नरवीर तानाजी मालुसरे यांची माहिती Tanaji Malusare Information in Marathi

tanaji malusare information in marathi तानाजी मालुसरे यांची माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे सुखी तोरण बांधण्यासाठी अनेक वीर पराक्रम केले. तसेच स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केले. स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अनेक आहेत आणि त्यातीलच एक म्हणजे विर तानाजी मालुसरे होय. तानाजी मालसुरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणापासूनचे सवंगडी व अतिशय विश्वासू, प्रामाणिक, कर्तृत्ववान, शूर विर, असे स्वराज्याचे मावळे होते. भारतातील मराठा साम्राज्याच्या इतिहासात तानाजी मालुसरे यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेले आहे. ते एक महान योद्धा होते. ज्यांनी स्वराज्याचा महत्वपूर्ण असा किल्ला म्हणजेच कोंढाणा किल्ला स्वराज्याला पुन्हा मिळवून दिला.

tanaji malusare information in marathi
tanaji malusare information in marathi

तानाजी मालुसरे यांची माहिती – Tanaji Malusare Information in Marathi

tanaji malusare history in marathi – तानाजी मालुसरे यांचा इतिहास

जन्म इसवी सन १६२६ रोजी तान्हाजी यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव नरवीर तानाजी काळोजी मालुसरे होय.‌ सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यांमध्ये स्थिती असणारे लहानसं गोडवली येथे तानाजी मालसुरे यांचा बालपण गेलं. वडिलांच्या मृत्यूनंतर तान्हाजी आपल्या शेलार मामा यांच्या गावी म्हणजेच उंबरठ येथे गेले. तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा तानाजी यांच्यावर अतिशय विश्वास होता.

पराक्रम ज्या क्षणापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा पासून प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत तानाजी मालुसुरे यांचा सहभाग होता. तानाजी मालुसरे हे स्वराज्याचे अतिशय विश्वासू मावळे होते शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सुभेदार म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.

तानाजी मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत विविध लढाया केल्या होत्या. ज्यावेळी अफझलखानाने स्वराज्यावर चाल केली होती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या काही निवडक विश्वासू सरदारांना प्रत्येकी हजार सैन्याची तुकडी देऊन अफजलखानावर हल्ला करण्यास सांगितले होते. त्यावेळी या मावळ्यांमध्ये तानाजी मालुसरे यांचा देखील सहभाग होता‌. त्यांनी आपल्या सैन्याच्या बरोबरीने लढत अतिशय उत्तम कामगिरी बजावली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळी संगमेश्वर काबीज केली त्यावेळी त्यांनी तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे पाठवले होते रात्रीच्या वेळी अचानक सुर्व्यांनी हल्ला केला तेव्हा पिलाजी तेथून पळून गेले परंतु वीर तानाजी मालुसरे यांनी सुर्व्यांनी केलेल्या हल्ल्याचा त्यांच्यावर पलटवार केला. प्रसिद्ध मराठा यौद्धां पैकी एक म्हणजे शूर वीर तानाजी मालुसरे होय.

तानाजी मालुसरे यांची कोंढाण्याची लढाई त्यांच्या शूरवीरतेची साक्ष देते. कोंढाण्याच्या लढाई मधील मुगल किल्ले रक्षक उदयभान राठोड याच्याविरुद्ध तानाजी मालुसरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढा दिला. तानाजी मालुसरे यांनी अनेक पराक्रम केले आहेत परंतु कोंढाण्याच्या लढाईसाठी त्यांना सर्वात जास्त स्मरणात ठेवले जाते.

कोंढाण्याची लढाई सन १६६५ मध्ये पुरंदरच्या तहा मुळे छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ल्या सह इतर तेवीस किल्ले मोगलांच्या हाती द्यावे लागले. पुण्यात असणारा कोंढाणा किल्ला हा सर्वात जड तटबंदी किल्ला होता आणि एक मोक्याचा किल्ला होता. पुरंदरच्या तहानंतर राजपूत, अरब आणि पठाण सैन्याने मुघलांच्या वतीने किल्ल्याचे रक्षण केले. त्यातील सर्वात सक्षम सेनापती म्हणजे उदयभान राठोड कोंढाण्याचा किल्लेदार होता.

सायंकाळची वेळ होती आणि राजमाता जिजाऊ प्रतापगडाच्या एका खिडकीतून कोंढाणा गडावर फडकणारे हिरवे झेंडे बघत होत्या त्या वेळी त्यांच्या समोर असणारे दृश्य त्यांना खटकले आणि त्यावेळी त्यांनी लगेचच छत्रपती शिवाजी महाराज यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या जवळ आपली इच्छा व्यक्त केली. खरंतर त्या वेळी कोंढाणा पुन्हा मिळवणे अतिशय कठीण बाब होती परंतु आपल्या आईच्या इच्छेखातर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंडाणा पुन्हा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी योजना आखली.

त्यावेळी तानाजी मालुसरे यांच्या घरी मात्र वेगळीच तयारी सुरू होती. तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे म्हणजेच रायबाचे लग्न होते त्यामुळे सर्वत्र लग्नाची तयारी सुरू होती सगळीकडे जल्लोषाचे वातावरण होते. तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या कुटुंबियांना आपल्या मुलाच्या लग्नासाठी आमंत्रण देण्यासाठी गेले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला मोगलांच्या ताब्यातून परत मिळविण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांच्या खांद्यावर सोपवली.

इतकी मोठी जबाबदारी महाराजांनी आपल्या हाती सोपवली आहे. हे ऐकून तानाजी यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता ते या मोहिमेसाठी तयार झाले त्यावेळी शेलार मामा तानाजी मालुसरे यांना म्हणाले आधी आपण लगीन उरकून घेऊ आणि मग मोहिमेसाठी निघू. परंतु त्यावर लगेचच तानाजी मालुसरे म्हणाले आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे. तानाजी मालुसरे यांच्या वीर मुखातून बाहेर पडलेले हे शब्द इतिहासाच्या पानात सोनेरी अक्षरात लिहिले गेले.

छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन झाल्यानंतर तानाजी यांनी जिजाऊ मांसाहेबांची भेट घेतली त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मोहिमेसाठी निघाले. तो दिवस होता ४ फेब्रुवारी १६७०. तानाजी मालुसरे आपल्या तीनशे सैनिकांसह सिंहगड किल्ला काबीज करण्यासाठी कूच केले. ते आपल्या सैनिकांसह होते कोंढाण्याच्या पायथ्याला पोहोचले. रात्रीची वेळ होती त्यामुळे गड गाफील होता. तानाजी मालुसरे यांच्यासोबत त्यांचे भाऊ व शेलार मामा होते.

त्यादिवशी हवामान चांगलं नव्हतं शिवाय गडाच्या उंचीमुळे गड चढणे अतिशय अवघड होतं. जवळजवळ उभी चढण होती. तानाजी गडाच्या पायथ्याशी आपल्या सैनिकांसह योग्य वेळेची वाट बघत होते. गड सर करण्यासाठी त्यांनी द्रोणागिरीचा कडा निवडला. पाच हजार सैनिक उदयभान नावाच्या सरदाराच्या नेतृत्वाखाली किल्ल्याचे संरक्षण करत होते. तानाजींनी शिवाजी महाराजांच्या पाळीव घोरपडीच्या मदतीने म्हणजेच यशवंतीच्या मदतीने आपल्या सैनिकांसह दोरीच्या साह्याने कड्यावर चढण्यात यशस्वी झाले.

आणि शत्रूवर हल्ला करायला सुरुवात केली त्यांनी पुण्याच्या दिशेने उघडणारा दरवाजावर आपले सैन्य आले असेल या विचाराने त्या दिशेकडील पहारेकर्‍यांवर हल्ला करून त्यांना संपविले. पुढे गडावरील एक एक दरवाजा आपल्या ताब्यात घेत तिथल्या पहारेकर्‍यांना म्हणजेच सैनिकांना लढा देत राहिले. हा हल्ला अचानक झाला होता त्यामुळे गडावरील सैनिकांना याची काहीच कल्पना नव्हती शिवाय उदयभान देखील गाफील होता. सर्वात आधी तानाजींची लढाई सिद्धी हलाल गडाच्या सरनोबताशी झाली.

जोरदार लढाई सुरू झाली आणि यामध्ये तानाजींनी सिद्धी हलाल चा खात्मा केला. लढाई सुरू होती आणि त्यावेळी उदयभान ने तानाजी वर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तानाजींच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या परंतु त्यांना महाराजांसाठी हा किल्ला जिंकायचा होता. महाराजांचे शब्द लक्षात ठेवून ते ही लढाई लढत राहिलेत. या लढाईमध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली तरीही हातावर शेला बांधून ते त्यावर वार झेलत होते. हा गड जिंकण्यासाठी तानाजी यांनी आपल्या रक्ताचे पाणी केले त्यांनी संपूर्ण लढाई जिंकवून दिली.

परंतु या लढाईमध्ये त्यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या शिवाय किल्ल्यावरची कठीण चढाई, मोहीम फत्ते करण्याची जबाबदारी व दडपण तसेच पूर्ण वेळ उदयभानशी लढाई करून तानाजी यांचा जीव थकला होता आणि ते खचले होते व उदयभानच्या झालेल्या जबरदस्त हल्ल्याने ते धारातीर्थी कोसळले. इतकं होऊन सुद्धा त्यांनी आपल्या मराठा सैन्यासाठी वाट मोकळी करून दिली. या लढाईमध्ये तानाजी धारातीर्थी कोसळले परंतु त्यांच्यानंतर त्यांचे मामा शेलार यांनी लढाईची कमान घेतली आणि उदयभान चा वध केला.

आणि शेवटी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला तानाजी मालुसरे यांच्या शौर्यामुळे मराठ्यांचा विजय झाला आणि आपल्या स्वराज्याची शान असलेला कोंढाणा किल्ल्या वर भगवा फडकला. तानाजी मालुसरे यांनी दाखवलेला धाडसी पराक्रमाचे शिवाजी महाराजांनी भरभरून कौतुक केले परंतु तानाजी या मोहिमेत धारातीर्थी पडल्याचे एकूण त्यांना तीव्र दुःख झाले आणि त्यावेळी ते म्हणाले गड आला पण सिंह गेला.

तेव्हापासूनच तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलले आणि ते सिंहगड असे करण्यात आले. तानाजी मालुसरे यांचे सिंहगडावर स्मारक आहे शिवाय रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही देखील त्यांचे स्मारक आहे.

आम्ही दिलेल्या tanaji malusare information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नरवीर तानाजी मालुसरे यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about tanaji malusare in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि tanaji malusare mahiti माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये tanaji malusare village name Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!