विनोबा भावे यांची माहिती Vinoba Bhave Information in Marathi

Acharya Vinoba Bhave Information in Marathi आचार्य विनोबा भावे विनायक नरहरी भावे यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 रोजी झाला. भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि भूदान चळवळीचे प्रमुख नेते होते. 1940 मध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह पुकारला होता. त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून महात्मा गांधी यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली होती. 1942 मध्ये “छोडो भारत” आंदोलनात ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यावसन झाले होते. सूर्योदय नेते म्हणून आचार्य विनोबा भावे हे प्रसिद्ध झाले. विनोबा भावे यांच्या आजोबांचे नाव शंभू राव भावे होते. शंभू राव भावे यांचे जन्मगाव वाई होते. 

vinoba bhave information in marathi
vinoba bhave information in marathi

विनोबा भावे यांची माहिती – Vinoba Bhave Information in Marathi

नाव(Name)विनायक नरहरी भावे
जन्म (Birthday)11 सप्टेंबर 1895
जन्मस्थान (Birthplace)गगोड़े
वडील (Father Name)नरहरी शंभू राव महावीर
आई (Mother Name)रखुमाबाई
मृत्यू (Death)15 नोव्हेंबर 1982
लोकांनी दिलेली पदवीआचार्य

वाईच्या ब्राह्मणशाही मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर होते. हे विनोबा भावे यांच्या मालकीचे असून येथील शंभू रावांनी अग्निहोत्र स्विकारुन अग्निहोत्र शाळा स्थापली. आजोबा आणि आईपासून धर्मपरायणतिचे संस्कार विनोबा भावे यांना मिळाले होते. विनोबा भावे यांचे वडील नरहरी शंभू राव महावीर आणि आई रखुमाबाई होती. वडील नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेली होते. 

शिक्षण:

विनोबा भावे यांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथे झाले होते. महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते 1916 साली ते मुंबई जाण्यास निघाले होते. परंतु वाटेतच उतरून आई वडिलांना न कळवता वाराणसी येथे रवाना झाले होते.दोन गोष्टींचे आकर्षण विनोबा भावे यांना होते. एक हिमालय आणि दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक, वाराणसी येथे हिंदू विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधी यांची भाषण झाले होते. महात्मा गांधी यांच्या त्या भाषणाचा विनोबा भावे यांच्या मनावर परिणाम झाला होता. बंगालमधील क्रांती आणि हिमालयातील अध्यात्म यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधी यांच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्वात विनोबा भावे यांना आढळले होते.

विनोबा भावे यांनी महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला आणि  गांधींची कोचरब आश्रमात 7 जून 1916 रोजी भेट घेतली होती. आणि तेथेच त्या सत्याग्रह आश्रमात नैष्टीक ब्रह्मचर्याची  प्रतिज्ञा करून जीवन साधना सुरू केली होती. महात्मा गांधींची एक वर्षाची रजा घेऊन विनोबा भावे वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदांच्या अध्ययना करिता ऑक्टोबर 1916 रोजी उपस्थित झाले होते. ब्राम्हविध्येची साधना विनोबा भावे यांचा जीवनोद्धेश होता. भारतीय स्वातंत्र्य लढाईमध्ये विनोबा भावे महात्मा गांधी यांच्या सोबत होते. सन 1932 मध्ये स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी बद्दल तुरुंगवास झाला होता.

राजकीय कार्य :-

वाई येथील प्राज्ञपाठ शाळा मंडळाचे संस्थापक आणि मुख्याध्यापक स्वामी केवलानंद सरस्वती यांच्यापाशी विनोबा भावे यांनी उपनिषदे, ब्राह्मसूत्र शंकरभाष्य, पांतजल योगसूत्र इत्यादी विषयांचे अध्ययन केले होते. दिनकर शास्त्री कानडे आणि महादेव शास्त्री दिवेकर हे प्राज्ञपाठ शाळेची व्यवस्थापनाची आणि अन्य प्रकारची कामे करत असत. सोमवार हा या पाठशाळेचा सुट्टीचा दिवस असत होता. त्यादिवशी पाठशाळेची अंगमेहनतीची कामे शिक्षक विद्यार्थी करत असत आणि प्रज्ञानंद स्वामींच्या समाधी स्थानाच्या सभागृहात विद्यार्थीं आणि शिक्षक यांच्या शास्त्रार्थ चर्चेकरिता साप्ताहिक सभा घेत असत.

सामाजिक, धार्मिक, तात्विक हे चर्चेचे विषय असत. त्याचबरोबर प्रचलित राजकारणाची अनेक बाजूनी चर्चा चालत असत. सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगी अरविंद घोष इत्यादी सशस्त्र क्रांतिकारकांच्या मार्गाने चालणाऱ्या एका गुप्त गटाचे सदस्य हे दिनकर शास्त्री कानडे होते. ते सशस्त्र क्रांतीच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करीत होते. त्यांचेही वक्तृत्व विनोबा भावे यांच्याप्रमाणे अमोघ होते. अहिंसक क्रांतीची वैचारिक भूमिका विनोबा भावे मोठ्या परिणामकारक रीतीने या साप्ताहिक सभांमध्ये मांडत होते. हिवाळ्यात वाई येथे 1917 साली प्लेगची साथ उद्भवली होती.

कृष्णेच्या दक्षिण तीरावरराहुट्या आणि पर्णशाला उभारून त्यात प्राज्ञपठशाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक जवळ जवळ 4 महिने राहिले होते. वेदांताचे आणि इतर शास्त्रांचे पाठ त्यातील एका विस्तृत पर्णशाले मध्ये चालत होते. विनोबा भावे पर्णशाले बाहेरच्या कृष्णाकाठच्या आम वृक्षाच्या छायेखाली उपनिषदांचे आणि शंकरभाष्याचे उच्च स्वरात वाचन करत, हळुहळु सावकाश भेऱ्याही मारत होते. त्यांचे ते प्रसन्न वाचन ऐकून स्वामी केवलनंदांच्या मनावर विनोबा भावे यांच्या व्यक्तिमत्वाची खूप खोल छाप पडली होती.

विनोबा भावे यांनी वेदांत विषयामध्ये खूप वेगाने 10 महिन्यात प्रगती केली होती. आपण कोणकोणत्या ग्रंथांचे आणि विषयांचे अध्ययन केले याचा सविस्तर वृत्तान्त विनोबा भावे यांनी महात्मा गांधी यांनना कळवला होता.महात्मा गांधी हे वृत्तांतपत्र वाचून अत्यंत विस्मित झाले होते.

फेब्रुवारी 1918 मध्ये विनोबा भावे वाईहून अहमदाबादला परतले होते. ऐन्फ्लुयएन्झाची साथ 1918 साली देशभर परसली होती. लक्षावधी लोक त्या साथीला बळी पडले होते. त्यात विनोबा भावे यांचे आई वडील, आणि सगळ्यात लहान भाऊ दत्तात्रय हे आजारी पडले होते. ही गोष्ट महात्मा गांधी यांना कळल्यावर त्यांनी विनोबा भावे यांना मातूश्रींच्या शुश्रुषेकरता बडोद्यास जाण्याचा आग्रह धरला होता. विनोबा भावे जाण्यास तयार नव्हते. महात्मा गांधी यांनी विनोबा भावे यांचे मन वळवले. आई आणि धाकटा भाऊ या रोगाला बळी पडले होते. वडील या रोगातून बरे झाले होते.

1932 सालच्या सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनात विनोबा भावे यांनी भाग घेतला होता. त्यांनी धुळे कारागृहात शिक्षा भोगली होती. विनोबा भावे यांनी या कारागृहात सुप्रसिद्ध गीताप्रवचने या कारागृहात त्यांनी दिली होती. शंभरपेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यासाठी शिक्षा झालेले कैदी या प्रवाचनाच्या रविवारच्या सभेत उपस्थित राहत होते. त्यामध्ये शेठ जमनालाल वजाज, आण्णासाहेब दास्ताने, गुलजारीलाल नंदा, साने गुरुजी इत्यादी मंडळी उपस्थित राहत होते.

विनोबा भावे मृत्यू :-

15 नोव्हेंबर 1982 पवनार, महाराष्ट्र मध्ये आचार्य विनोबा भावे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता भारतभर आणि जगभर प्रसारमाध्यमातून विद्युतवेगाने पसरली होती. या निधनाला कोणी महानिर्वाण म्हणत होते तर कोणी योगपुरुषाची समाधी म्हणत होते. महात्मा गांधींच्या आध्यत्मिक परंपरेचे आचार्य विनोबा भावे हे एक श्रेष्ठ वारस होते. त्यांचे हे प्रायोपवेशनाचे तंत्र हिंदू धर्म, बौद्ध आणि विशेषतः जैन धर्म या तिन्ही धर्माना प्राचीन काळापासून मान्य असलेले तंत्र होते. ज्ञानदेवादी संतांनी योगमार्गांने देहत्याग केला होता.

हा योगमार्ग गुरूंगम्यच होता. गीतेच्या आठव्या अध्यायात त्याचे वर्णन केले आहे. विनोबा भावे यांनी प्रायोपवेशनाच्या द्वारे देहत्याग केला होता. अनेक जैन साधू आणि साध्वी स्त्रिया  आज ही प्रतिवर्षी अशाप्रकारे देहत्याग करतात आणि त्याची वार्ता वृत्तपत्रात येते. स्वातंत्र्यवीर सावरकर, धर्मानंद कोसंबी यांनी अशाच प्रकारे देहत्याग केला होता.

विनोबा भावे यांच्यासह नरहर कुरुंदकर, वसंतदादा पाटील, बालगंधर्व, जी. डी. बापू लाड , नागनाथ अण्णा नायकवाडी, बाळासाहेब देसाई (सातारा), भाई सावंत, बाळासाहेब सावंत ( रत्नागिरी), चिंतामणराव देशमुख, संताजी घोरपडे, मारोतराव कन्नमवार, इत्यादी व्यक्तींची स्मारके उभारण्याचे महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने ठरविले होते पण यातील एकही स्मारक पूर्ण केले नाहीत.

वैयक्तिक सत्याग्रहानंतर 7 मार्च 1951 पर्यंत पवनार येथील परंधाम आश्रमातच विनोबा भावे यांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चर्येत जीवन व्यतीत केले होते. 1936 पासून महात्मा गांधी साबरमतीच्या आश्रम सोडून सेवाग्रामला म्हणजे पवनार जवळच येऊन राहिले होते. त्यामुळे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा चिरकाल संवाद चालू होता. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी दिल्ली, पंजाब, राजस्थान यामध्ये आले होते. त्यांना धीर देण्याकरता विनोबा भावे यांना पंडितजीनी बोलावून घेतले होते. या दौऱ्यात सर्वधर्मसमभावाचा आदेश देऊन प्रेम आणि सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न विनोबा भावे यांनी केला होता.

पुस्तके – acharya vinoba bhave books in marathi

 • अष्टदशी
 • इशावस्यवृत्ती
 • उपनिषदांचे अभ्यास
 • गीताई
 • गीताई चिंतनिका
 • गीता प्रवचने
 • गुरुबोध सार
 • जीवनदृष्टी
 • भागवत धर्म – सार
 • मधुकर
 • मनुशासनम
 • लोकनिती
 • विचार पोथी
 • साम्यसूत्र वृत्ती
 • साम्यसुत्रे
 • स्थितपज्ञ – दर्शन

चरित्रग्रंथ :-

 • आमचे विनोबा
 • गांधी, विनोबा आणि जयप्रकाश
 • दर्शन विनोबांचे
 • ब्रह्मर्षी विनोबा
 • महर्षी विनोबा
 • महाराष्ट्राचे शिल्पकार विनोबा भावे
 • विनोबांचे धर्मसंकीर्तन
 • विनोबा सारस्वत
 • साम्ययोगी विनोबा

आम्ही दिलेल्या acharya vinoba bhave information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आचार्य विनोबा भावे यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vinoba bhave mahiti marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि vinoba bhave in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये swami vinoba bhave jayanti information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!