संत सूरदास यांची माहिती Sant Surdas Information in Marathi

sant surdas information in marathi कृष्णभक्तीशी एकरूप झालेले, कृष्ण्भक्तीपर पदे रचणाऱ्या भक्तकविंमध्ये अग्रमान्य स्थान असणारे, सामाजिक प्रतिष्ठा, गोड गळा हे सर्वकाही लाभलेल्या संत सुरादासाना हिंदी साहित्यातील सूर्य असं म्हंटल जातं. जन्मतःच अंधत्व, निरक्षरत्व,निराधारता या सर्वावर मात करून केवळ सुरांच्या जोरावर संत सुरादासानी जीवनात काव्यसृष्टी पादाक्रांत केली, त्याला कशाचीही तोड नाही. तत्कालीन काळातील एक महान हिंदी संत कवी ‘संत सूरदास’.

sant surdas information in marathi
sant surdas information in marathi/surdas in marathi

संत सूरदास यांची माहिती sant surdas information in marathi

संत सूरदास यांचा जीवन परिचय

नावसंत श्री सूरदास
जन्मइ.स. १४७८ (विक्रम संवत १५३५) सीही, दिल्ली
भाषाब्रजभाषा
गुरुवल्लभाच्चार्य
आईजमुनादास
वडीलरामदास सारस्वत
पत्नीआजन्म अविवाहित
साहित्यसुरसागर, सुरसारावली, साहित्य-लहरी
मृत्यू (निर्वाण)इ.स. १५८3 परसौली, उत्तरप्रदेश

भगवान श्रीकृष्णाचे एकमेव उपासक आणि ब्रजभाषेतील सर्वश्रेष्ठ कवी महात्मा सूरदास यांचा जन्म दिल्ली पासून थोड्या अंतरावर असलेल्या सीही या गावात इ. स. १४७८ साली झाला. काही विद्वानांच्या मते त्यांचा जन्म हा मथुरेजवळ असलेल्या रुनकता या खेड्यात झाल्याचा सांगितला जातो. त्यांचे वडील रामदास सारस्वत हे ब्राम्हण होते तर त्यांच्या आईचे नाव जमुनादास असे होते. वडील रामदास हे पेशाने पंडित होते. संत सूरदास हे जन्मापासूनच अंध होते. त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच दुर्लक्ष झालं. त्यामुळे वयाच्या ६ व्या वर्षीच त्यांनी घरदार सोडून दिले.

संत सूरदास यांचा जन्म आणि स्थान याबद्दल एका पदातून सांगितले आहे,

“रामदास सुत सूरदास ने, जन्म रुनकता में पाया !

गुरु बल्लभ उपदेश ग्रहण कर, कृष्णभक्ती सागर लहराया !!”

संत सूरदास जीवनकथा

संत सूरदास हे लहानपणापासूनच गानविध्येत अत्यंत पारंगत होते. त्यांना ज्योतिष आणि शकुनविद्या अवगत होती. लहानपणापासूनच ते निस्सीम भगवत भक्त होते. त्यांनी स्वतःला पूर्णपणे कृष्णभक्तीमध्ये समर्पित केले होते. आणि त्यावर त्यांनी काही काळ उपजीविकाही केली पण पुढे वैराग्य आल्याने त्यांनी हा मार्गही सोडून दिला. कालांतराने यमुनेच्या काठी गौघाट येथे कुटी बांधून त्यांनी आत्मसाधनेला प्रारंभ केला.

एकदा सूरदास वृंदावन धाम च्या यात्रेसाठी निघाले असता त्यांना वल्लभाचार्य भेटले. आणि गौहाट येथे त्यांना वल्लभाचार्य यांचे शिष्यत्व प्राप्त झाले. वल्लभाचार्य हे पुष्टीमार्गाचे संस्थापक होते. त्यांनी सुरदासाना पुष्टीमार्गाची दीक्षा दिली आणि श्रीकृष्णभक्तीचा उपदेश केला. वल्लभाचार्य यांनी त्यांना गोकुळ येथे आणले व कृष्णलीला वर  पदे रचण्याची आज्ञा दिली.

यमुनेच्या तीरावर बसून ते कृष्णलीला गाऊ लागले. त्यांच्या गोड गळ्यामधून सुमधुर, सुश्राव्य भजनं येऊ लागली. यमुनेच्या काठी त्यांची काव्यगंगा उगम पावली. लोकांना पण त्यांच्या रचलेल्या लीला आवडू लागल्या, ते त्या तल्लीन होऊन ऐकू लागले.

सख्यभक्ती, वात्सल्यभक्ती, माधुर्यभक्ती, विनोद्वृत्ती हे त्यांच्या काव्याचे विशेष भाग मानले जातात. असेच गाता गाता सूरदास “कवी सूरदास” झाले. नावातच अर्थ आहे, सुरांचा दास म्हणजे ‘सूरदास’! सूरदासांच्या जास्तीत जास्त काव्यांतून त्यांनी कृष्णाच्या बाललीलांच वर्णन केले आहे.

साधारण १४९६ ते १५१० या काळात त्यांचे वास्तव्य गौघात येथे आणि त्यानंतर गोवर्धन येथे होते. त्यानंतर संत सूरदास यांनी आपले उर्वरित आयुष्य हे वृंदावनातील गोवर्धन पर्वतावर प्रकटलेल्या श्रीकृष्णाचे रूप श्रीनाथजींच्या पूजाआर्चेत व भजन – कीर्तनात व्यतीत केले. त्यांनी श्रीकृष्ण भक्तीपर सह्स्त्रावदी पदे रचली. यामध्ये कृष्णाच्या बाललीला  व योवनातील शृगारक्रीडा यांची मनाला भावणारी मार्मिक वर्णने केली आहेत.

मैया मोहि दाऊ बहुत खिझाये; मोसौ कहत मोल कौ लीन्हो; तू जसुमती कब जायौ?

कह करो इही के मारे खेलन हौ नही जात; पुनिपुनि कहत कौन है माता; कौ है तेरा तात?

गोरे नन्द जसोदा गोरी तू कल स्यामल गात चुटकी दै-दै ग्वाल नचावत हसत- सबै मुसकात |

तू मोही कि मारन ? सीखी दाउही कब न खीझे; मोहन मुख रिस कि ये बाते जसुमती सुनि सुनि रिझै |

सुनहु कान्ह बलचंद्र चबाई जनमत हि कौ धूत; सूर स्याम मौहि गोधन कि सौ हा माता तो पूत| 

यामध्ये बालकृष्ण यशोदा मातेला सांगतात, बलरामदादा मला खूप चिडवतो. तो म्हणतो कि, तू मला धन देऊन घेतलं आहेस. तू मला जन्म दिला नाहीस. म्हणून मी त्याच्याबरोबर खेळायला जाणार नाही. तो मला पुन्हा पुन्हा विचारतो कि तुझी माता पिता कोण? नंदबाबा आणि यशोदा माता हे दोघेही गोरे आहेत मग तू काळा कसा? असं म्हणून तो नाचतो, त्यामुळे सगळ्याच गोपि माझ्यावर हसू लागतात.

तू मात्र नेहमी मलाच मार देतेस. दादाला तू कधीच मार देत नाहीस. तू मला शपथ देऊन संग कि, मी तुझाच मुलगा आहे. कृष्णाची हि तक्रार ऐकून यशोदा मंत्रमुग्ध झाली.

आख्यायिका      

सुरादासांचे साधुत्व, गीतमाधुर्य व गनकौशल्य यांनी सहस्रावधी कृष्णभक्तांना मंत्रमुग्ध केले होते.  त्यांच्या गायनामुळे त्यांची ख्याती दूरवर पसरली होती. एकदा अकबर बादशहा त्यांना भेटण्यासाठी मथुरेस आला. भेट झाली तेव्हा सूरदासांच्या पदांवर लुब्ध झालेल्या बादशहाने कवी सूरदास यांना आपली स्तुतीकवने रचण्याची आज्ञा केली पण(‘नहिं न रह्यो मन में ठौर’)“ मी केवळ कृष्णकीर्तन करतो, अन्य कुणाचे किर्तीगान करणे मला रुचत नाही” परखड उत्तर सुरदासाने दिले.

संत सूरदास साहित्यरचना 

संत सूरदास यांना हिंदी साहित्यामधले विद्वान म्हटले जातं. त्यांच्या रचनांमध्ये श्रीकृष्णाच्या प्रती अतूट प्रेम आणि भक्ती व्यक्त होते. त्यांच्या रचनांमध्ये त्यांनी वात्सल्य रस, शांत रस आणि शृंगार रस यांचे वर्णन केले आहे. त्यांची ब्रज भाषेतील भजन आजही लोकांच्या मनात घोळत आहेत,

“मैया मै नाही माखन खायौ

ख्याल परै ये सखा सबै मिलि मेरैं मुख लपटायो॥”

मनाची शुद्धता, भाषेचा साधेपणा आणि शब्द्चित्रात्मक शैली यांनी त्यांची पदे सजीव वाटतात.

संत सूरदास यांनी लिहिलेले ५ ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

  • ‘सुरसागर’ हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. यामध्ये त्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीलांच वर्णन केले आहे. या ग्रंथामध्ये सव्वा लाख पदांचा समावेश होता. परंतु आता त्यामध्ये सात-आठ हजार पदांचा उल्लेख आहे. खालील पदामध्ये सूरदास सांगतात कि, श्रीकृष्णाच्या बालरूपाचे एक क्षणाचे दर्शन हे शेकडो वर्षांच्या सुखापेक्षा अधिक श्रेष्ठ आणि मनोहारी आहे.

“शोभित कर नवनीत लिए |

घुटुरून चलत रेनु – तन – मंडित, मुख दधि – लेप किए |

चारू कपोल लोल लोचन, गोरोचन तिलक दिए |

लट लटकनी मनू मत्त मधुप – गन, मादक मधुहिं |

पिए कठूला कंठ वज्र केहरि नख, राजत रुचिर हिए |

धन्य सूर एको पल इही सुख, का सत कल्प जिए ||”

  • ‘सुरासारावली’ हा पण त्यांचा प्रमुख ग्रंथ आहे. ज्यामध्ये त्यांच श्रीकृष्णा प्रती असलेले अलौकिक प्रेम अनुभवायला भेटते. या ग्रंथामध्ये एकूण ११०७ पदे आहेत.
  • ‘साहित्य – लहरी’ हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. या ग्रंथामध्ये ११८ पदांच्या लहान लहान रचना आहेत.
  • ‘नल – दमयन्ति’ या ग्रंथामध्ये महाभारतकालीन नल आणि दमयन्ति यांचो कथा आहे.
  • ‘ब्याह्लो’ हाहि त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. याशिवाय दशमस्कंध टीका, नागलीला, भागवत, गोवर्धन लीला, सुरपचीसी, सुरसागर सार, प्राणप्यारी, आदि ग्रंथ त्यांच्या साहित्यामध्ये समाविष्ट आहेत.  

संत सूरदास यांचा निर्वाण (मृत्यू)

संत सूरदास यांचा मृत्यू गोवर्धन पर्वताच्या जवळ असलेल्या परसौली गावात इ.स १५८३ मध्ये झाला. त्यांना १०१ वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य लाभले.

आम्ही दिलेल्या sant surdas information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर श्री संत सेना महाराज यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant surdas information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant surdas raag kedar information in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!