अनुताई वाघ यांची माहिती Anutai Wagh Information in Marathi

Anutai Wagh Information in Marathi अनुताई वाघ यांची माहिती समाज सुधारक जे समाजाचे हितचिंतक असतात. समाजामध्ये प्रबोधन व जागृती निर्माण करतात. आपल्या महाराष्ट्राला देखील असेच थोर महान समाजसुधारक लाभले. आजच्या लेखामध्ये आपण अनुताई वाघ या थोर शिक्षणतज्ञ व समाजसुधारक विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अनुताई वाघ यांनी एकोणिसाव्या शतकामध्ये प्रसिद्ध समाज सुधारक व बाल शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्या नेतृत्वाखाली समाजामध्ये शिक्षणाविषयी जागृती पसरवली. राष्ट्राचा सामाजिक व सांस्कृतिक विकास साधणाऱ्या अनुताई वाघ यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

anutai wagh information in marathi
anutai wagh information in marathi

अनुताई वाघ यांची माहिती – Anutai Wagh Information in Marathi

पूर्ण नाव (Name)अनुताई वाघ
जन्म (Birthday)१७ मार्च १९१०
जन्म गाव (Birth Place)पुण्यातील मोरेगाव
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)समाज सुधारक

जन्म

अनुताईचा जन्म १७ मार्च १९१० रोजी पुण्यातील मोरेगाव येथे झाला. अनु ताईंना पाच भावंडे होती त्यातील अनुताई सर्वात मोठ्या होत्या. अनुताईंच्या घरची परिस्थिती देखील हालाखीची होती. त्याशिवाय त्यांच्या वडिलांच्या सारख्‍या बदली व्हायच्या ज्यामुळे त्यांना एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतर करावं लागायचं. या काही कारणांमुळे अनुताई यांचं शिक्षण अर्धवटच राहिलं.

शिवाय घरच्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजेच इसवी सन १९२३ मध्ये अनुताई यांचा विवाह शंकर वामन जातेगावकर यांच्याशी लावून दिला. परंतु सहा महिन्यांमध्ये अनुताई यांच्या पतीचे निधन झाले आणि अनुताई यांना विधवापन आलं. परंतु १३ वर्षाच्या त्या चिमुकलीने या सर्व अवघड प्रसंगांवर मात करत हसत आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याचा निर्णय घेतला.

अनुताई वाघ- ज्ञानज्योत

लहान वयातच अनुताई वाघ यांना कठीणातून कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. काही वैयक्तिक कारणास्तव त्यांचं शिक्षण अधुर राहीलं. परंतु अनुताईंच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आईची मैत्रीण दुर्गाबाई नेणे यांच्या येण्याने अनुताई यांच्या आयुष्यामध्ये नवीन आशेचा किरण जागा झाला. दुर्गाबाई नेने यांनी त्यांच्या ओळखीवर अकोल्यामध्ये अनुताई यांना राष्ट्रीय शाळेमध्ये प्रवेश करून दिला.

अनुताईंच्या शिक्षण पुन्हा सुरू झालं एक वर्षाच्या कालावधीनंतर अनुताई इगतपुरी येथे आल्या. इगतपुरी मध्ये अनुताईंनी फायनल परीक्षा देऊन जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर येऊन सर्वांना चकित करून सोडले. पुढे चार वर्ष त्या नाशिक मध्ये नोकरी करत होत्या नंतर त्या पुण्यातील हुजूरपागेत रुजू झाल्या.

त्या घरामध्ये मोठ्या असल्यामुळे आई-बाबा नंतर त्यांच्या भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. जी त्यांनी अतिशय उत्तम रित्या पार देखील पाडली. हुजूरपागे मध्ये तब्बल तेरा वर्षे त्यांनी नोकरी केली. नोकरी करत असताना त्यांना मॅट्रिकची परीक्षा देण्याचा मन झालं आणि त्यांनी नाईट स्कूलमध्ये दाखला नोंदवला.

इसवी सन १९३८ मध्ये त्या मॅट्रिकच्या परीक्षेत पास झाल्या. अनुताई यांना शिक्षणाने झपाटलं होतं. शिक्षणाशिवाय त्यांना कुठलाही दुसरा मार्ग दिसत नव्हता शिक्षणाने माणसाची उन्नती होते या वाक्यावर त्या जगत होत्या. वयाच्या ५१ व्या वर्षीसुद्धा त्यांनी कोसबाडहुन पदवीची परीक्षा दिली. त्यावेळी त्यांना एका डोळ्यांमध्ये मोतीबिंदू देखील झाला होता.

त्यामुळे त्यांना एका डोळ्यातून दिसायचं परंतु हार न मानता त्यांनी दुसरा वाचक घेऊन जिद्दीने अभ्यास केला. आणि अतिशय उत्तम मार्गाने त्या उत्तीर्ण झाल्या. अनुताई यांना नेहमीच समाजासाठी कसायचं होतं. समाजासाठी काहीतरी कराव आपल्या शिक्षणाचा समाजाला काहीतरी फायदा व्हावा ही त्यांची इच्छा नेहमीच राहिली आहे.

परंतु घरात त्या मोठ्या असल्याने त्यांच्या भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या या कर्तव्यातून त्या बाहेर पडल्या आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवण्याची संधी चालून आली. इसवी सन १९४५ मध्ये ताराबाई मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या बोरवली येथे स्त्रियांच्या बाल शिक्षणाविषयी शिबिर घडवून आणलं होतं. या शिबिरात अनुताई यांचा देखील सहभाग होता.

आदिवासी जमातीमध्ये शिक्षणाचा प्रचार व्हावा म्हणून सर्व स्त्री वर्गाला ताराबाई मोडक यांनी बोर्डीला येऊन आदिवासी शिक्षणामध्ये आपले योगदान द्यावं असं आवाहन केलं होतं. अनुताई यांनी आदिवासी समाजामध्ये शिक्षणाची क्रांती घडवून यावी म्हणून बोर्डीला जाण्याचा निर्णय घेतला. इसवी सन १९४५ मध्ये अनुताई वाघ यांच्या आयुष्यामधील एक नवीन पर्व सुरू झाल.

एकोणिसाव्या शतकामध्ये शिक्षणाला प्राधान्य देण्यास नुकतीच सुरुवात झाली होती. मुंबई मध्ये देखील बाल शिक्षण ही नवीनच कल्पना उदयास आली होती. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार खेड्यांमध्ये तेही आदिवासी समाजात करणे हे थोडा अवघडच काम होतं. परंतु ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली अनुताई यांनी शिक्षणाचा प्रसार करण्याची जोखीम उचलली.

सुरुवातीस त्यांना या सगळ्या गोष्टी फार अवघड गेल्या परंतु ताराबाई यांच्या सोबतीने अनुताईंनी बालवाडी सुरू केली आपल्या बालवाडी मध्ये वेगवेगळी मुलं शिक्षणासाठी यावी म्हणून प्रत्येक गावातील घराघरांमध्ये जाऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न अनुताईंनी केला. कधी झांजा वाजवून मुलं गोळा केली तर कधी प्रत्येक मुलाशी त्याच्या कलेने घेत त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्या मनामध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली.

हळूहळू त्यांचं हे कार्य गावातील ग्रामस्थांना पटू लागलं आणि त्यांनी आपली मुलं ताराबाई आणि अनुताई यांच्या बालवाडीत पाठवण्यास सुरुवात केली. पांढरपेशांची म्हणा, मच्छीमारांची म्हणा, शेतकऱ्यांची, हरीजनाची सर्व जमातीची मुलं हळूहळू बालवाडी मध्ये प्रवेश घेउ लागली. पुढे ताराबाई आणि अनुताई या दोघींनी मिळून असामान्य अशी एक गोष्ट करून दाखवली. खेड्यापाड्यांमध्ये त्यांनी शिक्षणाचा प्रसार जरूर केला परंतु आदिवासी पाड्यांमध्ये शिक्षण पोचवण्यासाठी त्यांना बरेच डोंगर चढावे लागले.

आदिवासी समाज म्हटलं म्हणजे‌ डोंगरदऱ्यांच्या पलीकडे त्यांची वस्ती असते. अशा वेळी रोज या भागातून मुलं खेड्यातील शाळांमध्ये शिक्षणासाठी येणं हे खूप अशक्य होतं. म्हणून अनुताई आणि ताराबाई यांनी बोर्डी वरून पाच सहा महिने लांब असणाऱ्या आदिवासी जमातीच्या कोसबाड येथे आपला संसार उभा केला आणि या मुलांना शिकता यावं म्हणून शाळा त्यांच्यापर्यंत पोहचवल्या.

मुलं शाळेत येऊ शकत नाहीत म्हणून काय झालं अनुताई आणि ताराबाई या दोघींनी मिळून शाळाच मुलांपर्यंत पोचवली. आदिवासी समाजातील मुलांना शिक्षण देताना अनुताई यांना स्वतःची शिक्षक म्हणून एक वेगळीच ओळख झाली. प्राथमिक शिक्षणा पेक्षाही त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे जावे लागले.

या शिक्षणाची सुरुवात मुलांना अंघोळ घालने, त्यांची नखे कापणे, त्यांचे केस धुणे अर्थातच त्यांना सर्वात आधी स्वच्छता शिकवण्या पासून झाली. पुढे गप्पागोष्टी, गाणी, मजा आणि त्यातूनच अभ्यास सुरू झाला. आदिवासी समाजातील मुलांना प्रशिक्षण देत असताना अनुताईंनी आदिवासी समाजाच्या समस्या समजायला सुरुवात झाली. ज्यातून त्या समस्या समाजासमोर आणू शकल्या.

ही मुले देखील हुशार आहेत शिक्षण घेण्याची त्यांची कुवत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन अनुताईंनी या मुलांमध्ये शिक्षणाची आवड टिकून राहावी म्हणून वेगवेगळे प्रयत्न केले. जेणेकरून त्यांना या मुलांना त्यांच्या जीवनात उपयोगी असं शिक्षण देता येईल. दुर्गम भागामध्ये शिक्षण पोहोचवण्याचा अनूताईंचा सुंदर प्रयत्न यशस्वी ठरला.

इसवी सन १९५६ पासून पालघर मधील कोसबाड येथे त्यांनी आपली सेवा दिली. कोसबाड ही एक अशी जागा आहे जिथे अनुताई वाघ यांनी बराच वेळ वास्तव्य केले. त्या परिसराला साजेशी अशी कोसबाडच्या टेकडीवरून, कुरणशाळा, टिल्लूची करामत ही काही पुस्तके लिहिली.

पुरस्कार

अनुताईंनी आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रसार केला त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात घालवल. त्यांच्या या कार्यामुळेच आपल्या राष्ट्राचा सामाजिक विकास झाला आणि लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटले त्यामुळे साक्षरतेचे प्रमाण देखील वाढले. अनुताई वाघ यांनी साक्षरता प्रसारर्थ लिहिलेलं “सहजशिक्षण” या पुस्तकात भारतीय केंद्र सरकारतर्फे १९८१ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

अनुताईंनी आदिवासी जमातीच्या मुलांना शिक्षण मिळाव म्हणून अनेक वेगवेगळ्या शिक्षण संस्था स्थापन केल्या. त्यांनी समाजसुधारणेत दिलेले योगदान अनमोल आहे. अनुताई वाघ यांना आदर्श शिक्षिका, दलित मित्र, आदर्श माता, फाय फाऊंडेशन, सावित्रीबाई फुले बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज, रमाबाई केशव ठाकरे, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आशा भोसले पुरस्कार असे सर्वश्रेष्ठ पुरस्कार जाहीर झाले. यासोबतच अनुताई वाघ यांचा पद्मश्री सारखा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

आम्ही दिलेल्या anutai wagh information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अनुताई वाघ यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या anutai wagh full information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about anutai wagh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये adivasi samaj sudharak anutai wagh information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!