Tandoori Roti Recipe in Marathi तंदूरी रोटी रेसिपी मराठी आज आपण या लेखामध्ये तंदुरी रोटी कशी बनवायची ते पाहणारा आहोत. तंदुरी रोटी हि एक उत्तर भारतीय डिश आहे जी भारतामध्ये सर्व ठिकाणी बनवली जाते आणि हि रोटी वरून थोडी कडक आणि आतून मऊ असते. तंदुरी रोटी हि आपण कोणत्याही भाजी सोबत किंवा मग कोणत्याही पंजाबी खाद्य पदार्थांच्या सोबत खावू शकतो. जर आपण घरामध्ये जर काही मसालेदार भाजी बनवली असेल तर म्हणजेच पनीर टिक्का, पालक पनीर, काजू करी, व्हेज कुर्मा या सारख्या भाज्या बनवल्या कि आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी तंदुरी रोटी बनवू शकतो.
आणि एक उत्तम पर्याय आहे. तंदुरी रोटी हा पदार्थ लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना खाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तंदुरी रोटी रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २५ ते ३० मिनिटामध्ये बनते आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण रोटी रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
तंदूरी रोटी रेसिपी मराठी – Tandoori Roti Recipe in Marathi
तंदुरी रोटी बनवताना मैदा, दही आणि काही इतर साहित्य घातले जाते आणि ते पीठ आपण चपातीची कणिक मळतो त्यापेक्षा थोडी सैल कणिक मळली जाते आणि त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून त्याच्या हाताने थापून रोट्या बनवल्या जातात आणि त्या तंदुरी मध्ये भाजल्या जातात.
- मैदा : मैदा हा तंदुरी रोटी बनवण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे मैद्यामध्ये आपण इतर साहित्य घालून त्याचा कानिकीचा गोळा बनवून मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्याची रोटी बनवली जाते.
- दही : तंदुरी रोटी मध्ये दही वापरले तर रोटी छान बनते आणि वातड होत नाही.
- बेकिंग सोडा : तंदुरी रोटी मध्ये बेकिंग सोडा घातल्यामुळे रोटी चांगली भाजली जाते.
- तूप : तंदुरी रोटी मध्ये थोडे तूप घातल्यामुळे रोटीला चांगली टेस्ट येते.
तंदुरी रोटी रेसिपी – tandoori roti in marathi
तंदुरी रोटी हि एक उत्तर भारतीय डिश आहे जी भारतामध्ये बहुतेक ठिकाणी बनवली जाते आणि विशेषता हि रोटी पंजाबी डिश सोबत खूप छान लागते. तंदुरी रोटी रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २५ ते ३० मिनिटामध्ये बनते आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण रोटी रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. चला तर आता आपण रोटी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तंदुरी रोटी बनवण्यासाठी जे साहित्य लागते त्यामधील काही साहित्य घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते. परंतु हे साहित्य आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर मग आता आपण तंदुरी रोटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात.
- २ वाटी मैदा.
- अर्धी वाटी दही.
- २ चमचे तूप.
- अर्धा चमचा बेकिंग पावडर.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- ३ चमचे तीळ
तंदुरी रोटी हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून तंदुरी रोटी कशी बनवायची ते पाहूयात.
- रोटी बनवताना सर्वप्रथम मैदा चाळून घ्या आणि मग ते एका मोठ्या मिक्सिंग बाऊल मध्ये घाला.
- आता दही थोडे फेटा आणि मग ते दही मैद्यामध्ये घाला आणि दही देखील पिठाला चांगले लावून घ्या.
- आता यामध्ये तूप, चवीनुसार मीठ आणि साखर आणि बेकिंग सोडा घाला आणि हे मिश्रण चांगले मिक्स करा.
- मग यामध्ये लागेल तेवढे पाणी घाला आणि याची घट्ट कणिक मळून घ्या आणि हे झाकण लावून कमीत कमी एक तास किंवा जास्ती जास्त २ ते ३ तास भिजवून ठेवावी.
- २ तासांनी कानीक चांगली भिजली कि त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवावे आणि ते हाताने थापून त्यावर थोडे तीळ घालावे आणि रोटी तंदूर मध्ये भाजून घ्यावी.
- अश्या प्रकारे सर्व गोळ्यांच्या तंदुरी रोट्या भाजून घ्याव्यात.
- तुमच्या तंदुरी रोट्या सर्व्ह करण्यासाठी तयार झाल्या.
तंदुरी रोटी कश्या सोबत खातात – serving suggestions
- तंदूर रोटी आपण पालक पनीर, पनीर टिक्का, मलाई कोफ्ता, काजू मसाला, व्हेज कोल्हापूर यासारख्या भाज्यांच्या सोबत खावू शकतो किंवा मग कोणत्याही भाजी सोबत खावू शकतो.
टिप्स (Tips)
- कणिक मळण्यासाठी आपण पाण्याऐवजी दुध देखील वापरू शकतो.
- कणिक कमीत कमी एक तास किंवा जास्ती जास्त २ ते ३ तास भिजवून ठेवायला लागते.
- तंदुरी रोटी तंदूर मध्ये भाजली तर त्याला चांगली टेस्ट येते.
आम्ही दिलेल्या tandoori roti recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर तंदूरी रोटी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tandoori roti recipe in marathi madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि tandoori roti recipe on tawa in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये tandoori roti recipe in marathi video Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट