Alessandro Volta Information in Marathi अलेस्सांद्रो व्होल्टा यांची माहिती अलेस्सांद्रो व्होल्टा हे एक इटालियन भौतिक शास्त्रज्ञ आणि केमिस्ट होते. अलेसांद्रो वोल्टा यांनी सर्वप्रथम इलेक्ट्रिकल बॅटरी चा शोध लावून संपूर्ण जगाला विद्युत क्षेत्रामध्ये कलाटणी मिळवून दिली. अलेस्सांद्रो व्होल्टा यांनी इलेक्ट्रिक सेल, मिथेन, व्होल्टेज, व्होल्ट आणि व्होलटमीटर असे महत्त्वपूर्ण शोध लावले आहेत. “वोल्टेज” या एककाचं नाव देखील अलेस्सांद्रो व्होल्टा यांच्या नावावरून पडले आहे. अठराशे च्या दशकामध्ये त्यांनी लावलेल्या बॅटरी शोधासाठी अलेसांद्रो वोल्टा यांची एक विशेष ओळख आहे.
“व्होल्टाईक पाईल” हे अलेस्सांद्रो व्होल्टा यांनी तयार केलेलं उपकरण आज आपण सगळे बॅटरी या नावाने वापरतो. आजच्या लेखामध्ये आपण याच महान इटालियन भौतिक शास्त्रज्ञाची माहिती जाणून घेणार आहोत.
अलेस्सांद्रो व्होल्टा यांची माहिती – Alessandro Volta Information in Marathi
जन्म
अलेस्सांद्रो व्होल्टा यांचा जन्म इटली मधला आहे. १८ फेब्रुवारी १७४५ मध्ये अलेस्सांद्रो व्होल्टा यांनी इटली मध्ये जन्म घेतला. अलेस्सांद्रो व्होल्टा यांचे पूर्ण नाव अलेसांद्रो ज्यूसेप आंतोनिओ अनास्तासिओ व्होलटा असे आहे. इटली मधील कोमो हे अलेस्सांद्रो व्होल्टा यांच जन्म ठिकाण आहे.
अलेस्सांद्रो व्होल्टा जेव्हा जन्माला आले तेव्हा पुढील चार वर्ष त्यांनी तोंडातून “अ” सुद्धा काढला नव्हता. व्होलटा एका गरीब कुटुंबातले होते. अलेस्सांद्रो हे त्यांच्या कुटुंबातील चौथे अपत्य होते. अलेस्सांद्रो यांना तीन बहिणी होत्या.
अलेस्सांद्रो व्होल्टा हे जेव्हा सात आठ वर्षाचे होते तेव्हा, त्यांच्या वडिलांचे दुःखद मरण झालं. वडिलांच्या जाण्याने घरावर कर्जाचा डोंगर कोसळलं. वडिलांच्या मृत्यूनंतर अलेस्सांद्रो त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्यांच्या काकूंकडे शिफ्ट झाले.
- नक्की वाचा: अल्बर्ट आईनस्टाईन यांची माहिती
शिक्षण आणि वैयक्तिक आयुष्य
अलेस्सांद्रो व्होल्टा एका गरीब कुटुंबातले होते. त्याशिवाय अलेस्सांद्रो जेव्हा चार वर्षाचे झाले तेव्हा ते बोलायला लागले. तेथील काही प्रथांन नुसार अलेस्सांद्रो यांना त्यांच्या आईवडिलांनी ब्रुटेन येथे एका परिचारिकेच्या देखरेखीखाली ठेवले होते. अलेस्सांद्रो तेरा वर्षाचे होईपर्यंत त्यांचे शिक्षण घरीच झालं.
त्यानंतर अलेस्सांद्रो यांना त्यांच्या काका काकूंनी त्यांना शाळेमध्ये ॲडमिशन करून दिलं. अलेस्सांद्रो यांनी गेसूट्स कडून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांन मध्ये तीन वर्षे शिक्षण घेतलं. अलेस्सांद्रो यांच्या घरच्यांना वाटायचं की अलेस्सांद्रो हे वकील किंवा पुजारी बनले पाहिजेत. अलेस्सांद्रो चार वर्षाचे होईपर्यंत त्यांनी तोंडातून एक शब्द देखील काढला नव्हता.
तेच अलेस्सांद्रो वेगवेगळ्या पाच भाषांमध्ये पारंगत होते. अलेस्सांद्रो यांना इटालियन, जर्मन, लॅटिन, फ्रेंच, इंग्रजी या भाषा बोलता येत होत्या. कुटुंबाची हालत फार बेताची होती. म्हणूनच अलेस्सांद्रो यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. आणि वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी अलेसांद्रो यांना कोमाच्या एका शाळेमध्ये शिक्षक बनण्याची संधी मिळाली.
अलेस्सांद्रो व्होल्टा यांचा विवाह वयाच्या ५० व्या वर्षी झाला. डोना टेरेसा पेलेग्रीनी हे अलेस्सांद्रो व्होल्टा यांच्या पत्नीचे नाव होते. पुढे अलेस्सांद्रो यांना तीन अपत्य देखील झाली.
- नक्की वाचा: थॉमस अल्वा एडिसन यांची माहिती
शोध
अलेस्सांद्रो व्होल्टा हे इलेक्ट्रिकल बॅटरी फाउंडर म्हणजेच विद्युत बॅटरीचे शोधकर्ता मानले जातात. तसेच अलेस्सांद्रो व्होल्टा यांनी मिथेन गॅस चा देखील शोध लावला आहे. अलेस्सांद्रो व्होल्टा यांनी लावलेल्या ह्या विद्युत बॅटरीच्या शोधामुळे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रांमध्ये प्रगती घडून आली. अलेसांद्रो यांच्या या शोधानंतर अनेक वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी आपापले शोध करून इलेक्ट्रॉनिक क्षेत्रांमध्ये भर पडली.
अलेस्सांद्रो व्होल्टा यांनी वयाच्या विसाव्या वर्षी पहिला वैज्ञानिक पेपर लिहला. या पेपर मध्ये अलेस्सांद्रो व्होल्टा यांनी दोन वेगवेगळ्या पदार्थांना एकत्र करून त्यांच्या पासून वीज निर्मिती करता येते असं सांगितलं होतं. इसवीसन १७९९ मध्ये अलेस्सांद्रो व्होल्टा यांनी व्होल्टाईक पाईल या बॅटरी चा शोध लावला. ही बॅटरी एक इलेक्ट्रिकल बॅटरी असते.
जी कंटिन्यू इलेक्ट्रिकल प्रवाह देऊ शकते. हा प्रयोग व्होल्टा यांनी १७९९ साली संपूर्ण जगासमोर प्रकाशित केला. या शोधानंतर अलेस्सांद्रो व्होल्टा यांनी ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे पाण्यामध्ये विद्युत विघटन कसे होते. यांचे देखील काही शोध जगासमोर मांडले. इसवीसन अठराशे मध्ये अलेस्सांद्रो व्होल्टा यांनी इलेक्ट्रिकल बॅटरी चा शोध लावला.
त्यामुळे आज जगाने इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती करून ठेवली आहे. या शोधामुळे बरेच मार्ग अडचणी मोकळ्या झाल्या. इलेक्ट्रोकेमिकल बॅटरी तांबे आणि जस्त च्या समूहापासून बनवली जाते. हा समूह समुद्रात भिजलेल्या पेपरच्या डेक्स पासून विभक्त केला जातो. त्यामुळे बराच वेळ इलेक्ट्रिकल प्रवाह सुरू ठेवता येतो.
या शोधामुळे व्होल्टा यांना सिद्ध करता आले की इलेक्ट्रिसिटी रसायनापासून देखील बनवली जाऊ शकते. हायड्रोजन दिव्याचा शोध देखील अलेस्सांद्रो व्होल्टा यांनी लावला आहे. याचं वर्णन सांगायचं झालं तर एका काचेच्या ग्लोब सह ब्रास बेस आणि स्टॉप कॉक सह पितळी कॉलर असते. वर एका नोझल मध्ये वाकडी अशी ट्यूब असते.
- नक्की वाचा: आर्किमिडीज यांची माहिती
पितळी कॉलर वर फुलदाणी सारखे ग्लास रिझरवोयर बसवतात. रिझरवोयर मधून पाणी ओतल्यावर पाण्याच्या दबावामुळे ग्लोब मधील हायड्रोजन नोजल मधून निघून जाते. आणि इलेक्ट्रिक फोर्सच्या छोट्या स्पार्क मुळे वायु टेपर पेटला जातो. अलेस्सांद्रो व्होल्टा यांनी पेविया विद्यापीठांमध्ये चाळीस वर्षं प्रयोगिक भौतिकशास्त्रज्ञ म्हणून कार्य केले.
व्होल्टा यांनी लावलेल्या या संशोधनामुळे बाकीच्या वैज्ञानिकांमध्ये देखील वेगवेगळे संशोधन करून दाखवण्याची प्रेरणा जागृत झाली. एका प्रकारे अलेस्सांद्रो व्होल्टा हे सगळ्यांसाठीच आदर्श बनले. त्यांनी जगासमोर महत्त्वपूर्ण संशोधन मांडलं आणि याच शोधांमुळे पुढे जगात इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिज्ञम या दोन क्षेत्रांमध्ये प्रगती होऊ लागली.
वोल्ट हे एकक सुद्धा अलेस्सांद्रो व्होल्टा यांच्या नावावरून आलं आहे. अलेस्सांद्रो व्होल्टा यांनी मिथेन वायूचा देखील शोध लावला आहे. अलेस्सांद्रो व्होल्टा हे मिथेन गॅस वेगळे करणारे पहिले व्यक्ती होते.
अलेस्सांद्रो व्होल्टा जेव्हा ३१ वर्षाचे होते तेव्हा त्यांनी लावलेल्या या शोधामध्ये त्यांना असं जाणवून आलं की, विद्युत स्पार्क मुळे बंद कंटेनर मधील मिथेन एयर फुटू शकते. अलेस्सांद्रो व्होल्टा यांच्या मते प्रत्येक धातूची एक विशिष्ट शक्ती आहे जी धातु दुधातून मध्ये भिन्न असते आणि विद्युत द्रव गती मध्ये ठेवते.
प्रयोगाची भाषा कोणत्याही युक्तिवाद आपेक्षा अधिकृत असते, तत्थे आपल्या वर्णभेदाचा नाश करू शकतात. प्रयोग जेव्हा तुम्ही चुकीचे असल्याचे दर्शवतात तेव्हा आपण अगदी आकर्षक कल्पना दाखवण्यास आवश्यक तयार असावे.
- नक्की वाचा: जेम्स वॅट यांची माहिती
पुरस्कार
अलेस्सांद्रो व्होल्टा यांना त्यांनी केलेल्या कार्यामुळे काही पुरस्कार देखील जाहीर झाले आहेत. इसवीसन १७९४ मध्ये अलेस्सांद्रो व्होल्टा यांना “कोपली पदक” मिळालं होतं. “लिजन ऑफ होनर”, “ऑर्डर ऑफ दि आयर्न क्राऊन” इत्यादी पुरस्कार अलेस्सांद्रो व्होल्टा यांना मिळाली आहेत.
मृत्यू
अलेस्सांद्रो व्होल्टा एक इटालियन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी मिथेनचा शोध लावला. त्या सोबतच जगातील पहिली विद्युत बॅटरी हा शोध देखील त्यांनी लावला. त्यामुळे त्यांनी आपल्या क्षेत्रात दिलेलं योगदान भरपूर मोठ आहे. इसवी सन १८१९ मध्ये अलेस्सांद्रो इटली मधील कोमो येथे त्यांच्या राहत्या घरी राहत होते.
फ्राझिअन ऑफ कोमो जे आता कॅमॅनागो व्होल्टा म्हणून ओळखला जात. अलेस्सांद्रो व्होल्टा यांना एक रुदय विकाराचा तीव्र झटका देखील येऊन गेला होता. परंतु, त्यावर विजय प्राप्त करण्यामध्ये ते यशस्वी ठरले. प्रकृती बिघडली असून सुद्धा त्यांनी काम करायचं कधीच थांबवलं नाही. वयाच्या ७४ व्या वर्षी देखील वोल्टा निवृत्त झाले नाही.
तर, ५ मार्च १८२७ रोजी अलेस्सांद्रो व्होल्टा यांचं आपल्या राहत्या घरी निधन झालं. अलेस्सांद्रो व्होल्टा ८२ वर्षाचे असताना कोमो येथे त्यांचे निधन झाले. आज इलेक्ट्रिकल बॅटरीचा मानवी जीवनामध्ये महत्त्वपूर्ण वाटा आहे.
याच बॅटरीचा शोध ज्यांनी लावला ते म्हणजे अलेस्सांद्रो व्होल्टा यांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिकल काँग्रेसने विद्युतदाब शक्तीचे एककला “होल्टेज” अस नाव अलेस्सांद्रो व्होल्टा यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. इतकच नव्हे तर चंद्रावरील एक खड्डा आणि एक लघुग्रह देखील अलेस्सांद्रो व्होल्टा यांच्या नावावर ठेवला आहे.
अलेस्सांद्रो व्होल्टा यांना त्यांनी केलेल्या कार्यामुळे काही पुरस्कार देखील जाहीर झाले आहेत. इसवीसन १७९४ मध्ये अलेस्सांद्रो व्होल्टा यांना “कोपली पदक” मिळालं होतं. “लिजन ऑफ होनर”, “ऑर्डर ऑफ दि आयर्न क्राऊन” इत्यादी पुरस्कार अलेस्सांद्रो व्होल्टा यांना मिळाली आहेत.
आम्ही दिलेल्या alessandro volta information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर अलेस्सांद्रो व्होल्टा यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या alessandro volta electric battery information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of alessandro volta in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये alessandro volta invention Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट