व्हेज कटलेट रेसिपी मराठी Veg Cutlet Recipe in Marathi

Veg Cutlet Recipe in Marathi व्हेज कटलेट रेसिपी मराठी आपण रोज काही ना काही वेगळे आणि स्वादिष्ट पदार्थ बनवू खान्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये काही नाश्त्याच्या रेसिपी असतात काही जेवणामध्ये खाल्ल्या जाणाऱ्या रेसिपी असतात आणि काही स्नॅक्स असतात आणि आज आपण स्नॅक्स किंवा सकाळचा नाश्ता म्हणून खाल्ला जाणारा व्हेज कटलेट हा पदार्थ कसा बनवायचा ते पाहणार आहोत. व्हेज कटलेट हि रेसिपी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बनवली जाते आणि ती प्रत्येक ठिकाणी काही फरकाने बनवली जाते. व्हेज कटलेट हि रेसिपी लहान मुलांना आवडू शकते.

तसेच हि रेसिपी कुटुंबामध्ये सर्वांना आवडू शकते आणि या रेसिपीची विशेषता म्हणजे या रेसिपीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरलेल्या असतात आणि यामधील प्रत्येक भाजीमध्ये काही ना काही पौष्टिक गुणधर्म असतोच. व्हेज कटलेट ही रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण व्हेज कटलेट रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

Veg Cutlet Recipe in Marathi
Veg Cutlet Recipe in Marathi

व्हेज कटलेट रेसिपी मराठी – Veg Cutlet Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पद्धतखूप सोपी
वाढणी५ ते ६ व्यक्ती

व्हेज कटलेट रेसिपी – How to make homemade veg cutlet

व्हेज कटलेट हि रेसिपी झटपट म्हणजेच २५ ते ३० मिनिटामध्ये बनणारी रेसिपी आहे जी आपण गडबडीच्या वेळी नाश्ता किंवा स्नॅक्ससाठी बनवू खावू शकतो. लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडू शकणारा आणि सर्वांच्यासाठी एक उत्तम पदार्थ आहे आणि हा पदार्थ आपण घरामध्ये अगदी सहजपणे बनवून शकतो कारण हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनू शकतो. चला तर पाहूयात व्हेज कटलेट कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पद्धतखूप सोपी
वाढणी५ ते ६ व्यक्ती

व्हेज कटलेट रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make veg cutlet recipe

व्हेज कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आधीपासून घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असू शकते आणि जर ते आपल्या घरामध्ये उपलब्ध नसेल तर आपण ते बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. व्हेज कटलेट बनवण्यासाठी बटाटा, गाजर, मटार, रवा आणि तेल हे मुख्य साहित्य लागते. चला तर आता आपण वेज कटलेट रेसिपी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • ३ ते ४ बटाटे
  • १/२ वाटी मटार.
  • १/२ वाटी खिसलेले गाजर
  • ६ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या किंवा बारीक पेस्ट केलेल्या ).
  • २ चमचे आलं लसून पेस्ट.
  • कांदा ( बारीक चिरलेला ).
  • १/४ चमच्या हिंग.
  • १ चमचा गरम मसाला.
  • हळद ( आवश्यकतेनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • १/२ मोठा चमचा कोथिंबीर ( चिरलेली ).
  • १ मोठा चमचा तेल ( फोडणीसाठी ).
  • २ वाटी रवा ( कटलेट कोट करण्यासाठी ).
  • तेल ( तळण्यासाठी ).

व्हेज कटलेट बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make veg cutlet recipe

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून व्हेज कटलेट रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

  • सर्व प्रथम बटाटे घ्या आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • मग कुकरमध्ये पाणी घाला आणि ते बटाटे त्यामध्ये टाकून कुकरचे झाकण घालून त्याला ३ ते ४ शिट्या द्या त्यामुळे बटाटे चांगले शिजण्यास मदत होईल. ( टीप : आपण बटाटे भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये बटाटे टाकून त्यावर झाकण घालून देखील शिजवू शकतो ).
  • कुकर गार झाल्यानंतर त्यामधील बटाटे काढून घेवून त्याची साल काढा आणि ते बारीक मॅश करून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा घाला.
  • आणि कांदा थोडा वेळ भाजला किं त्यामध्ये गाजर, मटार, हिरवी मिरची, आलं लसून पेस्ट घाला आणि ते चांगले एकत्र करा आणि १ ते २ मिनिटे भाजा.
  • त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला, हिंग, हळद घाला ते काही वेळासाठी चांगले एकत्र करा आणि मग त्यामध्ये शिजवलेला बटाटा, मीठ ( चवीनुसार ) आणि साखर ( चवीनुसार ) घाला ते चांगले मिक्स करा.
  • आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि ते मिक्स करून गॅस लगेच बंद करा. मग हे मिश्रण थोडे गार होऊ द्या.
  • ते मिश्रण गार झाले कि त्याचे मध्यम आकाराचे चपटे गोळे बनवा आणि ते रव्यामध्ये मध्ये चांगेल कोट करून घ्या.
  • कढईमध्ये आता तेल घाला आणि ते मध्य आचेवर गरम करा आणि त्या तेलामध्ये जितके कटलेट मावतील तितके कटलेट घाला आणि ते लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या आणि भाजल्यानंतर ते टिशू पेपरवर काढा ज्यामुळे जादाचे तेल त्या पेपरमध्ये शोषले जाई.
  • अश्या प्रकारे सर्व व्हेज कटलेट रव्यामध्ये मध्ये बुडवून चांगले कोट करा आणि तेलामध्ये लालसर रंगावर तळून घ्या.
  • तुमचे क्रिस्पी आणि टेस्टी व्हेज कटलेट सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.

व्हेज कटलेट कश्यासोबत खावे – serving suggestions 

व्हेज कटलेट हि रेसिपी आपण तशीच खावू शकतो तसेच आपण हि रेसिपी घरी बनवलेल्या खोबऱ्याच्या चटणी सोबत, चिंच गुळ चटणी सोबत किंवा मग टोमॅटो केचअप किंवा हिरव्या चटणी सोबत खावू शकतो.

टिप्स (Tips)

  • व्हेज कटलेटमध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता.
  • जर तुम्ही व्हेज कटलेट सकाळच्या नाश्त्यासाठी बनवणार असाल तर रात्रीच कुकरमध्ये बटाटे शिजवून फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे तुमचा सकाळी बटाटे शिजवण्यासाठी लागणारा वेळ वाचतो आणि आपण रेसिपी पटकन बनवू शकतो.
  • कटलेटला ब्रेड क्रम्ब्सने देखील कोट केले तरी चालते.

आम्ही दिलेल्या veg cutlet recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर व्हेज कटलेट रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mix veg cutlet recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि veg cutlet in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये veg cutlet by madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!