प्राणायाम मराठी माहिती Pranayam Information in Marathi

Pranayam Information in Marathi – Anulom Vilom Pranayam in Marathi प्राणायाम मराठी माहिती प्राणायाम प्रकार मराठी प्राणायाम चे फायदे मराठी प्राणायाम म्हणजे काय? मित्रहो, प्राणायाम हा शब्द प्राण आणि आयाम या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. यातील, प्राण या शब्दाचा अर्थ आपल्या ‘श्वासोच्छ्‌वासातला वायू’ असा होतो आणि आयाम या शब्दाचा अर्थ गति-विच्छेद असा होतो. म्हणजेच, आपल्या प्राणाचा अथवा श्वासोच्छ्‌वासांचा आयाम म्हणजे गति-विच्छेद होय; अशी पातंजल या योगसूत्रामध्ये प्राणायामाची व्याख्या सांगितली गेली आहे. याशिवाय, मनुस्मृतीमध्ये असे म्हटले आहे की, भट्टीत टाकलेले लोखंडादी धातू ज्याप्रकारे भात्याने शुद्ध होतात, अगदी त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियांचे मळ प्राणायामाने नष्ट होतात आणि आपली इंद्रिये देखील शुद्ध होतात.

मित्रहो याखेरीज, योगसूत्रात असे म्हटले आहे की, ज्ञानाचे आवरण हे प्राणायामाने क्षीण होऊन ते आपल्या चंचल मनाला एकाग्रतेची योग्यता प्राप्त करून देते. त्याचबरोबर, हठयोगाच्या परिभाषेनुसार योगासने आणि प्राणायाम यांनी आपल्या शरीरातील सर्व नाडींची शुद्धी होते.

pranayam information in marathi
pranayam information in marathi

प्राणायाम मराठी माहिती – Pranayam Information in Marathi

मित्रहो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाडी म्हणजे काय? तर मित्रांनो, नाडी म्हणजे मज्जातंतू होय. खरंतर, नाडी म्हणजे मज्जातंतू असा अर्थ कुवलयानंद यांनी सांगितला आहे. कुवलयानंद यांनी सांगितलेल्या अर्थाप्रमाने ‘सुषुम्ना नाडी’ म्हणजे आपल्या पृष्ठवंशातून गेलेला मज्जातंतू होय.

प्राणायाम म्हणजे काय?

तर, आपले शरीर, इंद्रिये आणि मन निर्दोष व निरोगी ठेवण्यासाठी केलेली साधना अथवा समाधीकरिता महत्वाची असलेली योग्यता निर्माण करण्याची साधना होय. प्राणायाम हा योगसाधनेचाचं एक महत्व पूर्ण भाग आहे. मित्रहो, पतंजलीच्या योगदर्शनात योगाची यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही अनुक्रमे एकूण आठ अंगे सांगितली आहेत, त्यांपैकी क्रमानुसार आलेले चौथे अंग म्हणजे प्राणायाम होय.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे, हठयोगप्रदीपिकेत असे सांगितले आहे की प्राणायामाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने अथवा साधकाने स्वतःचे शरीर निरोगी असेल, तरच प्राणायामाचा अभ्यास सुरू करावा.

शिवाय, प्राणायाम करू इच्छिणाऱ्या साधकाला हितकारक आणि सात्त्विक मिताहाराची सवय असायला हवी. त्याचबरोबर, आपले पोट प्राणायामाच्या आरंभी साफ आणि मोकळे असले पाहिजेत. यासोबतच, जिभेचे चोचले पुरविणाऱ्या तळलेल्या, तिखट, आंबट आणि पचनाला जड असलेल्या पदार्थांचे कधीही सेवन करू नये.

कारण, असे पदार्थ खाल्ल्याने आपले मन प्रक्षुब्ध होऊ शकते. शिवाय, वादविवाद निर्माण करणारे किंवा भांडणाचे प्रसंग टाळावेत, तसेच ज्याठिकाणी खूप गर्दी असते तेथील लोकांमध्ये जाऊन मिसळू नये म्हणजेच दुसऱ्या भाषेत आपण जनसंगपरित्याग करावा, याखेरीज तत्त्वचिंतनपर ग्रंथांचे मन केंद्रित करून अध्ययन करावे, आपण आपला इंद्रियसंयम नियमितपणे पाळावा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण आपले शरीर स्वच्छ ठेवावे, जेणेकरून आपले अंतःकरण शांत व निर्विकार राहण्यास मदत होईल.

मित्रहो, आता आपण प्राणायामाच्या स्थानाबद्दल बोलुयात. तर, प्राणायामाचे स्थान हे स्वच्छ, निवांत, एकांत आणि वारा, पाऊस, ऊन, थंडी इत्यादि गोष्टींचा त्रास नसलेल्या निरामय अशा ठिकाणी असावे. प्राणायामामधील धौती, बस्ती, नेती, त्राटक, नौली आणि कपालभाती या महत्वाच्या अनुक्रमे सहा क्रिया आहेत.

जो मनुष्य जाड, स्थूल आणि कफदोषी असेल त्या संबंधित मनुष्याने या सहा षट्‌क्रियांपैकी आवश्यक त्या क्रिया करून आपल्या शरीराचा स्थूलपणा कमी करावा आणि कफदोष देखील नाहीसा करावा. अनेक योगींच्या मते, सर्वांनीच षट्‌क्रियांपैकी आवश्यक ती कर्मे करून आपले शरीर शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि नंतरच प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवात करावी.

परंतू, दुसऱ्या बाजूकडे आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की वरील विचारांच्या अगदी उलट काही योग्यांचे मत आहे, ते पुढीलप्रमाणे; या  योगासनाने आणि प्राणायामानेच कफदोष निघून जातात आणि स्थौल्य देखील नाहीसे होते. त्यामुळे, अशा समस्यांचे निवारण करण्यासाठी विशेष अशा कोणत्याही षट्‌क्रियांची आवश्यकता नाही.

प्राणायाम करण्याची पद्धत

वर सांगितल्याप्रमाणे प्राणायाम करण्यासाठी  निरामय, स्वच्छ आणि एकांतपणा असलेल्या ठिकाणी बैठक घालावी. शिवाय, ही बैठक एक इंचापेक्षा अतिजास्त, जाड अथवा खुपणारी नसावी. मित्रांनो, भगवद्‌गीतेत सांगितल्याप्रमाणे प्राणायाम करताना बसण्याच्या ठिकाणी दर्भ अंथरावे, त्याच्यावर हरणाचे, वाघाचे किंवा मेंढ्याचे अशा प्राण्यांचे मऊ, उबदार कातडे घालावे आणि त्यावर परत सुती असलेले किंवा रेशमी वस्त्र पांघरावे.

यानंतर, तयार केलेल्या अशा प्रकारच्या बैठकीवर साधकाने पद्मासन, सिद्धासन, स्वस्तिकासन किंवा समासन घालून व्यवस्थित बसावे. पातंजल योगसूत्राच्या व्यासकृत योगभाष्यात पद्मासन, भद्रासन, वीरासन, स्वस्तिक अशा प्रकारच्या एकूण बारा आसनांची नावे सांगितलेली आहेत आणि अशाच प्रकारची कित्येक पुष्कळ आसने देखील अस्तित्वात आहेत, असादेखील उल्लेख केलेला आहे. शिवाय,  हठयोगप्रदीपिकेमध्येदेखील योगभाष्यापेक्षा अनेक वेगवेगळी काही आसने सांगितली आहेत.

परंतु, वर उल्लेख केलेली प्रमुख चार आसने प्राणायामाभ्यासास भरपूर उपयोगी आहेत. इतर काही आसने निरनिराळ्या अनेक रोगांचे निवारण करून, आपले शरीर सशक्त, निरोगी आणि हलके ठेवण्यासाठी सहाय्य करतात. अशा प्रकारची विविध आसने नियमितपणे नियमाने केल्यास आपले वजन वाढत नाही, शिवाय वजन योग्य तेवढेच राहण्यास मदत होते. मित्रहो, प्राणायाम करताना मूल बंध, उड्डियान बंध आणि जालंधर बंध हे मुख्य तीन बंध करावयाचे असतात.

यांतील, मूल बंध म्हणजे ताठपणे सरळ बसून आपल्या गुदद्वाराचे स्नायू पूर्ण ताकदीने आवळून उचलून धरणे. उड्डियान बंध म्हणजे ताठ सरळ बसून आपले पोट खपाटीस नेणे आणि शेवटचा जालंधर बंध म्हणजे ताठ सरळ बसून आपली हनुवटी पूर्णपणे छातीजवळ टेकवून, गळ्याचा होईल तेवढा संकोच करून ताकदीने आवळून धरणे.

याखेरीज, आपल्या शरीरातील मुख्य तीन नाड्या या अनुक्रमे इडा, पिंगला आणि सुषुम्ना या आहेत. डाव्या नाकपुडीतून इडा, उजव्या नाकपुडीतून पिंगला आणि मेरुदंडातून म्हणजेच आपल्या कमरेपासून अगदी डोक्यापर्यंत आणि पाठीच्या मध्यभागातून गेलेल्या पृष्ठवंशातून सुषुम्ना ही नाडी जाते. विशेष बाब म्हणजे या तीन नाड्यांना क्रमाने चंद्र, सूर्य आणि ब्रह्म नाडी असेदेखील म्हणतात. मित्रहो, प्राणायामाचे हे तंत्र समजण्याकरिता वरील बंध आणि नाडी यांच्या बद्दलची माहिती काळजीपूर्वक अभ्यासणे अधिक गरजेचे आहे.

प्राणायाम प्रकार मराठी व प्राणायाम चे फायदे मराठी

मित्रहो, प्रामुख्याने प्राणायामाचे मुख्य दोन प्रकार आहेत ते म्हणजे अमंत्रक आणि समंत्रक हे होत. यांतील, अमंत्रक म्हणजे मंत्रावाचून करावयाचा प्राणायाम आणि समंत्रक म्हणजे मंत्रासह करावयाचा प्राणायाम होय. याशिवाय, वेदाध्ययनाचा अधिकार असलेल्या त्रैवर्णिकांनी खालील सव्याहृतिक आणि सशिरस्क गायत्रीमंत्र जपण्याचा सल्ला दिलेला आहे.

तो पुढीलप्रमाणे; ‘ॐ भूर्भुवः स्वः महः जनः तपः सत्यम्’. या गायंत्रीमंत्रामधील सात व्याहृती मनपूर्वक उच्चारून, त्यानंतर प्रणवोच्चारपूर्वक गायत्रीमंत्र उच्चारायचा असतो आणि गायत्रीमंत्राच्या शेवटी ‘ॐ आपोज्योती रसोऽमृतं ब्रह्म भूर्भवस स्वरोम्’ हे शिरस् म्हणजे टोक जोडायचे असते किंवा प्राणायाम करणाऱ्या साधकाची जी उपास्य देवता असेल, त्या उपास्य देवतेच्या संबंधित असलेला मंत्र प्राणायाम करण्याच्या वेळी देवतेच्या अनुग्रहाकरिता मनापासून जपायचा असतो.

मित्रहो, अलीकडच्या काळामध्ये योगविद्येचा म्हणजे विशेषतः योगासने आणि प्राणायाम यांचा आपल्या भारत देशात व इतर पश्चिमी देशांमध्ये प्रसार होत आहे. याशिवाय, योगविद्येचे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने संशोधन देखील सुरू झाले आहे. डॉ. डी. जी. रेळे आणि लोणावळे येथील ‘कैवल्यधाम’ या योगविद्येच्या अभ्यासाच्या केंद्राचे संस्थापक स्वामी कुवलयानंद व त्यांचे सहाय्यक यांनी योगासने तसेच, प्राणायाम या दोहोंचे विशेष संशोधन केले आहे. 

प्राणायाम आणि जिमखान्यामध्ये केल्या जाणाऱ्या विविध व्यायामांचे अनेक प्रकार यांच्यामधील मुख्य फरक म्हणजे; यौगिक आसने आणि प्राणायाम यांच्या योगाने घडणारा व्यायाम हा अधिक ताकदीचा असल्याने दमछाट करणारा आणि शरीरशक्ती पणाला लावणारा आपल्या शरीरातील स्नायूंचा व्यायाम नसतो.  

परंतु, यौगिक व्यायामामध्ये आपल्या मनाची ताकद, सहनशक्ती आणि शांती वाढून अनेक मनोरोगांचेही निवारण होते. ज्यामुळे, अनेक मनोरोगांना प्रतिबंध होतो. पण, तसे जिमखानी व्यायामांचे अजिबात नसते. कारण, आपले मानसिक दौर्बल्य घालविणे, मनाची उत्सुकता वाढविणे, मन प्रसन्न ठेवणे आणि महत्वाचं  मनःसामर्थ्य वाढविणे हा त्यांचा उद्देश नसतो. याखेरीज, यौगिक व्यायामामध्ये वर दिलेले सर्व उद्देश प्राप्त करता येतात.

                       तेजल तानाजी पाटील

                          बागिलगे, चंदगड

आम्ही दिलेल्या anulom vilom pranayam information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्राणायाम मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pranayam information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि pranayam information in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kapalbhati pranayam information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!