Sarojini Naidu Information In Marathi सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1979 रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांचा जन्म बंगाली कुटुंबात झाला. सरोजिनी नायडू यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चटोपाद्याय होते. अघोरनाथ हे वैज्ञानिक, डॉक्टर, शिक्षाशास्त्री आणि शिक्षक होते. हैद्राबाद येथील निआज कॉलेजची स्थापना सरोजिनी नायडू यांच्या वडिलांनी केली होती. सरोजिनी नायडू यांच्या आईचे नाव वरद सुंदरी देवी होते. वरद सुंदरी देवी या बंगाल भाषेतून कविता करीत होत्या.
एकूण आठ बहिण भाऊ सरोजिनी नायडू यांना होते. सरोजिनी नायडू या सर्वात मोठ्या होत्या. विरेंद्रनाथ चटोपाद्याय हा त्यांचा भाऊ क्रांतिकारी होता. बर्लिन कमिटीमध्ये विरेंद्रनाथ यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. 1937 साली विरेंद्रनाथ यांना इंग्रजांनी मारून टाकले. सरोजिनी नायडू यांचे दुसरे भाऊ हरिद्रनाथ चटोपाद्याय हे होते. ते एक कवी, कलाकार, कथाकार आणि नाटक सुद्धा लिहीत होते. सरोजिनी नायडू यांची बहीण सुनलीनी देवी होत्या. त्या एक अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना होत्या.
सरोजिनी नायडू यांची माहिती Sarojini Naidu Information In Marathi
नाव (Name) | सरोजिनी नायडू |
जन्म (Birthday) | 13 फेब्रुवारी 1979 |
जन्मस्थान (Birthplace) | हैदराबाद |
वडील (Father Name) | अघोरनाथ चटोपाद्याय |
आई (Mother Name) | वरद सुंदरी देवी |
पती (Husband Name) | गोविंद राजुलू नायडू |
मुले (Children Name) | जयसूर्या, पद्मजा , रणधीर आणि लीलामणी |
मृत्यू (Death) | 2 मार्च 1949 |
लोकांनी दिलेली पदवी | भारताची कोकिळा |
वैयक्तिक आयुष्य
सरोजिनी नायडुं early life
सरोजिनी नायडू या लहानपणापासून एक हुशार विद्यार्थिनी होत्या. उर्दू, तेलगू, इंग्लिश, फारसी आणि बांग्ला या भाषेचे चांगले ज्ञान सरोजिनी नायडू यांना होते. मॅट्रिक परीक्षा त्यानी वयाच्या 12 व्या वर्षी उत्तीर्ण केली होती. प्रथम स्थान त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सीत मिळवले होते. सरोजिनी नायडू यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी गणिततज्ञ किंवा वैज्ञानिक व्हावं. पण लहानपणापासून सरोजिनी नायडू यांना कविता लिहिण्याचा छंद होता. त्यांच्या आईकडून कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली होती. सरोजिनी नायडू यांच्या कविता प्रत्येकाला आवडत होते आणि त्यातून लोक प्रभावी होत होते.
सरोजिनी नायडुं education
हैद्राबादचे निजाम देखील सरोजिनी नायडू यांच्या कवितेने प्रभावी झाले होते. त्यांनी सरोजिनी नायडू यांना विदेशात अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली होती. जेव्हा त्या इंग्लंड येथे वयाच्या 16 व्या वर्षी गेल्या तेव्हा त्यांनी प्रथम किंग्स कॉलेज लंडन येथे प्रवेश घेतला होता. त्यानंतर कैम्ब्रिज च्या ग्रीटन कॉलेज मधून शिक्षण प्राप्त केले होते.
त्या काळातील इंग्लिशचे प्रसिद्ध कवी आर्थन सायमन आणि इडमंड गोसन यांच्याशी सरोजिनी नायडू यांची भेट त्याठिकाणी झाली. भारतीय विषयांना लक्षात ठेवत त्यांनी सरोजिनी नायडू यांना लिखाण करण्यास आणि दक्षिण पठारची भारतीय कवयित्री होण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर भारतातील नद्या, पर्वत, मंदिरे आणि सामाजिक गोष्टींना आपल्या कवितांमध्ये समाविष्ट करण्याची प्रेरणा सरोजिनी नायडू यांना मिळाली. पुढे भारतातील एक महान कवियत्री म्हणून सरोजिनी नायडू यांना मानू लागले. लाखो हृदयामध्ये त्यांनी त्यांच्या कवितामुळे स्थान मिळवले.
सरोजिनी नायडुं marriage
ज्यावेळी इंग्लंड येथे भारताच्या महान कवियत्री सरोजिनी नायडू शिक्षण घेत होत्या तेव्हा त्यांची भेट गोविंद राजुलू नायडू यांच्याशी झाली होती. त्यावेळीच सरोजिनी त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यावेळी इंग्लंड येथे गोविंद राजुलू नायडू हे फिजिशियन होण्याकरिता गेले होते. भारतात शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर वयाच्या 19 व्या वर्षी आपल्या परिवाराच्या संमतीने गोविंद राजुलू नायडू यांच्याशी विवाह केला.
त्यांचा विवाह हा ब्राम्हो मॅरेज ऍक्ट अंतर्गत मद्रास येथे 1998 साली संपन्न झाला होता. वेगवेगळ्या जातीमध्ये लग्न होणे हे त्याकाळी गुन्ह्यापेक्षा कमी समजले जात नव्हते. त्यावेळी भारतीय समाजात आंतर जातीय विवाहांना मान्यता दिली नव्हती. याकरीता त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. पण त्यांच्या वडिलांनी सरोजिनीच्या या निर्णयाला समाजाची चिंता न करता त्यांना सहाय्य केले होते. या सर्व परिस्थितीतुन जाऊन त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी झाले. त्यांच्यात खूप काही करण्याची ऊर्जा व आवड होती.
सरोजिनी नायडू यांनी विवाहानंतर देखील लिखाण सुरू ठेवले होते. हळूहळू त्यांच्या कवितामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. विवाहानंतर सरोजिनी नायडू यांना चार मूल झाली. जयसूर्या, पद्मजा , रणधीर आणि लीलामणी अशी चार मुले होती. पद्मजा या सरोजिनी नायडू सारख्या कवियत्री झाल्या. आणि सक्रिय राजकारणात देखील उतरल्या. पश्चिम बंगालच्या गव्हर्नर देखील 1961 साली झाल्या.
त्यांची बुल बुले हिंद ही कविता 1905 साली प्रकाशित झाली होती. त्यांनंतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखीन वाढ होत गेली. त्यानंतर सरोजिनी नायडू यांच्या खूप कविता प्रकाशित होत गेल्या आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली. जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर यासारखे महान व्यक्तिमत्त्व सरोजिनी नायडू यांच्या कवितेच्या प्रशंसकांच्या यादीत होते. इंग्लिश भाषांतून देखील सरोजिनी नायडू यांनी कविता लिहल्या. भारताच्या संस्कृतीचे अनोखे चित्र सरोजिनी नायडू यांच्या कवितांमध्ये होते.
राजकीय आयुष्य
ज्यावेळी भारताचे स्वातंत्र्यसेनानी गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी कवियित्री सरोजिनी नायडू यांची भेट झाली तेव्हा त्यांच्या जीवनात बदल घडत गेला. आपल्या लिखाणाची ताकद स्वातंत्र्याच्या लढाईत वापरण्याचा सल्ला गोपाळकृष्ण गोखले यांनी सरोजिनी नायडू यांना दिला. आपली बुद्धी आणि शिक्षण पूर्णपणे देशाला समर्पित करण्यासाठी गोपाळ कृष्ण गोखले यांनी सरोजिनी नायडू यांना सुचवले.
क्रांतिकारी कविता लिहून स्वातंत्र्याच्या या लढाईत लहान लहान गावांमध्ये जाऊन गावांमधील लोकांना प्रोत्साहित करण्यास गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुचवले. यामुळे वर्षानुवर्षे गुलामगिरीत अडकलेल्या सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता येईल आणि स्वातंत्र्याच्या या लढाईत एकत्र येऊन सहभागी होतील. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या या सल्ल्यावर सरोजिनी नायडू यांनी खूप विचार केला आणि आपले व्यावसायिक लिखाण बंद करून स्वतःला पूर्णपणे राजकारणात समर्पित केले.
महान क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडू 1905 साली बंगालच्या विभाजना वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सहभागी झाल्या. विभाजनामुळे सरोजिनी नायडू फार व्यथित होत्या. पुढे स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय सरोजिनी नायडू यांनी घेतला. एक निष्ठावान देशभक्ता प्रमाणे त्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्याकरता सतत प्रयत्न करू लागल्या. स्वातंत्र्याची ज्योत चेतवण्याकरिता सामान्य जनांमध्ये संपूर्ण भारत त्यांनी पिंजून काढला होता. देशप्रेमाची भावना लोकांमध्ये वाढीस लावण्यात सरोजनी नायडू यांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले होते.
भारताची कोकिळा असे सरोजिनी नायडू यांना म्हटले जाते. भारताच्या स्वतंत्र समरास सरोजिनी नायडू यांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. सरोजिनी नायडू एक क्रांतिकारी महिला होत्या. भारताला गुलामगिरीतून सोडून स्वतंत्र मिळवून देण्याकरिता खूप संघर्ष घेतला होता. एक उत्तम राजकारणी आणि स्वतंत्र सेनानी, एक फेमिनिस्ट, कवयित्री आणि आपल्या काळातील एक महान वक्त्या सरोजिनी नायडू होत्या. मोठ मोठे दिगग्ज देखील सरोजिनी नायडू यांचे भाषण ऐकून मंत्रमुग्ध होऊन जात होते.
इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या प्रेसिडेंट सरोजिनी नायडू होत्या. आणि उत्तरप्रदेशच्या राज्यपाल म्हणून निवडून आलेल्या सरोजिनी नायडू या पहिल्या महिला होत्या. त्यांचा सहभाग भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात देखील होता.भारताची नाईटिंगेल आणि भारताची कोकिळा सरोजिनी नायडू यांना म्हटले जात होते.सरोजिनी नायडू यांच्या कवितांमध्ये लहान मुलांच्या, देशभक्तीच्या, निसर्गाच्या, मृत्यच्या आणि प्रेमाच्या कविता आहेत. पण सरोजिनी नायडू या जास्तीत जास्त लहान मुलांच्या कविता करण्यास जास्त प्रसिद्ध होत्या.
अधिकतर लोक त्यांच्या कविता वाचून आपल्या बालपणाच्या आठवणींमध्ये रमून जात असत. एक खोडकरपणा त्यांच्या कवितांमधून आढळून येत होता. त्यांच्या लहानपणाची झलक त्यांच्या कवितांतून दिसत होती. आणि म्हणूनच सरोजिनी नायडू याना “भारताची कोकिळा” म्हटले जाते. त्यांच्यामधील प्रतिभा त्यांच्या वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच दिसायला लागली. प्रत्येकजण त्यांच्या कविता वाचून आश्चर्यचकित व्हायचे. वृत्तपत्रांमध्ये लेख आणि कविता देण्यास त्यानी तेव्हापासूनच सुरुवात केली.
देशप्रेमाची भावना त्यांच्या मनात भरली होती. म्हणूनच त्या महात्मा गांधी सोबत राष्ट्रीय आंदोलनात सहभागी होत्या. सरोजिनी नायडू यांनी मिठाच्या सत्याग्रहात देखील महात्मा गांधी सोबत भाग घेतला होता. सरोजिनी नायडू यांची मुलगी पद्मजा हिने देखील स्वतंत्र्य संग्रामात आपला सहभाग नोंदवला होता आणि भारत छोडो या आंदोलनातसुद्धा सहभागी झाल्या होत्या. जेव्हा भारतातील महान क्रांतिकारी महिलांची चर्चा होते तेव्हा सर्वात आधी नाव सरोजिनी नायडू यांचे घेतले जाते.भारतीय महिलांकरिता सरोजिनी नायडू या एक आदर्श होत्या.
सरोजिनी नायडू यांचा मृत्यू :-
महात्मा गांधीजींचा प्रिय शिष्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता खूप संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा मृत्यू 2 मार्च 1949 ला झाला. कार्यालयात काम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन सरोजिनी नायडू यांचा मृत्यू झाला. सरोजिनी नायडू यांनी आपले संपूर्ण जीवनच देशाला समर्पित केले होते. त्यांनी आपल्या जीवनात खूप सन्मान प्राप्त केला. लोकांकरिता त्या एक प्रेरणास्त्रोत ठरल्या होत्या. भारत सरकारने त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत 13 फेब्रुवारी 1964 ला त्यांच्या सन्मानार्थ 15 पैशांचे डाकतिकिट प्रकाशित केले.
सरोजिनी नायडूनी लिहिलेली पुस्तके :-
सरोजिनी नायडू यांच्या कवितेचा संग्रह “गोल्डन थ्रेसहोल्ड” नावाने 1905 ला प्रकाशित झाला. त्यानंतर “दि बर्ड ऑफ टाइम” आणि “दि ब्रोकन विंग्स” हे दोन संग्रह प्रकाशित झाले. या कविता संग्रहाला भारतातच नाही तर इंग्लंड मध्ये देखील मोठ्या संख्येने वाचकांनी पसंद केले होते.शक्तिशाली लेखिका म्हणून सरोजिनी नायडू यांना ओळख मिळाली. “वर्डस ऑफ फ्रीडम” हे सरोजिनी नायडू यांच्या राजनैतिक विचारावर आधारित होते.
सरोजिनी नायडू यांची कन्या पद्मजाने “द फेदर ऑफ द डॉन” ला एडिट 1961 ला करून प्रकाशित केले. दि मॅजिक ट्री अँड दि विजार्ड मास्क, फीस्ट ऑफ युथ, दि इंडियन विवर्स,दि सेपट्रेड फ्लूट : सॉंग ऑफ इंडिया, अलाहाबाद: किस्ताबिस्तान, मुहूमद जिन्न: अन ऐम्बेसिडर ऑफ युनिटी, दि ब्रोकन विंग्स : सोंग्स ऑफ लव्ह, डेथ अँड स्प्रिंग, दि बर्ड ऑफ टाइम : सॉंग ऑफ लाइफ हे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहेत.
maher muneer language सरोजिनीने वयाच्या १२ व्या वर्षी लेखन सुरू केले. पर्शियन भाषेत लिहिलेल्या माहेर मुनीर या नाटकाने हैदराबादच्या किंगडमच्या निजामाला प्रभावित केले. 1905 मध्ये, द गोल्डन थ्रेशोल्ड नावाचा तिचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.
सरोजिनी नायडू यांनी ‘माहेर मुनीर’ हे नाटक कोणत्या भाषेत लिहिले होते?
पर्शियन महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून, सरोजिनीने पर्शियन “मेहर मुनी” (एक प्रख्यात रोमँटिक जोडपे) मध्ये एक काव्य नाटक लिहिले होते.
आम्ही दिलेल्या sarojini naidu information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर सरोजिनी नायडू information about sarojini naidu in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sarojini naidu kaun thi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sarojini naidu wikipedia in hindi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sarojini naidu information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट