सचिन तेंडुलकर माहिती Sachin Tendulkar Information in Marathi

Sachin Tendulkar Information in Marathi – Sachin Tendulkar Mahiti Marathi सचिन तेंडुलकर माहिती क्रिकेट विश्वामध्ये ज्याला क्रिकेटचा देव असे संबोधले जाते तो म्हणजे भारतीय माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्याविषयी आपण आजच्या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. क्रिकेट विश्वामध्ये सचिन तेंडुलकर यांचा दबदबा आहे. क्रिकेटच्या चाहत्यांवर तर जणू सचिन ने जादूच केली आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातही सचिन तेंडुलकर यांना आदर्श मानणारे त्यांचे अनेक चाहते आहेत. क्रिकेट विश्वामध्ये सर्वात जास्त धावा केल्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

सचिन तेंडुलकर हे डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचे जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट खेळाडू मांडले जातात. सचिन तेंडुलकर यांची फलंदाजी म्हणजे एक अमानवीय शक्ती आहे म्हणूनच क्रिकेटचा देव अशी त्यांची ओळख आहे. चला तर जाणून घेऊया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या जीवन चरित्राविषयी.

sachin tendulkar information in marathi
sachin tendulkar information in marathi

सचिन तेंडुलकर माहिती मराठी – Sachin Tendulkar Information in Marathi

पूर्ण नाव (Name)सचिन रमेश तेंडुलकर
जन्म (Birthday)२४ एप्रिल १९७३
जन्म गाव (Birth Place)महाराष्ट्रातल्या मुंबई
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
टोपणनावमास्टर ब्लास्टर, सच्चू

जन्म व वैयक्तिक आयुष्य

टिपिकल मराठी फॅमिली मध्ये २४ एप्रिल १९७३ मध्ये महाराष्ट्रातल्या मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांचा जन्म झाला. साध राहणीमान या वातावरणात ते लहानाचे मोठे झाले. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा सचिन. तेंडुलकर कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांच्या नावावरून सचिन असे नाव ठेवण्यात आलं.

सचिन तेंडुलकर यांचे वडील एक कादंबरीकार आणि लेखक होते. तर आई विमा एजंट होत्या. त्यामुळे घरातील वातावरण नेहमीच शिस्तीचं राहील. सचिन तेंडुलकर यांचे प्राथमिक शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेतून पार पडलं. सचिन तेंडुलकर यांना लहानपणी टेनिस खेळायची आवाड होती.

अमेरिकेचे प्रसिद्ध टेनिस खेळाडू जॉन मॅकनराॅ ‌ हे सचिनचे आदर्श होते. पुढे जाऊन सचिन तेंडुलकर यांच मन क्रिकेट या खेळाकडे वळले त्यांचे मोठे भाऊ अजित यांनी लहानपणी सचिन यांना क्रिकेट संदर्भात बऱ्याच गोष्टींमध्ये मार्गदर्शन केलं. पुढे जाऊन सचिन तेंडुलकर यांनी डॉक्टर अंजली यांच्याशी विवाह केला आज या दाम्पत्यांना अर्जुन आणि सारा अशी दोन अपत्य आहे.

सचिन तेंडुलकर यांची कारकीर्द

सचिन तेंडूलकर हे क्रिकेट विश्वातील नावाजलेले व नामांकित खेळाडू आहेत. सध्या जरी ते निवृत्त झाले असले तरी क्रिकेट खेळातील त्यांची कारकीर्द फार मोठी आहे. लहानपणापासून सचिन तेंडुलकर यांना क्रिकेट खेळायची फार आवड होती. सुरवातीला ते आपल्या भावासोबत क्रिकेट खेळायचे. आपल्या भावाचे क्रिकेट खेळातील असलेले कलागुण अजित तेंडुलकर यांनी ओळखले होते.

त्यांचे हे कौशल्य गांभीर्याने घेऊन त्यांनी सचिन तेंडुलकर यांना क्रिकेट मध्ये आपलं करिअर घडविण्यासाठी कल्पना दिली आणि सचिन तेंडुलकर यांची ओळख प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याशी करून दिली. ह्यांच्या मार्गर्शनाखाली त्यांनी क्रिकेट चा श्रीगणेशा केला. शाळेतल्या मित्रपरिवार सोबत हॅरिस शिल्ड सामन्यात विनोद कांबळी ह्यांच्या भागीदारीने ६६४ धावांची खेळी रचली होती.

१४ वर्षाचा सचिनची अशी अव्वल कामगिरी बघून त्याच्या घरच्यांसाठी व त्याच्या प्रशिक्षकासाठी हे खूप कौतुकास्पद बाब होती. १९८८ मध्ये सचिन ने आपला पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला ज्यामदे तो १०० धावांवर नॉट आउट राहीला. त्या वेळी तो मुंबई संघासाठी आणि गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. सचिन ने लहान वयातच खूप मोठं यश गाठायला सुरुवात केली होती.

असा विक्रम करणारा तो सर्वात तरुण खेळाडू होता. बघता बघता सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाऊल ठेवण्यास सुरुवात केली. १९८९ साली पाकिस्तानातील कराची येथे सचिन तेंडुलकरने यांनी आपल्या आयुष्यातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सुरुवातीला त्यांना यश मिळू शकली नाही परंतु फैसलाबाद येथे झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकर यांनी पहिले अर्धशतक झळकावून आपल्या क्रिकेट करिअरची वाटचाल सुरू केली.

सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये देखील सचिनची सुरुवात तशी फार चांगली झाली नाही परंतु निराश न होता संयमाने सचिन कठोर परिश्रम सराव करून सचिनने इसवी सन १९९० साली झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर सचिन तेंडुलकर यांनी आपलं पहिलं कसोटी शतक पूर्ण केले. अवघ्या अकरा वर्षापासून सचिन तेंडुलकर क्रिकेटचे धडे गिरवत होते आणि त्वरित त्यांचे क्रिकेट संबंधित असलेले कौशल्य बाहेर येऊ लागले होते.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केल्यानंतर जरी त्यांना हवी तशी खेळी करता आली नसली तरी, इसवी सन १९९१ -११९२ मध्ये सचिन तेंडुलकर यांची क्रिकेट क्षेत्रातील खरी वाटचाल सुरू झाली. ऑस्ट्रेलियन दौऱ्यामध्ये पर्थम येथील वेगवान आणि उसळत्या मैदानावर अतिशय अविस्मरणीय शतकी खेळी रचली.

सचिन तेंडुलकर यांना आज पर्यंत कसोटी सामन्यांमध्ये तब्बल अकरा वेळा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. ९ सप्टेंबर १९९४ साली सचिन ने एकदिवसीय आतरराष्ट्रीय सामन्यातील पाहिलं शतक नोंदवल. सचिन तेंडुलकर यांचं क्रिकेट मध्ये असलेले कौशल्य इतके अप्रतिम आहते की ते एकमेव क्रिकेट विश्वातील खेळाडू आहेत ज्यांनी रणजी चषक, दुलीप चषक आणि इराणी चषक मधील पहिल्याच सामन्यात शतक नोंदवला आहे.

सचिनने १९९७ साली हजार कसोटी धावा केल्याचा विक्रम नोंदवला. याच वर्षी सचिनला विस्डेन तर्फे सर्वोत्तम वार्षिक क्रिकेटपटू म्हणून घोषित केलं. सचिन तेंडुलकर यांनी हजार धावा करण्याचा विक्रम तब्बल सहा वेळा नोंदवला आहे. १९९८ मध्ये सचिन तेंडुलकर यांनी १८९४ एक दिवसीय धावा नोंदवल्या आहेत. सचिन तेंडुलकर यांचा कसोटीमध्ये ४९ शतके आणि वन-डेमध्ये एकावन्न शतकांचा विक्रम आजपर्यंत कोणताही खेळाडू मोडू शकला नाही आहे.‌

सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट कौशल्य विषयी सांगायचं झालं तर ते देवाकडून मिळालेलं वरदानच आहे. अवघ्या १६ व्या वर्षी सचिनने कसोटी सामन्या मध्ये पदार्पण केलं होतं. सचिनने आतापर्यंत २०० कसोटी सामने खेळले आहेत आणि या सामन्यांमध्ये त्याने १५९२१ धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी ५३.७९ इतकी आहे.

कसोटी सामन्यांमध्ये ५१ शतके आणि ६८ अर्धशतके झळकावली आहेत. सचिन ४६३ एक दिवसीय सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता. एकदिवसीय सामन्यांमध्ये १८४२६ धावा केल्या आहेत. ४९ शतके आणि ९६ अर्धशतके नोंदवली आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकर यांची फलंदाजीची सरासरी ४४.८३ इतकी आहे.

फ्रॅंचाईजी क्रिकेटमध्ये ३०७ सामन्यांमध्ये २५२२८ धावा आणि ८१ शतक आणि ११४ अर्धशतक केली आहेत. लोकल क्रिकेट मध्ये ५५१ सामन्यात २१९९९ धावा केल्या आहेत. तर साठ शतक आणि ११४ अर्धशतक केली आहेत. आज सचिन तेंडुलकर जरी निवृत्त झाले असले तरी त्यांच्यासारखा रत्न भारताला पुन्हा मिळणे नाही.

सचिन तेंडुलकर ज्या वेळी मैदानात उतरायचे त्यावेळी संपूर्ण चोहीकडून त्यांच्या नावाचा जय घोष ऐकू यायचा. आज ते ज्या स्तरावर उभे आहेत त्याचं सर्व श्रेय त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासून घेतलेल्या परिश्रमांना जातं. सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील बऱ्याच खेळाडूंचे प्रेरणास्थान आहेत आदर्श आहेत. बऱ्याच युवा तरुणांना त्यांच्या कडून बळ, साहस आणि प्रेरणा मिळते.

पुरस्कार

सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट विश्वामध्ये अतिशय अविस्मरणीय कामगिरी करून ठेवली आहे. आज विस्डेनच्या डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर क्रिकेट विश्वातील सर्वकालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांचे नाव पुढे करण्यात आलं आहे. तर व्हिव्ह रिचर्ड्स यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वकालिक उत्कृष्ट फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे.

२००३ मधील क्रिकेट विश्वचषकात मालिकेतील सर्वोत्तम उत्कृष्ट खेळाडू सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करून दाखवणारा एकमेव क्रिकेटपटू म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर यांनी २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात ३०००० धावांचा टप्पा पार केला आहे.

सचिन तेंडुलकर यांच क्रीडा क्षेत्रातील योगदान पाहून भारत सरकारने भारतातील सचिन तेंडुलकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. इसवी सन १९९४ मध्ये सचिन तेंडुलकर यांना अर्जुन पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. १९९७ मध्ये सचिन यांना राजीव गांधी खेल पुरस्कार प्राप्त झालं.

१९९९ मध्ये सचिन तेंडुलकर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. २००८ मध्ये सचिन यांना पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला. २०१० मध्ये सचिन तेंडुलकर एलजी पीपल्स अवॉर्ड चे मानकरी ठरले. २०११ मध्ये सचिन यांना क्रिकेटर ऑफ द इयर असा पुरस्कार प्राप्त झाला.

आम्ही दिलेल्या sachin tendulkar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सचिन तेंडुलकर माहिती मराठी sachin tendulkar chi mahiti बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sachin tendulkar marathi mahiti या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sachin tendulkar wikipedia in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sachin tendulkar information in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!