Anda Bhurji Recipe in Marathi – Egg Bhurji Recipe in Marathi अंडा भुर्जी रेसिपी अंडी खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक आरोग्य फायदे मिळतात आणि म्हणूनच बहुतेक लोक आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा अंडी खातात. अंड्यामध्ये प्रथिने असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदे होता तसेच अंडी खाल्ल्यामुळे आपली उर्जा देखील वाढते. तसेच डॉक्टर देखील आपल्याला रोज एक उकडलेले अंडे खायला सांगतात. पण रोज आपल्याला उकडलेले अंडे खाणे कंटाळवाणे वाटते त्यावेळी आपण अंड्यापासून वेगवेगळ्या डीश बनवून खावू शकतो जसे कि अंडा करी, अंडा भुर्जी, अंडा ऑमलेट, अंडा बिर्याणी, अंडा मसाला याप्रकारचे वेगवेगळे पदार्थ बनवून खावू शकतो.
परंतु आज आपण या लेखामध्ये अंडा भुर्जी रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अंडा भुर्जी हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडते आणि हि रेसिपी भारतामध्ये सर्व ठिकाणी बनवली जाते आणि आवडीने चपाती किंवा ब्रेड सोबत खावू शकतो. चला तर आता आपण झटपट बनणारी आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनणारी एक सोपी आणि स्वादिष्ट अंडा भुर्जी कशी बनवायची ते पाहूयात.
अंडा भुर्जी रेसिपी – Anda Bhurji Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ८ ते १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
वाढणी | ३ ते ४ व्यक्ती |
डिश प्रकार | नॉन व्हेज |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
- अंडी : अंडा भुर्जी बनवण्यासाठी अंडी हे महत्वाचा घटक आहे जो फोडून त्याचा आतला भाग फोडणीमध्ये टाकला जातो आणि मग ते सतत हलवत राहून मिक्स केले जाते.
- टोमॅटो : टोमॅटो हा देखील एक महत्वाचा घटक आहे ज्यामुळे भूर्जीला चांगली टेस्ट येते.
- तिखट आणि मीठ : अंडा भुर्जी बनवण्यासाठी तिखट आणि मीठ हे देखील मुख्य घटक आहेत कारण लाल तिखट घातल्यामुळे भूर्जीला तिखटपणा येतो आणि मिठामुळे भूर्जीला चव येते.
अंडा भुर्जी रेसिपी – how to make egg bhurji recipe in marathi
अंडा करी भारतामध्ये लोक आवडीने खातात ती रेस्टॉरंट / हॉटेल असो किंवा घरामध्ये असो. अंडा भुर्जी रेसिपी हि चविष्ट असल्यामुळे सर्वांना खूप आवडते तसेच हि रेसिपी नॉनव्हेज मध्ये मोडते आणि बहुतेक लोक हि रेसिपी घरामध्ये बनवून खाण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी खास आज आपण अंडा भुर्जी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | ८ ते १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
वाढणी | ३ ते ४ व्यक्ती |
डिश प्रकार | नॉन व्हेज |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
अंडा भुर्जी बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि जर ते आपल्या घरामध्ये उपलब्ध नसेल तर आपण ते बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. जर आपल्या कुटुंबामध्ये सतत अंड्याचे पदार्थ खाणारे व्यक्ती असतील तर अंडी देखील आपल्या घरामध्ये उपलब्ध असू शकतात. अंडा भुर्जी बनवण्यासाठी अंडी, टोमॅटो, कांदा आणि काही इतर साहित्य लागते. चला तर आता आपण अंडा भुर्जी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ३ अंडी.
- १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला ).
- १ टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
- १ चमचा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १/२ चमचा जिरे.
- मीठ ( चवीनुसार ).
- २ चमचे कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
- १ मोठा चमचा तेल.
आता आपण वरील साहित्य वापरून अंडा भुर्जी कशी बनवायची ते पाहूयात.
- सर्वप्रथम अंडा भुर्जी बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून बाजूला ठेवा.
- त्याचबरोबर आता एक मोठ्या वाटीमध्ये अंडी फोडून ती थोडी एकजीव करा आणि बाजूला ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये एक चमचा तेल घाला आणि ते गरम झाले कि त्यामध्ये जिरे टाका आणि ते चांगले फुलले कि त्यामध्ये लगेच बारीक चिरलेला कांदा घाला आणि कांदा तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत भाजा.
- कांदा चांगला भाजला कि त्यामध्ये टोमॅटो घाला आणि तो तेलामध्ये मिक्स करून तो टोमॅटो देखील १ मिनिट भाजा.
- आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घाला आणि ते मिक्स करा.
- आता या मिश्रणामध्ये फोडून ठेवलेली अंडी घाला आणि ते चमच्या मिक्स करून सतत हलवत राहा. हे मिश्रण जो पर्यंत हलवा कि ते मिश्रण चांगले सुट्टे होणार नाही. हे मिश्रण चांगले सुट्टे झाले कि त्यामध्ये कोथिंबीर टाका आणि मिक्स करून त्यावर झाकण लावून ते मंद आचेवर २ ते ३ मिनिटे वाफवून घ्या.
- तुमची अंडा भुर्जी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.
अंडा भुर्जी कश्यासोबत खातात – serving suggestions
- गरमागरम अंडा भुर्जी आपण ब्रेड सोबत किंवा चपाती सोबत देखील खावू शकतो.
टिप्स (Tips)
- अंडा भुर्जी हि रेसिपी गरमागरम सर्व्ह करा.
- अंडा भुर्जी मध्ये आपण लाल मिरची पावडर ऐवजी ताज्या हिरव्या मिरच्या चिरून घालू शकतो.
- जर आपण भुर्जी हलवत असताना त्यामध्ये जर एक चमचा दुध घातले तर मिश्रण लगेच सुट्टे होते.
आम्ही दिलेल्या Anda Bhurji Recipe in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर अंडा भुर्जी रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या boiled egg bhurji recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि recipe of egg bhurji in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये egg bhurji recipe in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट