सुरेश भट यांची माहिती Suresh Bhat Information in Marathi

suresh bhat information in marathi सुरेश भट यांची माहिती, भारतातील मराठी साहित्य आणि लेखन हे खूपच वेगळे आणि प्रेरित करणारे आहे आणि या साहित्याच्या वाचनामुळे वाचणाऱ्याला एक चांगली प्रेरणा मिळते. आपल्या मराठी साहित्यामध्ये कथा, नाटक, कादंबरी, कविता, ललित प्रकार, पोवाडा, बाल साहित्य, विनोद सुविचार, लोकगीत, लावणी, भारुड, ओव्या, चारोळ्या, व्यक्तीचित्र, उखाणे, गोंधळ असे अनेक प्रकारचे लेखन आहे आणि यामधील कविता या प्रकारामध्ये देखील अनेकांनी मोलाची कामगिरी केली आहे.

आणि त्यामधील एक लोकप्रिय नाव म्हणजे सुरेश भट आहे. सुरेश भट हे एक चांगले कविताकार आणि गझलकार आहेत आणि ते एक चांगले महाराष्ट्रातील कवी म्हणून देखील ओळखले जात होते. त्यांनी गझल हा काव्यप्रकार मराठी भाषेमध्ये रुजवला आणि त्यामुळे त्यांना एक लोकप्रिय गझलकार म्हणून देखील ओळखले जाते.

सुरेश भट यांचा जन्म हा १५ एप्रिल १९३२ मध्ये महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यामध्ये एका कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये सप्तरंगा आणि झंझावत या सारख्या कविता लिहिल्या आणि रंग माझा वेगळा हा कविता संग्रह तर लिहिलाच परंतु त्यांनी इतर कविता संग्रह देखील लिहिले.

suresh bhat information in marathi
suresh bhat information in marathi

सुरेश भट यांची माहिती – Suresh Bhat Information in Marathi

नावसुरेश भट
जन्म१५ एप्रिल १९३२
ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यामध्ये
पालकश्रीधर भट आणि शांता श्रीधर भट
शिक्षणबीए (BA)
ओळखकविताकार आणि गझलकार

सुरेश भट यांचे प्रारंभिक जीवन – early life

सुरेश भट यांचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यामध्ये १५ एप्रिल १९३२ मध्ये झाला आणि यांचा जन्म कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला आणि त्यांच्या वडिल श्रीधर भट जे डॉक्टर होते आणि त्यांच्या आईला कवितेची आवड असल्यामुळे ते देखील आवडीने लहान वयापासूनच कविता शिक्षण्यास सुरुवात केली.

सुरेश भट यांच्याविषयी असे म्हटले जाते कि ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलीओ झालेला आणि त्यामुळे त्याचा उजवा पाय हा आयुष्याभरासाठी अशक्त झाला. सुरेश भट यांनी त्यांचे संपूर्ण शिक्षण हे अमरावती मध्ये पूर्ण केले आणि त्यांनी १९५५ मध्ये बीए (BA) ची पदवी मिळवली.

पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमरावतीच्या आसपास ग्रामीण भागामध्ये विविध अध्यापनाच्या नोकऱ्या सांभाळून कविता लिहिणे सुरु केले. त्यांनी काही दिवसांनी भंते सुरई ससाई यांच्या मदतीने बौध्द धर्म स्वीकारला. सुरेश भट यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.

सुरेश भट यांची कामगिरी – suresh bhat marathi kavita

सुरेश भट यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक कविता अबी गझल लिहिल्या आणि त्यांनी गझल हा काव्यप्रकार मराठी भाषेमध्ये रुजवला आणि त्यामुळे त्यांना एक लोकप्रिय गझलकार म्हणून देखील ओळखले जाऊ लागले.

सुरेश भट यांनी त्यांचा रुपगंधा हा पहिला कविता संग्रह १९६१ मध्ये प्रकाशित केला आणि त्यांनी त्यांचा दुसरा कविता संग्रह १९७४ मध्ये प्रकाशित केला ज्याचे नाव रंग माझा वेगळा हा होता. मग १९८३ मध्ये त्यांनी एल्गार नावाचा संग्रह स्व प्रकाशित केला.

रुपगंधा आणि रंग माझा वेगळा या कविता संग्रहांना महाराष्ट्र सरकार कडून साहित्य पुरस्कार मिळाला. सुरेश भट यांच्या कवितांचे वर्णन हे सामान्यता मराठी गझल असे करण्यात आले आणि गझल मराठी भाषेमध्ये रुपांतरीत करण्यासाठी ते अग्रणी मानले जातात.

भटांची मायबोली हि कविता देखील लिहिली होती ज्यामध्ये ४५० हून अधिक गायक होते. तसेच त्यांनी सप्तरंगा आणि झंझावत या सारख्या कविता लिहिल्या होत्या.

कविता – suresh bhat poems in marathi

सुरेश भट यांनी सप्तरंगा, झंझावत, कफला, रसवंतीचा मुजरा, झंझावात, रुपगंधा, मायबोली, एल्गार आणि रंग माझा वेगळा  या काही त्यांच्या कविता आहेत.

सुरेश भट यांच्या विषयी काही मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts

 • सुरेश भट यांना लहानपणी पासूनच लेखनाची आवड होती आणि त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी म्हणजेच १९४४ पासूनच कविता लिहायला सुरुवात केली.
 • मराठी काव्यनिर्मिती करत असतानाच भटांनी उर्दू गझलांची भुरळ पडली आणि त्यांचे आकर्षण हे झपाट्याने वाढत गेले आणि त्यांनी उर्दू भाषा आणि उर्दू गझल देखील शिकल्या.
 • सुरेश भट यांचा कल हा अभ्यासापेक्षा अवांतर वाचनाकडे होता.
 • सुरेश भट यांनी १५ मार्च १९६१ रोजी त्यांचा ७२ कवितांचा संग्रह रुपगंधा हा प्रकाशित केला आणि या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार मिळाला होता.
 • सुरेश भट यांचा विवाह १९६४ मध्ये पुष्पा मेहंदळे यांच्याशी झाला आणि त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.
 • १९६७ मध्ये सुरेश भट यांनी भोपाळ या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भटांनी एक गझल सादर केली ज्याचे प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले होते.
 • रंग माझा वेगळा या कविता संग्रहांमध्ये एकूण ९२ कवितांचा संग्रह होता आणि हा कविता संग्रह त्यांनी १९७४ मध्ये प्रकाशित केला होता.
 • १९७५ ते १९७९ या काळामध्ये सुरेश भट हे नागपुरात राहिले आणि त्यांनी बहुमत नावाचे एक साप्ताहिक चालवले.
 • एल्गार या कविता संग्रहामध्ये एकूण ९६ कविता होत्या आणि या कविता संग्रहाला सोलापूरचा दमनी हा पुरस्कार मिळाला.
 • कफला हा १९९० मध्ये प्रकाशित झालेला मराठीतील पहिला प्रातिनिधिक गझल संग्रह आहे.
 • सुरेश भट हे गझल लेखक आणि गीतकार म्हणून मराठी जनमानसात परिचित असले तारी त्यांना गद्यहि लिहिले.
 • अनेक गायकांनी सुरेश भट यांच्या कविता आणि गझल संग्रह गायके आहेत त्यामधील तरुण असे रात्र अजुनी, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, रंगुनी रंगत सार्या, मलमली तरुण माझे, समजावुनी व्याथेला, पुरता माझ्या वयातची इत्यादी.
 • सुरेश भट यांच्या वडिलांचे नाव श्रीधर भट असे होते आणि ते डॉक्टर होते आणि त्यांच्या आईचे नाव शांता श्रीधर भट असे होते आणि त्यांना देखील कवितेची आवड होती.
 • सुरेश भट यांच्या गझल या खूप लोकप्रिय झाल्या होत्या.

सुरेश भट यांचा मृत्यू – death

सुरेश भट यांचा मृत्यू हा १४ मार्च २००३ मध्ये हृदयाच्या झटक्याने झाला आणि त्यांचा मृत्यू हा नागपूर या ठिकाणी झाला.

आम्ही दिलेल्या suresh bhat information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सुरेश भट यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या suresh bhat marathi kavita या suresh bhat poems in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about suresh bhat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये quotes of suresh bhat in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!