अंतराळवीर सुनीता विल्यम्स माहिती Sunita Williams Information in Marathi

Sunita Williams Information in Marathi – Sunita Williams Space Missions Information in Marathi अंतराळवीर सुनीता विल्यम्स माहिती पहिली अंतराळवीर म्हणून सुनीता विल्यम्स यांची ओळख आहे. जगातील सुप्रसिद्ध अमेरिकेची नासा या संस्थेमध्ये सुनीता विल्यम्स अंतराळवीर होत्या. सुनीता विल्यम्स यांचा जीवन प्रवास प्रत्येकाच्या अंगावर काटे आणणारा आहे. एका अतिसामान्य घरातल्या स्त्रीने अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि स्वतःच्या जिद्दी व चिकाटीने ते पूर्ण देखील करून दाखवल. आजच्या लेखामध्ये आपण याच स्त्रीची म्हणजे सुनीता विल्यम्स यांची माहिती जाणून घेणार आहोत.

sunita williams information in marathi
sunita williams information in marathi

अंतराळवीर सुनीता विल्यम्स माहिती – Sunita Williams Information in Marathi

नावसुनीता विल्यम्स
ओळखपहिली अंतराळवीर
जन्म१९ सप्टेंबर १९६५
जन्म ठिकाणओहायो राज्यामधील युक्लिड
वडिलांचे नावदीपक एन पांड्या
आईचे नावबाॅनी जालोकर पांड्या

जन्म

सुनिता यांचे पूर्ण नाव सुनीता मायकल जे विल्यम असं आहे. सुनिता यांचा जन्म १९ सप्टेंबर १९६५ सालीचा आहे. ओहायो राज्यामधील युक्लिड येथे सुनीता यांनी जन्म घेतला. सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या आहेत. सुनिता यांचे बालपण मॅसेच्यूसेट्सच्या नीडहॅम मध्ये गेलं.

शिक्षण

लहानपणापासून सुनिता यांना शिक्षणाची आवड होती. सुनिता यांचे प्राथमिक शिक्षण त्या राहत असलेल्या शहरांमधून पूर्ण केलं. सुनिता यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण

मॅसेच्यूसेट्सच्या हायस्कूलमधून पूर्ण केलं. १९८३ मध्ये सुनीता यांनी हायस्कूलची परीक्षा देऊन पास असा शेरा मिळवला. सुनीताने संयुक्त राष्ट्रांच्या नेव्हल अकॅडमी मधून फिजिकल सायन्सची बी एस ची परीक्षा दिली आणि सन 1987 मध्ये ती ह्या परीक्षेत उत्तीर्ण देखील झाली. सन 1995 मध्ये सुनीताने फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून अभियांत्रिकी या विषयांमध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली.

अंतराळवीर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनिता भरपूर कष्ट घेत होती. सुनीताला तिचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक नद्या पार कराव्या लागल्या म्हणजे तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. परंतु तिने कधीही हार न मानता जिद्दीने व चिकाटीने तिच्या ध्येयावर तिने लक्ष केंद्रित केलं.

वैयक्तिक आयुष्य

सुनीताच व्यक्तिमत्त्व अत्यंत साधं होतं. सुनिता साध्या विचारांची आहे पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती स्वताला झोकून द्यायची. सुनिताच राहणीमान अगदी साधं होतं तिचे वडील दीपक एन पांड्या एक न्युरो सायंटिस्ट होते. सुनीताचे वडील हे मूळचे भारतातील आहेत त्यांचा जन्म गुजरात राज्यातला आहे.

सुनीताची आई बाॅनी जालोकर पांड्या. सुनीताच्या विचारांवर तिच्या वडिलांचा जास्त प्रभाव होता कारण तिचे वडील उच्चशिक्षित होते याशिवाय एक सुप्रसिद्ध डॉक्टर देखील होते. त्यामुळे सुनीताच्या मनातही कुठेतरी लहानपणापासून त्यांच्या बद्दल गर्व निर्माण झाला असावा आणि यातूनच तिला पुढे आपणही काहीतरी मोठे करून दाखवावे अशी इच्छा निर्माण झाली असावी.

सुनीताला मोठा भाऊ आणि मोठी बहीण आहे. सुनीताला जन्म घेऊन नुकतेच सात-आठ महिने झाले होते तेव्हा तिच्या वडिलांचं स्थलांतर झालं.‌ अहमदाबाद वरून थेट अमेरिकेमध्ये सुनिता ची संपूर्ण फॅमिली शिफ्ट झाली. सुनिता यांची जॉईंट फॅमिली होती सुनीताच्या भावंडांना आपल्या काकूंचा व आजी-आजोबांचा फार लळा होता.

सुनिता च्या मनावर तिच्या वडिलांचे आणि आईचे संस्कार आहेत सुनीताचे रोल मॉडेल महात्मा गांधीजी आहेत. वडिलांनी दिलेली साधी शिकवण व उच्च विचार सरणी आईने दिलेले चांगले गुण व संस्कार सुनीताच्या कामी आले. ज्यावेळी सुनिता अभियांत्रिकी या विषयावर मास्टर ऑफ सायन्स ही पदवी घेत होती त्यावेळी तिची ओळख मायकल विल्यम्स यांच्याशी झाली.

मायकल विल्यम्स स्वभावाने अतिशय चांगले आहेत. त्याशिवाय ते नौसेना चालक, हेलिकॉप्टर पायलट, परीक्षण पायलट, नौसैनिक आणि जलतरणपटू आहेत. सुनीता आणि मायकल हे दोघे चांगले मित्र होते आणि मग त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुनिताला प्रेरणा व येणाऱ्या सामन्याशी लढाई करण्याचं बळ मायकल विल्यम्स यांनी दिलं.

करियर

सुनिताने लहानपणापासून जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण करण्यासाठी तिने भरपूर कष्ट घेतले. जेव्हा सुनिता संयुक्त राष्ट्रांच्या नोबेल अकॅडमी मध्ये शिक्षण घेत होती तेव्हा तिची ओळख नौसेनेशी झाली. आणि त्यातूनच सुनीताला हेलिकॉप्टर पायलट बनण्याची सुवर्ण संधी मिळाली. सुनीताने सहा महिने नेवल तटवर्ती कमांडमध्ये काम केलं.

पुढे सुनीताने बेसिक डायविंग ऑफिसर या पदावर काम केलं. पुढे सुनिता ची नियुक्ती नेवले एअर ट्रेनिंग कमांड या पदावर करण्यात आली. सुनीताची या क्षेत्राबद्दल असलेली ओढ आणि तिचा आत्मविश्वास आणि आवड पाहून सुनीताच्या एकापेक्षा एक उच्च पदावर नियुक्ती करण्यात आली. नंतर सुनीता हेलिकॉप्टर‌ कॉम्बैट सपोर्ट स्क्वाड्रन या पदावर काम करत होती.

या कालावधीमध्ये सुनिता यांच्यावर एकावर एक जबाबदाऱ्या सोपविण्यात येत होत्या. नाॅरफोक, वर्जिनिनियत हेलिकॉप्टर‌ कॉम्बैट सपोर्ट स्क्वाड्रन ८ ची जबाबदारी हाताळण्याच काम सुनिता यांच्याकडे होतं. ऑपरेशन डेझर्ट शिल्ड आणि ऑपरेशन प्रोव्हाइड कंफट या दोन भूमध्यसागर, रेड सी आणि पर्शियन गल्फ च्या मिशन मध्ये सुनिता यांचा सहभाग होता.

एच ४६ या तुकडीसाठी सुनिता यांचे ऑफिस इन्चार्ज म्हणून निवड झाली आणि त्यांना १९९२ मध्ये फ्लोरिडा येथे पाठवण्यात आले. युएस नेवल टेस्ट या पायलेट शाळेत सुनिता प्रशिक्षण घेत होत्या. त्यांचा हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर १९९५ मध्ये यु एस नेवल टेस्ट पायलट शाळेमध्ये रोटरी विंग डिपार्टमेंट मध्ये सुनिता यांची प्रशिक्षक आणि शाळेची सुरक्षा अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.

त्याच दरम्यान सूनिता यांना यु एच ६०, ओ एच ६, ओ एच ५८ या हेलिकॅप्टर मधून उड्डाण करण्याची संधी मिळाली. या क्षेत्रात उतरल्या नंतर सुनीता यांनी वेगवेगळे रेकॉर्डब्रेक करण्यास सुरुवात केली. सुनिता यांना यु एस एस पदावर असिस्टंट एअर बॉस व वायूमान संचालक म्हणून नेमण्यात आलं. तेव्हा सुनीता यांनी ३० पेक्षा अधिक विमानांमध्ये ३००० तासांपेक्षा जास्त वेळा उड्डाण करून दाखवलं आणि संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करून सोडलं.

सुनीता विल्यम्स यांचे हे पराक्रमी इथपर्यंतच थांबले नाही तर, त्यांना नासामध्ये काम करण्याची संधी मिळाली. ११९८ मध्ये सुनिता यूएसएस सैपान मध्ये आपली सेवा देत होत्या. यादरम्यान त्यांना नासामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी धावून आली. लगेच सुनिता यांची एस्ट्रोनॉट स्पेस ट्रेनिंग जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये सुरू झाली.

९ डिसेंबर २००६ रोजी डिस्कवरी नावाचा अंतरिक्षयान आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रांमध्ये पाठवण्यात आलं यावेळी सुनिता यांचा एक्सपेडिशन १४ व १५ या दोन देशांमध्ये सहभाग होता. यादरम्यान सुनीता यांनी तीन स्पेस वाक केले. २००७ मध्ये सुनीताने अंतराळातच बोस्टन मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला आणि ही मॅरेथॉन सुनीताने चार तास २४‌ मिनिटांमध्ये पूर्ण करून दाखवली.

या गोष्टीमुळे सुनीता विल्यम्स अंतराळ मध्ये धावणारी पहिली व्यक्ती ठरली. सुनिता भारतीय वंशाची आहे आणि लहानपणापासून तिने मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनीताला वेगवेगळ्या परिस्थितीशी सामना करावा लागला या सगळ्याला न जुमानता सुनीताने ९ डिसेंबर २००६ रोजी अंतराळात झेप घेतली.

सुनिता दोन वेळा अंतराळात गेली आणि त्या दोन्ही वेळेला अंतराळात जाण्यासाठी अंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशन अल्फा याचा उपयोग केला. स्टेशन अल्फा ही सोळा देशांची मिळून संयुक्त परियोजना आहे. या मध्ये खाण्यापिण्याची, राहण्याची, प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध आहे. सुनीताची देखरेक जरी दुसऱ्या देशांमध्ये झाली असली तरी ती मूळची भारतीय वंशाची होती आणि तिच्या विचारांवर भारतीय संस्कार होते.

सुनिता जेव्हा अंतराळामध्ये होती तेव्हा ती भगवद् गीतेच वाचन करायची. अंतराळात सुनीता विल्यम्स तीनशे एकवीस दिवस सतरा तास आणि पंधरा मिनिटे राहिली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनची सुनीता अंतराळ यात्रेच्या चिमूची फ्लाईट इंजिनियर होती. आणि पुढे जाऊन सुनीता अंतराळ यात्री पंधरा दल ची फ्लाईट इंजिनियर झाली.

सुनिता विल्यम ची जगातील दुसरी महिला आहे जी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनची कमांडर होती. सुनीता विल्यम्सने अंतराळातील रोबोटिक तंत्राचे देखील प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणादरम्यान सुनीता पाण्याच्या आत मध्ये एक्वेरियस हॅबिटॅट मध्ये सलग नऊ दिवस राहिली होती. सुनीताचे स्वप्न होतं की तिने जमीन, आकाश आणि समुद्र यांची सफर करावी.

जे स्वप्न तिने अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने आणि अफाट कष्ट करून पूर्ण करून दाखवलं. जेवढा तिच्या घरच्यांना अभिमान वाटतो त्याच्या दहा पट्ट तिच्या या कार्याचा अभिमान आपल्या भारताला वाटतो. ही भारतीय वंशाची स्त्री आहे आणि तिने ज्या काळामध्ये एवढं कर्तुत्ववान कार्य करून दाखवलं.

त्या काळी स्त्रियांना फारसं काही महत्त्व नव्हतं स्त्रिया फक्त घर आणि मुली इतक्या कामाशी जोडल्या गेलेल्या असायच्या. परंतु सुनीता विल्यम्सच्या या कार्यामुळे अनेक स्त्रियांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालं.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये sunita williams information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर astronaut sunita williams information in marathi wikipedia म्हणजेच “अंतराळवीर सुनीता विल्यम्स माहिती” sunita williams marathi mahiti यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या information about sunita williams in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि sunita williams mahiti माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!