सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi

Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi – Surya Ugavala Nahi Tar Marathi Nibandh सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध मित्रहो, आपल्याला माहितीये की सूर्य हा वनस्पती, प्राणी आणि सजीव यांच्या जीवनाचा सर्वात मोठा आधार मानला जातो. आपल्याला सूर्यापासूनच सौर उर्जा, प्रकाश,जीवनसत्त्वे प्राप्त होतात. तसेच सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन तापून पाण्याच्या जलचक्र तयार होऊन ढग तयार होतात आणि पाऊस पडतो. जसं की आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे त्याशिवाय आपण श्वास पण घेऊ शकत नाही. आपल्याला जागृत करणारा सूर्य, अंधाराचा नाश करणारा सूर्य, आपल्या पृथ्वीची उत्पत्ती करणारा सूर्य उगवलाच नाही तर…ह्या सृष्टीवर जीवन असते का?

surya ugavala nahi tar essay in marathi
surya ugavala nahi tar essay in marathi

सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध – Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi 

Surya Ugavala Nahi Tar Marathi Nibandh

‘दिनमणी’ हे एक सूर्याचे नाव आहे. दिन म्हणजे दिवस तर मणी हा शब्द येथे तेजोगोल या अर्थाने वापरला आहे. तसेच या सृष्टीला दृष्यमान, प्रकाशमान करणारा, काळोख संपविणारा, आणि अविरत ऊर्जेचा पुरवठा करणारा सूर्य हा एक सूर्यमालेतील तप्त गोळा म्हणजेच ‘तेजोनिधी लोहगोल’ आहे. सूर्यप्रकाश हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मुख्य ऊर्जास्रोत आहे.

मित्रहो, आपल्या जीवनात सूर्याचे अगणित महत्त्व आहे. वनस्पती, सजीव, प्राणी, जीवजंतू वगैरे वगैरे तसेच इतर मार्गाने आपल्याला मिळणाऱ्या ऊर्जा सुद्धा सूर्यामुळे मिळते जसे की मानवाला दैनंदिन आयुष्यात पेट्रोल अन्य जीवाश्म इंधन लागते ती आपल्याला सूर्याच्या ऊर्जेमुळे प्राप्त होते, शिवाय या सगळ्याना जगण्यासाठी त्यांचे चयापचय करण्यासाठी सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेची गरज निर्माण होते.

सजीवांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते आणि ते वातावरणातील कर्ब-द्वि-प्राणिल व पाणी यांच्या प्रकाश-संश्लेषणाद्वारे वनस्पती प्राथमिक अन्न तयार करतात. त्यामुळेच सजीवांची भूक भागवू शकतो. त्यामुळे सूर्य उगवला नाही, तर असा विचार पण आपण करू शकत नाही कारण आपली सगळी कामे पूर्ण होण्यासाठी सूर्याची नितांत गरज आहे सूर्य उगवला नाही तर मानवाचं जगणं कठीण होईल.

प्रकाशाचा मूळ स्त्रोतच सूर्य आहे. तसेच सजीवांना प्राणवायू पुरविण्याचे कामही अप्रत्यक्षरित्या सूर्यच करीत असतो. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की, सजीवांचा प्राणवायूचे पुनर्विमोचनही याच प्रकाश – संश्लेषण प्रक्रियेत होत असतो. यावरून स्पष्टपणे जाणवते की जीवनाचे दुसरे नावच सूर्य आहे. जर सूर्य नसेल तर जीवन अशक्य आहे.

मित्रहो, बराच काळ जर पृथ्वीवर सूर्य नसला तर हाहा:कार उडेल. दैनंदिन ऊर्जेची ही आवक थांबेल. ऊर्जेचा साठवलेला साठा हळूहळू पण निश्चित स्वरूपानी हा कमी कमी होत जाईल. तसेच मौसमी वाऱ्यांना खीळ बसेल आणि ऋतुचक्र थांबेल. दिनचर्या, रात्रंदिन, या शब्दाला अर्थ असून अर्थहीन होतील.

ज्याप्रमाणे धृवप्रदेशात भलीमोठी रात्रच काय ती शिल्लक उरेल. आणि अंतत: तिथल्या प्रमाणेच सारी सृष्टी ही निर्जीव व बर्फमय होईल. म्हणूनच सूर्य उगवला नाही तर ही कल्पना करणंच भयानक आहे. रोजच्या प्रमाणे सकाळ होणार नाही. पशु पक्ष्याची किलबिलाट ऐकू येणार नाही, रोज ज्या पद्धतीने कोंबडा बाक देऊन उटवतो त्या प्रमाणे ऐकू येणार नाही.

सगळीकडे अंधारच अंधार पसरलेला असेल, त्यांचा परिणाम म्हणजेच त्या कुबट वातावरणात जीवाणू आणि रोगजंतूचा वेगाने  वाढ होईल आणि त्यांचा दुष्परिणाम सजीव, प्राणी, वनस्पती वर होईल.पण पूर्ण सृष्टीच अंधारात बुडालेली असेल. सर्वत्र रोगकारक वातावरण निर्माण होईल, साथीचे रोग पसरेल, गरिबी, उपासमार यांचे राज्य निर्माण होईल. ज्याप्रमाणे नाण्यांचे दोन बाजू असतात एक फायदे आणि दुसरं म्हणजे तोटे.

त्याचप्रमाणे सूर्य उगवला नाही तर मोठया प्रमाणात तोटेच सहन करावा लागेल. पण सूर्य उगवला तर सृष्टीचा पुनर्जन्मच होतो. आपल्या आजूबाजूचा निसर्ग, जीवसृष्टीचे पालनपोषण करण्यात सूर्याची मोठी भूमिका असते. सर्व सृष्टीची उलाढाल ही ऊर्जेविना अशक्य आहे. म्हणूनच सूर्याला सजीवांचा जीवनदाता म्हटलं पाहिजे.

जेव्हा चंद्राच्या पाठीमागे सूर्य दडतो तेंव्हा सूर्यग्रहण होते. काही वेळेपुरता का होईना पण सूर्य (पूर्णत: किंवा अंशत:) दिसेनेसा होतो. आणि या काळात अज्ञात आकाशस्थ वस्तू, ज्या यापूर्वी प्रखर सूर्यप्रकाशात दिसत नाहीत त्या दिसू शकतात. त्यामुळे अशा वस्तूंचा वेध घेण्याची संधी मिळते. म्हणूनच आजकाल ग्रहणांचा हा अभ्यास केला जातो. अ

शाप्रकारे काही काळ सूर्य (पूर्णत: किंवा अंशतः) दिसेनासा होण्याने खगोलशास्त्रात किती नवं नवे शोध लागू शकतात. याची आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत. म्हणूनच येथे तुम्हाला आवर्जून सांगावस वाटतं, सूर्याच्या अभावातच त्याच्या प्रभावाची जाणीव आपल्याला सदैव होत असते.

मित्रहो, रात्र म्हणजेच अंधार आणि त्या अंधारातच जास्त प्रमाणात अनर्थ गोष्टी घडत असतात. चोर, लुटारू, दरोडेखोर हे,अंधाराची वाट पाहत थांबलेले असतात, “सूर्य मावळला” म्हणजे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असते. तर सूर्योदयाची वाट पाहणारे काही कर्तव्यतत्पर सज्जन असतात.तर काही कुकर्म करणारे लोक सुर्यास्तोची वाट पाहत असतात असे निरनिराळ्या प्रकारचे मानव या जीवसृष्टी वर आहेत.

जेव्हा पावसाची आगमन होते तेव्हा सूर्य हा भर दिवसा आकाशात कुठे असावा हे सुद्धा सांगता येत नाही. त्यामध्ये तर दिवसचे दिवस, किंबहूना कधी कधी आठवडे-आठवडे सूर्यदर्शन होत नाही. सूर्याच्या उपस्थित नसण्याने काय होते त्याचे वर्णन करण्याची मुळी गरजच उरत नाही. प्रत्येकाला माहितीय सूर्य कधी उगवेल याचीच भ्रांत पडलेली असते.

कारण, सजीवांच्या वाटचालीसाठी सूर्याची उष्णतेची गरज मानवाला, निसर्गाला किती मोठया प्रमाणात आहे हे शब्दांत तरी कोणाला सांगता येणार नाहीत, धुतलेले कपडे सूर्याच्या अभावाने सुकत नाहीत. तसेच वातावरणातली धुळीमुळे अनेकांना श्वसनाचे आजार जडतात यांचे मुख्य कारण म्हणजे वातावरणात वाढलेली प्रदूषण आणि आर्द्रता ही श्वसनाच्या रोगांचे भांडार उघडते, जसे की सर्दी, दमा, न्युमोनिया इत्यादी

भारतात फुप्फुसाच्या आजारांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे याचाच अर्थ असा की, आपण जरी कल्पना केली तर त्याचे भयानक तोटे  जीवसृष्टीच्या पदरात पडते. रस्तोरस्ती तुंबलेले पाणीचे रूपांतर चिखलात होत असते. तर आजुबाजूची ज्या डबकी असतात ते डासांच्या पैदाईशीची माहेरघरेच बनलेली असते. म्हणूनच या सगळया गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सूर्याची अतिशय निकड भासू लागते.

सूर्याच्या अभावानी नरक वाटणारा परिसर, मग त्याच्या प्रभावानीच स्वर्गवत होऊ लागतो.सूर्याच्या दर्शनानेच रोगराई आपला पसारा आवरू लागते, डास, माशांना  कीटकांना पर्वणीची वाट बघावी लागते. पाण्याने भरलेली डबके सुकून कोरडे पडतात  तसेच धुतलेले कपडे वाळण्यास मदत होते. याखेरीज शेतातील पिके जोमाने वर येतात. आणि सुगीचे दिवस सुरू होतात.

मित्रहो, आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. सूर्य हा या संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्वाचा आहे तो एक सूर्यमालेतील तारा आहे जो एक तप्त आगीच्या गोळ्या समान आहे. त्यामुळेच आपल्या पृथ्वी वर जीवन आहे आणि तोच पृथ्वी वर रोज प्रकाश घेऊन येत असतो, त्यामुळे तर सगळे आपण एक-मेकांना बघू शकतो. सूर्य हा सौरमंडल मधील महत्त्वाचा केंद्र बिंदू आहे.

सूर्या पासून पृथ्वी वर येणारा प्रकाश हा ८ मिनिट १७ सेकंदाचा कालावधी मध्ये पृथ्वीवर पोहचतो आणि त्याच्यामुळेच तर आपल्या पृथ्वी वर सर्व जीवसृष्टीला प्रकाश मिळतो म्हणून आपण कुठल्याही सर्व परिसर,व्यक्ती, प्राणी वगैरे वगैरे बघू शकतो. तसेच पृथ्वी आणि अन्य ग्रह हे सूर्याच्या भोवताली परिक्रमा घालत असतात.

त्यामुळे आपण पृथ्वी वरून बघितल्यावर सूर्य आपल्याला खूप लहान दिसतो कारण तो पृथ्वी पासून खूपच लांब आहे. परंतु तो आपल्या पृथ्वी पेक्षाही खूप मोठा आहे.मित्रहो, तुम्ही एक कल्पना करून बघा सूर्य नसता तर या पृथ्वी वर काही राहिलं असत का? आपण देखील नसतो.

म्हणजेच या जीवसृष्टी वर काहीच राहील नसत कारण आपल्याला सूर्या पासून व्हिटॅमिन ड मिळत असतो आणि व्हिटॅमिन ड त्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, व्हिटॅमिन ड हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे.हे फक्त सूर्याच्या प्रभावानेच होऊ शकतो.

मित्रहो, सर्व स्वर्गसमकक्ष सृष्टी सजते कधी? तर ऋतुचक्र पूर्ण होतांना! ऊन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे पुन्हा पुन्हा ऋतुचे चक्र घडत असतो हे ऋतुचक्र पूर्ण होते तेंव्हा सुगीचे दिवस येतात. सूर्याच्या असण्याने मानवाला, पूर्ण जीवसृष्टला, ऊबदार सूर्यप्रकाश, स्वच्छ कोरडी हवा, भरपूर मोठया प्रमाणात पाणी व विपूल अन्नधान्य मिळत असतो यांनी सृष्टी संपन्न असते.

जणू काही स्वर्ग सृष्टीवर अवतरतो. आणि मित्रहो, हा स्वर्ग साऱ्यांनाच उपभोगता येतो. म्हणूनच तर सूर्य उगवला नाही तर ……  काय होईल ह्या निष्फळ चिकित्सेत उगाच न गुंतता सूर्य सजीवांचा जीवनदाता ठरणारा तसेच जीवसृष्टीला पुनर्जन्म देणारा ठरत असतो.

आम्ही दिलेल्या surya ugavala nahi tar essay in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या surya ugavala nahi tar marathi nibandh या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on surya ugavala nahi tar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये surya ugavala nahi tar nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!