बाबू गेनू यांची माहिती Babu Genu Information in Marathi

Babu genu information in marathi बाबू गेनू यांची माहिती, आपला भारत देश हा ब्रिटीशांच्या ताब्यात होता आणि त्यांनी आपल्या देशावर अनेक वर्ष राज्य केले तसेच देशातील लोकांचा छळ केला परंतु हे सर्व रोखाण्य्साठी आणि भारतातून ब्रिटीशांना बाहेर काढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर लढले तसेच देशाला स्वातंत्र्य मिळावेम्हणून आपल्या प्राणाची देखील आहुती दिली. आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक क्रांतीकारांनी भाग घेतला नि त्यामधील एक म्हणजे बाबू गेनू हे होते आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला होता आणि आज आपण या लेखामध्ये बाबू गेनू यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

बाबू गेनू यांचा जन्म हा १ जानेवारी १९०८ मध्ये महाराष्ट्र राज्यातील आंबेगाव या तालुक्यामधील महाळुंगे पडवळ या गावामध्ये एक छोट्याश्या आणि शेतकरी कुटुंबामध्ये झाला होता. त्यावेळी मुंबई या शहरामध्ये सुतगिरनिंचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात चालत होता आणि ते देखील मुंबई मधील एका सुत गिरणी मध्ये काम करत होते. ज्यावेळी ते सुत गीरीनिमध्ये काम करत होते त्यावेळी ब्रिटीशांचे सरकार होते आणि त्यावेळी ब्रिटीश सरकार हे परदेशी बनावटीच्या कापडांची आयात करत होते.

परंतु ते विदेशी बनावटीच्या कापडांच्या आयातीच्या विरुध्द होते आणि म्हणून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी आयोजित केलेल्या निषेधामध्ये सहभागी झाले होते. बाबू गेनू यांना शहीद बाबू गेनू या नावाने ओळखले जाते कारण त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती आणि त्यावेळी त्यांचे वय फक्त २२ वर्ष इतके होते.

babu genu information in marathi
babu genu information in marathi

बाबू गेनू यांची माहिती – Babu Genu Information in Marathi

नावबाबू गेनू
जन्म१ जानेवारी १९०८
जन्म ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील आंबेगाव या तालुक्यामधील महाळुंगे पडवळ
मृत्यू१२ डिसेंबर १९३०

बाबू गेनू यांचा स्वातंत्र्य लढा – babu genu said information in marathi

मँचेस्टर जॉर्ज फ्रेझीयर हा एक कापड व्यापारी होता आणि ती १२ डिसेंबर १९३० मध्ये किल्ल्यामधील जुन्या हनुमान गल्लीतील दुकानातून परदेशी बनावटीचे कापड हे मुंबई बंदराजवळ नेत होता आणि त्याला त्याच्या विनंतीनुसार पोलीस संरक्षण सुद्ध देण्यात आले होते परंतु त्यांना परदेशी बनावटी माल हा भारतामध्ये येवू द्यायचा नव्हता त्यामुळे अनेक स्वातंत्र सैनिकांनी ट्रक न हलवण्याची विनंती केली परंतु असे झाले नाही तर त्याठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी त्या आंदोलकांना बाजूला घालवले आणि ट्रक हलवला.

ज्यावेळी काल्देवी रोडवर ट्रक आला त्यावेळी बाबू गेनू काल्देवी रोडवर ट्रकच्या आडवे उभे राहिले आणि महात्मा गांधींचा जयजयकार करू लागले होते. या प्रकारच्या अहिंसक आंदोलनामध्ये पोलीस बाबू गेनू आणि इतर आंदोलकांना शारीरिकदृष्ट्या रोखत असताना देखील बाबू गेनू यांनी आपला संकल्प सोडला नाही आणि त्यांनी ट्रक च्या समोरून हलले नाही.

त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्रक चालवण्याचा आदेश दिला त्यावेळी ह्या ट्रकचा चालक बालवीर सिंग हा होता जो भारतीय होता त्याने बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्रक चालवण्यास नकार दिला त्यावेळी इंग्रज पोलीस अधिकाऱ्याने ट्रक ड्रायव्हर सीटवर बसून ट्रक बाबू गेनू यांच्या अंगावरून घातला आणि त्यावेळी त्यांचा तेथेच मुर्त्यू झाला आणि तो दिवस १२ डिसेंबर १९३० हा होता.

अश्या प्रकारे बाबू गेनू यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. बाबू गेनू यांच्या मृत्यू नंतर स्वातंत्र्य सैनिकांनी आणि संप, संताप, निषेध केले आणि त्याच वेळी ब्रिटीश प्रशासनाने हि घटना अपघात म्हणून एक प्रेस नोट जारी केली.

बाबू गेनू यांच्याविषयी काही महत्वाचे प्रश्न – questions 

  • बाबू गेनू यांचा मृत्यू कसा झाला ?

मुंबई मध्ये ब्रिटीशांच्या मालावर बहिष्कार घालणाऱ्या चळवळी मध्ये बाबू गेनू देखील सहभागी होते आणि त्यामध्ये त्यांनी मुंबई मध्ये माल वाहून नेणाऱ्या ट्रक समोर ते रस्त्यावर आडवे पडले होते आणि त्यावेळी तो ट्रक त्यांच्या अंगावरून घातला आणि त्यांच्या मृत्यू १२ डिसेंबर १९३० मध्ये झाला.

  • बाबू गेनू यांचा जन्म केव्हा व कोठे झाला ?

बाबू गेनू यांचा जन्म हा १ जानेवारी १९०८ मध्ये महाराष्ट्र राज्यातील आंबेगाव या तालुक्यामधील महाळुंगे पडवळ या गावामध्ये एक छोट्याश्या आणि शेतकरी कुटुंबामध्ये झाला होता.

  • बाबू गेनू यांची ओळख ?

बाबू गेनू हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे स्वातंत्र्यवीर आहेत आणि त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि म्हणून त्यांना शहीद बाबू गेनू या नावाने ओळखले जाते.

बाबू गेनू यांच्याविषयी काही विशेष तथ्ये – facts 

  • बाबू गेनू यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपल्या प्राणाची आहुती दिली आणि म्हणून त्यांच्या अंत यांत्रेस वीस हजार लोकांचा जमाव होता.
  • बाबू गेनू हे मुंबई मधील सुत गिरणीमध्ये काम करत होते.
  • ज्यावेळी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यावेळी ते फक्त २२ वर्षाचे होते.
  • बाबू गेनू यांनी जी चळवळ केली होती आणि त्यामध्ये आपले प्राण दिले होते ती एक स्वदेशी प्रकारची चळवळ होती आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ १२ डिसेंबर हा दिवस स्वदेशी दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • बाबू गेनू यांची परीस्थी हि खूप गरिबीची होती आणि ते १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते.
  • ते बनावटीच्या कापड विरोधामध्ये होणाऱ्या आंदोलनामध्ये सक्रीयपणे सहभागी होत होते.
  • बाबू गेनी यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ मुंबई आणि दिल्ली या शहरामध्ये अनेक स्मारक करण्यात आली आहेत.

आम्ही दिलेल्या babu genu information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बाबू गेनू यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या babu genu said information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि babu genu information in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!