काळी माती माहिती Black Soil Information in Marathi

black soil information in marathi काळी माती माहिती, आज आपण या लेखामध्ये ब्लॅक सॉईल (Black soil) म्हणजेच काळी माती या विषयी संपूरणे आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. मातीचे अनेक वेगवेगळे प्रकार आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळतात जसे कि लाल माती, गाळाची माती, चिकन माती आणि इतर अनेक प्रकार आहेत आणि त्यामधील एक प्रकार म्हणजे काळी माती आणि हि काळी माती शेतकरी लोकांच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण काळ्या मातीमध्ये चांगल्या प्रकारे पिक घेणे खूप सोपे आहे.

त्यामुळे जास्त करू शेतीसाठी वापरली जाणारी जमीन हि काळ्या मातीची असते. काळी माती हि आपल्या देशासाठी किंवा काही इतर देशांच्यासाठी आणि सामन्यात संपूर्ण जगासाठी एक महत्वाची माती आहे कारण या मातीच्या आधारे शेतकरी चांगल्या प्रकारचे पिक घेऊ शकतो.

जसे कि वेगवेगळ्या प्रकारचे अन्न प्रकार आणि इतर अनेक प्रकार पिकवता येतात. या मातीमध्ये इतर मातींच्यापेक्षा चांगले पिक आणि जोमाने पिक येत असल्यामुळे या मातीला ‘सुपीक माती’ म्हणून देखील ओळखले जाते तसेच या मातीला ‘रेगुर माती’ म्हणून देखील ओळखले जाते.

काय मातीची जमीन हि भारतामध्ये दख्खन पठारावर आणि दक्षिण भारतामध्ये आढळते. काळ्या मातीमध्ये पोटॅश, लोह, अॅल्युमिनियम, चुना, मॅग्नेशियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हे घटक असतात जे चांगली उत्पादन क्षमता मिळवण्यास मदत मिळते.

black soil information in marathi
black soil information in marathi

काळी माती माहिती – Black Soil Information in Marathi

काळ्या मातीची इतर नावे – other names

काळ्या मातीला अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते जसे कि काळी माती, रेगुर माती, लावा माती आणि सुपीक माती.

काळ्या मातीचे वितरण – distribution

या प्रकारची माती हि अर्ध शुल्क स्थितीमध्ये बेसाल्ट आच्छादित असलेल्या भागामध्ये तयार होते आणि ह्या प्रकारची माती गोदावरी नदीच्या खोऱ्यात तसेच कृष्णा नदीच्या खोऱ्यात, दक्षिण पठार, नर्मदा आणि ताप्ती खोरे महाराष्ट्र, माळवा आणि मध्य प्रदेशमध्ये तयार होते.

या प्रदेशामध्ये मातीमध्ये बुरशी जवळजवळ अनुपस्थित आहे आणि विशिष्ट क्षारांच्या उपस्थितीमुळे मातीचा काळा रंग बनतो.

काळ्या मातीची वैशिष्ठ्ये – features

  • काळी माती हि मऊ आणि बुसबुशीत असते.
  • काळी माती हि करडी असताना सुट्टी असते परंतु जर हि ओली झाली तर ती चिकट बनते.
  • जर मान्सूनपूर्वी मातीची चांगल्या प्रकारे मशागत करून ती बुसबशीत बनवली नाही तर त्यामध्ये काम करण्याचे अवघड बनते.
  • काळी माती उष्ण हवामानामध्ये शेतामध्ये जाड विदारक बनवण्यास मदत करतात.
  • काळ्या मातीमध्ये सुपीकता हि इतर मातीच्यापेक्षा जास्त प्रमाणात असल्यामुळे या मातीला जास्त महत्व आहे.
  • काळी माती उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटीबंधीय प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.
  • या मातीमध्ये अनेक प्रकारचे धान्य जसे कि गहू, ज्वारी, बाजरी, नाचना, मक्का घेऊ शकता त्याच बरोबर मुग, उडीद, चवळी यासारखे अनेक प्रकारचे कडधान्य देखील घेतले जाते आणि अनेक प्रकारच्या भाज्यांचे पिक पिक देखील या मातीमध्ये चांगल्या प्ताकारे येऊ शकते.

काळ्या मातीचे आरोग्य फायदे – health benefits

आपल्याला काळ्या मातीचा वापर हा चांगल्या शेतीसाठी केला जातो हे माहित आहे परंतु काळी मातीचे अनेक आरोग्य आरोग्य फायदे देखील आहेत हे ऐकल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल. परंतु हे खरे आहे कि काळ्या मातीचे अनेक फायदे आहेत. चला तर काळ्या मातीचे कोणकोणते आरोग्य फायदे आहेत ते पाहूया.

  • काळ्या मातीमुळे शरीरातील मळ निघून जाण्यास मदत होते आणि त्यामुळे शरीर शांत बनते.
  • काळी माती ज्या व्यक्तीला अनेक पोटाचे सामान्य आजार आहेत अश्यांच्यासाठी लाभदायक ठरू शकते.
  • स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी असह्य वेदनांना तोंड द्यावे लागते त्यावेळी त्या वेदनांच्यावर उपचार करण्यासाठी काळ्या मातीचा वापर होऊ शकतो.
  • सध्या अनेकांना हिमोग्लोबिन कमतरतेला तोंड द्यावे लागते त्यावेळी काळी माती हि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते कारण लोह जास्त प्रमाणात असते.

काळ्या मातीमध्ये घेतली जाणारी पिके

काळी माती हि जगासाठी एक महत्वाची माती आहे कारण हि एक सुपीक माती आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातत आणि ती कोणकोणती आहेत ते खाली आपण पाहूया.

  • गहू, ज्वारी, नाचना, बाजरी, मक्का (धान्य )
  • मुग, उडीद, चवळी, वाटाणा, मटकी (कडधान्य).
  • कापूस, ताग, जवस.
  • तंबाखू.
  • मोहरी.
  • भुईमुग.
  • सर्व पालेभाज्या, भाज्या आणि कंदमुळे.

काळ्या मातीचे वेगवेगळे प्रकार – types

काळ्या मातीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

  • खोल काळी माती : खोल काळी माती हा मातीचा एक प्रकार आहे आणि ह्या प्रकारामध्ये मातीचा रंग हा गडद काळ्या रंगाचा असतो आणि या प्रकारची माती सामान्यता मध्यम तापमानामध्ये आणि  पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी आढळते.
  • उथळ काळी माती : उथळ काळी माती हा काळ्या मातीचा एक प्रकार आहे आणि या प्रकारची माती कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी आणि उच्च तापमान असलेल्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
  • मध्यम काळी माती : मध्यम काळी हि मध्यम काळ्या रंगाची असते त्याचा गडद रंग नसतो आणि हि माती जास्त पाऊस असणाऱ्या प्रदेशामध्ये किंवा मध्यम तापमान असणाऱ्या पप्रदेशामध्ये आढळते आणि या मातीसाठी थंड हवामानाची गरज असते.

काळ्या मातीचे फायदे – benefits

  • काळी माती हि इतर मातींच्यापेक्षा अधिक सुपीक असते.
  • इतर मातींच्यामुळे मोठ्या प्रमाणात धूप निर्माण होते परंतु काळ्या मातीमुळे धूप निर्माण होत नाही.
  • काळ्या मातीमध्ये चांगल्या प्रकारे ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असते आणि यामुळे पिके चांगली येण्यास मदत होते.

आम्ही दिलेल्या black soil information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर काळी माती माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या black soil information in marathi language या article मध्ये update करू, मित्रांनो हि information on black soil in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!