कोरीगड किल्ला माहिती मराठी Korigad Fort Information In Marathi

Korigad Fort Information In Marathi कोरीगड (कोराईगड) हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील लोणावळा डोंगररांगेवर हा किल्ला वसलेला आहे. कोरीगड या किल्ल्याला कुमवारीगड या नावाने देखील ओळखले जाते आणि हा किल्ला लोणावळा गावापासून २० किलो मीटर अंतरावर आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारश्याचे वैभव दर्शवणारा एक निसर्गरम्य किल्ला आहे आणि या किल्ल्यावरून आपल्याला तोरणा, मोरगड, प्रबळगड, तिकोना आणि अर्नाळा हा परिसर दिसतो. असे म्हणतात हा किल्ला मुळशी धरणाच्या पूर्वेकडील भागामध्ये एक मावळ गाव आहे आणि तेथे कोळ्यांची एक कोरी म्हणून पोटजात आहे.

हा किल्ला त्या बागमध्ये वसलेला आहे म्हणून या किल्ल्याला कोरी लोकांचा कोरीगड असे म्हणतात त्याचप्रमाणे या गडाच्या पायथ्याला पेठ शहापूर गाव आहे म्हणून या किल्ल्याला शहागड असे देखील म्हंटले जाते.

korigad fort information in marathi
korigad fort information in marathi

कोरीगड किल्ला माहिती मराठी – Korigad Fort Information In Marathi

किल्ल्याचे नावकोरीगड, कोराईगड, कुमवारीगड आणि शहागड
ठिकाणहा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील लोणावळा डोंगररांगेवर वसलेला आहे
प्रकारगिरिदुर्ग
स्थापना१५ व्या शतकामध्ये
समुद्र सपाटीपासूनची उंची३०५० फुट
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणेगुहा, कोराई देवीचे मंदिर, प्राचीन तोफ, लक्ष्मी मंदिर, गणेश टाके, हनुमानाचे मंदिर, ध्वजस्तंभ आणि गणेश दरवाजा.

कोरीगड हा किल्ला १५ व्या शतकामध्ये या किल्ल्याची पुनर्बांधणी करण्यात आली आणि हा किल्ला जमिनीपासून ९२९ मीटर उंच बांधली आहे आणि हा किल्ला समुद्रसपाटी पासून ३०५० फुट उंच आहे. मुख्य किल्ल्याचे शत्रूच्या आक्रमणा पासून रक्षण करण्यासाठी किल्ल्याच्या सभोवताली भक्कम अशी तटबंदीच्या भिंती बांधल्या आहेत त्याचबरोबर ह्या किल्ल्याला पश्चिमेकडे बुरुजांची चिलखती मजबूत तटबंदी आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला लोणावळा डोंगररांगेवर वसलेला आहे.

या किल्ल्यावर चढण्यासाठी ६०० पायऱ्या आहेत तसे या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत आणि त्यामधील मुख्य दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा. या किल्ल्याची विशेषता म्हणजे या किल्ल्याला वक्र बुरुज गोलाकार भिंतीला बांधले आहेत आणि या किल्ल्याच्या मजबूत बांधकामासाठी दगड आणि चून खडीचा वापर केला आहे. या किल्ल्यावर आपल्याला हिंदू शैलीतील काही मंदिरे पाहायला मिळतात, गणेश टाके, उत्तर भागातील लहान आकाराच्या गुहा, कोराई देवीचे मंदिर, प्रचीन तोफा, लक्ष्मी मंदिर यासारखी अनेक ठिकाणे आपल्यला किल्ल्यावर पाहायला मिळतात.

कोरीगड किल्ल्याचा इतिहास – Korigad Fort History in Marathi

इ. स. १६५७ च्या काळामध्ये कोरीगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी तिकोना, तुंग, विसापूर, लोहगड, तोरणा आणि इतर अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेतले. ज्या वेळी पुरंदरचा तह झाला त्यावेळी शिवाजी महाराजांना एकूण २३ किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले आणि त्यांच्याकडे १२ किल्ले ठेवलेले होते आणि त्या १२ किल्ल्यामध्ये कोरीगड किल्ला देखील समाविष्ठ होता आणि त्यावरूनच या किल्ल्याचे महत्व महाराजांच्या काळामध्ये किती होते ते समजते.

११ मार्च १८१८ मध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्यावर हल्ला केला आणि तोफांचा वापर करून दारूगोळ्याचे कोठार उद्वस्त करून टाकले. ब्रिटीश आणि मराठा सैनिकांच्या मधील हा लढा सलग तीन दिवस चालू होता पण हा किल्ला १४ मार्च १८१८ मध्ये ब्रीटीशांच्या ताब्यात गेला.

कोरीगड या किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे 

 • कोराई देवीचे मंदिर :

कोरीगड या किल्ल्यावर आपल्यला कोराई देवीचे मंदिर पाहायला मिळते आणि जर आपल्यला या किल्ल्यावर जर राहायचे असेल तर या मंदिरा मध्ये २५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.

 • गणेश मंदिर आणि गुहा :

या किल्ला चढताना आपल्यला एक छोटेसे गणेश मंदिर आणि त्या मंदिरात छोटीसी गणपतीची मूर्ती आहे आणि आणि मंदिराच्या बाजूला एक छोटी गुहा पाहायला मिळतात. त्या गुहेमध्ये पुढच्या खोलीमध्ये पाणी आहे आणि आतील खोली कोरडी आणि रिकामी आहे.

 • महादरवाजा :

महादरवाजा म्हणजे किल्ल्याच मुख्य दरवाजा या दरवाज्याला गणेश दरवाजा या नावाने ओळखले जाते आणि आपल्यला किल्ल्यामध्ये याच दरवाज्यातून प्रवेश करावा लागतो.

 • हनुमानाचे मंदिर :

कोरीगड या किल्ल्याच्या पठारावर आपल्याला हनुमानाचे मंदिर देखील पाहायला मिळते.

 • ध्वजस्तंभ :

कोरीगड या किल्ल्याच्या पठारावर गेल्यानंतर आपल्यला एका बुरुजावर असलेला ध्वजस्तंभ पाहायला मिळतो या किल्ल्यावरील इतर वास्तूंचे फक्त आपल्याला अवशेष पाहायला मिळतात.

 • गणेश टाके :

कोरीगड या किल्ल्यावर पूर्वीच्या काळी बांधलेले टाके आहेत ज्याला गणेश टाके म्हणतात आणि यामधील पाणी पूर्वीच्या काळामध्ये पिण्यासाठी वापरले जायचे.

 • तोफ :

प्राचीन काळातील ठेवलेली एक तोफ आपल्यला किल्ल्यावर पाहायला मिळते.

कोरीगड किल्ल्याजवळील इतर पाहण्यासारखी ठिकाणे

 • शिरोटा तलाव :

शिरोटा तलाव हा लोणावळा खंडाळा या महामार्गावर आहे जे राजमाची किल्ल्याजवळ आहे. जर आपण कोरीगड या किल्ल्याला भेट देत असाल तर शिरोटा तलाव देखील पाहू शकता.

 • सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम :

या किल्ल्याच्या मार्गावर आपल्यला सुनील कांडलूर यांचे आंतरराष्ट्रीय आणि बॉलीवूड कलाकारांचे मेणाच्या पुतळ्यांचे सर्वोत्कृष्ट संग्रह आपल्याला सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम मध्ये पाहायला मिळतो.

 • साकुर पठार :

खंडाळा भागामध्ये साकुर पठार हे जमिनीपासून १००० फुट उंचीवर आहे आणि या पाठराहून आपल्यला त्या भागातील संपूर्ण प्रदेश पाहायला मिळतो.

 • भाजा गुहा :

भाजा गुहा हि एक प्राचीन भारतीय वास्तूकलेचे उदाहरण आहे जे आपल्यला लोणावळा भागामध्ये पाहायला मिळते.

कोरीगड किल्ला फोटो:

korigad fort information in marathi
korigad fort information in marathi

कोरीगड किल्ल्यावर कसे जायचे ?

 • रेल्वे मार्गे : ह्या किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला रेल्वेने जायचे असल्यास कोरीगड पासून जवळचे रेल्वे स्थानक लोणावळा येथे आहे आणि पुणे आणि मुंबई येथून लोणावळा रेल्वे स्थानकाला काही रेल्वे आहेत आणि लोणावळा मधून तुम्हाला बस किवा टॅक्सीने पेठ शहापूर पर्यंत जावे लागेल. पेठ शहापूर हे किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे गाव आहे. शहापूर गावातून आपल्यला किल्ल्यावर चालत जावे लागते.
 • विमानाने : कोरीगड हा किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला जर विमानाने यायचे असेल तर या किल्ल्याचे सर्वात जवळचे विमानतळ हे पुणे येथे आहे जे किल्ल्यापासून ९५ किलो मीटर अंतरावर आहे. पुण्यातून आपल्यला लोणावळ्याला बसने, रेल्वेने किवा टॅक्सीने जाता येते आणि तेथून पुढे पेठ शहापूरला जाण्यासाठी देखील आपल्यला टॅक्सी किवा स्थानिक बस पकडावी लागते.
 • रस्ता मार्गे : लोणावळा ते कोरीगड यामधील अंतर २० किलो मीटर आहे जर तुम्हाला तेथील निसर्गाचा अनाद घेत जायचे असेल तर तुम्ही स्वताची बाईक किवा कारणे देखील जावू शकता तसेच लोणावळा शहरातून आपल्याला पेठ शहापूरला जाण्यासाठी बस देखील मिळू शकते.

टीप

 • कोरीगड हा किल्ला चढण्यासाठी १ ते २ तास लागतात आणि पाहण्यासाठी १ तास लागतो.
 • या किल्ल्यावर जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे पाणी आणि खाण्यासाठी काही स्नॅक्स आपल्यासोबत असले तर ते चांगलेच.
 • कोरीगड हा किल्ला पाहण्यासाठी कोणताही प्रवेश शुल्क घेतला जात नाही.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, कोरीगड किल्ला korigad fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. korigad fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about korigad fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही कोरीगड किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या korigad chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही korigad fort trek त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!