स्वामी दयानंद सरस्वती Swami Dayanand Saraswati Information in Marathi

Swami Dayanand Saraswati Information in Marathi स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विषयी माहिती स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 1824 मध्ये झाला. काठेवाड मधील मोरवी राज्यातील टंकारा या गावी स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव करसनजी तिवारी होते. ते पिढीजात जमीनदार आणि सावकार होते. तसेच ती महसूल खात्यात मोठे सरकारी अधिकारीही देखील होते. ते सामवेदी औदीच्य ब्राह्मण होते. समाजात त्यांना बराच मान देत होते. अशा कुलीन कुळात स्वामी दयानंद सरस्वती जन्मले होते. त्यांचे नाव मुलशंकर असे ठेवण्यात आले होते. तर आजच्या या सदरात आपण धर्मसुधारक तसेच समाजसुधारक स्वामी दयानंद सरस्वती यांची माहिती घेणार आहोत.

swami dayanand saraswati information in marathi
swami dayanand saraswati information in marathi

स्वामी दयानंद सरस्वती यांची माहिती – Swami Dayanand Saraswati Information in Marathi

नाव(Name)स्वामी दयानंद सरस्वती
जन्म (Birthday)12 फेब्रुवारी 1824
जन्मस्थान (Birthplace)टंकरा
वडील (Father Name)करशनजी लालजी तिवारी
आई (Mother Name)यशोदाबाई
मृत्यू30 ऑक्टोबर 1883

शिक्षण व सामाजिक कार्ये

वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांनी संस्कृत ग्रंथाच्या अभ्यासात सुरुवात केली होती. आठव्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांनी वेदाध्ययनाचा प्रारंभ केला. सामवेदी असूनही त्यांनी प्रथम शुक्ल यजुर्वेदाच्या अध्ययन केले होते. 14 व्या वर्षी त्यांनी वेदाध्ययन पूर्ण केले होते. मुंजी नंतर त्यांनी शैल पंथाची दीक्षा घेऊन पार्थिव पूजा स्वीकारली होती.

अतर वेदांतील काही भाग आणि संस्कृत व्याकरणाचे ग्रंथ त्यांचीही अध्ययन त्यांनी केले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल होण्याचा काळ आला होता. शिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात जागरण करीत असताना, शिवाच्या पिंडीवर उंदीर फिरताना त्यांनी पाहिला आणि देव म्हणजे मूर्ती नाही, हे त्यांना समजले.

त्यांनी हा प्रश्न आपल्या वडिलांना विचारला पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. धर्म आणि देव यांच्या संबंधी विचारांना मात्र चालना मिळाली होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची लहान बहीण व प्रेमळ चुलते अंबाशंकर यांचा मृत्यू त्यांनी डोळ्यांनी पाहिला होता. मृत्यूच्या भीतीतून सोडविणारा मोक्ष कसा मिळेल याचाच सतत विचार करू लागले होते.

अनेकांना त्यांनी यासंबंधी प्रश्न विचारले होते. योगा अभ्यास केल्याशिवाय याचे उत्तर मिळणार नाही हे स्वामी दयानंद सरस्वती यांना समजले होते. मुलाच्या मनात वेगळेच विचार चालले आहेत हे लक्षात येताच त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु स्वामी दयानंद सरस्वती यांना हे समजताच 1845 मध्ये  गृहत्याग केला होता.

स्वामी दयानंद सरस्वती  संन्यास यांच्या समूहात दाखल झाले होते. तेथे ब्रह्मचर्याची शिक्षा घेऊन त्यांनी “शुद्ध चैतन्य” हे नाव धारण केले होते. यानंतर त्यांनी सुमारे पंधरा वर्षे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पर्यटन केले होते. अनेक संन्याशांची ज्ञानी पुरुष यांची त्यांनी भेट घेतली होती, तसेच अनेक शास्त्रांचे सखोल ज्ञान संपादन केले होते आणि ते त्यांनी तपासूनही पाहिले होते.

तांत्रिक आचार, कर्मकांड, मुर्तिपूजा, अज्ञानमुलक, धर्माचरण, अंधश्रद्धा इत्यादी अनेक गोष्टींची त्यांनी बारकाईने अवलोकन केले होते.स्वामी दयानंद सरस्वती यांनी पूर्णांनंद नावाच्या स्वामिपासून संन्यास धर्माची शिक्षा घेतली आणि दयानंद सरस्वती हे नाव धारण केले होते. 1860 साली मथुरेस अत्यंत चिकित्सक आणि ज्ञानी असलेल्या स्वामी विराजानंद या अंध गुरुकडे ते आले होते.

विराजानंद जवळ स्वामी दयानंद सरस्वती हे तीन वर्षे राहिले होते. याच काळात त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणेच्या विचारांचा पाया विरजानंदांशी विचारविनिमय होऊन घेतला होता आणि पुढील अनेकविध सुधारकीय कर्यांची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. यानंतर दयानंदानी पुन्हा भारतभर परिभ्रमण केले होते.

त्यावेळी त्यांनी मूर्तिपूजा, रुढीप्रियता, जन्मतः जातीभेद, हिंसात्मक, यज्ञ इत्यादी गोष्टीवर टीका करणारी अनेक व्याख्यान दिली होती. दयानंद हे केवळ संहिता ग्रंथानाच वेद मानत होते.कारण त्यामध्ये जन्मसिद्ध जातिभेदास आधार नव्हता. वेदांचा आधार घेऊन त्यांनी नवे विचार मांडण्यास सुरुवात केली होती.

अस्खलित संस्कृतात शास्त्री पंडितांबरोबर त्यांनी वादविवाद केले होते. त्यांनी काशीला 1869 साली पंडितांबरोबर शास्त्रार्थ केला होता. दयानंदांचा उदात्त हेतू लक्षात न घेता पंडितांनी केवळ शब्दप्रमानाच्या आधारावर त्यांना उत्तरे दिली होती. यानंतर दयानंदानी प्रयाग, कलकत्ता, मुंबई, पुणे, इत्यादी ठिकाणी व्याख्याने देऊन आपले नवे धर्मसुधारनेचे  विचार प्रभावीपणे मांडले होते. 

त्यामुळे केशव चंद्र सेन, लोकहितवादी, न्या रानडे यासारख्यांनी त्यांची स्तुती केली होती. 1875 साली मुंबई येथे त्यांनी आपल्या विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी आर्य समाजाची स्थापना केली होती. आपल्या वैदिक धर्म विचारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश इत्यादी प्रांतात दौरे आणि हिंदी भाषेत व्याख्याने देऊन धर्मजागृती केली होती.

आर्य समाजाच्या प्रचारासाठी त्यांनी ग्रंथ लेखनास प्रारंभ केला होता. कट्टर वेदनिष्ट दयानंद हे होते. त्यांनी यजुर्वेद आणि ऋग्वेद यावर संस्कृतात भाष्ये लिहिलेली आहेत. ऋग्वेदाच्या काही भागावर भाष्यही केली आहेत. पण त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे “सत्यार्थप्रकाश” हा आहे.

यात त्यांनी वेदातील ज्ञान भांडार हिंदी भाषेतून लोकांसमोर मांडले आहे. आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ सत्यार्थप्रकाश हा समजला जाऊ लागला होता. याशिवाय दयानंदांनी संस्कार विधि, पंचमहायज्ञ विधि, गोकरुणानिधी इत्यादी ग्रंथ लिहून आपले विचार जनतेसमोर मांडले होते. त्यात त्यांनी शुद्ध वैदिक धर्माचे स्वरूप स्पष्ट केले, पाखंडी मतांचे खंडन केले.

मूर्ती पूजेचा धिक्कार केला, स्त्रियांना आणि शूद्रांना वेद अध्ययनाचा अधिकार आहे हे सिद्ध केले, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले, जातीभेदावर टीका केली आणि ख्रिस्ती, इस्लाम, यहुदी इत्यादी धर्मातील दोष उघड करून दाखविले होते.

1879 मध्ये दयानंद यांच्या धर्म विचारांनी प्रभावित झालेली दिवस ऑफिकल सोसायटीचे संस्थापक कॉल कट यांनी दयानंद यांची  सहारनपुर येथे थेट भेट घेतली होती आणि एकत्र कार्य करण्याची योजना ठरली होती. थिऑसॉफिकल सोसायटीच्या श्रीमती ब्लाव्हटस्की यांनीही दयानंदा संबंधी प्रशांतसोद्वार काढले होते.

पण या दोन संस्थांचे एकीकरण होऊ शकले नाही. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, यातीलही कार्यकर्ते दयानंदाकडे आकृष्ट झाले पण तेही समाज कार्य समाजात मिसळू शकले नाही. दयानंद आणि आपल्या आर्य समाजाचे संघटन अत्यंत चिकाटीने आणि प्रभावीपणे केले होते. आर्य समाजातर्फे त्यांनी वैदिक पाठशाळा काढल्या होत्या.

फिरोजपूर येथे अनाथ आश्रम चालू केला. जाती – पंथ – भाषा इत्यादी कोणतेही भेद लक्षात न घेता कोणालाही आले समाजाचे सदस्य होता येत होते. आर्य समाजाच्या सदस्यांसाठी नियम तयार केले गेले होते. प्रत्येक रविवारी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन वेदाध्ययन केले जायचे. प्रत्येकाने रोज संध्या, होम, गायत्री जप व वेद पाठ या गोष्टी अवश्य केल्या जायच्या.

या गोष्टी करण्यास पुरोहिताची आवश्यकता लागत नव्हती. ब्रह्मचर्य, सत्य, भक्ती इत्यादी प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. सर्व सत्याचे मूळ परमेश्वर आहे वेद हा सत्य मुलक ग्रंथ आहे त्याचा विचार करूनच धर्माचरण केले पाहिजे सर्वांच्या उन्नतीसाठी झटले पाहिजे इत्यादी विचार लक्षात घेऊन प्रत्येक आर्य समाज सदस्यांनी वागले पाहिजे असे दयानंदांनी म्हटले होते.

दयानंद हे स्वतःला शरीराने, मनाने दणकट असे होते. अत्यंत विरुद्ध वातावरणात आपली मते मांडण्यात ते कधीही माघार घेत नव्हते. काशीत जाऊन मूर्तीपूजा सिद्ध करा नाहीतर विश्वेश्वर यांची मूर्ती फोडून टाका असे म्हणून ते वादास उभे राहिले होते. अनेक संकटे आली तरी त्यांनी ती तेजस्वीपणे स्वीकारले आणि त्यावर मात केली होती. ख्रिस्ती, इस्लाम धर्माच्या पंडितांसशी वाद घालून त्यांनी त्यांना नामोहरण केले होते.

परधर्मात जाऊ पाहणाऱ्या हिंदूंना वैदिक धर्म पटवून दिले होते. परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले गेले होते. वैदिक धर्माला त्यांनी पुन्हा तेजस्वी बनविले होते. शाहपुर चे महाराज नर्सिंग, जोधपूर चे महाराज जस्वंत सिंह यासारख्या अनेक राजरजवाड्यांना त्यांनी आर्य समाजाची शिक्षा दिली होती. सहस्त्रावधी लोकांना समाजाच्या कार्याकडे प्रवृत्त केले होते.

 स्वामी दयानंद सरस्वती यांचे निधन 

1883 साली दयानंद जोधपुरला आले आणि तेथील महाराजांची त्यांच्यावर श्रद्धा बसली होती आणि ते त्यांचे अनुयायी बनले होते. तेथे त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे म्हटले जाते. विष प्रयोगामुळे दयानंद यांची प्रकृती बिघडली होती आणि अजमेर येथे 30 ऑक्टोबर 1883 साली निधन झाले.

आम्ही दिलेल्या swami dayanand saraswati information in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या swami dayanand saraswati in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about swami dayanand saraswati in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण dayanand saraswati history in marathi या लेखाचा वापर swami dayanand saraswati information in marathi wikipedia असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!