warli painting information in marathi वारली चित्रकला माहिती, भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या कला लोकांच्याकडून प्रदर्शित केल्या जाटतात आणि वारली चित्रकला देखील एक प्रसिध्द कला आहे जी खूप जुनी कला आहे. वारली चित्रकला हि सर्वात जुन्या कलेचा प्रकार आहे आणि हि कला आदिवासी जमातीतील लोकांनी तयार केली आहे असे म्हटले जाते, म्हणजेच पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, तलासरी, जव्हार, डहाणू आणि मोखाड या शहरांच्यामध्ये राहणार्या अधिवासी समाजाने हि तयार केली.
हि वारली चित्रकला सर्वात प्राचीन चित्रकला जरी असली तरी ती सध्या देखील खूप लोकप्रिय आहे आणि ह्या कलेचा उगम हा महाराष्ट्र राज्यातून जरी झाला असला तरी हि कला संपूर्ण देशामध्ये परिचयाची आहे. वारली चित्रकलेचा शोध हा सत्तरच्या दशकात सुरुवातीला झाला असला तरी या कलाप्रकाराची कोणतीही नोंद नाही. चला तर खाली आपण वारली चित्रकलेविषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती घेवूया.
वारली चित्रकला माहिती – Warli Painting Information in Marathi
वारली चित्रकला म्हणजे काय ?
वारली कला हि एक महाराष्ट्राची लोककला आहे आणि हि चित्रकला म्हणजे हा एक भौमितिक आकारांचा संच आहे. ज्यामध्ये त्रिकोण, वर्तुळ आणि चौरस हे भौमितिक आकार असतात.
वारली चित्रकलेचा इतिहास – warli painting history in marathi
वारली चित्रकला हि सर्वात जुनी चित्रकला आहे म्हणजेच वारली चित्रकलेचा उगम हा इसवी सनपूर्व ३००० च्या आसपास सापडतो परंतु आदिवासी कला शैली हि १० व्या शतकातील असली तरी १९७० पर्यंत वारली चित्रांचा प्रकार हा कोणाला माहित नव्हता.
बऱ्याचदा या चित्र प्रकारामध्ये निसर्गाचे अनेक भाग केंद्रित केलेले असतात. त्याचबरोबर वारली कलाकारांच्याबद्दल एक अशी आकर्षक वस्तुस्थिती आहे कि त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतीसाठी मातीच्या झोपड्यांचा पार्श्वभूमी म्हणून वापर केला.
वारली चित्रातील प्रकार किंवा घटक
वारली चित्रकला हि वेगवेगळ्या स्वरुपात, वेगवेगळ्या प्रकारामध्ये आणि अनेक वेगवेगळ्या घटनांच्यावर किंवा उपक्रमांच्यावर चित्रित केली जाते. चला तर खाली आपण वारली चित्रकलेतील घटक किंवा श्रेणी कोणकोणत्या असतात ते पाहूया.
- लोक : वारली चित्रामध्ये अनेक वेगवेगळ्या घटकांचे प्रदर्शन केले जाते आणि तसेच लोक हे वारली चित्रातील एक मुख्य घटक आहे आणि या चित्रामध्ये लोकांची चित्रे काढली जातात आणि या चित्राद्वारे चांगल्या आणि वाईट लोकांची कृत्ये प्रदर्शित केली जातात.
- देव : काही वारली चीत्राकलेमध्ये देवांची चित्रे देखील प्रदर्शित्त केलेली असतात आणि यामध्ये वारली जमातीच्या जुन्या लोककला असतात त्या संबधित चित्रकला असतात म्हणजेच यामध्ये आदिवासी जमातीचा इतिहास दाखवला जातो.
- अधिकार आणि विधी : वारली चीत्रकलेमध्ये काही चित्रांच्यामध्ये वेगवेगळ्या विधींचे रेखाटन केलेले असते जसे कि लग्नाचा विधी. यामध्ये उत्सव, आनंद आणि दैनंदिन क्रियाकलाप दर्शविणारी चित्रे काढली जाटतात तसेच यामध्ये अधिकार आणि हक्क दर्शविणारी देखील अनेक चित्रे असतात.
- प्राणी : प्राणी हा देखील वारली चित्रकलेतील महत्वाचा घटक आहे आणि या चित्रामध्ये सभोवतालचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दर्शवली जातात आणि वाघ हा प्राणी या चित्रकलेतील महत्वाचा प्राणी आहे कारण वाघ हा प्राणी या चित्रकलेमध्ये अनेकदा रेखाटला जातो.
वारली चित्राचे महत्व – warli painting in marathi information
- वारली चित्रकला हि नैसर्गिक जीवनाच्या खूप जवळची कला आहे कारण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि अनेक उत्सवांचा आणि विधींचा समावेश असतो.
- पूर्वी हि कला फक्त मातीच्या भिंतींच्यावर काढली जात होती परंतु सध्या ती इतकी लोकप्रिय झाली आहे कि ती पेपर वर काढली जाते आणि त्याची फ्रेम बनवून ती बाजारामध्ये विकली जाते.
- वारली चित्रकलेमध्ये आदिवासींनी जगलेले जीवन रेखाटले आहे आणि या चित्रांच्या रेखाटनामुळे लोकांना पूर्वी आदिवासी जमातीचे जीवन कसे होते याचा अंदाज लावत येतो.
- पूर्वी स्त्रिया त्यांच्या लग्नाच्यावेळी वारली चित्राचे रेखाटन करायच्या आणि आपला आनंद व्यक्त करत होत्या.
वारली चित्रकलेविषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- आपल्याला वारली चित्रा पाहिल्यानंतर गुंतागुंतीचे भौमितिक वेगवेगळी चित्रे पहायला मिळतात आणि यामध्ये लग्नाचे विधी, शिकारीची दृश्ये, प्राचीन जीवनशैलीची दृष्ये अश्या प्रकारची अनेक वेगवेगळे उपक्रम हे या चित्राच्या प्रकारामार्फत प्रदर्शित केलेली असतात. वारली हि चित्रकला महाराष्ट्रातील एक चित्रकला असून या चित्रकलेशी महाराष्ट्रातील लोकांच्यासाठी अनेक भावना जोडलेल्या आहेत.
- वारली चित्रामध्ये वापरलेले भौमितिक आकार म्हणजे चौरस, त्रिकोण, वर्तुळ, मंडळे, ठिपके आणि डॅश इत्यादी आकार असतात.
- वारली चित्रकला हि द्विमितीय अही म्हणजेच ज्याचा कोणताही दृष्टीकोन किंवा प्रमाण नाही अशी चित्रकला आहे.
- पूर्वी वारली चित्रकला हि मातीच्या भिंतींच्यावर तांदळाच्या पिठामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट बनवून आणि बांबूच्या काड्या घेऊन त्याने भिंतीवर चित्रे बनवली जात होती.
- वारली चित्रे हि पारंपारिक पणे घरांच्या भिंतीवर पांढऱ्या रंगाच्या पेस्ट, डिंक आणि पाण्याने बनवलेली होती.
- या चित्रामध्ये त्रिकोण, सूर्य आणि चंद्रा हे वृक्ष आणि पर्वत आहेत आणि या चित्रामधील चौरस म्हणजे मंदिरे आहेत.
- पूर्वीच्या वारली चित्रप्रकारामध्ये तांबडा आणि पांढरा रंग वापरला जात होता.
- वारली चित्रकला हि पारंपारिकपणे एक सामुहिक क्रियाकलाप आहे ज्यामध्ये अनेक कलाकार हे एकत्र काम करत असतात.
- वारली चित्रकले मध्ये जास्तीत जास्त त्रिकोणी आकाराचा भौमितिक आकार वापरला जातो आणि हि चित्रकला खूप सोपी आणि साधी चित्रकला असून हि रेखिय देखील आहे.
- वारली चित्रकलेचा सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे त्यामध्ये पौराणिक पात्रे किंवा देवतांची प्रतिमा नसून सामाजिक जीवनाचे चित्रण असते.
- वारली हि चित्रकला रेखाटत असताना या चीत्राकालेमध्ये अजूनही पारंपारिक संकल्पनांचे पालन केले जाते.
- वारली कला हा लोककलेचा एक अनोखा प्रकार आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये देखील आढळतो आणि वारली रचनेची उत्पत्ती लाकडाच्या कोरीव कामातून झाली असे म्हटले जाते.
- वारली चित्रकला बनवण्यासाठी बहुतेकदा तीन रंग वापरले जातात ते म्हणजे लाल, पांढरा आणि काळा.
- वारली चित्रप्रकार हा वेगवेगळ्या गोष्टींचे आणि घटकांचे प्रतिनिधित्व करते तसेच हे तारपा नृत्य आणि प्रतिकारात्मक प्रतिनिधित्व करते कारण तारपा हा नृत्य प्रकार कलाकृतीमधील केंद्रबिंदू आहे.
आम्ही दिलेल्या warli painting information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर वारली चित्रकला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या warli painting history in marathi या warli painting meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि warli painting in marathi information माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये warli painting information in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट