yuvraj singh information in marathi युवराज सिंग माहिती, भारतामध्ये क्रिकेट हा खेळ जरी लोकप्रिय नसला तरी या खेळला आपल्या देशामध्ये खूप महत्व आहे, कारण हा खेळ अनेकांचा प्रिय खेळ मानला जातो. आपल्या भारतीय क्रिकेट खेळामध्ये अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी क्रिकेट मध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली आणि आपले आणि देशाचे नाव उंचावले आहे आणि असेच काही खेळाडू म्हणजे सचिन तेंडूलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग, हार्दिक पंड्या, केएल राहू असे अनेक सध्याचे खेळाडू आहेत.
ज्यांनी क्रिकेट खेळामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. आज आपण या लेखामध्ये युवराजसिंग या क्रिकेट खेळाडूविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. युवराज सिंग हा खेळाडून भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख आणि नावलौकिक खेळाडू आहे ज्याने फलंदाजी मध्ये एक चांगली भूमिका बजावली.
युवराज सिंग यांचा जन्म १२ डिसेंबर १९८१ मध्ये भारतातील पंजाब राज्यातील चंडीगड मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव शबनम असे आहे आणि त्यांच्या वडिलांचे नाव योगराज सिंग असे आहे आणि हे भारतीय क्रिकेट संघामध्ये त्यांच्या काळामध्ये माजी गोलंदाज होते.
त्यांच्या वडीलच क्रिकेट प्रेमी असल्यामुळे त्यांना देखील लहानपणी पासूनच क्रिकेटची आवड निर्माण झाली आणि त्यांनी लहानपणी पासूनच त्यांच्या वादिलान्च्याकडून प्रशिक्षण घेतले. त्याचबरोबर त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी म्हणजेच खूपच लहान वयामध्ये पंजाब अंडर १६ संघात स्थान मिळवले आणि त्यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये पदार्पण केले.
युवराज सिंग माहिती – Yuvraj Singh Information in Marathi
नाव | युवराज सिंग |
ओळख | क्रिकेटपटू |
जन्म | १२ डिसेंबर १९८१ |
जन्म ठिकाण | भारतातील पंजाब राज्यातील चंडीगड |
पालक | योगराज सिंग आणि शबनम |
लाग | ३० नोव्हेंबर २०१६ |
पत्नीचे नाव | हेजल कीच |
मुलाचे नाव | ओरीयन |
युवराज सिंग यांचे सुरुवातीचे आयुष्य आणि कौटुंबिक माहिती – yuvraj singh biography in marathi
युवराज सिंग हे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाबी अभिनेत योगराज सिंग आणि शबनम यांचा मुलगा आहे आणि यांचा जन्म १२ डिसेंबर १९८१ मध्ये भारतातील पंजाब राज्यातील चंडीगड मध्ये एक पंजाबी शीख कुटुंबामध्ये झाला. ज्यावेळी योगराज सिंग आणि शबनम यांचा घटस्पोट झाला त्यावेळी ते त्यांच्या आई सोबत राहत होते.
सुरुवातीला योगराज सिंग हे एक पंजाबी अभिनेते देखील असल्यामुळे त्यांनी अभिनेता म्हणून देखील काम केले होते त्यामुळे युवराज सिंग देखील आपल्याला वडिलांच्या पायावर पाय ठेवत पत सरदार आणि मेहंदी दि सगन या सारख्या काही चित्रपटामध्ये तरुण कलाकार म्हणून काम केले होते.
युवराज सिंग यांना क्रिकेट विश्वामध्ये येण्यापूर्वी क्रिकेट खेळामध्ये इतका रस नव्हता परंतु वडील क्रिकेट मध्ये असल्यामुळे त्यांनी युवराज सिंग ला क्रिकेट खेळाचे देखील प्रशिक्षण दिले आणि त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी म्हणजेच खूपच लहान वयामध्ये पंजाब अंडर १६ संघात स्थान मिळवले आणि त्यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये पदार्पण केले.
युवराज सिंग यांचे टेनिस आणि रोलर स्केटिंग हे दोन आवडते खेळ होते आणि त्यांनी राष्ट्रीय अंडर १४ रोलर स्केटिंग चॅम्पीयनशिपमध्ये चांगली कामगिरी केली होती.
युवराज सिंग आणि बॉलीवूड अभिनेत्री हेजल कीच हे २०११ मध्ये मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम मध्ये पहिल्यांदा भेटले आणि त्यांनी ३० नोव्हेंबर २०१६ मध्ये लग्न केले आणि आता या जोडप्याला एक मुलगा आहे त्याचे नाव ओरीयन असे आहे.
युवराज सिंग यांचे शिक्षण – education
युवराज सिंग यांनी त्यांचे शालेय शिक्षण आणि सुरुवातीचे शिक्षण हे चंडीगड मधील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले आणि मग युवराज सिंग यांनी चंडीगड या ठिकाणी असणाऱ्या पंजाब विद्यापीठाशी संलग्न डीएव्ही (DAV) कॉलेजमधून वाणिज्य शाखेमध्ये पदवी प्राप्त केली.
युवराज सिंग यांचे क्रिकेट क्षेत्रातील पदार्पण आणि कामगिरी – career
युवराज सिंग यांन वयाच्या १३ व्या वर्षी पंजाब अंडर १६ संघात स्थान मिळवले आणि मग नंतर दोन वर्षांनी त्यांनी पंजाब अंडर १९ मध्ये देखील प्रवेश मिळवला.
१९९७ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि श्रीलंकाविरुध्द अंडर १९ मध्ये ५५ चेंडूमध्ये एकूण ८९ धावा बनवल्या आणि त्यांनी त्यांच्या क्रिकेट क्षेत्रातील पहिली यशस्वी कामगिरी केली.
त्याचबरोबर युवराज सिंग हे २००० मध्ये अंडर १९ मध्ये विजय झालेल्या विश्व चषक स्पर्धेचा तो एक भाग होता आणि त्यांना २००० मध्ये अष्टपैलू प्रयत्नांच्यासाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले तसेच त्याच्या शूर कामगिरीसाठी त्याला २००० मध्ये आंतरराष्ट्रीय कॅप मिळाली.
युवराज सिंग यांनी २००० पासून एक दिवसीय सामन्यामध्ये खेळण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी त्यांनी पहिला सामना हा केनिया विरुध्द खेळला आणि त्यावेळी त्यांनी खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु केली आणि परंतु जरी टीम हि स्पर्धा जिंकू शकली नसली तरी युवराज सिंगचे मात्र कौतुक झाले.
त्यानंतर युवराज सिंगने ३०४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय खेळामध्ये भाग घेतला आणि या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी १४ शतके बनवली तर ५२ अर्धशतके बनवण्यास तो यशस्वी ठरला आणि त्यांनी एकदिवसीय स्पर्धेमध्ये एकूण ८७०० धावा बनवल्या.
त्याचबरोबर युवराज सिंगने २०१३ मध्ये पहिला कसोटी सामना खेळला आणि हा सामना भारत विरुध्द न्युझीलंड असा होता आणि त्यावेळी त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यांनी कसोटी सामन्यामध्ये एका डावामध्ये १६९ धावा बनवल्या होत्या तर ४० सामन्यांच्यामध्ये एकूण १९०० धावा बनवल्या होत्या.
आणि त्यांनी कसोटी सामन्यामध्ये तीन शतके आणि ११ अर्धशतके बनवली होती. तसेच त्यांनी २००७ मध्ये टी२० सामना देखील खेळला होता आणि त्यांनी या एकूण ५८ सामन्यांच्यामध्ये ११७७ धावा बनवल्या होत्या आणि या त्यांनी टी२० सामन्यांच्यामध्ये एकूण ८ अर्धशतके ठोकली होती.
युवराज सिंग यांनी टी२० चा सामना इंग्लंड विरुध्द खेळत असताना ६ चेंडूंच्यामध्ये ६ षटकार ठोकले होते.
- वयाच्या १३ व्या वर्षी पंजाब अंडर १६ संघात स्थान मिळवले.
- १९९७ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि श्रीलंकाविरुध्द अंडर १९ मध्ये ५५ चेंडूमध्ये एकूण ८९ धावा बनवल्या
- २००० मध्ये अंडर १९ मध्ये विजय झालेल्या विश्व चषक स्पर्धेचा तो एक भाग होता.
- युवराज सिंग यांनी २००० पासून एक दिवसीय सामन्यामध्ये खेळण्यास सुरुवात केली.
- युवराज सिंगने ३०४ एकदिवसीय सामन्यांच्यामध्ये एकूण १४ शतके बनवली तर ५२ अर्धशतके बनवण्यास तो यशस्वी ठरला आणि त्यांनी एकदिवसीय स्पर्धेमध्ये एकूण ८७०० धावा बनवल्या.
- कसोटी सामन्यामध्ये एका डावामध्ये १६९ धावा बनवल्या होत्या तर ४० सामन्यांच्यामध्ये एकूण १९०० धावा बनवल्या होत्या.
- २००७ मध्ये टी२० सामना देखील खेळला होता आणि त्यांनी या एकूण ५८ सामन्यांच्यामध्ये ११७७ धावा बनवल्या होत्या.
- युवराज सिंग यांनी ५८ टी२० सामने खेळले होते आणि त्यांनी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करून २८ विकेट घेण्यात ते यशस्वी ठरले होते.
आम्ही दिलेल्या yuvraj singh information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर युवराज सिंग माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या yuvraj singh award in marathi या yuvraj singh biodata in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about yuvraj singh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये yuvraj singh information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट