Sant Jagnade Maharaj Information in Marathi संताजी जगनाडे महाराज माहिती अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारा संत तुकारामांचा पट्टशिष्य, महाराष्ट्रातील तेली समाज घडविणारे, तेली समाजाचे आराध्यदैवत, समाजसुधारक आणि थोर लोकनेते संत “संताजी जगनाडे महाराज”. सदरच्या लेखात आपणास संत जनगाडे महाराजांचे बालपण त्यांचे जीवन त्यांचे अभंग व साहित्याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे.
संत जगनाडे महाराज माहिती – Sant Jagnade Maharaj Information in Marathi
संत जगनाडे महाराज यांचा जीवन परिचय
नाव | संत श्री संताजी जगनाडे |
जन्म | ८ डिसेंबर १६२४ |
जन्मस्थळ | सुदुंबरे, तालुका- मावळ, महाराष्ट्र |
मृत्यू | इ.स १६८८ |
वडील | विठोबा जगनाडे |
आई | माथाबाई |
पत्नी | यमुनाबाई |
अपत्य | बाळोजी व भागू |
समाज | तेली |
गुरु | संत तुकाराम |
साहित्य | ‘तेलसिंधु’, ‘शंकरदीपिका’ |
संत जगनाडे महाराज बालपण
संत श्री संताजी जगनाडे महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी इ.स. ८ डिसेंबर १६२४ रोजी तेली समाजामध्ये आई माथाबाई आणि वडील विठोबा या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे आजोळ मावळ तालुक्यातील सुदुंबरे हे होते. त्यांचे आई वडील हे दोघेही विठ्ठलभक्त होते. त्यामुळे संताजींवर बालपणापासूनच धार्मिक संस्कार झाले होते. लहानपणापासूनच त्यांना कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली होती. त्यामुळे नंतर ते संत तुकाराम महाराजांच्या चवदा टाळकऱ्यापैकी एक झाले. त्यांचा जन्म तेल्याच्या घरात झाल्यामुळे हिशोब करता येणे गरजेचे होते. संताजी अत्यंत तल्लख बुध्दिमतेचे असल्यामुळे लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण त्यांनी घेतले होते. त्यांची निरीक्षण अतिशय सूक्ष्म असायची.
- नक्की वाचा: संत सेवालाल महाराज माहिती
संताजी महाराजांच्या बालपणीची एक आख्यायिका सांगितली जाते. ते रोज आपल्या आईसोबत गावातील चक्रेश्वर मंदिरात जात असत. त्या मंदिरात अनेकजण आश्रयाला राहत. एके दिवशी एक भुकेने व्याकूळ माणूस त्यांना दिसला. संताजीनी नैवेद्याच ताट त्या भुकेल्या माणसाला दिलं. तो तृप्त झाला. परंतु नैवेद्यासाठी आणलेलं ताट संताजीनी कुणालातरी दिल्याने आई रागावली. त्यावर संताजी म्हणाले कि, ज्याला अन्नाची जास्त गरज आहे त्याला पहिल्यांदा ते दिलं पाहिजे. लहान असतानाच त्यांना माणसातील ईश्वर दिसला.
विवाह
वयाच्या १० व्या वर्षी वडिलोपार्जित तेलाच्या व्यवसायात संताजींचा प्रवेश झाला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही. तत्कालीन बालविवाहाच्या प्रथेमुळे त्यांचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षी खेड येथील कहाणे परिवारातील यमुनाबाई सोबत झाला. संताजी महाराजांनी आपला प्रपंच, व्यवसाय आणि समाज यात उत्तम संतुलन साधलं होता. कालांतराने त्यांना बाळोजी व भागू हि मुलं झाली. लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते.
- नक्की वाचा: संत रोहिदास माहिती
गुरु संत तुकाराम महाराज
त्या काळात संतांचे कीर्तनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून समाजाला शिकवण देण्याचे कार्य चालू होते. १७ व्या संत तुकाराम महाराजांची थोर समाजसुधारक आणि अन्यायाविरुद्ध लढणारे लोकनेते म्हणून ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. एके दिवशी संत तुकाराम महाराजांचे संताजींच्या गावात असणाऱ्या चक्रेश्वर मंदिरात कीर्तन होते. ह्या कीर्तनाला गावातली तसेच बाजूच्या गावाहून बरेच लोक आले होते. संताजीही कीर्तन ऐकण्यास गेले होते. संत तुकाराम महाराजांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्या विषयावर पूर्ण कीर्तन केले. त्या किर्तनामुळे संताजींच्या मनावर मोठा प्रभाव पडला आणि त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला. संताजीनी तुकाराम महाराजांची भेट घेतली. तेव्हा तुकाराम महाराजांनी संसार करत असताना परमार्थहि साधता येतो हे समजावून सांगितला.
“ज्याने गुरु नाही केला, त्याचा जन्म वाया गेला” आपण अजूनपर्यंत गुरु केला नाही. गुरु शिवाय मार्ग मिळत नाही, गुरुशिवाय तरणोपाय नाही म्हणून त्यांनी संत तुकाराम महाराजांना गुरु केले. तेव्हापासून संत जगनाडे महाराज (संतू तेली ) तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळ वाजवीत होते. संत तुकाराम महाराजांचे १४ टाळकरी होते त्यापैकी एक म्हणजे संत संताजी महाराज. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे लिखाण गंगाधर मवाळ आणि संताजी जगनाडे तेली हे करीत होते. संत तुकाराम महाराजांनी आपल्या शिष्यास म्हणजे संताजी आणि गंगाधर मावळ यांना भगवान शिवाचे दर्शन करून दिले.
- नक्की वाचा: संत सेना महाराज माहिती
अभंगाच्या गाथांचे पुनर्लेखन
तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगाची गाथा रामेश्वर भट्टानी इंद्रायणीत बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ती अभंगाची गाथा पुनर्लिखित केली. तुकाराम महाराजांचे वंशज गोपाळबाबा मोरे यांनी म्हंटले आहे,
“संताजी तेली बहु प्रेमळ | अभंग लिहित बसे जवळ |
धन्य त्याचे सबळ | सांग सर्वकाळ तुक्याचा |”
संताजींच्या अथक परिश्रमामुळेच तुकारामांची अभंगाची गाथा जिवंत राहू शकली, असे म्हंटले आहे.
साहित्य
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संत संताजी जगनाडे महाराजांनी केले.
संताजी महाराजांनी ‘तेलसिंधु’, ‘शंकरदीपिका’, ‘योगाची वाट’, ‘निर्गुणाच लावण्य’ नावाचे ग्रंथ लिहिले. त्यांनी तेलसिंधु या ग्रंथातून तेलाच्या व्यवसायाची माहिती दिलेली आहे. तेलाच्या व्यवसायातील अनेक रूपके, उपमा, अलंकार व चित्रण त्यांच्या अभंगातून झळकत.
“आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा | नंदी जोडीयेला मन पवनाचा ||
भक्ती हो भावाची लाट टाकीयीली | शांती शिळा ठेविली विवेकावरी ||”
मृत्यू
मार्गशीष वद्य त्रयोदशी इ.स. १६८८ साली संताजी महाराजांनी देह ठेवला. जगद्गुरू संत तुकारामांनी संताजींना शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन दिले होते. परंतु संत तुकाराम महाराज जगनाडे महाराजांच्या आधीच वैकुंठाला गेले होते. ज्यावेळी संताजींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते त्यांचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले.
“चारिता गोधन, माझे गुंतले वचन ||
आम्हा झाले येणे एका तेलीया कारणे ||
तीन मुष्ठी मृतिका देख, तेव्हा लोपविले मुख ||
आलो म्हणजे तुका, संतु न्यावया विष्णु लोका ||”
जेव्हा तुकारामांनी ३ मुठी माती संताजींच्या डोक्यावर टाकली तेव्हा संताजींचे डोके आत गेले.
आम्ही दिलेल्या sant jagnade maharaj information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर संत जगनाडे महाराज यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant jagnade maharaj information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about sant jagnade maharaj in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant jagnade in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
संत तुकाराम महाराज यांचे कीर्तन सम्प्ले की जगनाडे महाराज अभंनग लिहून ठेवत त्यामुळे गाथा त्यांची पाठ होती