Save Food Essay in Marathi – Essay On Wastage of Food in Marathi अन्नाची नासाडी थांबवा मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये अन्न बचत या विषयावर निबंध लिहिणार आहोत. अन्न वाचवणे हि काळाची गरज आहे आणि आपण अन्नाची नासाडी करून त्याचा अपमान करतो कारण ‘जीवन करी जीवित्व, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटले आहे. अन्न हा मानवाच्या जीवनातील महत्वाचा घटक आहे आणि मानव या अन्नावर चांगला जगू शकतो जर मानवाला खाण्यासाठी अन्न नसेल किंवा एकदा माणूस जर ४ ते ५ दिवस राहिला तर तो जगू शकत नाही म्हणजेच मानवाला जगण्यासाठी अन्न हे खूप महत्वाचे आहे.
आपल्याला सध्या जरी अन्नाची कमतरता भासत नसली तरी पुढे आपल्याला अन्नाची कमतरता भासू नये म्हणू आपण अन्नाची बचत केली पाहिजे. आपल्याला जगण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्याशिवाय आपण जगू शकत नाही आणि त्या आपल्या मुलभूत गरजा देखील आहेत. त्या मुलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा आणि त्यातील अन्न हि महत्त्वाची मुलभूत गरज आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला खूप महत्व आहे. त्याचा कोणत्याही प्रकारे अपमान केला जात नव्हता तसेच पूर्वीच्या काळी भारतामध्ये अन्नाला खूप महत्व दिले जायचे त्याचा अपमान कोणत्याही प्रकारे केला जायचा नाही जसे कि जर एकाद्या व्यक्तीला ताटामध्ये काही वाढून ठेवले तर ते त्यांनी थोडे कमी करून तरी खाल्लेच पाहिजे किंवा त्याला खायचे नसेल तर त्या ताटाला नमस्कार करून उटण्याची पद्धत पूर्वी भारतामध्ये होती त्यामुळे अन्नाचा अपमान होत नव्हता.
तसेच ताटामध्ये जितके अन्न घेतले आहे तितके अन्न खावून उटले जायचे जर ताटामध्ये अन्न शिल्लक असले तर तो अन्नाचा अपमान मनाला जायचा तसेच पूर्वी अन्नाची नासाडी देखील केली जायची नाही आणि जर अन्नाची नासाडी केली तर पाप लागते असा समाज देखील पूर्वी होता त्यामुळे अन्न हे खूप काळजी पूर्वक वापरले जायचे.
अन्नाची नासाडी थांबवा मराठी निबंध – Save Food Essay in Marathi
Essay On Wastage of Food in Marathi
अन्न उत्पादनामध्ये शेतकऱ्याचा मोलाचा वाटा असतो कारण शेतकरीच हा शेतामध्ये वेगवेगळी पिके घेण्यास कारणीभूत असतो. शेतामध्ये शेतकरी गहू, ज्वारी, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य, कडधान्यांच्या डाळी, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, फळे, भाज्या हे सर्व शेतामध्ये पिकवले जाते आणि आपण या सर्व घटकांचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो.
हे सर्व पिक घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कष्ट करावे लागलेले असतात त्यांनी त्यांचे पिक शेतामध्ये चांगले यावे म्हणून कोरड्या दुष्काळाचा सामना करू तसेच अतिपावासाचा सामना करून ते त्या नैसर्गिक संकटातून देखील मार्ग काढून आपले पिक चांगले आणण्याचा प्रयत्न करतात किंवा मग पिक चांगले आणतात आणि ते बाजारामध्ये विकतात आणि ते इतर लोक बाजारामधून विकत घेवून आपल्या अन्नाच्या गरजा भागवत असतात.
अश्या प्रकारे पिक घेण्यासाठी शेतकऱ्याला त्यामध्ये कष्ट करावे लागते तसेच अनेक समस्यांचा सामना करून पिक आणावे लागते म्हणून जगातील प्रत्येक मानवाने अन्न वाचवले पाहिजे त्याची नासाडी केली नाही पाहिजे. अन्नाची नासाडी हि बहुतेकदा मोठ मोठ्या कार्यक्रमांमध्ये होते जसे कि लग्न सोहळा, साखरपुडा, मोठ मोठे वाढदिवस आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम देशामध्ये रोज होत असतात आणि अश्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्न मात्रे होते तसेच अन्न ओतले जाते.
पण मोठ मोठ्या कार्यक्रमांमध्ये ज्या लोकांनी कार्यक्रम आयोजित केला आहे अश्या लोकांनी लागेल तेवढे अन्न बनवले पाहिजे आणि अन्नाची नासाडी थांबवली पाहिजे आणि अन्न वाचवले पाहिजे. ज्या लोकांना पुरेपूर अन्न मिळते त्यांना अन्नाची किंमत नसते ते त्यांना पुरे झाले कि ताटामधील अन्न तसेच सोडतात किंवा त्यांना अन्न आवडले नाही तर तसेच सोडतात आणि त्यामुळे अन्नाची नासाडी होते. तसेच लोक जास्त जेवण बनवून ते संपले नाही कि ते फेकतात आणि अन्नाचा अपमान करतात आणि त्यामुळे अन्नान नासाडी होते.
अन्न म्हणजे काय आहे आणि अन्नाची किंमत ज्यांना माहित आहेत जे अन्नाशिवाय एक एक दिवस राहतात तसेच ज्यांना रोज अपुरे जेवण खाऊन दिवस काढावे लागते, ज्यांना उपाशी राहावे लागते, जे लोक टाकलेले अन्न खातात त्या लोकांना अन्नाची किंमत विचार ते अन्नाची किंमत त्यांच्या लेखी काय आहे ते सांगतील.
अनेक लोक आहेत ज्यांना अन्नाची किंमत माहित नाही आणि ते अन्न रोज मात्रे करतात पण ज्यांना पुरेपूर अन्न मिळते त्या लोकांनीच अन्न बचतीचा विचार केला पाहिजे, तसेच ज्या लोकांना अन्न मिळत नाही अश्या लोकांचा विचार केला पाहिजे, तसेच भविष्य काळा अन्नाची कमतरता भासू नये म्हणून अन्न बचत केले पाहिजे आणि आपल्याला हवे तेवढे अन्न बनवून खाल्ले पाहिजे.
अन्न बचतीचे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपण अन्नाची बचत करू शकतो. ज्यावेळी मोठे मोठे कार्यक्रम असतात त्यावेळी जितके लोक येणार आहेत त्या हिशोबाने अन्न बनवले तर त्याची मोठ्या प्राणात नासाडी होणार नाही त्याचबरोबर आपण कोणत्याही हॉटेल मध्ये किंवा कॅफेमध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या डिश ऑर्डर करतो आणि त्यामधील आपल्याला हवे तेवढे खातो आणि राहिलेले तसेच सोडून देतो परंतु हॉटेल मध्ये गेल्यानंतर आपल्याला हवे तेवढेच आपण ऑर्डर करून खावू शकतो.
त्यामुळे अन्नाचे मात्रे होणार नाही. तसेच अनेक लोकांना ताटामध्ये जास्त अन्न घेवून ते तसेच सोडण्याची सवय असते परंतु आपण तसे न करता ताटामध्ये आपल्याला हवे तेवढे अन्न घेवून खाल्ले तर अन्न मात्रे होणार नाहीत. त्याचबरोबर काही घरांमध्ये गरजेपेक्षा जास्त अन्न रोज बनवले जाते आणि ते संपले नाही कि मग ते ओतले जाते पण पण तसे ना करता लोकांना घरामध्ये जितकी लोक आहेत त्या हिशोबाने त्यांना पुरेसे अन्न बनवले तर अन्न मात्रे होणार नाही आणि असे वेगवेगळे उपाय केल्यामुळे अन्नाची नासाडी होणार नाही आणि मोठ्या प्रमाणत अन्न बचत होईल.
सध्या जरी आपल्याला अन्नाची कमतरता नसली तरी देशामध्ये तसेच जगामध्ये कुठे ना कुठे तरी लोक अन्नासाठी झटत असतात तसेच त्यांना रोज पुरेसे अन्न मिळता नाही. पण सध्या आपल्याला पुरेसे अन्न मिळते आणि तशी अन्नाची कोणत्याही कमतरतेला सामोरे जावे लागत नाही म्हणून आपण अन्नाचा पुरवठा जास्त असतानाच आपण अन्नाची बचत केली पाहिजे आणि पुढे येणाऱ्या अन्नाच्या कमतरतेचा धोका कमी केला पाहिजे.
आम्ही दिलेल्या Save Food Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर अन्नाची नासाडी थांबवा मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Essay On Wastage of Food in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट