झेंडू फुलाची माहिती Marigold Flower Information in Marathi

Marigold Flower Information in Marathi – Zendu Flower Information in Marathi झेंडू फुलाची माहिती आज या लेखामध्ये marigold म्हणजेच झेंडू या फुलाबद्दल माहिती घेणार आहोत. झेंडू हे असे फुल आहे ज्याला मोठ्या प्रमाणात पाकळ्या असतात या फुलावर पाकळ्यांचे ठार असतात आणि फुलाच्या आतल्या भागातील पाकळ्या ह्या थोड्या छोट्या आकाराच्या असतात आणि वरील पाकळ्या मोठ्या आकाराच्या असतात. झेंडूची फुले जास्तीत जास्त केशरी किंवा पिवळ्या रंगाची असतात. झेंडू हा फुलाचा प्रकार १२ महिने वाढणारे फुल असून हि फुले सणांना, सजावट करण्यासाठी, घरामध्ये पूजा करण्यासाठी, मंदिरातील पूजेसाठी अश्या वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जातात.

ज्यावेळी आपण झेंडूची फुले वापरून सजावट करतो त्यावेळी ती केलेली सजावट पारंपारिक वाटते. भारतामध्ये या प्रकारच्या फुलांची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात कारण ह्या फुलांना भारतीय बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.

हे फुल जरी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये पिकत असले आणि या फुलांचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी भारतामध्ये होत असला तरी झेंडू हे फुल मुळचे अमेरिकेतील आहे कारण या फुलाची उत्पत्ती अमेरिकेतील आहे. या फुलाला इंग्रजीमध्ये marigold म्हणतात तसेच या फुलाला मारवाडीमध्ये हंजारी गजरा, मराठीमध्ये झेंडू आणि गुजरातीमध्ये गालगोटा या नावाने ओळखले जाते.

झेंडू या फुलाला बर्याच वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये फार प्राचीन काळापासून याला एक धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे. भारतात झेंडूपासून बनवलेल्या पुष्पांचा वापर हिंदू समारंभात देवांचा सन्मान करण्यासाठी केला जातो तर मेक्सिको या देशा मध्ये झेंडू विधीसाठी आणि औषधी हेतूंसाठी आणि चहा बनवण्यासाठी वापरतात.

marigold flower information in marathi
marigold flower information in marathi

झेंडू फुलाची माहिती – Marigold Flower Information in Marathi

प्रकारफुल
फुलाचे नावझेंडू
कुटुंबअ‍ॅस्टेरासी
शास्त्रीय नावटॅगेट्स
रंगकेशरी, पिवळा आणि लाल
सर्वात उंच प्रजातीसर्वात उंच वाढणारी प्रजाती १ ते ५ फुट उंच वाढू शकते आणि १ ते २ रुंद वाढते.

झेंडू – Marigold Meaning in Marathi

झेंडू या फुलाची वनस्पती हि अ‍ॅस्टेरासी कुटुंबातील असून टॅगेट्स वंशातील आहे. या फुलाला भरीव पाकळ्या असून हे फुल जास्तीत जास्त केशरी किंवा पिवळ्या रंगाचे असते. त्याचबरोबर झेंडू या फुलाच्या वेगवेगळ्या एकूण ४५ ते ५० प्रजाती आहेत आणि यामधील एक प्रजाती १ ते ५ फुट उंच वाढू शकते आणि १ ते २ रुंद वाढते आणि या प्रकातीला सर्वात उंच वाढणारी प्रजाती म्हणून ओळखले जाते. झेंडूची फुले हि उष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये चांगल्या प्रकारे येवू शकतात.

इतिहास 

झेंडू या फुलाचा वापर आपल्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात होत असला तरी हे फुल मुळचे अमेरिका या देशामध्ये उदयास आलेले फुल आहे. या फुलाची सर्व प्रथम नोंद हि इ. स १५५२ ची आहे जी अझ्टेक म्हणून केली होती आणि हि फुले बहुतेक त्या काळामध्ये औषधी फुले म्हणून वापरली जात असावी.

१५ व्या दशकात या फुलांचा प्रसार हा स्पेन या देशामध्ये झाला आणि मग हि फुले आफ्रिका आणि युरोप यासारख्या देशांमध्ये देखील लागवड केली जावू लागली. अश्या प्रकारे या फुलाची लोकप्रियता जगभरामध्ये वाढत गेली आणि लोक या फुलाचा मोठ्या प्रमाणात वापर वेगवेगळ्या कारणासाठी करू लागले.

सध्या या प्रकारची फुले भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. झेंडू हे फुल चांगल्या सूर्य प्रकाशमध्ये, उष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये आणि चांगल्या प्रकारे निचरा होणाऱ्या मातीमध्ये हि फुले चांगल्या प्रकारे येवू शकतात.

झेंडू या फुलाचा वापर 

Uses of Marigold Flower झेंडू हि फुले वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जातात त्यामधी काही करणे खाली दिलेली आहेत

  • झेंडूची फुले हि शक्यतो भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीसाठी वापरली जातात जसे कि लहान बाळाचे बारसे, डोहाळ जेवण कार्यक्रमासाठी त्याच बरोबर नवीन घराची वास्तुक शांती असेल तर घराची सजावट करण्यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो.
  • त्याचबरोबर झेंडूची फुले सणांमध्ये पूजेसाठी देखील वापरली जातात जसे कि गणपती, दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये वेगवेगळ्या पूज्या असतात त्या पूजांच्यासाठी झेंडूचे फुल किंवा माळा वापरल्या जातात.
  • हिंदू संस्कृतीमध्ये झेंडूच्या फुलाला धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व आहे कारण हे फुल हिंदू संस्कृतीमध्ये रोजच्या देवाच्या पूजेसाठी देखील वापरले जाते.
  • झेंडू या फुलांचे छोटे छोटे हार करून मादिरांच्या बाहेर विकले जातात त्याचबरोबर या फुलांचा वापर रांगोळी काढण्यासाठी देखील केला जातो.
  • काही भागांमध्ये या फुलांचा वापर औषधी गुणधर्मासाठी देखील केला जातो.
  • मेक्सिको या देशामध्ये झेंडू या फुलाचा वापर चहा मध्ये करतात.

झेंडू या फुलाचे फायदे – benefits of marigold flower 

  • खूप वर्षापासून झेंडू या फुलाचा वापर औषधी फुल म्हणून केला जातो. झेंडू हे असे एक फुल आहे कि त्याचा वापर त्वचेची जळजळ, जखम किंवा आपल्या उटलेले पुरळ बरे करण्यास मदत होते.
  • झेंडू या फुलांच्यामध्ये कर्करोगाची लक्षणे देखील बरे करण्याची खासियत आहे कारण या फुलामध्ये फ्लेव्होनाइड्स कोलोन हा घटक असतो जो कर्क रोगाची लक्षणे दूर करण्यास मदत करतो.
  • झेंडूमुळे शरीरामध्ये जमा झालेल्या सर्व विषारी पदार्थ काढून टाकून आपल्या शरीराच्या डीटॉक्सिफिकेशन प्रकीयेमध्ये मदत करते.
  • या फुलामुळे महिलांमध्ये उद्भवणाऱ्या मासिक पाळीच्या वेदना दूर करण्यास मदत करते.
  • जर आपण झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या कुस्करून त्या आपल्या त्वचेला लावल्या तर आपल्या त्वचेचा लालसरपणा, सूज किंवा कोरडेपणा दूर होऊ शकतो.
  • झेंडू या फुलामध्ये दाहक विरीधी गुणधर्म देखील असतात.

झेंडू लागवड माहिती – Zendu Lagwad in Marathi

झेंडू या फुलाविषयी काही अनोखी तथ्ये – facts about marigold flower 

  • झेंडू हि फुले शक्यतो लाल, पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची असतात.
  • झेंडू या फुलाचा वापर आपल्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात होत असला तरी हे फुल मुळचे अमेरिका या देशामध्ये उदयास आलेले फुल आहे.
  • झेंडू हे फुल १२ महिने वाढणारे फुल आहे म्हणजेच झेंडूचे झाड १२ महिने फुले देवू शकते.
  • झेंडूच्या फुलांच्या एकूण ५० प्रजाती आहेत आणि प्रत्येक फुलाचा रंग, त्याची उंची, आकार हे त्याच्या प्रजातीवर अवलंबून असते.
  • हि फुले सणांना, सजावट करण्यासाठी, घरामध्ये पूजा करण्यासाठी, मंदिरातील पूजेसाठी अश्या वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जातात.
  • या फुलाला मारवाडीमध्ये हंजारी गजरा आणि गुजरातीमध्ये गालगोटा या नावाने ओळखले जाते.
  • मेक्सिको मध्ये हि फुले वेगवेगळ्या विधीसाठी वापरली जातात त्याचबरोबर हि फुले त्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मासाठी तसेच चहा बनवताना देखील वापरली जातात.
  • झेंडू हे फुल चांगल्या सूर्य प्रकाशमध्ये, उष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये आणि चांगल्या प्रकारे निचरा होणाऱ्या मातीमध्ये हि फुले चांगल्या प्रकारे येवू शकतात.

आम्ही दिलेल्या marigold flower information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर झेंडू फुलाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Zendu Flower Information in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of marigold in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये marigold meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!