संत रोहिदास महाराज यांची माहिती Sant Rohidas Maharaj Information in Marathi

sant rohidas maharaj information in marathi भूतलावर प्रत्येक युगामध्ये अत्याचार, दुर्बुद्धी, अधर्म यांसारख्या गोष्टी वाढतात तेव्हा त्या नष्ट करण्यासाठी भगवंत जन्माला येतो, असा भारतीयांचा विश्वास आहे. आणि हाच विश्वास सार्थ ठरतो, जेव्हा माणसाला महाभारतातल्या श्रीकृष्ण, रामायणातील प्रभू राम यांचे कर्म कळते. कधी याच भगवंतांचे दर्शन संत शिरोमणी तुकाराम, श्री ज्ञानदेव, संत नामदेव, संत रामदास तर कधी संत रोहिदास sant rohidas in marathi यांसारख्या संतांमध्ये होते. आकाश कसे असंख्य ताऱ्यांनी उजळून निघते तसाच अवघा महाराष्ट्र उजळून निघाला तो इथे जन्माला आलेल्या संतांमुळे. असेच एक संत, जनसमुदायाला सामाजिक एकतेचा संदेश देणारे क्रांतिकारक विचारवंत – ‘संत रोहिदास’.

sant-rohidas-maharaj-information-in-marathi
Sant Rohidas Maharaj Information in Marathi/ sant rohidas in marathi

संत रोहिदास (रविदास) महाराज यांची माहिती Sant Rohidas Maharaj information in marathi

संत रोहिदास जीवन परिचय

नावसंत रोहिदास
जन्मई.स. १३७६
जन्मस्थळ गोवर्धनपूर, वाराणसी
जात चांभार
आईकालसी
वडीलरघु
पत्नीलोना
मृत्यूई.स. १५२७

उत्तरप्रदेशातील काशी जवळ असणाऱ्या मांडूर गावात ई.स. १३७६ साली माघ पौर्णिमेस रविवारी चर्मकार कुळात एका साधूच्या आशीर्वादाने रघु आणि कालसी यांच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आले. पुत्रजन्मामुळे कालसी कृतार्थ झाली. ते रत्न म्हणजे संत रोहिदास. काहींच्या मते संत रोहिदास यांचा जन्म हा वाराणसी मधील काशिजवळ गोवर्धनपूर येथे झाला. पण रविदास यांनी रैदास रामायणात लिहिल्याप्रमाणे त्यांचे जन्मस्थळ मांडूर हेच असल्याचे सिद्ध होते.

“कासी ढीग मांडूर स्थाना, शुद्ध वरण करत गुजराना |

मांडूरनगर लीन औतारा, रविदास सुभ नाम हमारा ||”

सूर्याप्रमाणे तेजस्वी असल्याने त्या पुत्राचे नाव ‘रविदास’ असे ठेवण्यात आले. आणि पुढे हाच तेजस्वी पुत्र संपूर्ण भारतवर्षात कायमस्वरूपी कोरले गेलेले नाव म्हणजे ‘संत रोहिदास’ झाले. संत रोहिदास भारतातील एकमेव असे संत आहेत कि ज्यांना विविध नावानी ओळखले जाते. बंगालीमध्ये रुईदास, रुयदास, राजस्थानिमध्ये रोहिदास, मराठीत रविदास पंजाबीमध्ये रैदास अशी त्यांची प्रचलित नावे आहेत.

बालपण (रोहिदास महाराजांची कथा)

आई कालसी ही धार्मिक आणि रामभक्त होती. त्यांच्या वडीलांचा व्यवसाय चांभार हा होता. वडील रघु हे काशीक्षेत्री येणाऱ्या जाणाऱ्या साधुसंतांची शक्य तितकी सेवा करीत असत. आईवडील दोघेही सात्विक वृत्तीचे होते. आई वडिलांच्या संस्कारामुळे त्यांना लहानपणापासूनच कीर्तन, प्रवचन ऐकण्याची आवड, संतांच्या प्रभावाखाली राहणे, यामुळे  त्यांना अध्यात्माची गोडी लागली. ते मोठे होतील तसे त्यांच्यातील देशभक्ती, देवभक्ती वाढत चालली. समाजातील जातीभेद, उच्चनीचता, दारिद्र्य- श्रीमंती यामधील भेदभाव कसा दूर करावा या विचारांनी त्यांना रात्रंदिवस झोप लागत नसे. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह लोना नावाच्या मुलीशी झाले. त्यांना विजयदास नावाचा मुलगा झाला.

स्वामी रामानंद यांना संत रोहीदासांनी आपले गुरु मानले. संत कबीरदास हे संत रोहीदासांचे समकालीन संत होते, आणि संत मीराबाई या सवर्ण समाजातील असतानाही चर्मकार समाजातील संत रोहीदासाना त्यांनी आपले गुरु मानले होते. तत्कालीन जातीयतेला न जुमानता अस्पृश्य समाजातील एका संताला गुरु मानून त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करणे, यातूनच रोहीदासांचे मोठेपण सिद्ध होते. गुरुनानक यांनी रोहीदासांबद्द्ल आपल्या भावना व्यक्त करताना म्हंटले आहे कि,

“रविदास चमारू उस्तुति करे |

हरि कि रिती निमख इक गई |

पतित जाति उत्तम भया |

चारि बरन पए पगि आई |”

संत रोहिदास हे रामभक्ती करण्यात दंग असे. ते हाताने चप्पल बनवायचे काम करत तर तोंडाने राम नामाचा जप करत. ते साधुसंताना फुकट जोड देत असत. रामभक्त रोहीदासांच्या भक्तीवेडामुळे त्यांच्या व्यवसायाचे आणि संसाराचे नुकसान होऊ लागले. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना वेगळे काढले. तरीदेखील त्यांनी आपला भक्तिमार्ग सोडला नाही. संत रोहिदास म्हणतात,

“अब कैसे छुटे राम रट लागी | प्रभू जी, तुम चंदन हम पानी,

जाकी अंग-अंग बास समानी ||

प्रभू जी, तुम मोती, हम धागा जासिये सोनहि मिलत सोहागा ||

प्रभू जी, तुम स्वामी हम दासा, ऐसी भक्ती करै ‘रैदासा’ ||”

या ओळीवरून कळते कि, संत रोहिदास भगवंताला आपला अविभाज्य भाग मानत त्यांना देवाशिवाय जीवनाची कल्पनाही करवत नव्हती.

मन शुद्ध/पवित्र असेल तर कुठेही समाधान लाभते, असा विचार असणारे रविदास त्यांच्या दोह्यातून म्हणतात, “मन चंगा तो कठौती में गंगा” माणसाचे मन पवित्र असेल, त्याला जातीयवादाचा स्पर्श झाला नसेल तर चांभाराच्या कुंडातही गंगाजलाच पावित्र्य दिसून येते, त्यासाठी आपला दृष्टीकोन तसा असायला हवा. यातून त्यांच्या विचारांची व्यापकता कळून येते.

समाजकार्य

संत रोहिदास यांनी भारतभर फिरून समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे धडे देत भारताला अध्यात्मिक आणि सामाजिक उंचीवर नेऊन ठेवले. संत रोहिदास हे मानवतावादी संत होते. त्यांनी समाजाला कल्याणाचा मार्ग दाखवला.

तत्कालीन समाजव्यवस्थेतील शुद्र मानला जाणाऱ्या समाजाचा प्रत्येक घटक सुखी व्हावा, एकमेकांप्रती आदर निर्माण व्हावा, जातीय आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, अशी विचारधारणा असणारे संत रविदास यांनी सामाजिक कार्याचा प्रसार संपूर्ण उत्तर आणि दक्षिण भारतात केला.

संत रोहिदास यांनी जातीव्यवस्थेला विरोध केला. त्यांनी समाजाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला कि, जर जातीभेदामुळे माणूस माणसापासून दुरावला जात असेल तर जातीभेद करून फायदा काय?

‘हिल, मिल चलो जगतमे, फूट पडो दो नही, फूट पडी माची तो, देश नष्ट हो जाई’

जात- पात, श्रद्धा-अंधश्रधा नव्हे तर एकजूट आणि धर्म आणि देश्प्रेमाबाबत रोहीदासानी अतिशय परखड विचार प्रकट केलेत. त्यांनी माणूस आणि देशाच्या हितासाठीच उपदेश केले असल्याचे दिसून येते.

साहित्य (रोहिदास महाराजांचे गाणेसाहित्य)

‘गुरुग्रंथ साहेब’ या शिखांच्या धर्मग्रंथामध्ये रविदासांच्या  ४१ कवितांचा समावेश आहे. या कविता म्हणजे त्यांच्या कल्पना आणि साहित्यिक कामांचा प्रमाणित स्त्रोत आहे.

शीख परंपरेतील प्रेमलेखन किंवा प्रेमबोध यामध्ये राविदासांच्या जीवनाबद्दल सांगितल्या गेलेल्या अख्यायिका आणि कथांचा समावेश आहे.

शीख परंपरा आणि हिंदू दादुपंथी हे त्यांच्या साहित्यकृतीचे दोन प्राचीन प्रत्यक्ष स्त्रोत आहेत.

संत रोहिदास मृत्यू

संत रोहिदास यांचा मृत्यू ई.स. १५२७ साली भारताच्या राजस्थान राज्यातील उदयपुर जवळील चित्तोडगड येथे झाला. रोहिदास संप्रदायी रोहिदास पुण्यतिथी चैत्र वद्य चतुर्दशीस साजरी करतात. ज्या ठिकाणी त्यांची पादत्राणे मिळाली, त्याच ठिकाणी त्यांची समाधी बांधलेली आहे.

आम्ही दिलेल्या sant rohidas information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर श्री संत रोहिदास महाराज sant sena rohidas information in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant rohidas maharaj information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sant rohidas in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant rohidas marathi information in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!