कुरकुरीत शेव रेसिपी Shev Recipe in Marathi

Shev Recipe in Marathi कुरकुरीत शेव रेसिपी शेव रेसिपी हा एक स्नॅक रेसिपी आहे जी आपण केंव्हाही बनवून खावू शकतो तसेच हि रेसिपी दिवाळी सणामध्ये फराळामध्ये देखील बनवली जाते. शेव रेसिपी हि डाळीच्या पिठामध्ये हळद, ओवा, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून ती शेव साच्यामधून तेलामध्ये पाडली जाते आणि ती मंद आचेवर चांगल्या तळून घेतली जाते. शेव हि आपण चाट रेसिपीज वरती टॉपिंग म्हणून वापरू शकतो तसेच घरगुती पध्दतीने बनवलेली शेव हि शेव भाजी बनवण्यासाठी देखील वापरू शकतो. शेव हा पदार्थ घरामध्ये बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि आता आपण अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये शेव कशी बनवायची ते पाहूयात.

Shev Recipe in Marathi
Shev Recipe in Marathi

कुरकुरीत शेव रेसिपी – Shev Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ२०  मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे

शेव म्हणजे काय ?

शेव रेसिपी हा एक स्नॅक रेसिपी आहे जी आपण केंव्हाही बनवून खावू शकतो. शेव रेसिपी हि डाळीच्या पिठामध्ये हळद, ओवा, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून ती शेव साच्यामधून तेलामध्ये पाडली जाते आणि ती मंद आचेवर चांगल्या तळून घेतली जाते.

शेव बनवण्यासाठी लागणारे साहित्य – key ingredients 

  • बेसन / हरभरा डाळीचे पीठ : शेव बनवण्यासाठी डाळीचे पीठ हा एक मुख्य घटक आहे. या पिठामध्ये हळद, लाल तिखट, ओवा आणि मीठ घालून ती पातळ मळली जाते आणि त्याच्या साच्याच्या सहाय्याने शेव बनवली जाते.
  • तेल : तेल हा घटक देखील शेव बनवण्यासाठी लागणारा एक महत्वाचा घटक आहे. बनवलेली शेव तेलामध्ये तळली जाते.

बेसन शेव रेसिपी – besan shev recipe in marathi 

स्नॅक्स म्हणून खाल्ली जाणारी हि रेसिपी घरामध्ये बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि आपण हि रेसिपी कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये अगदी उत्तम पध्दतीने बनवू शकतो. चला तर मग पाहूयात शेव रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते.

तयारीसाठी लागणारा वेळ२०  मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे

शेव बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make shev recipe 

  • २ वाटी बेसन.
  • १ चमचा ओवा.
  • १ चमचा लाल मिरची पावडर.
  • २ चमचे तेल.
  • १/४ चमचा हळद.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • तेल ( तळण्यासाठी ).

शेव बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make shev recipe 

  • साधी शेव बनवताना सर्वप्रथम ओवा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्या आणि त्यामध्ये १ मोठा चमचा पाणी घालून ते १५ ते २० मिनिटे झाकण लावून बाजूला ठेवा.
  • आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये २ वाट्या बेसन घ्या मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि आता त्यामध्ये ओव्याचे पाणी घाला आणि मग त्यामध्ये गरम केलेले ते घालून मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि मग त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून ते पातळ माळून घ्या.
  • ते पीठ ५ ते ६ मिनिटे भिजू द्या.
  • आता शेव तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल गरम करून घ्या आणि गॅसची आच मंद करा.
  • मग शेवचे पीठ साच्यामध्ये घाला आणि त्याची शेव तेलामध्ये पाडा आणि ते मंद आचेवर चांगली कुरकुरीत होईपर्यंत टाळून घ्या.
  • तुमची साधी शेव तयार झाली.

लसून शेव रेसिपी – lasun shev recipe in marathi

आता आपण लसून शेव कशी बनवायची  आणि हि शेव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात.

लसून शेव रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make shev recipe 

लसून शेव बनवण्यासाठी बेसन पीठ, लाल तिखट. मीठ, लसून आणि ओवा हे साहित्य लागते आणि हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध असते. चला तर मग पाहूयात शेव बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • २ वाटी बेसन.
  • १ चमचा ओवा.
  • १ चमचा लाल मिरची पावडर.
  • २ चमचे तेल.
  • १/४ चमचा हळद.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • तेल ( तळण्यासाठी ).
  • १ मोठा चमचा लसून पाकळ्या.

लसून शेव बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make shev recipe 

  • लसून शेव बनवताना सर्वप्रथम लसून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या आणि तो बारीक करून घ्या आणि त्यामध्ये थोडे पाणी घाला आणि ते परत मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
  • आता हे मिश्रण गाळण्यात ओता आणि लसूनच रस एक वाटीमध्ये गाळून घ्या.
  • मग ओवा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्या आणि त्यामध्ये १ मोठा चमचा पाणी घालून ते १५ ते २० मिनिटे झाकण लावून बाजूला ठेवा.
  • आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये २ वाट्या बेसन घ्या मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि आता त्यामध्ये लसून रस आणि ओव्याचे पाणी घाला आणि मग त्यामध्ये गरम केलेले ते घालून मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि मग त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून ते पातळ माळून घ्या.
  • ते पीठ ५ ते ६ मिनिटे भिजू द्या.
  • आता शेव तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल गरम करून घ्या आणि गॅसची आच मंद करा.
  • मग शेवचे पीठ साच्यामध्ये घाला आणि त्याची शेव तेलामध्ये पाडा आणि ते मंद आचेवर चांगली कुरकुरीत होईपर्यंत टाळून घ्या.
  • तुमची साधी शेव तयार झाली.

शेव कश्या सोबत खातात – serving suggestion 

आपण शेव तशीच स्नॅक म्हणून देखील खाल्ली जाते तसेच शेवचा वापर आपण चाट रेसिपीमध्ये टॉपिंग ( बारीक शेव नसल्यास ) म्हणून करू शकतो किंवा घरगुती पद्धतीनी बनवलेली शेव शेव भाजी बनवण्यासाठी अगदी उत्तम असते.

शेव हा पदार्थ किती दिवस टिकतो ?

घरगुती पध्दतीने बनवलेली साधी शेव आपण हवाबंद डब्यात ( पूर्ण थंड झाल्यावर ) ठेवतो आणि गरजेनुसार वापरतो आणि हा पदार्थ तळलेले असल्याने १ महिन्यापर्यंत ताजा राहतो.

टिप्स  ( Tips ) 

  • शेव केंव्हाही मध्यम आचेवर तळावी ज्यामुळे शेवचा रंग काळपट होणार नाही.
  • शेव तळताना पूर्ण लक्ष देवून तळा.
  • शेव बनवताना शेव मेकरला किंवा साच्याला थोड्या उंचीवरून धरा त्यामुळे आपली शेव कढईमदगे जाळीदार पडेल.

आम्ही दिलेल्या shev recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कुरकुरीत शेव रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या besan shev recipe in marathi  या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि lasun shev recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये lahsun sev recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!