अकोला जिल्हा माहिती Akola History in Marathi

akola history in marathi – akola district information in marathi अकोला जिल्हा माहिती व इतिहास आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा अकोला या विषयी माहिती घेणार आहोत तसेच अकोल्याविषयच इतिहास देखील जाणून घेणार आहोत. अकोला जिल्हा हा विदर्भ भागामध्ये येतो आणि हे महाभारतातील दंतकथेचे साम्राज्य होते. ब्रिटीशांच्या काळामध्ये हा जिल्हा ब्रिटीशांच्या हातामध्ये होता परंतु ब्रिटीशांच्या अगोदर हा जिल्हा मौर्य वंशाचे राजा अशोक हे या प्रांतावर राज्य करत होते. अकोला हा महाराष्ट्रातील जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे ५४२८ किमीइतके आहे.

या जिल्ह्याच्या उत्तरेस आणि पूर्वेला अमरावती हा जिल्हा आहे तसेच दक्षिणेकडे वाशीम जिल्हा आणि पश्चिमेस बुलढाना जिल्हा आहे. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण ७ तालुके आहेत ते म्हणजे अकोला, पातुर, मूर्तीजापूर, बार्शीटाकळी, बाळापुर, तेल्हार आणि अकोट हे तालुके आहेत. या जिल्ह्यामध्ये १ महानगरपालिका, ५ नगरपरिषद आणि १ नगर पंचायत आहे आणि या जिल्ह्याचे मुख्यालय हे अकोला हे शहरच आहे.

अकोला हे शहर मुंबई या शहरापासून ६०० कि.मी अंतरावर आहे आणि नागपूर या शहरापासून २५० कि.मी अंतरावर आहे. या जिल्ह्यामध्ये अकोला किल्ला, नरनाळा किल्ला आणि बाळापुर किल्ला हे महत्वाचे आणि प्राचीन किल्ले आहेत आणि या कि

akola history in marathi
akola history in marathi

ल्ल्यांना काही ऐतिहासिक महत्व देखील आहे. चला तर आता आपण अकोला या शहराविषयी काही आणखीन माहिती जाणून घेवूया.

अकोला जिल्हा माहिती – Akola History in Marathi

शहराचे नावअकोला
राज्यमहाराष्ट्र
ओळखमहाराष्ट्रातील जिल्हा
क्षेत्रफळया जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे ५४२८ किमीआहे.

Akola District Information in Marathi

अकोला जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत ?

अकोला जिल्ह्यामध्ये एकूण सात ( ७ ) तालुके आहेत आणि ते कोणकोणते आहेत ते आपण आता खाली पाहणार आहोत.

  • अकोला.
  • पातुर.
  • मूर्तीजापूर.
  • बार्शीटाकळी.
  • बाळापुर.
  • तेल्हार.
  • अकोट.

अकोला इतिहास – history of akola 

अकोला हे खूप हे खूप पूर्वीचे शहर आहे आणि या शहराचा महाभारतामध्ये देखील उल्लेख झालेला असे म्हटले जाते. अकोला हा बेरार प्रांताचा भाग होता आणि हा ब्रिटीशांच्या अधिपत्यखाली होता आणि हा ब्रिटीशांच्या हातामध्ये जाण्याअगोदर या प्रांतावर मौर्य वंशाचा राजा अशोक याचे राज्य होते आणि नंतरच्या काळामध्ये या भागावर यादव राजवंश, निजाम राजवंश, मुघल साम्राज्य, निजाम राजवंश आणि मराठा साम्राज्य यांनी राज्य केले. शेवटचा पेशवा बाजीराव दुसरा विरुध्द तिसऱ्या इंग्रज-मराठा युध्द मध्ये हा प्रांत इंग्रजांच्या ताब्यात गेला.

अकोला जिल्ह्यामध्ये तीन महत्वाचे आणि ऐतिहासिक किल्ले आहेत ते म्हणजे अकोला किल्ला, नरनाळा किल्ला आणि बाळापुर किल्ला आणि ह्या किल्ल्यांना ऐतिहासिक महत्व आहे आणि त्यामुळे अकोला जिल्हा हा ऐतिहासिक वरश्यासाठी खूप प्रसिध्द आहे. चला तर आता आपण या तीन किल्ल्यांच्याविषयी थोडी माहिती आणि इतिहास जाणून घेवूया.

  • अकोला किल्ला

अकोला किल्ला हा अकोला जिल्ह्यातील एक प्रसिध्द किल्ला आहे आणि हा किल्ला अकोला ह्या शहरापासून अडीच ते तीन कि.मी अंतरावर आहे. अकोला किल्ला हा सर्वप्रथम अकोल सिंग याने बांधला होता आणि हा किल्ला सर्वप्रथम मातीने बांधला होता आणि मग औरंगजेबच्या कारकिर्दीत असद खानने १६९७ मध्ये अकोला किल्ल्याला मजबूत अशी तटबंदी बांधली तसेच अनेक सुधारणा देखील केल्या. या किल्ल्यावर जाण्यासाठी मुखत्वे २ मार्ग आहेत.

अकोला किल्ल्याचा इतिहास 

अकोला किल्ला हा खूप पूर्वीचा किल्ला आहे आणि हा किल्ला सर्वप्रथम अकोल सिंग यांने बांधला होता आणि म्हणून या शहराला देखील अकोला हे नाव त्याच्यावरून पडले असावे. अकोला किल्ला हा अकोल सिंगने सर्वप्रथम मातीने बांधला होता आणि त्यानंतर औरंजेबाच्या वर्चस्वाखाली हा किल्ला असताना असद खानने १६९७ मध्ये अकोला किल्ल्याला मजबूत अशी तटबंदी बांधली.

तसेच अनेक सुधारणा देखील केल्या. ज्यावेळी भारतामध्ये इंग्रज आले त्यावेळी त्यांनी भारतातील अनेक प्रांत जिंकून घेतले आणि त्यामध्ये अकोला किल्ला देखील होता आणि १८७० मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या वर्चस्वाखाली असताना हा किल्ला उद्वस्त करून टाकला आणि १९१० मध्ये हा किल्ला शाळा म्हणून वापरण्यात आला होता असे देखील म्हटले जाते.

बाळापुर हा किल्ला अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्याच्या ठिकाणी हा किल्ला वसलेला आहे. इतिहासामध्ये असे सांगितले आहे कि हा किल्ला मुघल साम्राज्यातील औरंगजेबाचा दुसरा मुलगा शहजादा अजमशहा याने इ. स. १७१२ मध्ये हा किल्ला बाळापुर येथे बांधायला सुरुवात केली होती त्यानंतर या किल्ल्याचे बांधकाम इ. स. १७५७ मध्ये नवाब इस्माईल खान याने पूर्ण केले.

बाळापुर किल्ल्याचा इतिहास 

ज्यावेळी पुरंदरची लढाई झाली त्यावेळी खूप सैनिक विनाकारण मारत असल्यामुळे त्यांनी पुरंदरचा तह करायचा ठरवला आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्या सोबत त्यांनी तहाची बोलणी केली. या तहानंतर छत्रपती शिवाजी महारज आणि संभाजी महाराजांना आग्र्याला औरंगजेबाला भेटण्यासाठी बोलावले पण अग्र्यामध्ये त्यांना कैद करून ठेवण्यात आले पण छत्रपती शिवाजी महाराज तेथून कसे बसे सुटून औरंगजेबासोबत नमतेपणा पत्करून तहाची बोलणी केली.

या बोलानीच्या दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांना सात हजाराची मनसबदारी देण्यात आली होती आणि या मनसबदारीमध्ये असणाऱ्या सैन्य खर्चासाठी औरंगजेबाने १५ लाख होनांची जहांगीर आणि खानदेश आणि वऱ्हाड हे भाग दिले होते आणि या वऱ्हाड भागामध्ये बाळापुर किल्ला देखील होते.

गिरिदुर्ग प्रकारातील ३१६१ फुट उंच उभा असलेला नरनाळा किल्ला महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यापासून २४ किलो मीटर अंतरावर वसलेला आहे. नरनाळा ऐतिहासिक किल्ला अकोला शहरापासून ५५ ते ६० किलो मीटर अंतरावर आहे. नरनाळा हा किल्ला मेळघाट परिसरामध्ये आहे आणि किल्ल्याच्या सभोवताली सुंदर हिरवागार परिसर आहे.

नरनाळा या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ३८० एकराच्या भागामध्ये विस्तारलेला आहे. काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला इ. स १२८२ मध्ये चांदगडाचा गोंड राजा बल्लाड अत्राम याने बांधला असावा. पूर्वीच्या काळी या किल्ल्यावर राजा नारणाल सिंह स्वामी याच्या वर्चस्वाखाली होता त्यामुळे या किल्ल्याचे नाव या राज्याच्या नावावरून नरनाळ असे ठेवण्यात आले.

नरनाळा किल्ल्याचा इतिहास 

नरनाळा हा किल्ला नरनाळा भागामध्ये शहानुर किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला इ. स १२८२ मध्ये चांदगडाचा गोंड राजा बल्लाड अत्राम याने बांधला असावा आणि या किल्ल्याचे नाव राजा नारणाल सिंह स्वामी याच्या वर्चस्वाखाली असताना या किल्ल्याचे नाव या राजाच्या नावावरून नरनाळा असे पडले.

इ. स. १४२५ मध्ये नरनाळा हा किल्ला अहमद शा नावाच्या बहामनी शासकाने आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्याचे नुतनीकरण इस्लामी पध्दतीने केले. त्यानंतर ह्या किल्ल्यावर मुगलांनी आपल्या ताब्यात घेतला पण १७०१ ते १८०३ या काळामध्ये हा किल्ला मराठा साम्राज्याच्या वर्चस्वा खाली राहिला आणि १८०३ मध्ये हा किल्ला इंग्रजांना मिळवण्यात यश आले.

आम्ही दिलेल्या akola history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अकोला जिल्हा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या akola district information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि akola information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!