Bal Diwas Essay in Marathi – Essay On Children’s Day in Marathi बालदिन म्हणजे काय? बालदिन निबंध मराठी आपणा सर्वांना माहीत आहे की, १४ नोव्हेंबर यादिवशी संपूर्ण भारतभर दरवर्षी बालदिन साजरा केला जातो. खरंतर, आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरू‘ यांचा जन्मदिवस अथवा वाढदिवस यादिवशी येतो. त्यामुळे, या दिवसाचे विशेष असे महत्त्व आहे. मित्रांनो, लहान मुलांसाठी पंडित नेहरू यांचे खूप प्रेम होते. पंडित नेहरूजी लहान मुलांमध्ये खूप राहायचे, त्यांच्याशी गप्पागोष्टी करायचे, बोलायचे, त्यांच्याशी विविध खेळ खेळायचे. खरंतर, अशा अनेक गोष्टींतून त्यांना खूप समाधान भेटत असे.
शिवाय, मुलंही त्यांना खूप आदर देतं आणि आवडीने त्यांना “चाचा नेहरू” या नावाने संबोधत असतं. याखेरीज, संपूर्ण जगभरात इसवी सन १९२५ पासून ‘बाल दिन’ म्हणजेच ‘Children’s Day‘ खूप उत्साहाने साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्र संघाने दिनांक २० नोव्हेंबर १९५४ रोजी संपूर्ण जगभर बालदिन साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, आजही अनेक देशांमध्ये बालदिन मोठ्याने साजरा केला जातो. परंतू, विविध देशांमध्ये बालदिनाच्या तारखांबाबत खूप भिन्नता आढळते.
बालदिन निबंध मराठी – Bal Diwas Essay in Marathi
Essay On Children’s Day in Marathi
आपल्या भारतात मात्र इसवी सन १९६४ नंतर १४ नोव्हेंबर यादिवशी सगळीकडे ‘बाल दिन’ साजरा केला जाऊ लागला. यासोबतच मित्रहो, बालदिवस हा भारतातील अनेक भागांत विविध पद्धतीने आणि सगळ्यांसमवेत अगदी आनंदाने साजरा केला जातो. यादिवशी, बहुसंख्य लोक सकाळी लवकर उठून, शांती व्हॅनमध्ये एकत्रितपणे जमा व्हायला लागतात.
मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यादिवशी शांती व्हॅनमध्येच लोक का जमा होतात? तर मित्रहो, चाचा नेहरूंचा अंत्यसंस्कार याठिकाणी करण्यात आला होता. त्यामुळे, सगळेजण या स्थळी एकत्रितपणे जमतात आणि शांततेने पंडित नेहरूंना श्रद्धांजली अर्पण करतात. याखेरीज, पर्यटकांमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री आणि उच्च दर्जाचे अधिकारी यांसारख्या व्यक्तींचा समावेश असतो.
सगळे एकत्र जमल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीवर उपस्थितांनी आणलेल्या पुष्पांजलि ठेवल्या जातात आणि डोळे मिटून प्रार्थना केली जाते.
शिवाय, यावेळी भजन आणि गायनदेखील केले जाते. त्याचबरोबर, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे यज्ञ, त्यांची आंतरराष्ट्रीय राजकारणातील कृत्ये आणि त्यांनी सार्वत्रिक शांततेसाठी केलेले प्रयत्न या सर्व गोष्टींसाठी त्यांना पुज्यस्थानी मानून, पूर्णपणे श्रेय दिले जाते. खरंतर, लहान वयातच मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील या विचाराने पंडित नेहरूंनी मुलांसाठी अनेक प्रकारच्या योजना आखल्या होत्या.
त्यामुळे, बालदिनाच्या निमित्ताने यादिवशी लहान मुलांच्या अनेक कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जावं, असं ठरविण्यात आलं होतं. त्यानुसार, आजही देशभरातील अनेक शाळांमध्ये यादिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, खेळांचे आणि अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. शाळेतील सगळी मुले या कार्यक्रमांमध्ये खूप उत्साहाने सहभागी होतात.
शिवाय, बालदिन साजरा करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या, आपल्या शाळेतील शिक्षकांना आवश्यक ती मदत देखील करतात. त्याचबरोबर, राष्ट्रीय गाणी आणि स्टेज शॉर्ट नाटकांचे गायन सुद्धा करतात. खरंतर, असे अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी साजरे केले जातात. एकदा तर संसदेमध्ये घरगुती विद्यार्थ्यांना देशभक्ती दाखविण्यासाठी, पंडित नेहरूंच्या पावलांचा जशाच तसा पाठपुरावा करण्यास सांगितले होते.
बालदिनाचे महत्त्व
वरील माहितीमध्ये आपण पाहिलं की, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंती निमित्ताने दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. खरंतर, लहान मुलं म्हणजे पंडितजींचा जीव की प्राण! मुलं ही देवाघरची फुलं आहेत, असं ते सतत म्हणतं असायचे. परंतू आजकाल, भारतातल्या अनेक; किंबहुना प्रत्येक ब्रिजवर उमलण्यापूर्वीच कोमेजून गेलेली ही मुलं जेंव्हा आपल्याला दिसतात, तेंव्हा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव कासावीस होतो.
सत्तेच्या, स्वार्थाच्या राजकारणामध्ये आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी विसरलेल्या, शिवाय मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या या प्रशासनाला हा फुलविक्रेता ‘गेट वेल सून’ अशी सदिच्छा तर देतं नसेल ना? रस्त्यावर तसेच, ब्रिजवर सगळ्यांसमोर हात पसरत फिरणाऱ्या या मुलांना न कळत्या वयातच लाचारपणे जगावं लागतं.
मित्रांनो, आपल्याप्रमाणेच कधीतरी एखादी गोष्ट त्यांच्या मनात देखील भरते, आपल्याजवळ आपल्या आवडीची एखादी गोष्ट तरी असावी, असंही त्यांना वाटत असेल.
पण, अशा सगळ्या इच्छांना, स्वप्नांना आणि आकांक्षांना मुरड अथवा मोड घालण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. सगळ्यांचं जीवन प्रकाशमय करणाऱ्या सूर्याला ही मुलं आज साद घालताना आपल्याला दिसून येतात. आमच्या आयुष्यातील अज्ञानाचा, गरिबीचा हा तिमिर अंधार कायमचा दूर होऊ दे, अशी प्रार्थना ही कोवळी मुलं सूर्य नारायणाला करत आहेत. शिवाय, ज्याप्रमाणे शाळेत जाण्याची संधी मिळाली, त्याप्रमाणे आयुष्यातील पुढचा मार्गही सोपा होऊ दे, हीच त्यांची इच्छा असावी.
पंडित नेहरूंचे बालप्रेम
आपण पाहिलं की पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू हे आपल्या स्वतंत्र भारत देशाचे पहिले पंतप्रधान होते. दिल्ली शहरातील तीन मूर्ती भवन या सरकारी निवासस्थानात ते वास्तव्यास होते. खरंतर, दिल्लीतील तीन मूर्ती भवन हे भव्य प्रशस्त होते. शिवाय, या भवन परिसरात खूप मोठा आणि सर्वांना आकर्षित करणारा एक बगीचा होता.
या बागेमध्ये नानारंगी, वेगवेगळ्या प्रकारची आणि विविध जातींची फुलझाडी होती. चाचा नेहरू उर्फ पंडित जवाहरलाल नेहरु यांना लहान मुलांप्रमाणे फुले सुद्धा फार आवडत होती. एके दिवशी पंडित नेहरूजी या बागेमध्ये नेहमीप्रमाणे गाडीमधून फेरफटका मारत होते, तेंव्हा ते अचानकपणे खूप खूश झाले.
थोडेसे अंतर पुढे गेल्यानंतर पंडित नेहरूंना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मुलाच्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने नेहरुजी पुढे गेले असता, त्यांना एक-दोन महिन्याचे मुल एकटेच रडताना दिसले.
तेंव्हा, नेहरूंनी त्या मुलाला उचलून आपल्या खांद्यावर घेतले आणि त्याला शांत केले. लहान मुलाला खांद्यावर घेत पुढं गेल्यानंतर नेहरूंचे लक्ष रंगीबिरंगी फुग्यांकडे गेले. याऐवजी आपल्याला असं म्हणता येईल की नानारंगी फुग्यांनीच पंडित नेहरूंचे लक्ष स्वतःकडे आकर्षित केले होते.
त्यामुळे, नेहरूंनी आपल्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली आणि ते पटकन गाडीतून उतरले व फुगे खरेदी करण्यासाठी त्या फुग्यावाल्याकडे गेले. खरंतर, पंडित नेहरूंना फुगे खरेदी करताना पाहून सगळेजण खूप आश्चर्यचकीत झाले.
अशा प्रकारे, फुगे खरेदी केल्यावर, नेहरूजींनी ते सर्व फुगे उपस्थित मुलांना वाटून दिले आणि नेहरूजी त्या लहान बालकाच्या आईचा शोध घेऊ लागले. परंतू, संपूर्ण बगीचामध्ये त्या लहान मुलाची आई कुठंही दिसली नाही. भरपूर वेळ झाल्यामुळे ते लहान बालक जास्तच रडू लागले.
त्यामुळे, नेहरूजींनी त्या बालकाला आपल्या जवळ घेतले आणि आश्चर्य काय तर; ते बाळ नेहरूंकडे जाताच लगेच शांत झाले. मजेची बाब म्हणजे ते बालक चाचा नेहरूंकडे पाहून हसू लागले. तितक्यात त्या लहान बालकाची आई नेहरूंकडे धावत आली. पंडित नेहरूंच्या हातात आपले बाळ हसत आहे हे पाहून त्या बालकाची आई सुद्धा आश्चर्यचकित झाली.
अखेर, पंडित नेहरूजींनी लहान बालकाला त्याच्या आईकडे सोपविले. असचं एकदा पंडितजी तमिळनाडूच्या दौर्यावर गेले होते. त्यावेळी, चाचा नेहरूंना पाहण्यासाठी तेथील नागरिकांनी खूपच गर्दी केली होती. विशेष म्हणजे काही नागरिक तर सायकलीवर उभे राहून अगदी उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहत होते.
अशा प्रकारे, जागा भेटेल तिथून प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने पंडित नेहरूंना बघत होता. सर्वांना आपल्याबद्दल उत्सुकता लावणारे पंडित जवाहरलाल नेहरु यांचे व्यक्तिमत्व खरंच किती महान होते, हे मात्र खरे!
तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या bal diwas essay in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर बालदिन निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bal diwas essay in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि bal diwas essay in marathi greeting माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on children’s day in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट