संत सावता माळी यांची माहिती Sant Savata Mali Information in Marathi

sant savata mali information in marathi महाराष्ट्राची भूमी पावन आहे कारण इथे एकाहून एक संत जन्माला आले, ज्यांनी सामान्य जनतेला परमार्थाचा मार्ग दाखविला. अशा अनेक संतांमध्ये आपला प्रपंच हा विठ्ठलाचाच प्रपंच आहे असे समजून कर्म करीत राहिले ते संत सावता माळी. ज्यांनी संसार आणि परमार्थ वेगळा न मानता प्रपंच परमार्थमय करून टाकला. संत सावता माळी हे मराठी संतकवी होते. ज्यांनी बागबागायती बरोबरच विठ्ठल भक्तिचाही मळा फुलविला आणि त्या भक्तीचा सुगंध सर्वत्र पसरला असे संत सावता माळी. “देव सदा सर्वकाळ तुमच्या सानिध्यात वसतो”, हे तत्व त्यांनी सामान्य जनांच्या मनावर बिंबवले.

sant-savata-mali-information-in-marathi
sant savata mali information in marathi wikipedia

संत सावता माळी यांची माहिती sant savata mali information in marathi

संत सावता माळी यांचा जीवन परिचय 

नावसंत सावतोबा
जन्मई.स. १२५०, माढा तालुक्यातील अरण, जि. सोलापूर
भाषामराठी
वडीलपुरसोबा माळी
आईनंगीताबाई माळी
पत्नीजनाबाई
मृत्य (निर्वाण)ई.स. १२९५ अरण, जि. सोलापूर

सावतोबा यांच्या नावातच शुद्ध, सात्विक स्वभावाचे लक्षण दिसून येते. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचे समकालीन असलेले संत सावता माळी यांचा जन्म ई.स. १२५० साली महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण या गावी माळी घराण्यात झाला. त्यांचे घराणे मुळचे सांगली जिल्ह्यातील मिरज संस्थानातील औसे होय. संत सावता महाराजांचे आजोबा देवू माळी हे अरण या गावी स्थायिक झाले. पंढरपूर जवळ असलेल्या अरण चे नंगीताबाई आणि पुरसोबा हे सावतोबांचे आई आणि वडील.

दोघेही विठ्ठल भक्त होते त्यामुळे लहानपणापासूनच सावतोबानीही भक्तीचे धडे गिरविले होते. ते विठ्ठलाचे परमभक्त होते. भगवद्भक्ताचे घराणे म्हणून त्यांचे घराणे प्रसिद्ध होते. शेती हा त्यांचा व्यवसाय होता. हेच  त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. सावतोबानीही आई वडिलांची परंपरा सांभाळली.

संत शिरोमणी नामदेव महाराज संत सावता माळी यांच्या जन्माबद्दल आपल्या अभंगातून म्हणतात कि,

“माळियेचे घरी सावता जन्मला, पावन तो केला वंश त्याचा ||                     

धन्य ते अरण, रत्नांचीच खाण | जन्मला निधान सावता तो ||                      

सावता सागर, प्रेमाचा आगर | घेतला अवतार माळ्या घरी ||                      

धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता | साठविला दाता त्रैलोक्याचा ||              

नामा म्हणे सुफळ झाला, वंश उद्धरिला माळीयाचा ||”

संत सावता माळी यांनी भेंड गावच्या ‘भानवसे रुपमाळी’ या घराण्यातील जनाबाई हिच्याशी लग्न केले. आपल्या पतीची विठ्ठलभक्ती पाहून जनाबाई या सुद्धा त्यांच्या विठ्ठल साधनेत साथ करू लागल्या. संसार करूनही विरक्त वृत्तीचे सावतोबा तिला सत्पुरुष वाटत. त्यांना विठ्ठल आणि नागाताई अशी दोन अपत्ये झाली. दिवसभर मळ्यात राबावे, रात्री भजन-कीर्तनात रमावे असा त्यांचा दिनक्रम रहात असे.

खडतर आयुष्याला ईश्वरसेवा मानून अत्यंत समाधानी जीवन सावतोबानी जगलं. त्यांच्या अभंगांमुळे त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती. जसा मळा नेहमीच फुलता ठेवला तसाच त्यांनी स्वतःचा संसार देखील फुलवला होता.

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना पाणी, भाकरी, फळे, फुले देऊन पूजा करत असत. “हा मळा हेच माझे पंढरपूर” असे ते म्हणत होते. मळ्यात काबाडकष्ट करणे, भाज्या-फळे पिकवणे, वाटसरूला भाकरी देणे हीच माझी विठ्ठलभक्ती आहे. पांडुरंग माझ्या मळ्यात राहतो असे म्हणणारे सावतोबा कधीही स्वतः पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटायला त्यांच्या घरी जात असे. पांडुरंग हा मूर्तीत नाही तर आपण रोज करणारे काम हसतमुखाने आणि मनापासून करण्यात पांडुरंगाची खरी भेट होते. म्हणूनच संत एकनाथ महाराज त्यांच्याविषयी म्हणतात,

“एका जनार्दनी सावता तो धन्य | तयाचे महिमान न कळे काही”.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व नामदेव महाराज यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जातीतल्या अनेक संतांनी त्यांच्या अभंगाद्वारे विठ्ठलाचा व भक्तीचा महिमा गायिला. सावता माळी यांनी आपल्या बागबागायतीच्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द आपल्या अभंग रचनेत वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगांच्या भाषेत नव्या शब्दांची आणि नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली.. त्यांनी अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“आमुची माळियाची जात | शेत लावू बागाईत ||                                       

आम्हा हाती मोट नाडा | पाणी जाते फुलझाडा ||”

संत सावता माळी यांचे विचार अर्थपूर्ण आहेत. पोटापाण्याचा व्यवसाय हा प्रत्येकालाच करावा लागतो. तसे पहिले तर हे संत उत्तम कारागीर होते, ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्यांनी परमात्मा उपासना चालू ठेवली होती.

समाजप्रबोधन

संत सावता माळी यांनी आपला पिढीजात व्यवसाय नेकीने सांभाळून वारकरी पंथाचे, धार्मिक प्रबोधनाचे कार्य केले.

संत सावता माळी यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार यांची सांगड घातली. ईश्वर प्राप्तीसाठी योगयाग, जपतप, तीर्थयात्रा यांसारख्या साधनांची आवश्यकता नाही.

योग याग तप धर्म                                                  

सोपे वर्म नाम घेता                                                

तीर्थव्रत दान अष्टांग                                                     

यांचा पांग आम्हा नको.

प्रपंच करता करता केवळ अंतःकरणपूर्वक नामस्मरण केल्याने ईश्वर प्रसन्न होतो आणि दर्शन देतो, असा विचार त्यांनी आग्रहाने मांडला

कर्म आणि कर्तव्य करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी प्रवृतीमार्गी शिकवण त्यांनी जनतेला दिली. ‘कर्मे ईशु भजावा’ ही त्यांची वृत्ती होती.

आख्यायिका

अरणभेंडी गावात त्यांच्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा संत ज्ञानदेव, संत नामदेव आणि पांडुरंग हे पैठणच्या कुर्मदास नावाच्या भक्ताला भेटण्यासाठी चालले असताना वाटेत सावता माळी यांचे अरणभेंडी गांव लागले. पांडुरंगाला गंमत करण्याची इच्छा झाली. तेव्हा त्या दोघांची नजर चुकवून ते धावत पळत गेले आणि सावत्याला म्हणाले “माझ्या मागे चोर लागलेत, मला कुठेतरी लपव”. त्यावर सावतोबा म्हणाले “देवा, तुझे वास्तव्य तर सगळीकडे असते, अशी कोणती जागा आहे जेथे तु कोणाला दिसणार नाहीस?” विठ्ठल म्हणाले “तु मला तुझ्या उदरात लपव.”

त्याचबरोवर सावता माळी यांनी खुरपे घेऊन आपले पोट फाडले व  देवाला आपल्या पोटात घालून घेतले आणि वरून कांबळी बांधल्या. पांडुरंगाचा शोध घेत ज्ञानदेव आणि नामदेव सावता महाराजांपाशी आले आणि म्हणाले, “आमचा देव पहिला का तुम्ही?” व्याकूळ नामदेवांची प्रार्थनेमुळे पांडुरंग  त्यांच्या पोटातून बाहेर आले. सावतोबाना त्यांच्या उदरात प्रत्यक्ष विठ्ठलाने वास केला याचा परमानंद झाला. त्यांनी तो पुढील अभंगातून व्यक्त केला,

“सर्व सुखाचे सुख निर्मळ | कैसे दिसत आहे श्रीमुख निर्मळा ||

सावत्या स्वामी परब्रम्ह्पुतला | तनुमनाची कुरवंडी ओवळा ||”

संत सावता माळींचे गाजलेले अभंग

त्यांचे अभंग काशीबा गुरव हा लिहून ठेवत असे. संत सावता माळी यांच्या अभंगरचना या रसाळ आहेत. ज्यामध्ये त्यांनी दैनंदिन जीवनातील शब्द वापरले आहेत.

“कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी|

लसून मिरची कोथिंबिरी | अवघा झाला माझा हरि ||”

कर्म आणि कर्तव्य करत राहणे हीच खरी ईश्वरसेवा आहे अशी शिकवण संत सावता माळी यांनी दिली. सावतोबानी मळा फुलवून तिथे विठ्ठल बघीतला असे ते खालील अभंगातून सांगतात.

“स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात |”

“सावत्याने केला मळा | विठ्ठल देखियला डोळा |”

प्रपंच करता करता, केवळ नामस्मरनातुनच परमार्थ साधावा असे ते खालील अभंगातून म्हणतात

“प्रपंची असुनी परमार्थ साधावा | वाचे आळवावा पांडुरंग |

मोट, नाडा, विहीर, दोरी | अवघी व्यापिली पंढरी ||”

सावता महाराज म्हणतात, भक्तीमध्येच खरे सुख आणि आनंद आहे, तीच खरी विश्रांती आहे.

“सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा |

जेणे मुक्ती द्वारा ओळंगती ||”

सावता माळी यांनी विठ्ठलाच्या रूपाचे भावस्पर्शी वर्णन खालील अभंगातून केले आहे,

“विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ | हृदयकमळ मंत्रसिद्ध |                                  

दिगंबर मूर्ती गोजरी सावळी | तोडे पायीं वाली मनगटीं |                                

कटीवरी हात पद्म शंख | पुष्पकळी मोख अंगुलीत |                                     

सांवता माळी म्हणे शब्द्ब्रम्ह साचें | नाम विठ्ठलाचें कलियुगीं |”

संत सावता माळी निर्वाण

संत सावता महाराज आजारी पडल्यावर त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला आणि ते अखंड नामस्मरण करू लागले. अरण या त्यांच्या गावी आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (ई.स. १२९५ ) रोजी संत सावता माळी पांडुरंगचरणी अनंतात विलीन झाले असे मानले जाते.

अरणभेंडी या गावात सावता महाराजांच्या शेतातच त्यांचे समाधीमंदिर बांधण्यात आले. त्यांनी त्यांच्या मळ्यात जिथे देह ठेवला तिथेच त्यांच्या स्मृर्ती जतन करून ठेवल्या आहेत. अरणभेंडी या गावी त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो.

आम्ही दिलेल्या sant savata mali information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर श्री संत सावता माळी sant savata mali mahiti  यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant savata mali information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sant savata mali in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “संत सावता माळी यांची माहिती Sant Savata Mali Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!