जिजामाता माहिती Jijamata Information in Marathi

Jijamata Information in Marathi जिजामाता माहिती, राजमाता जिजाबाई माहिती जिजाऊ माता एक महान व्यक्तिमत्व आणि आदर्श आई ज्यांनी एका वीर पुत्राला जन्म दिला. राजमाता जिजाऊ यांनी आपला मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना एक असं माणूस बनवलं ज्यांच्यामुळे आज आपण स्वातंत्र्य या शब्दाचा खरा अर्थ जाणतो. आज बरेच लोक छत्रपती शिवाजी महाराज यांना “देव” मानतात. अशी थोर आई जिने एका विर पुत्राला जन्म दिला राज्याचा कारभार सांभाळत असताना देखील तिने शिवाजी महाराजांच खूप छान प्रकारे संगोपन केलं आणि आजच्या लेखा मध्ये आपण याच वीर मातेची माहिती jijabai information in marathi जाणून घेणार आहोत.

jijamata information in marathi
jijamata information in marathi

जिजामाता माहिती मराठी – Jijamata Information in Marathi

नाव (Name)जिजाबाई शहाजीराजे भोसले
जन्म (Birthday)१२ जानेवारी १५९८
जन्मस्थान (Birthplace)सिंदखेड, बुलढाणा जिल्ह्यात
वडील (Father Name)लखोजीराजे जाधव
आई (Mother Name)म्हाळसाबाई लखोजीराजे जाधव
पती (Husband Name)शहाजीराजे भोसले
मुले (Children Name)संभाजीराजे, शिवाजीराजे
मृत्यू (Death)१७ जून १६७४
लोकांनी दिलेली पदवीजिजाऊ, जिजाई, मासाहेब

जिजाऊ माता जन्म 

राजमाता जिजाबाई ज्यांना सगळे जिजाऊ, जिजाई, मासाहेब या नावाने देखील ओळखतात. जिजाऊ माता वीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई साहेब होत्या. या थोर माऊलीचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये सिंदखेड, बुलढाणा जिल्ह्यात झाला. जिजाबाईंना जिजाऊ हे नाव त्यांच्या लहानपणा मध्ये पडलं.

जिजाऊ माता अगदी स्वतंत्र विचाराच्या होत्या त्यांना आपल्या देशाबद्दल आणि धर्माबद्दल नेहमीच प्रेम वाटायचं. म्हणूनच त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या वीर छत्रपती शिवाजी महाराजांना देखील त्यांनी लहानपणापासूनच देशप्रेम, धर्मप्रेम, एकनिष्ठचे धडे दिले. जिजाऊमाता यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शन आणि शिक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं.

मराठा साम्राज्य स्थापन करण्यामध्ये जिजाबाई यांचं फार मोठं श्रेय आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महाराजांनी त्यांचं प्रत्येक पाऊल उचललं. जिजाबाई यांची वीर माता अशी ओळख आहे. त्या फक्त एक स्त्री नव्हत्या तर त्या एक शूर आई एक धाडसी पत्नी आणि एक योद्धा देखील होत्या.

वेळ आली तर त्या रणांगणात उतरायला देखील नेहमीच तयार असायच्या. जिजाबाईंचं देशावर अतिशय प्रेम होतं. त्यांच्या नसानसांमध्ये देश प्रेम भरलं होतं. परंतु जिजाबाई यांचे जीवन अतिशय संघर्षमय होतं. त्यांच्या जीवनात त्यांना नेहमीच त्याग, बलिदान अशा गोष्टींना सामोरे जावं लागायचं. एकापाठोपाठ एक संकट त्यांच्यावर येतच राहायचे. दारात उभ असलेल्या प्रत्येक संकटाला त्यांनी शूरपणे लढा दिला.

जिजाऊ माता विवाह

पूर्वीच्या काळात बालविवाह करण्याची प्रथा होती त्याच प्रमाणे जिजा मातांच देखील अगदी बालवयातच विवाह झाला. जिजाऊ माता यांचे वडील लखुजी जाधव हे निजामशाही मधील एक सरदार होते. लखुजी जाधव यांनी त्यांची कन्या जिजाऊ यांचा विवाह भोसले घराण्यातील मालोजी भोसले यांचे चिरंजीव शहाजी भोसले यांच्याशी करून दिला.

इसवी सन १६०९ मध्ये जिजाऊ विवाह बंधनात अडकल्या. शहाजीराजे भोसले हे देखील निजामशाहीतील एक प्रमुख सेनापती होते. त्यासोबतच एक शूर योद्धा देखील होते. त्यांच बहुतांश जीवन निजामशहा, मोगल, आदिलशहा यांची चाकरी करण्यात गेलं. परंतु त्यांच्या वडिलांकडून त्यांना पुणे व सुपे इथली जहागीरदारी मिळाली होती त्यामुळे जिजाऊ माता लग्नानंतर पुण्यामध्येच होत्या.

लग्नानंतर या दांपत्यांना एकूण आठ अपत्य झाली त्यामध्ये सहा मुली आणि दोन मुलं होती. त्यातीलच एक म्हणजे मराठा साम्राज्याचे शासक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी जिजाऊ माता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याची घडी बसवली.

जिजाऊ माता इतिहास – Jijau Mata History in Marathi

जिजाऊ माता ज्यांच्यामुळे इतिहास घडला, ज्यांच्यामुळे स्वराज्याचं तोरण बांधला गेलं. जिजाऊ माता यांचे वडील निजामशहाच्या येथे सरदार असल्यामुळे लहानपणापासूनच जिजाऊ माता यांना राजकारणातल्या घडामोडी आणि राजकारण समजायला लागलं होतं. असं म्हणतात जिजाऊ माता यांना दूरदृष्टी होती. त्यांनी तोरणा किल्ल्याला महत्त्वाचं समजून स्वराज्याची सुरुवात तोरणा किल्ल्या पासुनच केली.

त्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना तलवारबाजी आणि घोडेस्वारीच प्रशिक्षण दिलं होतं. त्यामुळे त्या स्वतः तलवारबाजी आणि घोडे स्वारीत माहीर होत्या. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा वेढा मध्ये अडकले होते आणि तीन महिने उलटून गेले तरी पण ते त्या वेढ्यातून सुटले नव्हते.

तेव्हा जिजामाता काळजीने व्याकुळ झाल्या होत्या आणि स्वतः घोड्यावर स्वार होऊन हातात तलवार घेऊन शिवाजी महाराजांची सुटका करण्यासाठी निघाल्या होत्या, परंतु नेताची पालकर यांनी त्यांना अडवलं आणि ते स्वतः महाराजांना सोडवण्यासाठी पन्हाळा कडे गेले. परंतु या सगळ्या घटनांमधून जिजामाता यांच महाराजांवर असलेलं प्रेम, माया दिसून येते.

कोंढाणा किल्ला म्हणजेच सिंहगड हस्तगत करण्याच्या वेळी जेव्हा तानाजी मालसुरे लढाई मध्ये धारातीर्थ झाले, तेव्हा त्यांच्या मुलाचं लग्न स्वतः जिजाबाई यांनी स्वतःच्या हस्ते लावून दिलं. यातून जीजाबाई यांना फक्त आपल्या घराबद्दल नव्हे तर त्यांना आपल्या स्वराज्यातील प्रत्येक जनतेची आणि प्रत्येक मावळ्यांची काळजी होती हे दिसून येतं.

जिजाऊ माता कार्य

महाराष्ट्राच्या इतिहासातील जिजामाता यांचे स्थान खूप उच्च आहे. त्यांनी मराठा साम्राज्य रक्षक वीर शिवाजी यांना जन्म दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा संगोपण जिजाबाई यांनीच केलं त्यामुळे शिवाजी महाराजांनी मध्ये जे काही गुण, कौशल्य आहे ते सगळ जिजाबाईंच्या शिक्षणामुळे. जिजाबाईंनी महाराजांना राजनीती शिकवली त्यांना लहानपणापासून महाभारत, रामायण यांच्या कथा सांगून त्यांच्यामध्ये ध्येय, धाडस, देशप्रेम, धर्मप्रेम निर्माण केलं.

ज्यामुळे शिवाजी महाराज एक शूर, वीर, धाडसी, बलवान, शक्तिशाली योद्धा बनले. त्यासोबतच महाराजांना जेष्ठ लोकांचा, स्त्रियांचा आदर करायला शिकवलं परकी स्त्री ही बहिणी समान असावी असं ब्रीदवाक्य जिजामातांनी महाराजांच्या मनात बसवलं. त्यासोबतच प्रत्येक जनावर, पशुपक्षी आपली माती या सगळ्या गोष्टींचा आदर करायला शिकवलं.

त्यासोबतच जनतेचं रक्षण कसं करायचं आणि जे नियम मोडतील किंवा जे राज्यद्रोही ठरतील त्यांना कडक शिक्षा द्यायची. इतकच नव्हे तर त्यांनी महाराजांना तलवारबाजी, घोडेस्वारी, युद्धकौशल्य या सगळ्यांच प्रशिक्षण दिलं. त्या स्वतः एक सशक्त प्रशासक आणि शक्तिशाली योद्धा असल्यामुळे महाराजांमध्ये देखील त्यांचेच गुण आहेत.

महाराजांमध्ये स्वराज्य स्थापन करण्याची ओढ जिजामाता यांच्यामुळेच निर्माण झाली. जिजामाता एक आदर्श माता होत्या ज्यांनी आपल्या वीर पुत्राला नेहमीच चांगला मार्ग दाखवला. जिजामाता या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणास्त्रोत होत्या. जिजामाता यांच्या मार्गदर्शना खाली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार केला एक स्वतंत्र हिंदू राज्य निर्माण केल.

जिजाऊ माता इतर माहिती

जिजाऊ राजमाता म्हणून देखील ओळखल्या जातात. महाराष्ट्रामध्ये जेव्हा २००५ मध्ये कुपोषितांचं प्रमाण वाढू लागलं होतं तेव्हा २००५ मध्ये राजमाता जिजाऊ यांच्या नावा खाली राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण असा प्रकल्प राबवण्यात आला होता. पहिल्यांदा हा प्रकल्प २००५ मध्ये अमलात आल आणि त्यानंतर २०११ मध्ये.

या प्रकल्पाचा मुख्य हेतू महाराष्ट्रातील कुपोषित समस्या कमी करणं होतं त्याशिवाय गर्भ महिलांवर त्यांच्या गर्भधारणेपासून च्या पहिल्या हजार दिवसांच महत्त्व पटवून देण्याचं काम या योजनेद्वारे केले जात जेणेकरून कोणतही कुपोषित बाळ जन्माला येऊ नये.

या प्रकल्पाला राजमाता जिजाऊ असं नाव देण्याचं कारण म्हणजे राजमाता या एक वीर पुत्राच्या आई होत्या परंतु त्यांची शिवाजी महाराजांवर असलेली माया त्यांनी ज्या प्रकारे शिवाजी महाराजांचा संगोपन केलं तसंच संगोपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईने आपल्या बाळाचं करावं म्हणून या प्रकल्पाला राजमाता जिजाऊ यांचे नाव दिले गेले.

जिजाऊ माता मृत्यू

आईच्या खांद्यावर खेळणारा शिवबा बघता बघता कधी मोठा झाला हे कळलेच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं राज्य कारभारातील प्रत्येक गोष्ट त्यांनी जिजाऊ माता यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा जिजाऊमाता यांचे मत घेऊनच त्यांनी रात्री राज्यकारभारातील प्रत्येक निर्णय घेतला.

महाराजांनी बहुतांश प्रदेशांवर ताबा मिळवायला सुरुवात केली होती. म्हणूनच आईसाहेबांना असं वाटलं की महाराजांचं आता राज्याभिषेक होणे गरजेचे आहे राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली महाराजांचा राज्याभिषेक सुरळीतपणे पार देखील पडला पण कोणालाच येणार्‍या संकटाची चाहूल नव्हती. राज्याभिषेक झाल्यावर अकरा दिवसांनी जिजाऊ माता यांचे निधन झालं.

छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्त्रोत असलेल्या त्यांच्या मातोश्री त्यांच्यापासून दुरावल्या. १७ जून १६७४ मध्ये रोजी राजमाता जिजाबाई एक आदर्श पत्नी आदर्श आई होत्या त्यांचं निधन झालं आणि रायगडावर दुःखाचा डोंगर कोसळला.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, राजमाता जिजाबाई उर्फ जिजामाता यांची प्रतिमा कशी होती. jijamata information in marathi त्यांचा जन्म, विवाह तसेच त्यांनी केलेली कार्ये काय आहेत? त्यांचा इतिहास काय आहे व कसा आहे? अशीच संपूर्ण माहिती आम्ही लेखाद्वारे थोडक्यात पूर्ण केली आहे.

jijamata information in marathi speech हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच rajmata jijau information in marathi language हा लेख कसा वाटला व अजून काही राजमाता जिजाबाई उर्फ जिजामाता यांच्या विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या jijau information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही  त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!