थालीपीठ भाजणी रेसिपी मराठी Thalipeeth Recipe in Marathi

Bhajaniche Thalipeeth Recipe in Marathi थालीपीठ भाजणी रेसिपी मराठी थालीपीठ हा पदार्थ महाराष्ट्रातील एक पारंपारिक पदार्थ आहे जसे काही महाराष्ट्रीयन घरामध्ये पोहे, शिरा, उपमा आणि भाजी भाकरी जशी रोजच्या सकाळच्या नाश्त्यासाठी बनवले जातात त्याप्रमाणे थालीपीठ हा पदार्थ देखील काही घरांमध्ये खूप आवडीने सकाळच्या नाश्त्यासाठी बनवला जाणारा एक पदार्थ आहे. थालीपीठ हा पदार्थ वेगवेगळ्या पिठांच्या पासून म्हणजेच आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या पिठांच्यापासून किंवा थालीपीठची भाजनी बनवून त्याचे पीठ बनवून आपण जेंव्हा हवे आहे तेंव्हा थालीपीठ बनवू शकतो. तसेच या पिठा मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून वेगवेगळ्या भाज्यांच्या थालीपीठ बनवू शकतो.

जसे कि दुधीचे थालीपीठ, काकडीचे थालीपीठ आणि बटाट्याचे थालीपीठ यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ आपण बनवून खावू शकतो. थालीपीठ हा पदार्थ आपण नाश्त्यासाठी बनवून त्यासोबत दही, रायता किंवा इतर काही पदार्थ देखील खावू शकतो आणि हे आपण लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत हे आपण सर्वांच्यासाठी बनवू शकतो कारण हे पौष्टिक असते.

थालीपीठ हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे तसेच हा पदार्थ खूप कमी वेळेमध्ये आणि भाजणी पीठ तयार असेल तर खूप कमी साहित्यामध्ये बनतो. आज या लेखामध्ये आपण पौष्टिक आणि महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ म्हणून ओळखल्या जाणारे थालीपीठ कसे बनवायचे याबद्दल माहिती घेणार आहोत.

Thalipeeth Recipe in Marathi
Thalipeeth Recipe in Marathi

थालीपीठ भाजणी रेसिपी मराठी – Thalipeeth Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ २० मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ १० मिनिटे
एकूण लागणारा वेळ ३० मिनिटे
पाककला भारतीय

थालीपीठ भजनी कशी बनवायची – how to make bhajaniche thalipeeth recipe in marathi

थालीपीठ बनवताना आपल्याला सर्वप्रथम भाजणी किंवा वेगवेगळ्या पीठाचे मिश्रण एकत्र करून त्याचे थालीपीठ बनवावे लागते म्हणून आपण थालीपीठ बनवण्याच्या अगोदरच भाजणी करून त्याचे पीठ बनवून ठेवले तर ते आपल्याला सोपे जाते म्हणून आपण थालीपीठ भाजणी कशी बनवायची याबद्दल माहिती घेवूयात.

थालीपीठ भाजणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – thalipeeth ingredients

 • १ वाटी तांदूळ, १ वाटी हरभरा डाळ, १ वाटी गहू, १ वाटी ज्वारी आणि १ वाटी मुगाची डाळ, १ चमचा धने-जिरे.

थालीपीठ भाजणी तयार करण्यासाठी केली जाणारी कृती 

 • सर्वप्रथम धने-जिरे सोडून वरती दिलेले सर्व साहित्य कडक उन्हामध्ये चांगले तापवून घ्या किंवा कडक वाळवून घ्या.
 • मग आता गसॅवर मध्यम आचेवर एक मोठी कढई ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये धने-जिरे थोडे गरम करून घ्या आणि ते लगेच कढईमधून बाहेर काढा.
 • आता या कढईमध्ये तांदूळ, हरभरा डाळ, गहू, ज्वारी आणि मुग डाळ घालून हे सर्व मिश्रण मध्यम आचेवर चांगले कडक भाजून घ्या (टीप : हे सर्व भाजत असताना मिश्रण सतत वर खाली करा त्यामुळे त्यामधील सर्व डाळी आणि धान्ये चांगली भाजतील).
 • हे सर्व मिश्रण चांगले भाजून झाले एक ते एका मोठ्या ताटामध्ये काढून ठेवा आणि थंड होईपर्यंत वाट पहा.
 • ह्या सर्व डाळी आणि कडधान्ये गार झाली कि त्यामध्ये भाजलेले धने आणि जिरे घाला आणि ते गिरणीतून बारीक दळून आणून ते एका हवा बंद डब्यामध्ये घालून ठेवा आणि तुम्हाला जेव्हा कोणत्याही प्रकारचे थालीपीठ बनवायचे असल्यास तुम्ही हे घरी बनवलेले भाजणीचे पीठ वापरू शकता.

थालीपीठ रेसिपीज ( thalipeeth recipes )

थालीपीठ हा महाराष्ट्राचा एक पारंपारिक पदार्थ आहे. या पदार्थाला पारंपारिक म्हणण्याचे कारण हा पदार्थ पूर्वीच्या काळापासून बनवला जातो आणि या पदार्थाला आज देखील तितकेच महत्व आहे. बहुतेक लोक हा पदार्थ नाश्त्यासाठी बनवतात आणि हा पदार्थ या मध्ये भाज्या घालून वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो जसे कि दुधीचे थालीपीठ, बटाट्याचे थालीपीठ आणि काकडीचे थालीपीठ, कोबीचे थालीपीठ इत्यादी. आज या लेखामध्ये आपण काही थालीपीठ रेसिपी पाहणार आहोत.

तयारीसाठी लागणारा वेळ २० मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ १० मिनिटे
एकूण लागणारा वेळ ३० मिनिटे
पाककला भारतीय

काकडीचे थालीपीठ रेसिपी कशी बनवायची – kakdi thalipeeth recipe in marathi

आपल्या सर्वांना माहित आहे कि काकडी हि किती पौष्टिक असते पण लहान मुले काकडी तशी खायला बघत नाहीत म्हणून आज आपण काकडी घालून थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूयात.

काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make thalipeeth 

 • २ वाटी थालीपीठ भाजनी पीठ.
 • दीड वाटी काकडीचा खीस.
 • १ ते २ चमचे लाल मिरची पावडर.
 • १ चमचा हळद.
 • १ चमचा ओवा.
 • दीड चमचे लसून पेस्ट.
 • १ छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर.
 • मीठ ( चवीनुसार ).
 • तेल ( आवश्यकतेनुसार ).
 • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make thalipeeth 

 • सर्वप्रथम एक मोठा बाऊल घ्या आणि त्यामध्ये थालीपीठ भाजणीचे पीठ घ्या आणि मग त्यामध्ये काकडी घाला आणि काकडी त्या पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्या. काकडी मध्ये जास्त प्रमाणात पाण्याचा अंश असल्यमुळे पीठ थोडे भिजले जाईल.
 • आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद , लसून पेस्ट , चिरलेली कोथिंबीर, ओवा आणि मीठ ( चवीनुसार ) घालून ते चांगले घट्ट मळून घ्या. ( टीप : आपण ज्यावेळी पीठ मळत असतो त्यावेळी पीठ मळण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी घ्या ).
 • आता आपण थालीपीठ बनवण्याकडे जाऊयात, सर्वप्रथम गसॅवर मध्यम आचेवर तवा ठेवा.
 • मग एक पोळपाट घ्या आणि त्यावर पांढरे शुभ्र भिजवलेले कापड घाला आणि आपण मळलेल्या पिठाचा मध्यम आकाराचा गोळा बनवून तो त्या कापडावर ठेवून हाताला पाणी लावून चांगल थापून घ्या.
 • मग तव्याला थोडे तेल लावून त्यावर थालीपीठ कापडासोबतच तव्यावर उलटे टाका आणि कापडावर गार पाणी शिंपडून कापड लगेच बाजूला काढा.
 • मग थालीपीठला बाजूने तेल सोडा आणि ते चांगले भाजून घ्या.
 • अश्या प्रकारे सर्व गोळ्याचे थालीपीठ बनवून ते तुम्ही दह्यासोबत सर्व्ह करू शकता.

दुधीचे थालीपीठ रेसिपी कशी बनवायची – dudhi bhopla thalipeeth recipe in marathi

थालीपीठ हा पदार्थ खूप प्रमाणत पौष्टिक मनाला जातो कारण यामध्ये वेगवेगळी धान्ये आणि डाळी वापरलेल्या असतात आणि या सर्व घटकांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. या पौष्टिक पदार्थामध्ये आपण दुधी भोपळ्याचा खीस घालून या पदार्थाची पौष्टिकता आपण अजून वाढवू शकतो.

दुधीचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make thalipeeth 

 • २ वाटी थालीपीठ भाजनी पीठ.
 • दीड वाटी दुधी भोपळ्याचा खीस.
 • १ ते २ चमचे लाल मिरची पावडर.
 • १ चमचा हळद.
 • दीड चमचे लसून पेस्ट.
 • १/२ चमचा आले पेस्ट.
 • अर्धी छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर.
 • मीठ ( चवीनुसार ).
 • तेल ( आवश्यकतेनुसार ).
 • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

दुधीचे थालीपीठ बनवण्यासाठी केली जाणारी कृती – pocess to make thalipeeth 

 • सर्वप्रथम एक मोठा बाऊल घ्या आणि त्यामध्ये थालीपीठ भाजणीचे पीठ घ्या आणि मग त्यामध्ये दुधी भोपळ्याचा खीस, लाल मिरची पावडर, हळद, आलं लसून पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ ( चवीनुसार ) घालून त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून ते चांगले मळून घ्या.
 • गसॅवर मध्यम आचेवर तवा ठेवा.
 • मग एक पोळपाट घ्या आणि त्यावर पांढरे शुभ्र भिजवलेले कापड घाला आणि आपण मळलेल्या पिठाचा मध्यम आकाराचा गोळा बनवून तो त्या कापडावर ठेवून हाताला पाणी लावून चांगल थापून घ्या.
 • मग तव्याला थोडे तेल लावून त्यावर थालीपीठ कापडासोबतच तव्यावर उलटे टाका आणि कापडावर गार पाणी शिंपडून कापड लगेच बाजूला काढा.
 • मग थालीपीठला बाजूने तेल सोडा आणि ते चांगले भाजून घ्या.

बटाट्याचे थालीपीठ रेसिपी कशी बनवायची – potato thalipeeth recipe in marathi

आता आपण पाहूयात बटाट्याची थालीपीठ रेसिपी कशी बनवायची.

बटाट्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make thalipeeth 

 • २ वाटी थालीपीठ भाजनी पीठ.
 • दीड वाटी उकडलेला बटाटा ( कुसकरलेला ).
 • १ ते २ चमचे लाल मिरची पावडर / हिरवी मिरची ( आवडीनुसार ).
 • १ चमचा हळद.
 • दीड चमचे लसून पेस्ट.
 • अर्धी छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर.
 • मीठ ( चवीनुसार ).
 • तेल ( आवश्यकतेनुसार ).
 • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

बटाट्याचे थालीपीठ बनवण्यासाठी केली जाणारी कृती – pocess to make thalipeeth 

 • सर्वप्रथम एक मोठा बाऊल घ्या आणि त्यामध्ये थालीपीठ भाजणीचे पीठ घ्या आणि मग त्यामध्ये कुसकरलेला बटाटा, लाल मिरची पावडर, हळद, आलं लसून पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ ( चवीनुसार ) घालून त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून ते चांगले मळून घ्या.
 • गसॅवर मध्यम आचेवर तवा ठेवा.
 • मग एक पोळपाट घ्या आणि त्यावर पांढरे शुभ्र भिजवलेले कापड घाला आणि आपण मळलेल्या पिठाचा मध्यम आकाराचा गोळा बनवून तो त्या कापडावर ठेवून हाताला पाणी लावून चांगल थापून घ्या.
 • मग तव्याला थोडे तेल लावून त्यावर थालीपीठ कापडासोबतच तव्यावर उलटे टाका आणि कापडावर गार पाणी शिंपडून कापड लगेच बाजूला काढा.
 • मग थालीपीठला बाजूने तेल सोडा आणि ते चांगले भाजून घ्या.

थालीपीठ आपण कश्यासोबत खाऊ शकतो – serving suggestions 

थालीपीठ हे नेहमी गरमागरम खावेत आणि हे दही, रायता, लोणी, सॉस किंवा लोणच्यासोबत खूप छान लागते.

आम्ही दिलेल्या Thalipeeth Recipe in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर थालीपीठ भाजणी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhajaniche thalipeeth recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि potato thalipeeth recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dudhi bhopla thalipeeth recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

Ad Blocker Detected!

Please Disable Ad Blocker to use this site as free

Refresh

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: