Yashwantrao Chavan Information in Marathi यशवंतराव चव्हाण यांची माहिती आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यशवंतराव चव्हाण हे खूप प्रगत विचारांचे होते. समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्याची त्यांच्यामध्ये ताकद होती व त्यांची इच्छा देखील होती. त्याचप्रमाणे त्यांनी गोरगरिबांसाठी अनेक संस्था, योजना उपलब्ध करून दिल्या. तसेच महाराष्ट्र कसा पुढे जाईल या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्राच्या विकासावर जोर दिला. समाजाकडून देखील यशवंतराव यांना भरपूर प्रेम मिळालं. चला तर जाणून घेऊ या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्याच्या संघर्षाची गाथा.
यशवंतराव चव्हाण यांची माहिती – Yashwantrao Chavan Information in Marathi
पूर्ण नाव | यशवंतराव बळवंतराव चव्हाण |
जन्म | १२ मार्च १९१३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वडील | बळवंतराव चव्हाण |
आई | विठाबाई चव्हाण |
ओळख | महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री |
जन्मगाव | महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील देवराष्ट्र |
मृत्यू | २५ नोव्हेंबर १९८४ |
जन्म
यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. यशवंतराव यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी मधला आहे. यशवंतराव यांचे जन्मस्थान महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील देवराष्ट्र हे आहे. यशवंतराव यांचे बालपण कष्टमय गेलं. कारण, यशवंतराव लहान असताना त्यांच्या आयुष्यातून बापाच सुख हरपलं.
त्यांच्या वडिलांच्या जाण्यानंतर त्यांच्या आईने व भावाने यशवंतराव यांचा पालन-पोषण करून शिक्षण वगैरे करून दिलं. यशवंतराव यांना लहानपणापासून भाषण साहित्य संगीत भजन कीर्तन या सर्वांची फार आवड होती. यशवंतराव यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे पूर्ण केलं.
उच्च शिक्षणासाठी यशवंतराव कोल्हापूर व पुणे येथे शिक्षण घेत होते बी.ए. व एल. एल. बी. या दोन पदव्या त्यांनी संपादन केल्या. त्यानंतर सन १९४२ मध्ये यशवंतराव यांनी आपलं एल. एल. बी चे शिक्षण पूर्ण करून एलएलबी ही पदवी मिळवली.
राजकीय आयुष्य
महाराष्ट्राचे शिल्पकार अशी यशवंतराव चव्हाण यांची विशेष ओळख आहे. ज्यांनी महाराष्ट्र घडवला आणि प्रबोधन कारक महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले, महाराष्ट्र मध्ये ज्यांनी क्रांती घडवून आणली, ते महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण. राष्ट्रीय नेते आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी मुख्य भूमिका बजावली.
सन १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आणि एक मे १९६० रोजी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रामध्ये प्रगती घडवून आणण्याचं काम यशवंतराव चव्हाण यांनी केलं. मुख्यमंत्रिपदाचा हा गाडा यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत चालवला.
यशवंतराव यांना देशप्रेम भरपूर होतं. १९३० मध्ये गांधीजीनी चालू केलेल्या कायदेभंग चळवळ मध्ये यशवंतराव यांचा सहभाग होता. या गोष्टीमुळे त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. मुख्यमंत्रीपद त्यांनी अत्यंत उत्तम रित्या सांभाळलं. त्यानंतर १९६२ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतराव यांच्यामधील क्षमता पाहून त्यांना संरक्षण मंत्री पद सोपवलं.
यशवंतराव त्यांना दिलेली कामगिरी खूप छान प्रकारे पार पाडत होते. त्यामुळे पुढील काळामध्ये त्यांना वेगवेगळी पदे मिळत गेली. उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री ही सगळी पदे यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या हुशारीच्या जोरावर उत्तम रित्या सांभाळली. यशवंतराव चव्हाण हे आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्षही होते.
यशवंतराव चव्हाण यांचे विचार करण्याची पद्धत थोडी वेगळी होती. भारत ज्यावेळी स्वातंत्र्य झाला त्यावेळी भारताचे पूर्ण लक्ष कृषी विभागाकडे होतं. भारताला कृषी विभागाकडून जास्त फायदा मिळायचा त्यामुळे, यशवंतराव चव्हाण यांनी कृषी क्षेत्रामध्ये भरपूर योजना राबवल्या. त्याशिवाय कृषी क्षेत्रा संबंधित यांचा थोडं वेगळं मत होतं.
त्यांच्यामध्ये जो जमीन कसतो तो शेतीचा खरा मालक असतो. याशिवाय शेती करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा शेती करण्याचे उत्तम मार्ग कोणते या सगळ्यांचा अधिक अभ्यास शेतकऱ्याने केला पाहिजे. कारण शेती करताना ती आपण व्यापारीदृष्ट्या केली पाहिजे त्याशिवाय शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राचा अभ्यास माहीत असावा.
जेणेकरून उत्पन्न चांगलं व्हावं. असे काही कृषी क्षेत्रा संबंधीत त्यांचे विचार होते. कुठल्याही गोष्टीचे नियोजन करणं खूप गरजेचं असतं. ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. ग्रामीण भागातील उद्योगांना एक नवीन वाटचाल मिळाली पाहिजे. यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी ब-याच योजना काढल्या.
यशवंतराव चव्हाण यांच्या मते जे भाग विकसित आहेत त्यांच्या विकासाबद्दल नव्हे तर आधी अविकसित भागांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण आर्थिक दृष्ट्या समतोल ठेवू शकू.
- नक्की वाचा: डॉ राजेंद्र प्रसाद यांची माहिती
योजना
प्रशासकीय विकासासाठी पंचायत राज त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची स्थापना केली. राज्याचा आर्थिक विकास व्हावा म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी राज्य पंचवार्षिक योजने ला सुरुवात केली. मूलभूत सोयी सुविधांन मध्ये प्रगती घडवून आणण्यासाठी कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार केला. त्यानंतर कोयना व उजनी या प्रकल्पांना हातभार लावला.
यशवंतराव यांनी १८ सहकारी साखर कंपन्यांची सुरुवात केली. शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन केली. मराठवाडा व कोल्हापूर विद्यापीठ यांची स्थापना यशवंतराव चव्हाण यांनी करून दिली.
राज्यामध्ये कृषी विद्यापीठ स्थापन करण्यामध्ये देखील यशवंतराव चव्हाण यांनी मोठा सहभाग घेतला. सांस्कृतिक विकास होणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. मराठी साहित्य संस्कृती महामंडळ आणि विश्वकोश मंडळाची स्थापना यशवंतराव चव्हाण यांनी करून दिली.
संस्था
यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला विकासाची वाट दाखवली. यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्राच्या विकासात खूप मोठा वाटा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या अनेक संस्था आहेत. पुणे मधील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मुंबई रिक्लेमेशन (मुंबई). यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई). यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (नाशिक). यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी (पुणे). यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (पुणे).
यशवंतराव चव्हाण यांची साहित्य संपदा – Yashwantrao Chavan Books in Marathi Pdf
आपले नवे मुंबई राज्य(१९५७). ऋणानुबंध (१९७५). कृष्णाकाठ (१९८४). भूमिका (१९७९). महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक (१९६०). विदेश दर्शन. सह्याद्रिचे वारे (१९६२). युगांतर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानच्या प्रश्नांची चर्चा.
मृत्यू
यशवंतराव चव्हाण हे उत्तम राजकारणी नेते होते. यशवंतराव चव्हाण यांनी लहानपणापासून गरीबी बघितली होती. यशवंतराव चव्हाण हे स्वतः शून्यातून वर आले होते. आणि शून्यातून वर येण म्हणजे गरीबी, संघर्ष, संकटं, वेगवेगळ्या अडचणी, कष्ट, महिनत या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं हे खूप अचूकरित्या त्यांना माहीत होतं.
त्यामुळे ज्या वेळी ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांना समाजाच्या अडचणी माहीत होत्या. आपल्या समाजातील दारिद्र्य मिटवून टाकणं हे त्यांचं एक स्वप्नच होतं. आपल्या महाराष्ट्राला व देशाला कसं पुढे नेता येईल याच गोष्टींचा त्यांनी नेहमी विचार केला. यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व फार वेगळे होते.
ते प्रगत विचारांचे होते. महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर चढवन्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग आर्थिक विकास हा सगळीकडे समान झाला पाहिजे असे यशवंतराव चव्हाण यांचे मत होते. आणि त्यानुसार त्यांनी ते प्रत्यक्षात देखील उतरवलं.
अगदी शून्यातून यशवंतराव चव्हाण यांनी आपलं नाव आपल्या कामगिरीच्या जोरावर उभं केलं होतं. आपण केलेल्या कष्टाची जाण त्यांना होती म्हणून त्यांना मिळाल्या मुख्यमंत्रीपदाचा त्यांनी नेहमीच आदर केला. त्या पदाचा गैरवापर त्यांनी कधीच होऊ दिला नाही. २५ नोव्हेंबर १९८४ या दिवशी यशवंतराव चव्हाण यांना हृदयविकाराचा झटका आला.
दिल्लीमध्ये त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेली मेहनत फळाला आली. परंतु आज जी महाराष्ट्राची स्थिती आहेत त्यानुसार पुन्हा यशवंतराव चव्हाण यांच्या सारखं व्यक्तिमत्व घडावं अशी इच्छा संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या कर्तबगारीने त्यांच्या प्रगत विचारांनी महाराष्ट्राला यशाच्या वाटेवर सोडलं होतं.
ते आज कुठेतरी नाहीसं झालं आहे. आज खरं तर महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांची फार गरज आहे. यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या कामगिरीमुळे आपल्या सर्वांच्या स्मरणात कायम राहतील.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये yashwantrao chavan information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर information of yashwantrao chavan in marathi म्हणजेच “यशवंतराव चव्हाण यांची माहिती” yashwantrao chavan jayanti यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या information about yashwantrao chavan in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि maharashtrache pahile mukhyamantri माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
Yashwantrao chavan yanchi shiksha shetrat kamgiri
….. यशवंतराव चव्हाण यांच्या वारसांची नावे दिली नाहीत… त्यांना किती अपत्य होते ते सुद्धा स्पष्ट दिलेले नाही. कृपया परिपूर्ण माहिती द्यावी.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ..!
आपल्याला जरूर माहिती देण्यात येईल