झिनिया फुलाची माहिती Zinnia Flower Information in Marathi

Zinnia Flower Information in Marathi झिनिया फुलाची माहिती आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या रंगाची आणि वेगवेगळ्या आकाराची सुंदर आणि आकर्षक फुले आपल्याला पहायला मिळतात आणि ती फुले आपल्या बागेची शोभा वाढवण्यास उपयोगी ठरतात त्यामधील एक सुंदर आणि आकर्षक फुल म्हणजे झिनिया. झिनिया हे फुल सूर्यफुलाच्या वंशातील आहे आणि या फुलाची लागवड हि आपल्या घराच्या अवती भोवती घराची शोभा वाढवण्यासाठी तसेच हि फुले बागेमध्ये बागेची शोभा वाढवण्यासाठी हि फुले लावली जातात.

या फुलांच्या जवळ जवळ १५ ते २० प्रजाती आहेत आणि या फुलांचे रंग आणि आकार हे त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते. झिनिया या फुलाच्या काही प्रजाती वर्षभर टिकतात म्हणजेच आपल्याला या झाडापासून वर्षभर फुले मिळू शकतात तर काही प्रजातींमध्ये त्याहून अधिक दिवस लाभ मिळू शकतो.

zinnia flower information in marathi
zinnia flower information in marathi

झिनिया फुलाची माहिती – Zinnia Flower Information in Marathi

नावझिनिया
वंश / कुळहे फुल सुर्यफुल वंशातील आहे
एकूण प्रजाती१५ ते २०
झाडाची उंची५५ ते ७० सेंटी मीटर
रंगया फुलाचा लाल, पांढरा, गुलाबी आणि पिवळा असू शकतो आणि या फुलाच्या काही प्रजाती केसरी किंवा जांभळ्या रंगाच्या असू शकतात.
वर्णनझिनिया हि फुले सुगंध विरहीत टपोरी आकाराची फुले आहेत आणि हि फुले उष्ण आणि दमट हवामानामध्ये चांगली येतात.

झिनिया या फुलाची माहिती 

zinnia information in marathi झीनियाची फुले हि सुर्यफुल या कुळातील असून या फुलाच्या एकूण १५ ते २० वेगवेगळ्या प्रजाती आहेत ज्याचा अकरा आणि रंग हा त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असतो. या प्रकारची फुले हि विविध रंगाची आणि टपोरी आकाराची असतात. शक्यतो या फुलाचा रंग हा लाल, पांढरा, गुलाबी आणि पिवळा असू शकतो आणि या फुलाच्या काही प्रजाती केसरी किंवा जांभळ्या रंगाच्या असू शकतात.

या फुलांची रोपे हि अगदी झुडूप सारखी आणि लहान असतात पण ती लागवड केल्यानंतर या रोपांची उंची ५५ ते ७० सेंटी मीटर पर्यंत वाढू शकते. झिनिया या फुलाला इतर फुलांच्या सारखा सुगंध जरी येत नसला तरी हि फुले देव पूजेसाठी तसेच डेकोरेशनसाठी देखील वापरली जातात. या फुलांनाचे चांगले संगोपन होण्यासाठी त्यांना उष्ण आणि दमट हवामान गरजेचे असते.

इतिहास 

झिनिया या हि एक साधी फुले आहेत जे घरातील किंवा मंदिरातील पूजेसाठी तसेच डेकोरेशनसाठी वापरली जातात आणि हि फुले मेक्सिको, न्यू मेक्सिको, कॅन्सस, कोलोराडो, अरिझोना आणि टेक्साससह अमेरिकेचे मूळ आहे. म्हणजेच हि फुले सुरवातीच्या काळामध्ये या देशांमध्ये लागवड केली गेली.

हि फुले उष्ण आणि दमट हवामानामध्ये येतात आणि सध्या या फुलांचे पिक मोठ्या प्रमाणात अमेरिका आणि मेक्सिको या देशांमध्ये घेतले जाते. हि फुले सुर्यफुल वंशातील असून झेंडू आणि सुसान या वंशाशी संबधित आहेत आणि अस्टेरसाय (Asteraceae) या कुटुंबातील आहे.

झिनिया या फुलाविषयी अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – some interesting facts about zinnia flower 

  • झिनिया हि फुले ऑक्टोबर पासून झाडाला लागायची बंद होतात, कारण या फुलांना थंड हवामान सोसत नाही आणि ऑक्टोबर नंतर थंडी सुरु होते त्यामुळे हि फुले त्या काळामध्ये लागत नाहीत.
  • झिनिया हे फुल उत्तर अमेरिकेच्या दक्षिण पश्चिम भागात, मेक्सिको मध्ये आणि संपूर्ण दक्षिण अमेरिकेमध्ये आढळू शकते.
  • या फुलाच्या जरी १५ ते २० प्रजाती असल्या तरी फक्त १० प्रजातीच लागवड करण्यायोग्य आहेत आणि या फुलाचे सामान्यता लागवड केलेली प्रजात म्हणजे झिनिया एलिगन हि आहे.
  • झिनिया फुलांच्या देठाच्या वर एकच फुलांचे डोके तयार होऊ शकते.
  • हे फुल उष्ण, कोरड्या आणि दमट हवामानामध्ये चानागल्या प्रकारे येवू शकते आणि हे फुल पूर्ण सूर्यप्रकाशात ठेवल्यावर फुल फुलण्यास सक्षम आहे.
  • झिनियाचे नाव प्रसिद्ध जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ जोहान गॉटफ्राइड झिन यांच्या नावावर आहे ज्यांनी या वनस्पतीचे वर्णन केले.
  • झिनिया हे अतिशय लोकप्रिय कट फुले आहेत जी विविध पुष्पगुच्छ आणि वाळलेल्या फुलांच्या व्यवस्थेसाठी वापरली जातात. झिनियाच्या पुष्पगुच्छ जवळ जवळ ७ दिवस चांगला राही शकतो.
  • झिनिया हि फुलाची वनस्पती केसांच्या वाढीसाठी देखील उपयुक्त ठरते, कारण या वनस्पतीमध्ये केस वाढीसाठी लागणारे औषधी गुण असतात म्हणून झीनियाचा औषधी म्हणून देखील वापर केला जातो.
  • या फुलाची वेगळी लागवड करणे आवश्यक नाही कारण जर आपण एक झीनियाचे झाड लावले असेल आणि त्या झाडाला फुले लागून त्या फुलातून बिया खाली पडून त्या फुलाच्या अनेक रोपे तयार होतात.
  • बागायतीमध्ये लोकप्रिय होण्याआधी झिनिया या फुलाला कुरूप, लहान आणि अप्रिय फुल मानले जात होते.
  • झीनियाच्या फुलांच्यामुळे फुलपांखरे आकर्षित होत असल्यामुळे या प्रकारची फुलांची झाडे फुलपांखरांच्या बागेमध्ये लावली जातात.
  • झीनियाची फुले पहिल्या उन्हाळया पासून ते थंडी पर्यंत लागतात, एकदा थंड सुरु झाली कि हि फुले लागत नाहीत, कारण या फुलांना थंड हवामान सोसत नाही.

झिनिया फुलाच्या वेगवेगळ्या रंगाचे प्रतिक 

झिनिया या फुलाचे वेगवेगळे रंग हे वेगवेगळ्या भावना दर्शवण्यासाठी वापरली जातात. खाली आपण कोणत्या रंगाचे फुल कोणती भावना दर्शवते ते पाहू.

  • पांढरा (White): झिनियाचे पांढऱ्या रंगाचे फुले हे चांगुलपणा दर्शवण्यासाठी वापरले जाते.
  • किरमिजी (Magenta): किरमिजी रंगाचे झीनियाचे फुल हे एकाद्या व्यक्तीबद्दल असणारा कायमचा स्नेह दर्शवण्यासाठी वापरले जाते.
  • पिवळा (Yellow): पिवळा रंग हा तुम्ही जर कोणाची रोज आठवण काढत असाल तर ते दर्शवण्यासाठी पिवळ्या रंगाच्या झिनिया फुलाचा वापर केला जातो.
  • मिश्रित (Multicolor): मिश्रित रंगाचे झिनिया हे फुल कोणाच्या तर स्मृतीमध्ये वापरले जाते.

झिनियाची लागवड कशी करावी ?

  • या फुलाची लागवड करताना रोपे किंवा बिया लावल्या जातात.
  • या फुलाच्या झाडाची लागवड करताना प्रजातींच्या विविधातेनुसार ५ ते २५ इंच अंतरावर लागवड करावी.
  • पंक्तीमध्ये ६ इंच अंतरावर आणि ओळीमध्ये २ फुट अंतरावर लावले जाते.
  • या फुलाचे बियाणे हे १/४ इंच खोल पेरा आणि तुम्हाला काही प्रजातींमध्ये ७ ते ८ दिवसाने या फुलाची रोपे वरती दिसू लागतात.
  • झिनिया या फुलाची रोपे हि झुडूपासारखी येतात त्यामुळे हि रोपे ३ इंच वाढल्यानंतर त्याच्या बाहेरील फांद्या कट करून टाकून ते रोप पातळ करून घ्यावे जेणेकरून ते १५ ते १८ इंच वाढू शकतील.
  • झिनिया या झाडांना शक्यतो उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फुले लागायला सुरुवात येते.

आम्ही दिलेल्या zinnia flower information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर झिनिया फुलाची माहिती मराठी असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या zinnia flower information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of zinnia flower in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये zinnia information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!