स मेस हि सोय देखील देण्यात आली आहे.
 • तसेच या ठिकाणी सभागृह, क्रीडा सुविधा आणि व्यायाम सुविधा देखील आहेत.
 • तसेच या ठिकाणी सीएसडी कॅन्टीनची सोय देखील आहे आणि रायडींग स्कूल देखील आहे.
 • सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी एक चांगला आणि प्रशस्त कॅम्पस देखील आहे.
 • या ठिकाणी मुलांना वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचता यावी म्हणून या ठिकाणी लायब्ररीची देखील सुविधा आहे.
 • सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी एनसीसी (NCC) प्रशिक्षण देखील दिले जाते.

सैनिक स्कूल मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता निकष – eiligibility

कोणत्याही संस्थेमध्ये प्रवेश घेत असताना त्या संबधित संस्थेने ठरवलेले काही पात्रता निकष असतात आणि ते आपल्याला पूर्ण करावे लागतात तसेच सैनिक स्कूल सातारा या शाळेमध्ये प्रवेश घेत असताना देखील त्या संबधी विद्यार्थ्यांना काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि ते पात्रता निकष काय काय आहेत ते खाली आपण पाहणार आहोतच.

 • जर एकाद्या विद्यार्थ्याला इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्याला प्रवेशाच्या वर्षी त्याचे वय हे १० ते १२ वर्षाच्या दरम्यान असावे.
 • तसेच जर एखाद्या विद्यार्थ्याला नववी साठी प्रवेश घ्यायचा असल्यास त्या विद्यार्थ्याला टायचे वय हे १३ ते १५ वर्षाच्या दरम्यान असावे आणि त्यांने आठवी पर्यंतचे शिक्षण हे चांगल्या शाळेमध्ये घेतलेले असावे.
 • इच्छुक विद्यार्थी या शाळेमध्ये सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण घेऊ शकतात.

सैनिक स्कूल सातारा परीक्षेचे स्वरूप – satara sainik school entrance exam syllabus in marathi pdf

प्रत्येक शैक्षणिक संस्थेचे काही वेगळी परीक्षा पध्दती असते आणि या ठिकाणी देखील या संस्थेची परीक्षा पध्दती आहे ती खाली पाहणार आहोत.

 • सैनिक स्कूल सातारा हि शिक्षण संस्था मुलांचा प्रवेश करून घेण्यासाठी प्रवेश परीक्षा घेते आणि या परीक्षेमध्ये बहुपर्यायील प्रश्न ऑफलाईन मोडद्वारे अर्जदारांना विचारले जातात आणि हे प्रश्न हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये विचारले जातात.
 • या स्कूलमध्ये सहावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुध्दीमत्ता या वर प्रश्न विचारले जातात आणि अश्या प्रकारे हा पेपर ३०० मार्काचा असतो यामध्ये गणित साठी ५० प्रश्न विचारले जातात आणि हा भाग १५० मार्कांचा असतो आणि इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुध्दीमत्ता यावर प्रत्येकी २५ प्रश्न विचारले जातात आणि हे प्रत्येकी ५० मार्काचे असतात.
 • तसेच जर नववी या वर्गासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्याला प्रवेश परीकाशेमध्ये गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान, बुध्दीमत्ता आणि सामाजिक अभ्यास या विषयी प्रश्न विचारले जातात आणि हा पेपर ४०० मार्क्सचा असतो.
 • आणि यामध्ये गणित या विभागासाठी ५० प्रश्न विचारलेली असतात जी २०० ममार्काची असतात आणि इंग्रजी, सामान्य विज्ञान, बुध्दीमत्ता आणि सामाजिक अभ्यास या साठी प्रत्येकी २५ प्रश्न विचारलेली असतात आणि त्यासाठी प्रत्येकी ५० मार्क असतात.

आम्ही दिलेल्या sainik school satara information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राणी दुर्गावती यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या satara sainik school information in marathi या sainik school satara question papers in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि sainik school satara wikipedia in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये satara sainik school entrance exam syllabus in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!