आंबोळी रेसिपी मराठी Amboli Recipe in Marathi

Amboli Recipe in Marathi आंबोळी रेसिपी मराठी आंबोळी हा एक पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ असून हा महाराष्ट्रामध्ये कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बनवला जातो. पूर्वीच्या काळी हा पदार्थ गृहुणी रोजच्या जेवणामधून काही वेगळेपणा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून खायच्या आणि त्यामधील एक लोकप्रिय आणि आवडीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे आंबोळी. पूर्वीच्या काळी हा पदार्थ स्त्रिया हमखास बनवून खात होत्याच पण आत्ता देखील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या काही इतर भागामधील स्वयंपाक घरामध्ये आंबोळी हा पदार्थ खूप आवडीने बनवला जातो आणि खाल्ला जातो.

सामान्यता लोक आंबोळी हा पदार्थ पिवळी बटाट्याची भाजी किंवा घट्ट खोबऱ्याच्या चटणी सोबत खाल्ले जाते परंतु महाराष्ट्रामध्ये आंबोळी हा पदार्थ मटन किंवा चिकन रस्याबरोबर किंवा सुक्या बरोबर खातात आणि हे किंवा चिकन रस्याबरोबर किंवा सुक्या बरोबर खूप छान लागतात. चला तर मग आज आपण या लेखामध्ये अंबोली हा पदार्थ कसा बनवायचा याबद्दल माहिती घेवूयात.

 amboli recipe in marathi
amboli recipe in marathi

आंबोळी रेसिपी मराठी – Amboli Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० ते ३५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन (कोकण)
बनवण्याची पध्दतखूप सोपी

आंबोली रेसिपी मराठी – rava amboli recipe in marathi

आंबोळी रेसिपी आपण दोन पकारे बनवू शकतो एक म्हणजे पारंपारिक आंबोली रेसिपी आणि दुसरी तांदूळ व उडदाची डाळ भिजत घालून बनवलेली आंबोळी. चला तर आता आपण आंबोळी दोन्हीही प्रकारे कशी बनवायची ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० ते ३५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन ( कोकण )
बनवण्याची पध्दतखूप सोपी

पारंपारिक आंबोळी रेसिपी – traditional amboli recipe 

आंबोळी हा पदार्थ महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो खुप लोक आवडीने खातात आणि हा पदार्थ घराच्या घरी बनवण्यास देखील खूप सोपा आहे आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतो. पारंपारिक आंबोळी रेसिपी हि बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते आणि खूप कमी वेळेमध्ये पारंपारिक आंबोली तयार होते. चला तर मग पाहूयात पारंपारिक आंबोळी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.

पारंपारिक आंबोळी रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make traditional amboli recipe 

  • ३ वाटी तांदळाचे पीठ.
  • १/२ चमचा जिरे.
  • २ ते ३ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
  • १/२ मोठा चमचा कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).

आंबोळी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make amboli recipe

  • पारंपारिक आंबोळी रेसिपी बनवताना आपल्याला सर्वप्रथम जवारी तांदूळ घेवून तो स्वच्छ निवडून घ्या आणि मग तो गिरणीतून किंवा घरगुती चक्की मध्ये दळून त्याचे बारीक पीठ करून घ्या.
  • आणि हे पीठ तुम्ही डब्यामध्ये एक ते २ महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवू शकता.
  • आता त्या दळून आणलेल्या पिठामधील ३ वाटी पीठ एका खोल भांड्यामध्ये घ्या म्हणजे ते आपल्याला चांगले कालवता येई.
  • आता या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून त्यामधील गाठी फोडून घ्या आणि मग ते पीठ चांगले पातळ करा . आता त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि त्याच्यावर झाकण ठेवून ते १५ ते २० मिनिटे चांगले भिजू द्या. ( टीप : तुम्हाला जर हिरवी मिरची आणि कोथिंबीर आंबोळीमध्ये घालायची नसेल तर तुम्ही घातली नाही तरी चालते ).
  • त्यानंतर गॅसवर मध्यम आचेवर नॉन स्टिक तवा ठेवा आणि तवा गरम झाला कि त्यावर तेल सोडा आणि मग आंबोळीचे पीठ थोडे एकजीव करून ते वाटीने तव्यावर गोल पसरा आणि बाजूने तेल सोडून आंबोळी चांगली पचू द्या तोपर्यंत खालची बाजू चांगली भाजलेली असेल.
  • मग आंबोळी पचली कि वरची बाजू खाली टाका आणि तेल सोडा आणि ती बाजू देखील चांगली भाजून घ्या.
  • अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या सर्व पिठाच्या आंबोळ्या बनवू शकता.
  • गरमागरम आंबोळी बटाट्याच्या भाजीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घालून केली जाणारी आंबोळी – modern amboli recipe 

तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घालून देखील त्याचे बॅटर बनवून जर आपण आंबोळी बनवली तर ती देखील खूप छान लागते परंतु या प्रकारे आंबोली बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो. चला तर मग ह्या प्रकारची आंबोळी कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घालून बनवलेल्या आंबोळीसाठी लागणारे साहित्य  – ingredients needed to make amboli 

या प्रकारची आंबोळी बनवण्यासाठी देखील मोजकेच साहित्य लागते जे आपल्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असू शकते. चला तर मग पाहूयात आंबोळी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • ३ वाटी तांदूळ.
  • दीड वाटी उडदाची डाळ.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).

तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घालून आंबोळ्या कश्या बनवायच्या – process to make amboli recipe 

  • सर्वप्रथम तांदूळ आणि डाळ घ्या आणि ते स्वच्छ निवडून घ्या आणि मग ते दोन्हीही एकत्र करून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या. मग त्यामधील धुतलेले पाणी काढून परत त्त्यामध्ये तांदूळ आणि डाळ बुडतील एवढे पाणी घालून ते ६ ते ७ तास भिजत ठेवा.
  • ६ ते ७ तासाने हे चांगले भिजले कि ते थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेवून त्याचे बारीक आणि गुळगुळीत बॅटर बनवून घ्या आणि ते बॅटर परत ५ ते ६ तास भिजू द्या.
  • बॅटर भिजले कि त्यामध्ये थोडे पाणी आणि चवीपुरते मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर नॉन स्टिक तवा ठेवा आणि तवा गरम झाला कि त्यावर तेल सोडा आणि मग खोल चमच्याने आंबोळीचे बॅटर तव्यावर घाला आणि त्या बॅटरवर गोल चमच्या फिरवून ते थोडे मोठे करून घ्या आणि मग ती आंबोळी दोन्ही बाजूनी तेल सोडून चांगली भाजून घ्या.
  • अश्या प्रकारे सर्व आंबोळ्या बनवून घ्या.
  • गरमागरम आंबोली बटाट्याची भाजी, मटन किंवा चिकन रस्याबरोबर किंवा सुक्या बरोबर सर्व्ह करा.

आंबोळी कश्या सोबत खातात – serving suggestions

गरमागरम आंबोली आपण चहा पिता पिता तशीच तुकडे मोडून खावू शकतो तसेच आंबोळी सामान्यता बटाट्याची भाजी किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत खाल्ली जाते. तसेच काही ठिकाणी मटन किंवा चिकन रस्याबरोबर किंवा सुक्या बरोबर सर्व्ह करा.

टिप्स ( tips ) 

  • आंबोळी बनवताना आपण तांदळाच्या पिठामध्ये १ चमचा बेसन पीठ देखील घालू शकतो.
  • तांदळाचे पीठ भिजवल्यानंतर लगेच बनवू नका नाही तर आंबोळ्या चांगल्या बनत नाहीत ते १५ ते २० मिनिटे भिजू द्या.

आम्ही दिलेल्या amboli recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आंबोळी रेसिपी मराठी amboli recipe chakali बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या amboli chutney recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि amboli pith recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये amboli recipe in marathi madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!