bakasana information in marathi बकासन मराठी माहिती, नियमित योगाचे आणि व्यायामाचे आपल्या जीवनामध्ये खूप महत्व वाढले आहे कारण सध्या या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरलेले आहे तसेच सध्या लोकांचे जीवन देखील खूप दगदगीचे बनले आहे त्यामुळे सध्या आपण आपल्या आरोग्याची काळजी चांगल्या प्रकारे घेण्यासाठी आन रोजच्या रोज व्यायाम आणि योगा करणे खूप आवश्यक आहे. जर आपण नियमितपणे रोजच्या रोज न चुकता वेगवेगळ्या प्रकारच्या योग मुद्रा केल्या तर आपल्या योगाचे अनेक फायदे मिळू शकतात तसेच योगाच्या रोजच्या सरावाने आपल्याला मन शांती मिळते तसेच आपल्यामध्ये सकारात्मक उर्जा देखील निर्माण होण्यास मदत होते.
जर नियमितपणे योगा आणि व्यायाम केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या उद्भवणार नाही तसेच योग नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो. योग हा एक अध्यात्मिक उपक्रम आहे आणि हा उपक्रम रोज नियमितपणे केल्यामुळे आपले शरीर, मन आणि आत्मा यांचे संपूर्ण समर्पण होते.
प्राचीन भारतामध्ये उगम पावलेला हा योग सध्या जगभरामध्ये प्रसिध्द झाला आहे आणि याची भिन्न रूपे देखील उदयास आलेली आहेत. योग हा अनेक प्रकारे केला जातो जसे कि अन्लोम विन्लोम, प्राणायम, भ्रस्त्रिका, वज्रासन, पद्मासन, सूर्य नमस्कार, चक्रासन, भुजंगासण, बकासन, गोमुखासन, त्रिकोणासन हे प्रकार आहेत आणि आज आपण या लेखामध्ये “बकासन” या योग मुद्रे विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.
बकासन मराठी माहिती – Bakasana Information in Marathi
आसनाचे नाव | बकासन |
इतर नाव | काकासन |
इंग्रजी नाव | क्रो पोझ (Crow pose) |
फायदे | मनगट आणि खांदे मजबूत होण्यास मदत होते त्याचबरोबर स्नायू देखील बळकट होतात. |
बकासन विषयी महत्वाची माहिती – bakasana yoga information in marathi
बकासन हा एक योगाचा प्रकार आहे आणि या आसनाला काकासन किंवा इंग्रजीमध्ये क्रो पोझ (Crow pose) म्हणून देखील ओळखले जाते. बकासन हा शब्द संस्कृत शब्दापासून बनला आहे आणि याचा अर्थ दोन शब्दामधील आहे म्हणजेच बका या शब्दाचा अर्थ बगळा पक्षी असा होतो तर आसन म्हणजे बसने असा अर्थ होतो.
बकासन हि मुद्रा बगळ्याच्या बसलेल्या मुद्रेसारखी दिसते आणि असे म्हणतात कि बगळा हा युवावस्थेचे आणि दीर्घायुष्याचे प्रतिक मानले जाते आणि एखाद्या व्यक्तीने बकासन हे आसन नियमित केले तर त्या व्यक्तीला हे दोन्हीहि फायदे मिळू शकतात. बकासन हे आसन करताना त्या संबधित व्यक्तीला आपल्या भुजांच्यावर भार देवून करावे लागते आणि हि मुद्रा करताना आपल्याला हाताची ताकद जास्त लावावी लागते.
तसेच या मुद्रेमध्ये वजनाचे समान वितरण देखील खूप महत्वाचे आहे. आपल्या माहित आहे कि कोणतेही असं केल्यानंतर आपल्याला काही ना काही आरोग्य फायदा मिळतोच तसेच बाकासानाच्या नियमित सरावाने देखील आपले हात, मनगट आणि खांदे मजबूत होण्यास मदत होते त्याचबरोबर स्नायू देखील बळकट आणि सैल होण्यास मदत होते.
बकासन कसे करावे – steps
बकासन हो एक योगाचा प्रकार आहे आणि हा करताना यामध्ये आपल्याला हाताची ताकद जास्त लावावी लागते त्याचबरोबर या असणामध्ये वजनाचे समान वितरण देखील करणे खूप गरजेचे असते. चला तर आता आपण बकासन कसे करायचे ते पाहूया.
- बकासन करताना सर्वप्रथम जमिनीवर चटई किंवा जमखाना अंथरून घ्या.
- आता मालासन मध्ये या आणि प्रथम तुमचे डोके हे तुमच्या उशीवर ठेवा आणि असे करण्याचे कारण आपण ज्यावेळी त्या मुद्रे मध्ये येतो त्यावेळी आपले डोके वर होते आणि जर आपल्याला बॅलन्स करता आले नाही तर आपले डोके उशीवर पडेल आणि आपल्या डोक्याला कोणतीही विजा होणार नाही आपले डोके सुरक्षित राहील त्यामुळे तुमच्या डोक्याच्या खाली उशी ठेवायला विसरू नका.
- आता नितंब वर करा आणि तुमचे पाय हे आणखी आता घ्या.
- मग त्यानंतर तुमचे पाय गुंतवा आणि आपले गुढघे आपल्या वरच्या बहुवार आणा.
- आता एका पाठोपाठ एक पाय उचला आणि या स्थितीमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करा परंतु या स्थितीमध्ये अग्रभाग उभे असावेत नाहीतर आपल्याला हि स्थिती संतुलित करता येते नाही.
- आपल्या संपूर्ण शरीराचे वजन हे मागे द्या जेणेकरून आपण आपले डोके हळू हळू उचलू शकाल.
- आता तुमचे डोके पुढे उचला आणि तुमचे पाय हलके होईपर्यंत स्थिती धरा आणि तुम्ही एका वेळी एक पाय उचलला पाहिजे आणि स्थितीमध्ये आपल्या पायाची बोटे गुंतवणे खूप महत्वाचे आहे.
- आपले गुढघे आणि वरचे हात एकमेकांवर दाबा.
- एकदा आपण आपल्या पायाची बोटे एकमेकांना स्पर्श करण्यासाठी आणल्यानंतर आपण शेवटी आपले हात सरळ करू शकतो आणि काही वेळ या मुद्रेमध्ये राहण्याचा प्रयत्न करू शकतो.
बकासन फायदे मराठी – bakasana information in marathi fayde
- बकासनाच्या नियमित सरावाने आपले हात, खांदे आणि मनगट मजबूत होण्यास मदत होते.
- काही व्यक्तींच्यामध्ये आत्मविश्वास आणि ध्येर्य कमी असते आणि जर एखाद्या व्यक्तीला ते वाढवायचे असेल तर त्या व्यक्तीने या आसनाचा नियमित सराव केल्यामुळे त्याचा आत्मविश्वास आणि ध्येर्य वाढू शकते.
- हे आसन करताना आपल्या पाठीचा कणा आणि पाय ताणतात आणि त्यामुळे पाठीचे आणि पायाचे स्नायू देखील सैल होण्यास मदत होते.
- या आसनाच्या नियमित सरावाने पाठीचा कणा मजबूत होण्यास मदत होते.
आम्ही दिलेल्या bakasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर बकासन मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bakasana yoga information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि bakasana information in marathi fayde माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट