संत सेवालाल महाराज यांची माहिती Sant Sevalal Maharaj Information in Marathi

Sant Sevalal Maharaj Information in Marathi संत सेवालाल महाराज माहिती महाराष्ट्राच्या मातीला पराक्रमी शूरवीरांचा वारसा लाभला तसाच या मातीमध्ये संतांच्या पवित्र  विचारांचा सुगंध आजतागायत दरवळत आहे. संतांचे विचार हे कोणत्याही जातीपुरते मर्यादित नसतात. तर त्यांचे मार्गदर्शन, प्रबोधन, भजन, कीर्तन हे सर्व जनतेच्या जडणघडणी साठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. याच पावन भूमीमध्ये भटक्या जातीमध्ये जन्माला येऊन समाजाला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवणारे,

ज्यांना बंजारा समाजाचे कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे, ज्यांचे विचार जनतेला मानवतावाडची शिकवण देतात असे ‘संत सेवालाल महाराज’. sant sevalal maharaj mahiti in marathi हे त्यागी, दूरदृष्टी, बुधीप्रामाण्य विचारांचे महान संत व थोर समाजसुधारक होते.

 sant sevalal maharaj information in marathi
sant sevalal maharaj information in marathi / sant sevalal maharaj mahiti in marathi

संत सेवालाल महाराज यांची माहिती – Sant Sevalal Maharaj Information in Marathi

संत सेवालाल महाराज जीवन परिचय

नावसंत सेवालाल महाराज
जन्म व जन्मस्थळ १५ फेब्रुवारी १७३९ गोलाल डोडी, जि.अनंतपुर, आंध्रप्रदेश
मृत्यू४ डिसेंबर १८०६ पोहरा, जि. वाशीम, महाराष्ट्र
वडीलभीमा नाईक
आईधर्मळीमाता
पत्नीअविवाहित
समाजबंजारा
भाषाबंजारा

संत सेवालाल महाराज यांचा जन्म आंध्रप्रदेश राज्यातील अनंतपुर जिल्यात असणाऱ्या गुत्ती तालुक्यातील गोलालडोडी या गावात मार्गशीष कृष्ण पक्ष शके १६६१( इ.स. १५ फेब्रुवारी १७३९ ) रोजी झाला. सध्या त्या गावाला सेवागड या नावाने ओळखले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव भिमानाईक आणि आईचे नाव धर्मळीमाता होते.

संत सेवालाल महाराज कथा (कहानी)

भीमा नाईक यांना चार पुत्र सेवालाल, बद्दू, हप्पा, भाणा असे होते. त्यामध्ये सेवालाल हे ज्येष्ठ होते. त्यांना संत सेवादास, सेवाभाया, सेवालाल महाराज या नावांनी ओळखले जाते. लहानपणापासूनच संत सेवालाल हे विरक्त स्वभावाचे होते. त्यांच्याकडे दुरदृष्टी होती. त्यांच्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात  निरक्षर लोकांचा समावेश होता. जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात आणल्या. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचे दर्शन जगभर घडविले.

लाद चला बंजारा | ले चला अपना संसार ||

बैल चले गी चले धाट से चले सांडरे |

सांड कि गरजना सुनकर |

भाग चले जंगल के शेर ||

सेवालाल महाराजांनी आजन्म अविवाहित राहून समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले. सेवाभायानी  फिरत्या व्यापाराच्या निमित्ताने संपूर्ण भारतभ्रमण करताना भारतातील अनेक संतांच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन समाजाला बंजारा बोलीभाषेतून जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखविला.  दिल्लीच्या नवाबाचा पराभव करून सेवालालनी दिल्लीचे राज्य जिंकले. असा आदर्श त्यांनी तरुण जनतेसमोर ठेवला. समाजातील तरुणांनी समाजातील अनिष्ट रुढींच्या अघोरी दहशतवादाचे समूह नष्ट करणारे पराक्रमी शूर व्हा, असा संदेश त्यांनी आपल्या कर्तृत्वातून समाजाला दिला.

जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा, स्त्रियांचा सन्मान करा आणि मुली जिवंत देवी आहेत, निसर्गाच्या अनुषंगाने नैसर्गिक जीवन जगा. भेदभाव करू नका, खोटे बोलू नका, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा,व्यसन करू नका, भुकेलेल्यांना अन्न द्या, सर्वांचा आदर करा, अंधश्रध्दा टाळा यांसारखी २२ प्रमुख तत्वे संत सेवालाल महाराजांनी बंजारा जीवनासाठी दिली आहेत.

बंजारा समाजाचा इतिहास 

सेवालाल यांचा जन्म बंजारा समाजामध्ये एका तांड्यात पशुपालन कुटुंबात झाला. बंजारा समाजातील लोक उदरनिर्वाहासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात काम धंदा मिळविण्यासाठी जात असतात. बंजारा समाजातील लोक हे प्राचीन काळापासून निसर्गाशी जोडलेल्या पृथ्वी, जल, अग्नी, वायू, सूर्य या शक्तिधारकांची पूजा करतात. त्यामुळे या जमातीतील लोकांना भटक्या जमातीचे लोक असे म्हणू लागले. या समाजाचा प्रमुख व्यवसाय बैलांच्या पाठीवर धान्याची गोणी वाहण्याचा होता. बंजारा समाजात लामण, लाम्बाडी, लांबणी अशा अनेक जमाती आहेत. विशेषता महाराष्ट्रात या समाजाचे वास्तव्य अतिशय जास्त प्रमाणात आहे.

संत सेवालाल महाराज यांचे उपदेश / शिकवण 

संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी बोल हे मानवाला वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात. बंजारा समाजाने त्याचा इतिहास व सेवाभावी शिकवण हि आजतागायत सुरक्षित ठेवली आहे. स्वतः शिका, इतरांना शिकवा, आणि शिकून राज्य घडावा अशी शिकवण ते समाजाला आपल्या बोलीभाषेतून देतात,

“शिका छ | शिकवा छ || शिकण राज घडावा छ ||”

संत सेवालाल महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा, कुप्रथा, व्यसनाधीनता, अनीतीचे व्यवहार, भूतदया, निसर्गप्रेम, स्वकर्तृत्वावर विश्वास, सत्य, अहिंसा याविषयीचे उपदेश हे वचने, दोहे, कवणे,व भजने या माध्यमातून बंजारा बोलीभाषेत समाजासमोर ठेवले. आणि समाजात धार्मिक आणि सामाजिक बदल घडवून आणले.

सत्य जाणून जीवन जगला तरच जीवनरूपी भवसागर पार करून जाल, सत्य हाच खरा धर्म आहे हे सांगताना संत सेवालाल महाराज म्हणतात,

“सत्यधर्म लीनता ती रेंणू |

सदा सासी बोलंणू |

हर वातेनं सोच समजन केवंणू |

भवसागर पार कर लेंणू ||”

स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवला तर तुम्ही स्वतःचे जीवन प्रकाशमय करू शकता, देव मंदिरात नाही तर माणसात आहे, असा सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याचा मार्ग पुढील दोह्यातून ते सांगतात,

“तम सौता तमारे जीवनमं | दिवो लागा सको छो |

कोई केनी भजो- पुजो मत | कोई केती कमी छेनी |

सौतर वळख सौता करलीजो | भजे-पुजेमं वेळ घालो मत |

करंणी करेर शिको | नरेर नारायण बंन जायो |

जाणजो छाणजो पछच मानजो |”

अहिंसा, कुप्रथा – देवाला प्रसन्न करण्यासाठी प्राणिमात्रांचा बळी देऊ नका. त्यांची पूजा करा, रक्षण करा त्यामध्येच ईश्वर भक्ती आहे.

“वाडी-वस्तीनं सायी वेस |

किटी-मुंगीनं सायी वेस |

जीव-जणगानीनं सायी वेस |

बाल- बच्चानं सायी वेस|

सेनं साथी वेस |”

अनीतीचे व्यवहार, कपटनीतीचा, बेइमानीचा व्यवहार करणाऱ्यांवर फटकारे ओढताना सेवालाल महाराज म्हणतात,

“जे कपट वाचा लेन आये|

पाप ओरे सोबत जाये |

यम घरेरो फासो ओरे गळेमं पडीये|

नव मंणेरी काया ओरी नरकेम मळजाये |

लक्ष चौऱ्यांशी योनी भोगाये ||”

गोर गरिबांना पिळणे बंद करा, त्यांना दंड करून आपला स्वार्थ साधू नका. स्वार्थासाठी गरिबांवर अन्याय करणाऱ्याला माणूस म्हणून जगण्याला अर्थ नाही. त्यावर सेवादास महाराज बंजारा बोलीत म्हणतात,

गोर गरीबेन दांडन खांय

सारी पिडी ओर नरकेम रिय

आरे वंशेपर दिवो कोणी रिय

गुन्हेगारीपासून परावृत्त व्हा असा संदेश देण्यासाठी ते बंजारा बोलीमध्ये खालील दोह्यातून उपदेश करतात,

“करीय चीर खाय कोरी, हात आये हथकडी

पगेमाई पडीये बेडी, डोरी डोरी हिंडीये”

“कसाईन गावढी मत वेचो |” गायी कसाई ला विकू नका.

“केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो |” कोणाची निंदा चाडी चुगली लावा लावी करू नका.

अत्यंत प्रभावी आणि संवेदनशील असे उपदेश सांगून समाजाला सन्मार्गावर चालण्याची शिकवण संत सेवालाल महाराजांनी समाजाला दिली. स्वतः निरक्षर असूनही त्यांनी समाजाला कळेल अशा लोकभाषेत बुधीप्रामान्यवादाचे, इह्वादाचे आणि विज्ञानाचे धडे दिले.

निर्वाण (मृत्यू)

जगातील ज्या ज्या ठिकाणी बंजारा समाज आढळतो त्या त्या ठिकाणी सेवालाल महाराज यांचे मंदिर बांधले जाते. त्यांना बंजारा समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. अशा संत सेवालाल महाराज यांचा मृत्यू ४ डिसेंबर १८०६ ला महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील पोहरा या गावात झाला.

आम्ही दिलेल्या sant sevalal maharaj information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant sevalal maharaj information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant sevalal maharaj in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!