washim district information in marathi वाशिम जिल्हा माहिती, आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र राज्यातील वाशीम या जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. वाशीम हा एक महाराष्ट्रातील जिल्हा आहे ज्याच्या पूर्वेला यवतमाळ, पश्चिमेस बुलढाणा, दक्षिणेस हिंगोली आणि उत्तरेस अकोला ह्या जिल्ह्यांनी वेढले आहे आणि ह्या जिल्ह्याला ऐतिहासिक ओळख देखील आहे म्हणजेच या जिल्ह्यावर सातवाहनांच्या काळामध्ये त्यांची सत्ता होती आणि म्हणून याला बच्छोम किंवा वत्सगुल्म या नावाने देखील ओळखले जात होते.
वाशीम जिल्ह्याचा एकूण आकार किंवा क्षेत्रफळ हे ५१५३ वर्ग किलो मीटर इतके आहे आणि या जिल्ह्याची लोकसंख्या हि दहा लाख वीस हजार दोनशे पंधरा ( १०,२०,२१५ ) इतके आहे. वाशीम जिल्हा हा २६ जानेवारी १९९८ मध्ये स्थापित करण्यात आला आणि त्या काळी हा जिल्हा अकोला जिल्ह्याचा एक भाग होता.
नंतर काही दिवसांनी हा जिल्हा एक स्वतंत्र्य जिल्हा झाला. वाशीम जिल्ह्यामध्ये पेनगंगा नदी आहे जी जिल्ह्यामधील एक प्रमुख नदी आहे आणि हि नदी वाशीम जिल्ह्यातील रिसोड या तालुक्यातून वाहते त्याचबरोबर काटेपूर्वा नदी हि देखील वाशीम जिल्ह्यातून वाहते आणि या नदीचा उगम हा या जिल्ह्यातील डोंगराळ भागातून झाला आहे.

वाशिम जिल्हा माहिती – Washim District Information in Marathi
जिल्ह्याचे नाव | वाशीम जिल्हा |
जिल्ह्याची स्थापना | २६ जानेवारी १९९८ |
क्षेत्रफळ | ५१५३ वर्ग किलो मीटर |
लोकसंख्या | दहा लाख वीस हजार दोनशे पंधरा |
जवळचे जिल्हे | यवतमाळ, बुलढाणा, हिंगोली आणि अकोला |
मुख्य नदी | पेन गंगा |
वाशीम जिल्ह्याचा इतिहास – washim district history in marathi
वाशीम जिल्हा हा सातवाहानांच्या काळामधील जिल्हा आहे कारण या जिल्ह्यावर त्यांची सत्ता होती आणि या जिल्ह्याला त्यांच्या काळामध्ये बच्छोम किंवा वत्सगुल्म या नावांनी ओळखले जात होते. वाशीम जिल्हा हा १९९८ मध्ये म्हणजेच अवघ्या काही काळामध्ये निर्माण झालेला जिल्हा आहे.
आणि या जिल्ह्याबद्दल असे म्हटले जाते कि भगवान बालाजी काही काळासाठी या ठिकाणी विश्रांतीसाठी येतात अशी भाविकांची श्रध्दा आहे. तसेच वाशीम जिल्हा हा प्राचीन काळामध्ये वाकाटक राजाची राजधानी देखील होती, असे म्हटले जाते. आणि त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या हेमाडपंथी मंदिरांच्यामुळे आणि असंख्य अश्या तलावांच्यामुळे या जिल्ह्याची प्रसिध्दता वाढली आहे.
वाशीम जिल्ह्यामधील काही प्रेक्षणीय स्थळे – washim district tourist places in marathi
वाशिम जिल्हा पाहाण्यासारखी ठिकाणे
वाशीम जिल्हा हा एक ऐतिहासिक ओळख असणारा जिल्हा आहे आणि या ठिकाणी आपल्याला अनके प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. जिल्ह्यामध्ये असणाऱ्या हेमाडपंथी मंदिरांच्यामुळे आणि असंख्य अश्या तलावांच्यामुळे या जिल्ह्याची ख्याती वाढली आहे. खाली आपण काही प्रमुख जिल्ह्यामधील पर्यटन स्थळे पाहणार आहोत.
बालाजी मंदिर
वाशीम जिल्ह्यामध्ये अनेक मंदिर आहेत आणि त्यामधील एक लोकप्रिय म्हणजे बालाजीचे मंदिर आणि हे मंदिर खूप जुने म्हणजेच १७७९ मध्ये बांधलेले मंदिर आहे आणि हे भवानी काळू यांनी बांधले होते जे जानोजी भोसले यांचे दिवाण होते.
अश्या या प्राचीन आणि पवित्र बालाजी मंदिराला भेट देण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी असंख्य भाविक आणि पर्यटक या या मंदिरला भेट देतात.
गुरुदत्त मंदिर कारंजा
भगवान दत्तात्रेय यांचे दुसरे अवतार आहे या ठिकाणी जन्मले आहेत त्यामुळे हे भगवान दत्तात्रेय यांचे जन्मस्थान आहे. श्री नृर्सिंह सरस्वती स्वामी महाराज हे दत्तात्रेय प्रभू यांचे दुसरे अवतार आहेत आणि त्यांचे मंदिर हे वाशीम जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी असते.
पोहरादेवी मंदिर
महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक प्रसिध्द आणि पवित्र अशी तीर्थक्षेत्रे आहेत आणि महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक म्हणजे पोहरादेवी मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये देखील अनेक भाविक दर्शनासाठी येतात.
जैन मंदिर शिरपूर जैन
वाशीम जिल्ह्यातील शिरपूर या ठिकाणी अंतरीक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये मोठ्ये संखेने जैन उपासक आणि भाविक येत असतात.
राम मंदिर
वाशीम जिल्ह्यातील सुंदर राम मंदिर हे भगवानदास महाराज बैरागी यांनी सुमारे २५० वर्षापूर्वी बांधलेले मंदिर आहे आणि मंदिरामध्ये भगवान राम, सीता, लक्ष्मण आणि हमुमान यांच्या सुंदर अश्या मुर्त्या आहेत. या मंदिरामध्ये अनेक भाविक दर्शनासाठी तर येतातच परंतु या ठिकाणी साधू विश्रांती घेटतात तसेच हे मंदिर अनेक वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांच्यासाठी फंक्शन हॉल म्हणून वापरले जाते.
पद्मतीर्थ शिव मंदिर
हे भगवान विष्णूने निर्माण केलेले प्रमुख तीर्थ आहे आणि यामध्ये दोन सुंदर तलाव देखील आहे आणि तलावाच्या मध्यभागी श्री राम नारायण तोष्णीवाल यांनी सुंदर शिवमंदिर बांधले आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट म्हणजे शाळुंकेचा रंग हा दिवसातून तीन वेळा बदलतो. पहिला पहाटे बदलतो आणि दुसरा दुपारी आणि तिसरा संध्याकाळी बदलतो.
वाशीमला कसे जायचे – how to reach
रस्त्याने
वाशीम हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांना रस्त्यांनी जोडलेला आहे आणि त्यामुळे आपण महाराष्ट्रातील कोणत्याही प्रमुख शहरातून जसे कि नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि मालेगाव या शहरातून बस पकडून वाशीम जिल्ह्यामध्ये पोहचू शकतो किंवा आपण स्वताच्या गाडीने देखील वाशीम जिल्ह्यामध्ये पोहचू शकतो.
रेल्वेने
वाशीम जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला रेल्वेने जायचे असल्यास तुम्ही वाशीम ला येवू शकता कारण वाशीम या ठिकाणी रेल्वे स्थानक आहे आणि तुम्हाला वाशीमला येण्यासाठी कोणत्याही प्रमुख शहरातून रेल्वे मिळू शकेल.
विमानाने
जर तुम्हाला विमानाने यायचे असल्यास तुम्हाला नांदेड विमान तळावर यावे लागेल आणि मग तेथून तुम्ही बस पकडून वाशीमला जाऊ शकता. नांदेड ते वाशीम हे अंतर १०६ किलो मीटर इतके आहे.
आम्ही दिलेल्या washim district information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर वाशिम जिल्हा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या washim district history in marathi या washim district tourist places in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about washim district in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये washim district information in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट