Anda Masala Recipe in Marathi अंडा मसाला रेसिपी अंड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या डीशेस बनवल्या जातात जसे की अंडा करी, अंडा ऑमलेट, अंडा भुर्जी, अंडा मसाला, अंडा बिर्याणी बनवले जातात आणि हे अंड्यापासून बनवलेले सर्वच पदार्थ खूप टेस्टी असतात. अंड्यामध्ये मोठ्या त्यामुळेप्रमाणात प्रथिने असतात आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे डॉक्टर सतत आजारी पडणाऱ्या लोकांना रोज एक अंडे खाण्य्सा सांगतात ते उकडून असो किंवा मग मसाला, करी किंवा भुर्जी असो. अंड्यापासून बनवले जाणारे पदार्थ भारतामध्ये बहुतेक लोकांना आवडतात आणि अंड्यापासून भारतात्मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू खातात.
पण आज आपण भारतातील बहुतेक स्वयंपाक घरांमध्ये बनणारा एक लोकप्रिय आणि स्वादिष्ट पदार्थ अंडी मसाला रेसिपी पाहणार आहोत. अंडा मसाला रेसिपी हि खूप सोपी रेसिपी असून हि रेस्टॉरंट मध्ये तसेच भारतीय स्वयंपाक घरांमध्ये वारंवार केली जाणारी डिश आहे आणि हि कित्येक लोकांची आवडती डिश आहे.
अंडा मसाला हि रेसिपी थोडी तिखट आणि मसालेदार असल्यामुळे हि रेसिपी खूप लोकांना आवडते आणि म्हणून हे हि डिश रेस्टॉरंट मध्ये किंवा घरामध्ये बनवून आवडीने खातात. अंडा मसाला हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये बनवता येते. चला तर आता आपण अंडा मसाला कसा बनवायचा ते पाहूयात.
अंडा मसाला रेसिपी मराठी – Anda Masala Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
पाककला | भारतीय |
- अंडी : अंडा मसाला बनवण्यासाठी अंडी हा महत्वाच घटक आहे कारण उकडलेली अंडी सोलली जातात आणि मग आपण बनवलेल्या मसाल्यामध्ये घातली जातात आणि मग मासाल्यासोबत सर्व्ह केली जातात.
- खोबरे आणि तीळ : अंडा मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामधील महत्वाचे साहित्य म्हणजे खोबरे आणि तील ज्यामुळे मसाला दाट होतो आणि मसाल्याला चांगली टेस्ट देखील येते.
- मसाले : अंडा मसाला मध्ये आपण काही मसाले वापरतो ज्यामुळे रेचीपिला एक वेगळीच टेस्ट येते आणि खमंग वास देखील येतो.
अंडा मसाला रेसिपी – anda masala recipe marathi
थोडी तिखट आणि मसालेदार अंडा मसाला हि रेसिपी भारतामध्ये काही ठिकाणी लोक आवडीने खातात आणि हि बनवण्यासाठी देखील खूप सोपी आहे आणि झटपट म्हणजेच २५ ते ३० मिनिटामध्ये बनते. लहानांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत अंडा मसाला हा पदार्थ सर्वांना आवडतो आणि हा भारतामध्ये सर्व ठिकाणी जरी बनत असला तरी तो भारतातील वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पध्दतीने बनवला जातो.
चला तर आता खूप सोपी आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनते. चला तर आता आपण अंडा मसाला कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
पाककला | भारतीय |
अंडा मसाला बनवण्यासाठी अंडी, खोबरे, तीळ, लाल मिरची पावडर, आणि काही मसाले हे मुख्य साहित्य लागते. त्याचबरोबर हि रेसिपी बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते पण सर्वच साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते असे नाही तर अंडा मसाला बनवण्यासाठी लागणारे काही साहित्य आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते आणि काही साहित्य घरामध्ये उपलब्ध असते. जे साहित्य घरामध्ये उपलब्ध नाही ते साहित्य आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर आता आपण अंडा मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ४ अंडी ( चांगली उकडलेली ).
- १ बारीक चिरलेला कांदा ( फोडणीसाठी ).
- १ मध्यम आकाराचा कांदा ( उभा चिरलेला ).
- अर्धी वाटी वाळलेले खोबरे ( काप केलेले )
- १ बदाम फुल, १ वेलदोडा.
- १ चमचा आले लसून पेस्ट.
- ३ ते ४ मोठे चमचे तीळ.
- १ मोठा चमचा जीरा.
- २ ते ३ चमचे लाल मिरची पावडर.
- १ चमचा गरम मसाला.
- १/२ चमचा हळद.
- दीड मोठा चमचा तेल.
- कोथिंबीर ( आवश्यकतेनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
आता आपण झणझणीत आणि मसालेदार अंडा मसाला वर दिलेले साहित्य वापरून कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
- सर्वप्रथम ४ अंडी घ्या आणि ती भांड्यामध्ये पाणी घालून ते भांडे मध्यम आचेवर गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये अंडी घालून त्यावर झाकण लावून ती १० ते १५ मिनिटे चांगली उकडून घ्या. अंडी उकडल्यानंतर गॅस बंद करून ठेवा आणि ते गार होऊ द्या.
- अंडी गार झाली कि ती सोलून बाजूला ठेवा.
- आता एक कढई घ्या आणि ती मध्यम आचेवर गरम करा आणि त्यामध्ये सर्वप्रथम वाळलेले खोबरे भाजून घ्या आणि मग त्यामध्ये तीळ, जिरे, बदाम फुल आणि वेलदोडा भाजून घ्या आणि ते बाजूला काढून घ्या.
- मग त्याच कढई मध्ये १ चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा चांगला खरपूस रंग येई पर्यंत भाजून घ्या. कांद्याला खरपूस रंग येईपर्यंत कांदा भाजल्यानंतर गॅस बंद करा आणि तो कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढा त्यामध्ये भाजलेले तीळ, जिरे आणि भाजलेले खोबरे आणि बारीक चिरलेली २ ते ३ चमचे कोथिंबीर घाला आणि ते सर्व मिश्रण मिक्सरवर फिरवून घेवून त्याचे बारीक वाटण करून घ्या आणि त्यामध्ये गरज असेल तर पाणी घालून ते परत फिरवून घ्या म्हणजे आपले वाटण थोडे मऊ होईल. आता हे वाटलेले मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवा.
- आता परत कढई घ्या आणि त्यामध्ये तेल घालून गॅस मध्यम आचेवर ठेवा. तेल चांगले गरम झाले कि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि आले लसून पेस्ट घाला आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
- मग त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला घाला आणि ते चांगले एकत्र करून २ ते ३ मिनिटे भाजून घ्या आणि मग त्यावर झाकण ठेवून ते ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्या.
- आता झाकण काढून त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून ते चांगले एकत्र करा आणि त्यामध्ये थोडे पाणी घाला आणि ते थोडा वेळ ( ४ ते ५ मिनिटे ) शिजवून घ्या.
- मग त्यामध्ये उकडलेली आणि सोललेली अंडी घाला आणि ती मसाल्यामध्ये मिक्स करा आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. तुमचा अंडा मसाला रेसिपी सर्व्ह करण्यासाठी तयार झाला.
अंडा मसाला कश्यासोबत खातात – serving suggestions
- अंडा मसाला आपण रोटी, नान, चपाती, पुलके किंवा पांढऱ्या भातासोबत खावू शकतो.
अंड्यामध्ये असणारे पोषक घटक – nutritional value
पोषक घटक | प्रमाण ( १ अंडे ) |
कॅलरी | ७० |
प्रथिने | ६ ग्रॅम |
जीवनसत्व अ | १० टक्के |
कॅल्शियम | २ टक्के |
जीवनसत्व ड | १५ टक्के |
जीवनसत्व इ | १५ टक्के |
जीवनसत्व ब १२ | ५० टक्के |
लोह | ६ टक्के |
फोलेट | १५ टक्के |
आम्ही दिलेल्या anda masala recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर अंडा मसाला रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dhaba style anda masala recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि anda masala fry recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये anda masala recipe in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट